संधिवात होऊ नये म्हणून ह्या ११ सोप्या सवयी लावून घ्या

पस्तिशीनंतर हाडांमधील कॅल्शियम कमी होऊ लागते. हळूहळू हाडांची घनता कमी होते आणि उतारवयात संधिवाताचा (आर्थरायटिस) त्रास सुरू होतो. भारतात जवळजवळ ६५ ते ७० % ज्येष्ठ नागरिकांना संधीवाताचा सामना करावा लागतो.

संधिवाताचे निरनिराळे अनेक प्रकार आहेत. सांधे दुखणे, पाठ- कंबर दुखणे, मान दुखणे, हातपाय दुखणे, शरीरावर सूज येणे, स्नायू आखडणे अशी संधिवाताची लक्षणे असू शकतात.

कॅल्शियमची कमतरता, विटामिन ‘डी’ ची कमतरता, शरीरात आम, वात, पित्त यांचा प्रकोप होणे या कारणांमुळे संधिवाताचा त्रास होऊ शकतो. सहसा हा त्रास तरुणवयात जाणवत नाही, प्रौढ आणि वयस्कर लोकांना याचा त्रास जाणवतो.

पण हल्ली बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि निकृष्ट अन्नाचे सेवन यामुळे तरुणांना देखील हा त्रास जाणवू लागला आहे.

उतारवयात संधीवाताचा त्रास होऊ नये म्हणून तरुणपणापासूनच काळजी घेतली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशा ११ सवयी सांगणार आहोत ज्या अगदी सहज सोप्या असून त्या जर आपण स्वतःला वेळीच लावून घेतल्या तर पुढे जाऊन संधीवाताचा त्रास होणार नाही.

जाणून घ्या अशा कोणत्या ११ सवयी आहेत

१. वजन कायम आटोक्यात ठेवा

उतारवयात संधीवातापासून वाचण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे आपले वजन कायम आटोक्यात ठेवणे. वजन वाढले की त्या स्थूलतेचा परिणाम गुडघे, हिपजॉइंटस, माकडहाड इथल्या सांध्यांवर होतो. वाढलेल्या वजनामुळे हे सांधे कमकुवत होऊ लागतात आणि संधीवाताचा त्रास होतो. म्हणून तरुणपणापासूनच योग्य, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांची सवय लावून घेऊन वजन आटोक्यात ठेवावे.

२. ग्रीन टी प्या

संधिवात आणि हाडांचे आरोग्य यासंबंधी केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की नियमितपणे ग्रीन टी पिण्यामुळे सांध्यांना अथवा स्नायूंना सूज येण्याचे प्रमाण कमी होते, इन्फेक्शनचे प्रमाण कमी होते, तसेच सांधेदुखी कमी होते.

सांधे आणि त्यांना जोडणार्‍या चकत्या (कार्टिलेज) यांचे आरोग्य चांगले राखण्यासदेखील नियमितपणे केलेले ग्रीन टी चे सेवन उपयोगी पडते. ग्रीन टी पिण्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास सुद्धा मदत होते.

३. नेहमी स्ट्रेचिंग करा

सतत एका जागी बसून काम करण्यामुळे किंवा संपूर्ण वेळ तेच तेच काम करण्यामुळे संधिवात होण्याचा धोका वाढतो असे दिसून आले आहे. त्यामुळे काम करत असताना मध्ये उठून शारीरिक हालचाली करणे, स्ट्रेचिंग करणे फायदेशीर ठरते. अशाप्रकारचे स्ट्रेचिंग करण्यामुळे कामातून ब्रेक मिळून तोचतोचपणा टाळला जातो आणि काम पुन्हा सुरू करण्यास नवा उत्साह मिळतो.

४. सकारात्मक विचार करा

सकारात्मक विचारसरणीचा आपल्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होतो असे संशोधनाअंती आढळून आले आहे. नेहमी सकारात्मक, पॉझिटिव्ह विचार करण्यामुळे शरीराच्या वेदना कमी होतात, उत्साह वाढतो. याचा उतारवयात संधिवात होऊ नये यासाठी निश्चित उपयोग होतो.

५. आहारात मासे खाण्याचे प्रमाण वाढवा

माशांमध्ये असणारे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड संधिवाताचा त्रास कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. एका सर्व्हेनुसार असे आढळून आले आहे की आठवड्यातून किमान दोन वेळा मासे खाणाऱ्या व्यक्तींमध्ये संधिवाताचे प्रमाण खूप कमी आढळून आले आहे.

६. लिफ्ट ऐवजी जिन्याचा वापर करा

कोणत्याही इमारतीत शिरलो की आपण सहजपणे लिफ्टकडे वळतो. परंतु असे न करता जर आपण नियमितपणे जिन्याचा वापर केला तर गुडघ्याचे आणि घोट्याचे सांधे वापरले जाऊन ते सशक्त बनतात. तरुण वयापासूनच नेहमी जिन्याचा वापर केला तर उतारवयात सांधेदुखीचा त्रास होत नाही.

७. नियमितपणे व्यायाम करा

आपण हे पाहिले की सांधेदुखी (आर्थरायटिस) होऊ नये असे वाटत असेल तर वजन आटोक्यात ठेवणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे शरीराची सुयोग्य हालचाल होत राहणे हे देखील आवश्यक आहे. म्हणूनच तरुण वयापासूनच योग्य प्रकारचा व्यायाम करण्याची सवय लावून घ्या.

असे करण्यामुळे आपले शरीर सशक्त आणि सुदृढ तर बनतेच शिवाय सांध्यांचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. दररोज किमान ३० ते ३५ मिनिटे असा आठवड्यातून किमान चार दिवस तरी व्यायाम करावा असे तज्ञ सांगतात.

८. रंगीबेरंगी आहार घ्या

गंमत वाटली ना? परंतु लहान मुलांना जसे खाण्याच्या पदार्थांचे आकर्षण वाटावे म्हणून आपण वेगवेगळ्या रंगाचे पौष्टिक पदार्थ खाण्यास देतो तसेच मोठ्या माणसांनी ही आपल्या आहारात वेगवेगळ्या रंगाच्या पौष्टिक पदार्थांचा आवर्जून समावेश करावा. ह्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, वेगवेगळ्या रंगाची फळे, मोड आलेली कडधान्य, मांसाहार यांचा समावेश असावा. पांढऱ्या रंगाची साखर आणि मीठ यांचा वापर कमीत कमी असावा. अशा प्रकारचा आहार तरूण वयापासून नियमितपणे घेतल्यास उतारवयात संधीवाताचा त्रास होत नाही.

९. जागरण करणे टाळा

फार जागरण करणे शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे हे सिद्ध झाले आहे. दररोज शक्यतो एकाच वेळी झोपल्यामुळे शरीराचे जागृतावस्था आणि झोप हे चक्र चांगल्या प्रकारे चालते आणि त्यामुळे संधिवाताची शक्यता कमी होते शिवाय होणाऱ्या वेदना कमी होतात. वेळेवर झोपल्यामुळे आणि पुरेशी झोप घेतल्यामुळे स्ट्रेस, अस्वस्थता, ताण तणाव आणि नैराश्‍य कमी होण्यास मदत होते.

१०. धूम्रपान करू नका

धूम्रपान करणे आरोग्याला घातक आहे हे तर सर्वांना माहीत आहेच. धूम्रपानाच्या अनेक दुष्परिणामांपैकी एक म्हणजे संधिवात. निकोटीन आणि कार्बन मोनॉक्साईडच्या सेवनामुळे सांध्यांवर थेट परिणाम होतो हे या विषयात केलेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्याशिवाय धूम्रपान करण्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका देखील असतो. म्हणून धूम्रपान करणे टाळावे.

११. बेकिंग सोड्याचे सेवन करा

बेकिंग सोडा पाण्यामध्ये मिसळून त्याचे सेवन केल्यास शरीराच्या आरोग्याला वेगवेगळे फायदे होतात. सांध्यांना येणारी सूज, होऊ शकणारे इन्फेक्शन यावर हा उपाय प्रभावी आहे असे आढळून आले आहे. परंतु अर्थातच हा उपाय करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

तर ह्या आहेत अशा ११ सोप्या सवयी ज्या आपण तरुणपणापासूनच लावून घेतल्या तर भविष्यात होऊ शकणारा संधिवाताचा (आर्थरायटिस) त्रास आपण टाळू शकतो.

मित्र-मैत्रिणींनो, या सोप्या सवयी अवश्य लावून घ्या आणि तुम्हाला याचे झालेले फायदे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांना मिळावी म्हणून हा लेख शेयर करायला विसरू नका.

कंबरदुखीची कारणे लक्षणे आणि उपाय

गुडघेदुखीची कारणे, लक्षणे आणि उपाय

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय