आपलं मूल अर्जुनासारखं असावं कि दुर्योधनासारखं…

Parenting tips

आपल्याला मिळणारी सोय म्हणजे, ती गोष्ट किंवा ती वस्तू नक्की मिळेल पण त्यासाठीची जवाबदारी, काहीतरी करून दाखवण्याची गरज मूलांना समजली तर आयुष्यात पुढे सुद्धा मिळालेल्या सोयीचा सदुपयोग करायची सवय मुलांना लागेल. मगच आपली मुलं दुर्योधनासारखी नाहीत तर अर्जुनासारखी बनतील.

आपण आजकालचे पालक आपल्या मुलांना जे हवं ते त्यांनी मागायचा उशीर कि त्यांच्यासमोर हजर राहील असाच अट्टहास ठेवतो. याच्या मागे कारण असतं कि जे माझ्या लहानपणी मला नाही मिळालं ते माझ्या मुलाला किंवा मुलीला मिळालं पाहिजे. पूर्वी म्हणजे काही २०-२५ वर्ष जरी मागे गेलं तर सोइ इतक्या नव्हत्या. आणि समृद्धी सुद्धा तेव्हा आजच्या इतकी नव्हती. आणि मानसिकतेतला बदल असेल कदाचित कि पालकांमधलं आणि मुलांमधलं नातं हे आजच्याइतकं मित्रत्वाचं सुद्धा नव्हतं. आता हे मित्रत्वाचं नातं नक्कीच मुलांसाठी पोषक आहे. पण या मित्रत्वामध्ये आदरयुक्त भीती सुद्धा तितकीच महत्वाची आहे.

आजकाल मुलांना मिळणाऱ्या सोयी या काळाच्या ओघात आलेल्या आहेत. त्यामुळे त्यात काही वावगे असण्याचा प्रश्न नाही हे तर आलेच. पण या सोयींबरोबर आपण आपल्या मुलांना जवाबदाऱ्या देतो आहोत का हेही लक्षात ठेवणे तितकेच महत्वाचे आहे.

मुलांना लहानपणी मिळणाऱ्या सोयींनबरोबर त्या त्या वयाला साजेशी आणि मुख्य म्हणजे दिलेल्या सोयीबरोबर येणारी जवाबदारी मुलांना समजणे हेही तितकेच महत्वाचे आहे. जवाबदारी समजली नाही तर मिळालेली सोय हि मुलांना आपला हक्क असल्याचे वाटते आणि त्यांना वस्तूची किंवा पैशांची किंमत राहत नाही. त्यासाठी लागणाऱ्या कष्टाची त्यांना गरज वाटत नाही आणि पर्यायाने सहजासहजी सगळे काही मिळण्याची त्यांची सवयच बनते.

आता याचंच प्रतीक म्हणून आपण बघतो महाभारतातले दुर्योधन आणि अर्जुन….. दुर्योधनाला त्याच्या पालकांनी म्हणजेच गांधारी आणि धृतराष्ट्राने आयुष्यातली सगळी सुखं दिली. ते साहजिकच होतं कारण ते हस्तिनापुराचे राज्यकर्ते होते. त्याला सांगितले गेले कि हे राज्य तुझे आहे हे हस्तिनापूर तुझे आहे. पण हे राज्य चालवण्यासाठी लागणारे गुण, जवाबदाऱ्या यांची जाणीव त्याला दिली नाही गेली. बालपणासून मिळालेल्या सगळ्या सुखसोयींनबरोबर दुर्योधनाला त्याचं राज्य सुद्धा विनासायास मिळालं होतं. म्हणूनच तो चांगला राज्यकर्ता होऊ नाही शकला. याउलट अर्जुनाला कुंतीमातेने मिळालेल्या सोयींबरोबर येणाऱ्या जवाबदाऱ्यांची जाणीव ठेवतच वाढवलं होतं.

तर आता आपण स्वतःला हा प्रश्न विचारु कि फक्त आपल्या बालपणी आपल्याला नाही मिळाले म्हणून आपल्या मुलांना फक्त सगळ्या सोयीच उपलब्ध करून द्यायच्या कि त्या सोयींनबरोबर काही जवाबदाऱ्या सुद्धा द्यायच्या. आपल्याला मिळणारी सोय म्हणजे, ती गोष्ट किंवा ती वस्तू नक्की मिळेल पण त्यासाठीची जवाबदारी, काहीतरी करून दाखवण्याची गरज मूलांना समजली तर आयुष्यात पुढे सुद्धा मिळालेल्या सोयीचा सदुपयोग करायची सवय मुलांना लागेल. मगच आपली मुलं दुर्योधनासारखी नाहीत तर अर्जुनासारखी बनतील.

सोयी आणि जवाबदाऱ्या या नक्कीच बॅलन्स असल्या पाहिजेत. जवाबदाऱ्या माहित असू द्यायच्या याचा अर्थ असा नाही कि त्याचा मुलांना तणाव येईल इतपर्यंत जवाबदाऱ्या असाव्यात. पण दिलेल्या सोयीच्या प्रमाणात जवाबदाऱ्यांची जाणीव मुलांना असली तरच ते मोठे होऊन जवाबदार नागरिक किंवा एक यशस्वी माणूस बनू शकतील.

वाचण्यासारखे आणखी काही…..

सफलतेची बिजं बालपणापासूनच मुलांमध्ये रोवली तर….
रोजच्या जीवनात भीतीला जा सामोरे दिलदार मनाने…
प्रत्येक पालकाने मुलांच मनोविश्व समजून घेण्यासाठी वाचावं असं पुस्तक

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!