असाही मदर्स डे…..

हीचा मुलगा आणि सून परदेशात. तेव्हा घरात ही नवरा आणि सासू अशी तीनच माणसे. त्यातही दिवसभर सासूची बडबड चालू असायची. हातपाय हलवता येत नाही मग तोंडाचा पट्टा चालूच. हिलाही तिची सवय झालेली तेव्हडे घर तिच्या बडबडीने भरलेले वाटायचे.

सकाळीच ती व्हाट्सअप बघत बसली होती. मुलाने आज Mothers Day चे विश केले होते. मग ईकडतीकडच्या गप्पा चॅटिंग सुरू झाले आणि ती त्यातच हरवून गेली. “ओ बाईसाहेब ….आहात कुठे ..??? सासूबाईचा छद्मी आवाज कानावर पडताच ती भानावर आली. “वाटलेच मला..सकाळीच तो फोन हातात घेऊन बसली असशील….. आमच्या चहापाण्याचे बघा. काय उपाशीच मारायचा विचार दिसतोय …??”

म्हातारीच्या तोंडाचा पट्टा चालू झाला की ती थांबणार नाही हे माहीत होते तिला. नशीब अंथरूणावरच पडून आहे. हातपाय चालत असते तर मारायलाही कमी केले नसते म्हातारीने. मनात असा विचार करीतच ती उठली आणि सासूबाईंच्या समोर गेली. म्हातारी बेडवर झोपून होती. या वयातही तिचा आवाज खणखणीत होता. आजीसासू झाली तरी सुनेवर अधिकार गाजवण्याची सवय सुटली नव्हती. उठ बस सुनेला टोचून बोलण्यात टोमणे मारण्यात तिला आनंद व्हायचा.

हीचा मुलगा आणि सून परदेशात. तेव्हा घरात ही नवरा आणि सासू अशी तीनच माणसे. त्यातही दिवसभर सासूची बडबड चालू असायची. हातपाय हलवता येत नाही मग तोंडाचा पट्टा चालूच. हिलाही तिची सवय झालेली तेव्हडे घर तिच्या बडबडीने भरलेले वाटायचे.

“आहो …आज मदर्स डे म्हणून शुभेच्छा दिल्या पोराने” ती समजावणीच्या सुरात म्हणाली.

“हो तर …बाहेर राहून फक्त शुभेच्छा द्या. इथे कोण मेला तरी येणार नाही बघायला. काय पण शिकवण दिली लेकाला… ?? माझा लेक बघ कसा.. ?? अजून काळजी घेतो तुझी माझी. त्याने विश केले का मला…? पण काळजी घेतो ना आपली.. ?? तिने हताशपणे मान डोलावली. म्हातारी कधी सरळ बोलणार नाही. मुकाटपणे स्वयंपाक घरात शिरली.

संध्याकाळी बेल वाजली. दरवाजा उघडला तर दारात नवरा हातात केकचा बॉक्स घेऊन उभा.

“आईसाठी आणलात का…? तिने हसून विचारले.

“छे ग…! मी कसला आणतोय स्वतःहून. आईने फोन करून आठवण केली. ह्यांनी कपाळावर आठ्या आणत उत्तर दिले.

“म्हणजे म्हातारीला ही मदर्स डे साजरा करायचा तर??? ती हसून बोलली. जा …..जा …लवकर म्हातारीला केक कापायचा आहे. मदर्स डे साजरा करा”.

तो कपाळावर आठ्या आणून आईच्या खोलीत शिरला. हिला त्यात इंटरेस्ट नव्हता पण सासूने हाक दिली तशी तीही खोलीत शिरली. टेबलवर केक ठेवला होता. तिने डोळे वटारून हिच्याकडे पाहिले “बघतेस काय अशी चल केक काप…” हिच्या लक्षात येईना काय चालू आहे. नवरा ही हैराण. “आई तुझ्यासाठी आणलाय ना…?? मग तूच काप ..??”

“मूर्खां ….! हे माझे वय आहे काय ?? आज तिचा दिवस आहे.. ?? ती आई आहे. मुलगा नाही घरी म्हणून काय झाले… ? माझी तर मुलीसारखी काळजी घेते ना.. ? सर्व करते माझे. माझे हट्ट पुरविते. माझी बोलणी खाते. माझे औषधपाणी करते. माझी आईच आहे ती. मग तिचा दिवस साजरा करायला नको का ?? ती आई आहे माझी. हॅपी मदर्स डे.” असे म्हणून टाळ्या वाजवू लागली.

खरेच आज मदर्स डे तिच्या घरात खऱ्या अर्थाने साजरा झाला.

वाचण्यासारखे आणखी काही…..

गिऱ्हाईक
सिझरिंग
तिची ही होळी

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय