हृदयरोगावर गुणकारी योगासने | सर्व आसने चित्रांसहित समजून घ्या

योगासने हा एक सर्वांगसुंदर व्यायाम आहे. उत्तम आरोग्यासाठी आणि वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी योगासनांचा उपयोग होतो हे आता जगभरात मान्य केले गेले आहे.

निरनिराळ्या आजारांवर काही विविक्षित योगासने अतिशय उपयुक्त ठरतात असे आढळून आले आहे.

आपल्याला होऊ शकणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपैकी सर्वात महत्त्वाचा आजार म्हणजे हृदयरोग. हृदयाशी संबंधित असल्यामुळे हा आजार माणसाच्या जीवनमरणाशी निगडित असतो. हृदयरोग होऊ नये यासाठी उत्तम, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योगासने अशी जीवनशैली असावी असा सल्ला दिला जातो.

तशी तर सगळीच योगासने अतिशय उपयुक्त आणि शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असतातच. परंतु काही विविक्षित योगासने ही हृदयरोग दूर ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.

ही विविक्षित योगासने नियमित केल्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहते, कोलेस्ट्रॉल वाढू नये यासाठी मदत होते तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रणात राहते. त्यामुळे ही योगासने नियमित केल्यास हृदयरोग दूर ठेवता येतो.

सध्याच्या काळात हृदयरोगाचे अनेक रुग्ण आढळून येतात. तसेच दरवर्षी हृदयरोगामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतेच आहे. असे असताना जर काही योगासने करून हृदयरोग दूर ठेवणे शक्य असेल तर आपण त्याचा निश्चित फायदा करून घेतला पाहिजे.

खालील योगासने नियमित करणे हृदयरोग दूर ठेवण्यास मदत करते.

१. बद्ध कोनासन

बद्ध कोनासन हे आसन नियमित करण्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. शरीरातील सर्व धमन्यांमधून रक्तपुरवठा चांगल्या पद्धतीने होऊन सर्व अवयवांपर्यंत योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होतो. रक्तप्रवाह सुरळीत राहिल्यामुळे शरीरातील सर्व धमन्या चांगल्या प्रकारे काम करतात आणि रक्ताची गुठळी होण्याची शक्यता नाहीशी होते.

तसेच रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी देखील मदत होते. हृदयरोगाचे प्रमुख कारण उच्च रक्तदाब किंवा रक्तामध्ये गुठळ्या होऊ नये हे असते, ज्यावर बद्ध कोनासन हे आसन अतिशय गुणकारी आहे.

हे आसन बसून करायचे असल्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना ते करणे सहज शक्य होते. हा या आसनाचा एक मोठा फायदा आहे.

बद्ध कोनासन कसे करावे?

१. सर्वप्रथम मॅटवर अथवा सतरंजीवर पाय लांब करून बसावे.

२. त्यानंतर दीर्घ श्वास घेत पाय तळवे एकमेकांना चिकटतील अशा स्थितीत शरीराच्या जवळ आणावेत.

३. पायाचे तळवे एकमेकांना चिकटलेले असताना ते जास्तीत जास्त शरीराच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करावा आणि हे करत असताना पाठीचा कणा ताठ ठेवून बसावे.

४. पाय जवळ आणताना दीर्घ श्वास घ्यावा आणि लांब करताना श्वास सोडावा.

५. अतिशय सोपे असे हे आसन सर्व वयोगटातील लोकांना करणे सहज शक्य आहे.

बद्ध कोनासन | Badhha konasan
बद्ध कोनासन

२. सेतुबंधासन

शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो. परंतु आधीपासून उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी हे आसन फार तीव्रतेने न करता सावकाश करावे.

सेतुबंधासन कसे करावे?

१. सर्वप्रथम मॅटवर उताणे झोपावे.

२. पाय गुडघ्यात दुमडून शरीराजवळ आणावेत आणि खांद्यापासून छाती पाठ कंबर हा शरीराचा भाग वर उचलावा आणि हातांनी पायाच्या घोट्याचा भाग धरण्याचा प्रयत्न करावा.

३. पायाचे घोटे धरता आले नाहीत तर हात शरीराला समांतर पसरून ठेवावेत.

४. छातीपासूनचा शरीराचा भाग वर उचलून काही वेळ त्याच स्थितीत राहण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर श्वास सोडत हळूहळू शरीर खाली आणावे.

५. उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी हे आसन करताना सावधगिरी बाळगावी.

setubandhasan
सेतुबंधासन

३. कपालभाती

कपालभाती हा प्राणायामाचा एक प्रकार आहे. श्वासोच्छ्वास घेण्याचा हा एक विविक्षित प्रकार आहे. नियमितपणे कपालभाती करण्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो तसेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण चांगले राहण्यास मदत होते.

कपालभातीचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास देखील खूप फायदा होतो.

कपालभाती कशी करावी?

१. सर्वप्रथम मॅटवर मांडी घालून बसावे. पद्मासनात बसता आले तर जास्त चांगले परंतु ते शक्य नसेल तर किमान मांडी घालून बसावे.

२. पाठीचा कणा ताठ ठेवावा.

३. एकदा दीर्घ श्वास घेऊन पोट आत ओढून घेत भराभर श्वास बाहेर टाकावा. जितक्या जास्त वेळा असे करता येईल तितक्या वेळा ते करावे.

४. श्वास बाहेर टाकण्याचा वेग आणि सलग किती वेळा श्वास बाहेर टाकायचा याचा आकडा हळूहळू वाढवत न्यावा.

५. कपालभाती करताना श्वास बाहेर टाकण्यावर जास्त लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते.

Kapalbhati pranayam
कपालभाती

४. गोमुखासन

गोमुखासन करणे देखील हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. नियमितपणे गोमुखासन करण्यामुळे शरीरातील स्नायू रिलॅक्स होऊन त्यांना आराम मिळतो.

त्याचप्रमाणे शरीरात इंडॉर्फिन हार्मोनची निर्मिती वाढते आणि त्यामुळे ताण तणाव, मनावरील नैराश्य दूर होण्यास मदत होते. हे आसन नियमित करण्यामुळे शरीरातील स्नायू मजबूत होतात, कार्डिओ व्हॅस्क्युलर आरोग्य सुधारते आणि शरीराची लवचिकता वाढण्यास देखील मदत होते.

गोमुखासन कसे करावे?

१. गोमुखासन केल्यानंतर शरीराची स्थिती गाईच्या तोंडासारखी दिसते. म्हणून या आसनास गोमुखासन असे म्हटले जाते.

२. गोमुखासन करताना सर्वप्रथम मॅटवर रिलॅक्स होऊन बसावे.

३. मांडी घालून दोन्ही गुडघे एकमेकांवर येतील अशा पद्धतीने पाय जुळवावेत.

४. उजवे पाऊल शरीराच्या डाव्या बाजूला तर डावे पाऊल शरीराच्या उजव्या बाजूला गेले पाहिजे.

५. त्यानंतर डावा हात पाठीकडे न्यावा आणि उजवा हात खांद्यावरून पाठीवर नेऊन डावा हात उजव्या हाताने धरण्याचा प्रयत्न करावा.

६. हे सर्व करत असताना पाठीचा कणा जास्तीत जास्त ताठ ठेवावा.

७. दीर्घ श्वास घेऊन काही सेकंद या आसनात स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा.

८. त्यानंतर हळूहळू आसन सोडावे.

Gomukhasan
गोमुखासन

५. मेडिटेशन ( ध्यानधारणा)

मेडिटेशन करण्यामुळे शरीराबरोबरच मनालाही शांतता मिळते. मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मेडिटेशनची खूप मदत होते आणि मानसिक स्वास्थ्य चांगले असल्यास शारीरिक आरोग्य नक्कीच सुधारते.

नियमित मेडिटेशन करण्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हृदयगती चांगली राहण्यास खूप मदत होते.

सकाळच्या वेळी मेडिटेशन करणे सर्वात जास्त फायदेशीर असते.

मेडिटेशन कसे करावे?

१. मॅटवर मांडी घालून शांत बसावे.

२. डोळे मिटून घेऊन सर्व लक्ष श्वासावर केंद्रित करावे.

३. मनात येणारे विचार दूर करण्याचा प्रयत्न करावा.

४. मनाची आणि शरीराची ताणरहित हलकी अवस्था अनुभवण्याचा प्रयत्न करावा.

५. दररोज किमान पंधरा मिनिटे मेडिटेशन करावे.

६. मेडिटेशन करताना दीर्घश्वसन करावे.

Medition
मेडिटेशन

तर ही आहेत अशी पाच सोपी योगासने जी नियमित करण्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी खूप मदत होऊ शकते.

या माहितीवरून आपल्या असे लक्षात येते की हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आपले शरीर आणि मन या दोन्हीचे स्वास्थ्य चांगले असणे आवश्यक आहे. शरीर आणि मन या दोन्हीचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी योगासनांची खूप मदत होते हे आता सिद्ध झाले आहे.

तर मित्र मैत्रिणींनो, तुम्ही देखील या लेखात सांगितलेली ही सोपी योगासने दररोज नियमितपणे करा आणि हृदयरोगाला दूर ठेवा.

याव्यतिरिक्त कोणकोणती योगासने तुम्ही नेहेमी करता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख शेयर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “हृदयरोगावर गुणकारी योगासने | सर्व आसने चित्रांसहित समजून घ्या”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय