‘हे’ चार खाद्य पदार्थ चुकून सुद्धा फ्रीजमध्ये ठेऊ नका

काही भाज्या किंवा फळं जर फ्रीजमध्ये ठेवली तर तुम्ही आजारी पडू शकता.

कारण फ्रीजमध्ये या भाज्या ठेवल्यामुळे त्या खराब होतात आणि त्या वापरून तुमच्या शरीराचं, आरोग्याचं नुकसान होतं.

वाढत्या तापमानात आधुनिक शैलीच्या घरात फ्रीजला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

फ्रीजची गरज प्रत्येक घराला असते. भाज्या, फळं,  दूध, यासारखे काही पदार्थ ठेवण्यासाठी फ्रीजचा प्रत्येक घरी उपयोग केला जातो.

काही वेळा रोजच्या रोज ताज्या भाज्या मिळणं अशक्य असतं, तर कधी रोज बाजार रहाट करणं शक्य नसतं अशा वेळी फ्रीज तुमच्या जीवनात महत्वपूर्ण भुमिका निभावतो.

याच्या मुळे मानवी आयुष्यात साठवण करणं सहज सोपं झालं आहे.

फ्रीजच्या फायद्याबरोबर काही गोष्टीत नुकसान ही होतं. या नुकसानीचा परिणाम थेट आरोग्याशी संबंधित असल्यामुळें याकडे अजिबात दुर्लक्ष करता येत नाही.

तर काही मोजक्या भाज्या किंवा फळं फ्रीजमध्ये कधीच ठेऊ नका.

कोणकोणत्या भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवणं नुकसानकारक ठरू शकतं ते नीट लक्षात घ्या.

1) टोमॅटो

फळभाजी म्हणून ओळखल्या जाणाऱा टोमॅटो प्रत्येक भाजीत ही सामावतो. त्यामुळे भाजी खरेदीत टोमॅटो असतातच.

पण जर टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवले तर आतून पाणी सुटायला लागतं. हळूहळू सगळे टोमॅटो मऊ होऊन कधी खराब झाले कळतच नाही.

म्हणूनच टोमॅटो कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका.

2) केळी

ताजी ताजी रसरशीत केळी खायला सगळ्यांना आवडतात.

ती जर मऊ होऊन काळी पडली तर ती खाण्यात काहीच मजा नाही.

फ्रीजमध्ये ठेवलेली केळी काळी पडतात. त्याचबरोबर आजुबाजुला असणारी फळं आणि भाज्या सुद्धा खराब करतात.

त्यामुळे केळी कधी ही फ्रीजमध्ये ठेऊ नका.

3) कांदे-बटाटे

बाजारातून भाज्या आणि फळं आणली की ती थेट फ्रीजमध्ये ठेवली जातात.

बरेच जण या भाज्यांमध्ये असणारे कांदे बटाटे ही फ्रीजमध्ये खुशाल ठेवतात.

लक्षात घ्या फ्रीजमधले बटाटे डायबेटीस पेशंटसाठी धोकादायक ठरतात.

त्याच कारणं म्हणजे फ्रीजची गार हवा बटाट्यातील स्टार्चचं रूपांतर साखरेत करते.

त्यामुळे बटाटे आठवणीने मोकळ्या ,खुल्या जागेत ठेवा.

कांदे जर फ्रीजमध्ये ठेवलेत तर कांद्याचा वास बाकी सगळ्या पदार्थांना लागतो, आणि पदार्थांची चव ही बदलते.

त्यामुळे कांदे ही फ्रीजबाहेर खुल्या जागेत ठेवा.

तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की काही विशिष्ट फळं आणि भाज्या फ्रीजमध्ये का ठेवायची नाहीत.

तर अगदी आठवणीने या फळांना आणि भाज्यांना तुमच्या किचनमध्ये मोकळी जागा द्या, घरातल्या सगळ्या व्यक्तींना याविषयी माहिती द्या आणि त्यांना फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक करु नका.

Image Credit : MadhurasRecipe

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।