रात्री लवकर आणि शांत झोपण्याचे पाच आश्चर्यचकित करणारे फायदे

झोप न येण्याची कारणे व उपाय झोप येण्यासाठी आयुर्वेदिक औषध झोपेच्या गोळीचे नाव झोप येण्यासाठी घरगुती उपाय झोप का लागत नाही झोप येण्यासाठी मंत्र झोपेचा विकार झोप झोप

रात्रीच्यावेळी पुरेशी झोप घेण्यामुळे आरोग्याला होणारे फायदे समजून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

दिवसभर कामे करून दमलेले आपले शरीर आणि मन रात्रीच्या वेळी पुरेशी विश्रांती घेतल्यामुळे ताजेतवाने होते. पुरेशी झोप झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काम करण्याचा उत्साह वाढतो, कंटाळा आणि मरगळ नाहीशी होते.

दुसऱ्या दिवशी आपला मूड चांगला ठेवणे किंवा डोळ्यांभोवती काळी वर्तुळे न दिसणे यापेक्षा खूप जास्त फायदे रात्री लवकर आणि पुरेसा वेळ झोपल्यामुळे मिळतात. पुरेशी झोप आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम तर करतेच त्याशिवाय कामजीवन सुधारण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरते.

यावरून आपल्या असे लक्षात येते की रात्रीच्या वेळी योग्य कालावधीसाठी आणि शांत झोप घेणे अतिशय आवश्यक आहे.

परंतु काही लोकांच्या बाबतीत हे शक्य होत नाही. त्याची अनेक वेगवेगळी कारणे असतात.

रात्री नीट झोप न येण्याची कारणे नेमकी कोणती?

१. झोपेचे नियमित वेळापत्रक नसणे

दररोज वेगवेगळ्या वेळी झोपल्यामुळे आपल्या शरीराला झोपण्याची आणि उठण्याची एक ठराविक वेळ अशी सवय लागत नाही. जर आपण दररोज ठराविक वेळी झोपण्याची सवय करून घेतली तर आपल्या शरीराचे बॉडी क्लॉक योग्य पद्धतीने चालते आणि रोज नेमक्या त्याच वेळी बरोबर शांत व गाढ झोप लागते.

२. रात्रीचे जेवण उशिरा घेणे

रात्री लवकर झोप न लागण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. उशिरा जेवल्यामुळे अन्नपचन होण्यास पुरेसा वेळ मिळत नाही आणि त्यामुळे झोप उशिरा लागते तसेच लागलेली झोप शांत आणि गाढ नसते. जर आपण पण झोपण्याच्या वेळेपूर्वी किमान दोन तास आधी जेवण केले तर अन्नपचनास पुरेसा वेळ मिळून नंतर शांत झोप लागण्यास मदत होते.

३. झोपण्यापूर्वी मोबाईल इंटरनेट अशा गॅजेट्सचा वापर करणे

झोपण्यापूर्वी किमान एक तास सर्व गॅजेट्स बंद करून ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा मोबाईल टीव्ही इत्यादीच्या वापरामुळे आपला मेंदू कार्यरत राहतो, तसेच डोळे देखील स्क्रीनच्या प्रकाशामुळे जागृतावस्थेत राहतात. असे झाल्यामुळे शरीराला मेंदूकडून झोपण्याचे आदेश मिळत नाहीत व आपण जागे राहतो. यासाठी झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी सर्व गॅजेट्स बंद करावेत, तसेच रात्री उशिरापर्यंत मित्रमंडळी नातेवाईक यांच्याशी गप्पा मारत बसू नये.

४. झोपण्याच्या खोलीत खेळती आणि स्वच्छ हवा नसणे

जर आपल्या झोपण्याच्या खोलीत स्वच्छ हवा नसेल, खोलीला चांगले व्हेंटिलेशन नसेल तर तेथे शांत झोप लागणे अवघड होऊन बसते. खूप उकडत असताना किंवा खूप थंडी वाजत असताना गाढ झोप लागू शकत नाही. म्हणून खेळती हवा असणारी, मोठ्या खिडक्या आणि दरवाजे असणारी खोली झोपण्यासाठी निवडावी.

वरील कारणांमुळे रात्री लवकर गाढ आणि शांत झोप लागत नाही. परंतु आपण यावर योग्य उपाय केल्यास निश्चितपणे रात्रीची शांत झोप मिळवू शकतो.

रात्रीच्या वेळी पुरेशी गाढ आणि शांत झोप मिळवल्यास आरोग्याच्या दृष्टीने खालील फायदे होतात.

१. रोगप्रतिकारक शक्ती वाढते

आपले शरीर आपण झोपलेलो असताना विशिष्ट प्रकारच्या हार्मोन्सची निर्मिती करून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. त्याचप्रमाणे शरीरातील अंतर्गत अवयवांची झीज भरून काढण्याचे काम देखील आपण झोपलेलो असताना केले जाते.

आपण झोपलेलो असताना आपला मेंदू कार्यरत राहून ही सर्व कामे करत असतो. म्हणून रात्रीच्या वेळी शांत आणि गाढ अशी पुरेशी झोप घेतल्यास आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

२. प्री मॅच्युअर एजिंग (अकाली म्हातारपण ) होत नाही

संपूर्ण शरीराला होणारा रक्तपुरवठा आणि त्वचेचे आरोग्य या दोन गोष्टींसाठी शरीराला पुरेशी झोप मिळणे आवश्‍यक असते. पुरेशी झोप मिळाल्यास त्वचा कोरडी पडणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसणे किंवा शरीर दमलेले असणे ही लक्षणे दिसत नाहीत.

पुरेशी झोप मिळाल्यामुळे उत्साही आणि ताजेतवाने वाटते याचाच अर्थ प्री मॅच्युअर एजिंग होत नाही.

३. वजन कमी करण्यास मदत होते

जर तुमची वजन कमी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही दररोज रात्री पुरेशी झोप घेणे अतिशय आवश्यक आहे. शरीराचा चयापचयाचा वेग वाढवून वजन लवकर कमी करण्यात झोपेचा महत्त्वाचा रोल असतो.

त्याच प्रमाणे झोपेमुळे पुरेशी विश्रांती घेतल्यास व्यायाम करण्यासाठी भरपूर उत्साह मिळतो परिणामी वजन कमी होण्यास मदत होते. पुरेशी झोप घेतल्यास शरीरातील हार्मोन्सचे संतुलन चांगले राखले जाते ज्यामुळे खाण्यावर कंट्रोल राहून वजन कमी होण्यास मदत होते.

४. जखमा किंवा एक्सीडेंट होण्याची शक्यता कमी होते

वाचताना कदाचित यावर विश्वास बसणार नाही, परंतु पुरेशी झोप घेतलेली असल्यास वेगवेगळ्या जखमा किंवा एक्सीडेंट होण्याची शक्यता कमी होते हे संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे.

पुरेशी झोप घेतलेली असल्यास आपला मेंदू तरतरीत राहतो आणि पूर्ण कार्यक्षमतेने कार्य करतो. असे झाल्यामुळे आपण जागे असताना सदैव सावध असतो परिणामी जखमा किंवा एक्सीडेंट होण्याची शक्यता कमी होते.

लहान मुलांमध्ये देखील वेळच्यावेळी आणि पुरेशी झोप घेणारी मुले तोल जाऊन पडणे किंवा दमलेली असल्यामुळे पडणे अशा गोष्टींची शिकार होत नाहीत.

यावरून आपल्याला पुरेशी झोप घेण्याचे महत्त्व सहज समजून येते.

५. कामजीवन सुधारते

पुरेशी झोप घेण्यामुळे शरीरातील सर्व अवयवांचे कार्य सुधारते, स्मरणशक्ती आणि कॉन्सन्ट्रेशन वाढते, हृदयरोग आणि उच्च रक्तदाब यांची शक्यता कमी होते हे तर आपण सर्व जाणतोच.

परंतु याशिवाय पुरेशी झोप घेण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे आणि तो म्हणजे अशा व्यक्तीचे कामजीवन निश्चितपणे सुधारते. बहुतांश वेळा अयशस्वी कामजीवनात जोडप्यापैकी एखादा किंवा दोघेही दमलेला आणि निरुत्साही असणे हे एक महत्त्वाचे कारण असते.

परंतु तेच जर पुरेशी झोप घेतल्यामुळे शरीराला आवश्यक असणारी विश्रांती मिळालेली असेल कामजीवन सुधारण्यास खूप मदत होते. स्त्रिया आणि पुरुषांमधील कामजीवनाशी निगडीत असणाऱ्या समस्या दूर होण्यास पुरेशी झोप घेण्यामुळे खूप मदत होते.

तर मित्र मैत्रिणींनो, याचाच अर्थ रात्रीच्या वेळी गाढ व शांत अशी पुरेशी झोप आपण घेतली तर हे सर्व आश्चर्यकारक फायदे आपल्याला मिळू शकतात.

हे सर्व आरोग्यविषयक फायदे मिळविण्यासाठी दररोज रात्री पुरेशी झोप घ्या. स्वतःला तशी सवय लावून घ्या.

तसेच ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख शेयर करायला विसरू नका.

आनंदी रहा स्वस्थ रहा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!