लहान मुलं तणावाखाली असण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय

तुमचे लहान मूल तणावाखाली आहे का? हे कसे ओळखावे?

जाणून घ्या लहान मुलांच्या तणावाची कारणे, मुले तणावाखाली आहेत ह्याची लक्षणे, आणि पालक नेमकी कशी मदत करू शकतात.

तणाव किंवा स्ट्रेस हा काही फक्त मोठ्या माणसांनाच असतो असे नाही, लहान मुलांना देखील स्ट्रेस जाणवू शकतो. फक्त त्याची कारणे वेगळी असतात आणि काही वेळा ती कारणे मोठ्या माणसांच्या लक्षात येत नाहीत आणि त्यामुळे मुलांच्या तणावाकडे दुर्लक्ष केले जाते.

आज आपण लहान मुलांना सामोरे जावे लागणारे ताण-तणाव, त्यांची कारणे आणि तणावात असणाऱ्या मुलांचे वागणे ह्या महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तसेच मुलांना ह्या बाबतीत पालक नेमकी कशी मदत करू शकतात हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

लहान मुलांमधील स्ट्रेस

मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांनादेखील ताण तणावाचा सामना करावा लागतो, हे वारंवार सिद्ध झाले आहे. लहान मुलांमधील ताणाची वेगवेगळी कारणे असतात.

भोवतालच्या परिस्थितीत अचानक झालेला बदल, एखादी नवीन ऍक्टिव्हिटी सुरू करणे किंवा एखादे आजारपण यापैकी कोणत्याही कारणामुळे लहान मुलांना स्ट्रेस येऊ शकतो.

बहुतांश वेळा लहान मुलांमधील स्ट्रेस हा नकारात्मक गोष्टीमुळे आलेला असतो, परंतु काही वेळा काही चांगल्या गोष्टींचा देखील मुलांच्या मनावर ताण येऊ शकतो. परीक्षेत उत्तम यश मिळवणे ही यापैकीच एक गोष्ट. नकळतपणे या गोष्टीचा देखील मुलांच्या मनावर खूप ताण येतो.

लहान मुलांच्या मनावर येणाऱ्या ताणाची कारणे

१. दुखणे, वेदना, आजारपण

२. एखाद्या मोठ्या दुखण्यावरील लांबलेले औषधोपचार

३. शाळेत वर्गमित्रांकडून किंवा शाळेतील मोठ्या मुलांकडून चिडवले जाणे किंवा बुली केले जाणे

४. शाळेत, कुटुंबात किंवा मित्रपरिवारात सतत नकारात्मक बोलणी ऐकावी लागणे

५. आई-वडिलांमध्ये तणाव असेल तर त्याचा थेट परिणाम मुलांवर होतो

६. परीक्षेतील किंवा एखाद्या स्पर्धेतील चांगल्या कामगिरीबद्दलचा ताण

७. अतिशय जवळच्या व्यक्तीचा मृत्यू (उदाहरणार्थ आजी किंवा आजोबा )

८. आईवडिल किंवा इतरांकडून सतत कोणाशीतरी तुलना केली जाणे.

या आणि अशा विविध कारणांमुळे लहान मुले तणावाखाली असतात. परंतु बरेच वेळा ही गोष्ट पालकांच्या लक्षात येत नाही.

लहान मूल तणावाखाली असेल तर दिसून येणारी लक्षणे

बहुतेक वेळा आपले मूल तणावाखाली आहे हे पालकांच्या लक्षात येत नाही. परंतु असे होऊ नये आणि आपल्या मुलाच्या स्ट्रेसचे कारण आपल्या वेळीच लक्षात यावे म्हणून लहान मूल तणावाखाली असेल तर त्याच्या वागण्यात काय बदल होतात, नेमकी कोणती लक्षणे दिसतात हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.

लहान मुले जर तणावाखाली असतील तर त्यांच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही बदल दिसून येतात. मुलांच्या वागण्यात बदल होतो, स्वभावात बदल होतो.

१. शारीरिक लक्षणे

  • भूक न लागणे
  • झोप न येणे
  • वारंवार उद्भवणारी डोकेदुखी
  • कारणाशिवाय होणारी पोटदुखी
  • भीतीदायक स्वप्ने पडणे
  • रात्री बिछाना ओला करणे

२. वागणुकीतील बदल

  • चिडचिड
  • आक्रस्ताळेपणा
  • अचानक अबोल आणि गप्प होणे
  • विनाकारण रडणे, मुसमुसणे
  • खूप घाबरणे
  • कोणत्याही खेळात अथवा ऍक्टिव्हिटी मध्ये भाग न घेणे
  • पालकांना स्वतःपासून दूर न जाऊ देणे
  • संतापून वर्ग मित्रांना मारणे

अशा वेळी मुलांना पालक नेमकी काय मदत करू शकतात?

आपले मुल तणावाचा सामना करत आहे ही गोष्ट कोणत्याही पालकांसाठी सहन करायला अवघड अशी आहे. पालकांना आपले मूल ताणाखाली आहे हे समजले की त्याचा प्रचंड त्रास होतो आणि ते स्वतःच खूप तणावाखाली येतात.

परंतु अशा वेळी पालकांनी स्वतः शांत राहणे अतिशय आवश्यक असते. स्वतः शांत राहिले तरच पालक मुलांना मदत करू शकतील.

आपल्या तणावाखाली असलेल्या मुलाला पालक नेमकी कशा प्रकारे मदत करू शकतात ते आपण सविस्तरपणे पाहूया.

१. घरातील वातावरण सकारात्मक, आनंददायी आणि सुरक्षित वाटेल असे ठेवा.

घरातील वातावरण जितके चांगले असेल तितके मूल जास्त आनंदी राहू शकेल. आईवडिल आनंदी आहेत आणि आपल्या पाठीशी आहेत हे लक्षात आल्यावर मुलांचा ताण कमी होतो.

२. आपले मूल टीव्ही किंवा इंटरनेटचा वापर करून नेमके कोणते कार्यक्रम पाहते यावर लक्ष ठेवा.

काहीवेळा टीव्ही किंवा इंटरनेटच्या माध्यमातून मुलांना घाबरवणारे, ब्लॅक मेल करणारे कार्यक्रम प्रसारित होतात. त्याचा ताण मुलांच्या मनावर येऊ शकतो. अशा बाबतीत मुले पालकांशी संवाद साधायला घाबरतात म्हणून पालकांनीच त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक असते.

३. मुलांना वेळ द्या.

हल्लीच्या धावपळीच्या जगात आई-वडील दोघेही आपापल्या करिअरमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांच्यापाशी मुलांना देण्याकरता फार थोडा वेळ उपलब्ध असतो.

परंतु जो उपलब्ध वेळ आहे तो मात्र मुलांबरोबर अतिशय चांगल्या प्रकारे व्यतीत करा. मुलांच्या सर्व ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्या, त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या, त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधा. यामुळे मुले देखील त्यांच्या मनातली भीती पालकांना सांगू शकतील.

४. मुलांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या.

बहुतेक वेळा पालकांना मुलांचे म्हणणे ऐकून घेण्यात फारसा रस नसतो. बरेचसे पालक मुलांचे म्हणणे अर्धवट ऐकून त्यावर ताबडतोब आपले मत व्यक्त करून मुलांना गप्प बसवतात.

परंतु असे न करता मुलांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या. त्यावर आधीपासूनच आपले मत बनवणे, टीका-टिप्पणी करणे टाळा. मुलांच्या मतांचा आदर करा. असे करण्यामुळे तुमचे मूल तुमच्यावर विश्वास ठेवून त्याच्या मनातील गोष्टी तुमच्याशी बोलू लागेल.

५. मुलांवर परीक्षेतील यशाची सक्ती करू नका.

बहुतेक वेळा महत्त्वाकांक्षी पालक आपल्या मुलाची कुवत न ओळखता त्याच्यावर परीक्षेतील विविक्षित यशाची सक्ती करतात. पालकांना बरे वाटावे, त्यांनी आपल्यावर रागवू नये या कारणांमुळे मूल तणावाखाली असूनही प्रयत्न करत राहते.

परंतु काही मुलांना हा विशिष्ट ताण झेपत नाही म्हणूनच पालकांनी मुलांवर शैक्षणिक अथवा इतर कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवण्याची सक्ती करू नये. मुलांच्या कलाने घेऊन त्यांना आवडेल त्या पद्धतीने अभ्यास करू द्यावा.

६. मुलांना आत्मविश्वास द्या.

तणावाखाली असणारी मुले आपला आत्मविश्‍वास गमावून बसतात. अशावेळी त्यांचा आत्मविश्वास परत मिळवून देण्याचे काम पालकांचे असते.

सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रेम या दोन गोष्टींच्या जोरावर पालक मुलांमधील आत्मविश्वास पुन्हा जागवू शकतात. मुलाने मिळवलेले छोटेसे यश देखील साजरे करावे असे करण्यामुळे मूल आनंदी होऊन त्याचा आत्मविश्वास दुणावतो.

७. तज्ञांची मदत घ्या.

वर सांगितलेले सगळे उपाय करूनही जर तुमचे मूल तणावाखाली असेल तर त्याला किंवा तिला या तणावातून बाहेर काढण्यासाठी या विषयातील लहान मुलांसाठीच्या तज्ञांची मदत अवश्य घ्या.

लहान मुलांमधील तणाव दूर करण्यासाठी कौन्सिलर किंवा लहान मुलांचे मनोविकारतज्ञ उत्तम प्रकारे काम करू शकतात. अशा प्रकारची मदत घेणे हा कोणत्याही प्रकारचा कमीपणा नसून उलट त्यामुळे आपले मूल लवकरात लवकर तणावातून बाहेर येऊन एक आनंदी आयुष्य जगू शकेल.

तर अशाप्रकारे आज आपण लहान मुलांमधील ताणतणावाची कारणे, लक्षणे आणि पालक त्यांना कशाप्रकारे मदत करू शकतात याविषयीची माहिती पाहिली.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून हा लेख जरूर शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “लहान मुलं तणावाखाली असण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय”

  1. Namskar majhe nav era aahe mi ek single mother aahe actually mi jya colony madhye rahate tithe majhya mulinbarobar chi lahan mothi mul muli aahet pn problem ha aahe ki ji mul पहिल्यापासून कॉलनीमध्ये आहेत ती माझ्या mulinbarobar खूप विचित्र वागतात , तिच्याबरोबर कोणी खेळत नाही आणि जर कोणी खेळायला आलेच तर बाकीची मुल त्या दुसऱ्या मुलाच्या घरी जावून माझी मुलगी किती वाईट आहे नको खेळु म्हणून सांगतात ज्यामुळे माझी मुलगी खूप एकटी पडते , बाकीच्या मुलांना खेळताना पाहून नाराज होते , समस्या ही आहे की दुसऱ्या मुलांची आई वडील दिसून ही ह्या गोष्टी दुर्लक्ष करतात are pn तुमच्या मुलाच्या अश्या वागण्याने एखादे मूल तणावात जाते की ज्याची चूक नसताना ही त्याला का ही वाईट वागनुक दिली जाते, एक आई म्हणून खूप वाईट वाटते , ह्या गोष्टी आपण काहीच करू शकत नाही ह्याची खंत वाटते , कृपया काही उपाय असेल तर नक्की कळवा .

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय