प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स नसतानासुद्धा होमलोन मिळणे शक्य आहे का?

प्रॉपर्टीची डॉक्युमेंट सादर न करता सुद्धा बँक अथवा वित्तीय संस्थेकडून होमलोन मिळू शकते का?

याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

घर खरेदी करताना जर होमलोनची आवश्यकता असेल तर लोनसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला कर्ज देणाऱ्या बँक अथवा वित्तीय संस्थेला निरनिराळी कागदपत्रे सादर करावी लागतात. या कागदपत्रांमध्ये अर्जदाराचे ओळखपत्र, त्याला मिळणाऱ्या उत्पन्नाचा स्त्रोत आणि दाखला आणि ज्या प्रॉपर्टीसाठी लोन घ्यायचे आहे त्या प्रॉपर्टीची सर्व कायदेशीर आणि ओरिजिनल कागदपत्रे यांचा समावेश होतो.

परंतु जर अर्जदाराकडे प्रॉपर्टीची डॉक्युमेंट्स नसतील तर काय होते? डॉक्युमेंटशिवाय घरखरेदीसाठी होमलोन मिळणे शक्य होते का? आज आपण हीच माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

होमलोन मिळण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. अर्जदाराला बँक अथवा वित्तीय संस्थेने मागितलेली सर्व कागदपत्रे काटेकोरपणे सादर करावी लागतात. यामागे नेमके कारण काय असते?

बँका अथवा वित्तीय संस्था ज्या मालमत्तेच्या खरेदीसाठी होमलोन द्यायचे आहे त्या मालमत्तेची सर्व डॉक्युमेंट्स का मागतात?

गृहकर्ज अप्रूव्ह करण्याआधी बँका अथवा वित्तीय संस्था त्या त्या प्रॉपर्टीच्या डॉक्यूमेंटसची मागणी करतात, त्यामागे खालील कारणे असतात.

१. अंडर-कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी

ज्या प्रॉपर्टीसाठी होमलोन मंजूर करायचे आहे ती जर अंडर-कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी असेल तर भविष्यात त्या प्रॉपर्टीचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी काही अडचण तर येणार नाही ना? अशी प्रॉपर्टी निर्माण करणारा बिल्डर विश्वासपात्र आणि चांगले रेप्युटेशन असणारा आहे ना? बिल्डरने सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली आहे ना ह्याची खात्री करून घेण्यासाठी बँका अथवा वित्तीय संस्था प्रॉपर्टी डॉक्यूमेंटची मागणी करतात.

२. रीसेल प्रॉपर्टी

ज्या फ्लॅटसाठी होमलोनचा अर्ज सादर झाला आहे तो जर रिसेलचा फ्लॅट असेल तर बँक अथवा वित्तीय संस्था सदर फ्लॅटच्या मूळ मालकाबद्दल संपूर्ण खात्री करून घेण्यासाठी प्रॉपर्टी डॉक्युमेंट्सची मागणी करतात.

घर विकणारा मूळ मालक हा खरोखर त्या घराचा मालक आहे ना? त्याच्याजवळ असणारी सर्व प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स ओरिजनल आहेत ना या गोष्टींची खात्री करून घेण्यासाठी प्रॉपर्टी डॉक्यूमेंटची आवश्यकता असते. तसेच सदर प्रॉपर्टीवर आधीच एखादे कर्ज नाही ना हे देखील तपासणे महत्वाचे असते.

३. प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स हे तारण

जेव्हा एखादी बँका अथवा वित्तीय संस्था अर्जदाराला होमलोन पुरवते तेव्हा, ज्या प्रॉपर्टीसाठी होमलोन घेतलेले असते ती प्रॉपर्टी लोन पुरवणाऱ्या बँकेकडे गहाण ठेवलेली असते. प्रॉपर्टी गहाण असण्याचा पुरावा म्हणून प्रॉपर्टीची सर्व ओरिजनल डॉक्युमेंट्स बँकेकडे जमा करणे आवश्यक असते.

कर्जदाराने होमलोन संपूर्ण फेडल्यानंतर त्याला प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स बँकेकडून परत मिळतात.

होमलोनची/गृहकर्जाची परतफेड केल्यानंतर या ८ गोष्टी लक्षात असू द्या

होमलोन घेताना नेमकी कोण कोणती प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स सादर करावी लागतात?

होमलोन घेताना अर्जदाराला बँका अथवा वित्तीय संस्थेकडे खालील डॉक्युमेंट्स जमा करणे आवश्यक असते.

१. अलॉटमेंट लेटर, प्रॉपर्टीचे अग्रीमेंट, खरेदीखत, सेल डीड

२. बिल्डरकडून अथवा हाउसिंग सोसायटीकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट

३. प्रॉपर्टीचे पझेशन लेटर

४. मालमत्ताकर भरल्याच्या पावत्या

५. जर प्रॉपर्टी बांधून तयार असेल तर ऑक्युपन्सी सर्टिफिकेट

प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स शिवाय लोन मिळणे शक्य आहे का?

वर नमूद केलेल्या प्रॉपर्टी डॉक्युमेंट्सपैकी काही अथवा सगळी डॉक्युमेंट्स जर अर्जदाराकडे नसतील तर अशा अर्जदाराला बँक अथवा वित्तीय संस्थेकडून गृहकर्ज मिळू शकते का?

खरे तर वर दिलेल्या यादीत सांगितलेली सर्व डॉक्युमेंट सादर केल्याशिवाय होमलोन अप्रूव्ह होणे शक्य नसते.

बँका अथवा वित्तीय संस्था सर्व प्रॉपर्टी डॉक्युमेंट्सची काटेकोरपणे छाननी करून मगच होमलोन सॅंक्शन करतात.

परंतु, अर्जदाराकडे जर काही प्रॉपर्टी डॉक्यूमेंट नसतील तरीही गृहकर्ज मिळवण्याचा एक मार्ग आहे. तो म्हणजे Pre-approved होमलोन.

Pre-approved होमलोन म्हणजे नेमके काय?

Pre-approved होमलोनमध्ये प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स नसली तरी केवळ तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला गृहकर्ज मंजूर होऊ शकते. कोणती प्रॉपर्टी खरेदी करायची हे ठरवण्याआधीच Pre-approved होमलोन मंजूर होऊ शकते. त्यासाठी अर्जदाराची लोन फेडण्याची क्षमता लक्षात घेतली जाते.

त्यामुळे आपल्याला नेमके किती होमलोन मंजूर होऊ शकेल याची माहिती काढून त्यानुसार बजेटमध्ये बसणारे घर खरेदी करण्यासाठी हा पर्याय उत्तम आहे.

Pre-approved होमलोनचे फायदे

१. आपल्या एलिजिबिलिटीनुसार नेमके किती लोन मिळू शकेल याची माहिती आधीच कळते.

२. गृहकर्जाची रक्कम आधीच कळल्यामुळे आपल्या बजेटमध्ये बसणारे घर शोधणे सोपे होते

३. खरेदी करण्याचे घर निश्चित झाले की पुढची प्रोसिजर सोपी आणि भरभर होते.

४. होमलोन मंजूर होण्याच्या प्रोसेसमध्ये प्रॉपर्टी डॉक्यूमेंट्सची आवश्यकता भासत नाही.

५. बँका अथवा वित्तीय संस्थेने आधीच मंजूर केलेल्या बिल्डर किंवा सोसायटीची अर्जदाराला माहिती मिळू शकते. शक्य असेल तर त्यांच्याकडूनच घर घेणे जास्त फायदेशीर ठरते.

निष्कर्ष

यावरून असे लक्षात येते की प्रॉपर्टीची योग्य डॉक्युमेंट्स सादर केल्याशिवाय गृहकर्ज डिसबर्स होण्याची संपूर्ण प्रोसिजर पूर्ण होत नाही परंतु लोन मंजूर मात्र करून घेता येऊ शकते.

जर pre-approved होमलोन असेल तर प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स सादर करण्याआधीच गृहकर्ज मंजूर करून घेऊन घर खरेदी निश्चित करता येते. मंजूर झालेली लोनची रक्कम डिसबर्स होण्याआधी मात्र प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स सादर करणे आवश्यक असते.

म्हणजेच pre-approved होमलोन घेतल्यास सुरुवातीला कागदपत्रांची आवश्यकता नसल्यामुळे आपल्याला मिळू शकणाऱ्या लोनच्या रकमेची माहिती करून घेऊन त्यानुसार गृह खरेदी करणे सोपे होते.

मित्रांनो, तुम्ही जर घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला कर्ज देऊ करणाऱ्या बँक अथवा वित्तीय संस्थेकडे pre-approved होम लोन बद्दल नक्की चौकशी करा आणि त्याचा जरूर फायदा घ्या. हा पर्याय तुम्हाला कसा वाटतोय हे कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा.

तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख शेयर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय