श्रीमंत व्हायचं असेल तर या 9 सवयींचा विचार पूर्वक अंगीकार करा.

श्रीमंत लोक थोडासा वेगळा विचार करतात… जगातले 1% सर्वाधिक श्रीमंत असणारे लोक जगातली 48% संपत्ती बाळगून आहेत.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, या जगात 80 व्यक्ती अशा आहेत ज्यांची संपत्ती एकत्र केली तर ती 3.5 अब्ज लोकांच्या संपत्ती एवढी होईल….

जागतिक असमानता हा एक कळीचा मुद्दा आहेच.

आपण तळाच्या 99% मधील समाविष्ट होतो हे जेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं तेव्हा 2011 साली अमेरिकेत Occupy ही चळवळ सुध्दा सुरु झाली होती.

ज्यांच्याकडे अजिबात संपत्ती नाही ते लोक 1% असणाऱ्या श्रीमंतांचा तिरस्कार करतात.

आपलं भविष्य बिघडवणारे, जागतिक अर्थव्यवस्थेचे नियम हे 1% लोक तयार करतात असं सामान्य लोकांना वाटतं…

पण हे खरं आहे का? या अर्थव्यवस्थेला सामान्य लोक खरच बळी पडतात का?

की स्वतःची संपत्ती खेचण्याची ताकद या सामान्य लोकांच्यात नाही?

तन-मन-धन अर्पून काम करून काही लोकांनी जी प्रचंड संपत्ती मिळवली आहे ती त्यांच्याकडून मागण्याचा प्रत्येकाला खरंच अधिकार आहे का? हक्क आहे का?

आणि हो, हेही लक्षात घ्या की या 80 श्रीमंत व्यक्ती पैकी प्रत्येकाला वारसा म्हणून ही अफाट संपत्ती मिळालेली नाही त्यापैकी फक्त 11 जणांना ही संपत्ती वारसाहक्काने मिळालेली आहे.

उरलेल्या 69 जणांनी त्यांची अफाट संपत्ती मिळवताना अगदी अगदी खालच्या स्तरापासून सुरुवात केली आहे.

सगळ्यांनाच माहिती असणारं एक ठळक उदाहरण म्हणजे वॉरन बफे.

एका मध्यमवर्गीय मुलांने लहान वयातच व्यवसाय आणि गुंतवणूक करत खूप मोठा पल्ला आज गाठला आहे.

72.3 अब्ज डॉलरचा मालक असणाऱ्या वॉरेन यांनी त्यांची संपत्ती स्वतः मिळवली आहे.

एकही छदाम हा फुकटचा नाही.

वॉरन बफे यांच्या संपत्तीत एवढी वाढ झाली कारण त्यांनी श्रीमंत व्यक्तींच्या काही सवयी स्वतःमध्ये रुजवल्या.

प्रचंड संपत्तीचा मालक असणाऱ्या वॉरन बफे यांनी आपल्या मेहनतीने कमावलेली संपत्ती इतरांना दान करावी का?

तर बिलकुल नाही. मेहनत न करता फुकट संपत्ती मिळवण्यापेक्षा श्रीमंत लोकांच्या सवयींचा अभ्यास करून प्रत्येकाने जर त्या स्वतःत रुजवल्या तर तेही श्रीमंत होतील आणि हाच मार्ग योग्य ठरेल नाही का?

मुळात म्हणजे श्रीमंत लोक आपण या संपत्तीचा उपभोग घ्यायला पात्र आहोत यावर विश्वास ठेवतात आणि म्हणूनच ते अफाट संपत्तीचे मालक असतात.

1) श्रीमंत व्यक्ती उत्पन्नाच्या नियमावर विश्वास ठेवतात.

श्रीमंत लोकांचा विश्वास असतो की त्यांनी जे योगदान दिलेलं आहे त्यानुसार त्यांना मिळणारे संपत्तीचे रिटर्न्स योग्यच आहेत.

ज्याला जितकी संपत्ती हवी आहे त्यांनी तितकं काम करावं.

आता अगदी सध्याचं उदाहरण बघू. सध्या ‘ऑटो डिम्ड रियर व्ह्यू मिरर’ चा शोध लागलेला आहे.

हा ऑटोडीम होणारा आरसा परदेशात प्रत्येक कार मध्ये असतोच.

आता हा आरसा ज्याने शोधून काढला त्याला संशोधनासाठी लागलेल्या वेळचे ठराविक पैसे देऊन मोकळं व्हायचं की त्याला प्रत्येक आरशाच्या विक्रीतून एक छोटी रक्कम, एक वाटा द्यायचा ?

अर्थातच भांडवलशाहीमध्ये त्याला उत्पन्नाचा ठराविक भाग मिळणे अपेक्षित आहे.

जगातल्या प्रत्येकाला जर आर्थिक समानता यावी असं वाटत असेल तर मेहनती मध्ये सुद्धा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे, समान मेहनत केली पाहिजे.

मेहनत न करता संपत्तीचे समान वाटप हा दृष्टिकोन जगाच्या दृष्टीने हानीकारक आहे.

त्यामुळे नवनिर्मिती आणि नवीन शोध लागणे थांबू शकेल

2) श्रीमंत व्यक्ती संधीवरती लक्ष केंद्रित करतात.

कुठल्याही क्षेत्रात अडचणी नाहीत असं होतच नाही.

पण त्या अडचणींवर उपाय शोधायला हवा.

फार पुर्वी पासून प्रचलित असलेलं एक उदाहरण इथं योग्य ठरतं.

एका गावात दोन वेगवेगळ्या शूज कंपनीने आपला एक माणूस सर्व्हे करण्यासाठी पाठवला होता.

हे गाव थोडसं जंगलाजवळ होतं. तिथं आदिवासी राहत होते.

एका कंपनीच्या माणसांनं कंपनीला मेल केला इथं अजिबात विक्री होणार नाही, कारण इथे कोणीच चपलाच वापरत नाही. त्यामुळे तुम्ही इथं शोरूम उघडू नये.

त्याच वेळेला दुसऱ्या कंपनीच्या माणसाने आपल्या कंपनीला मेल केला की इथे कुणी चपला किंवा बूट अजून पर्यंत घालत नाही तर इथे प्रचंड विक्री होईल, तर लवकरच आपलं शोरूम इथं सुरू करा .

दृष्टीकोनात हा फरक गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढवतो. इतरांना जिथे समस्या दिसते त्यात श्रीमंतांना संधी दिसते.

3) श्रीमंत व्यक्ती सकारात्मक व्यक्तींच्या संपर्कात रहातात.

सकारात्मक विचारसरणीचे लोक तुमच्या आजूबाजूला असले की तुमच्यावर त्यांचा उत्तम प्रभाव पडतो हे श्रीमंत लोकांना पक्क माहिती असतं.

म्हणूनच ते कायम चांगल्या गोष्टी पाहणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहतात.

हवामान, सरकार, युद्ध, वाढती महागाई यांचं रडगाणं गाणाऱ्या लोकांना श्रीमंत व्यक्ती स्वतः पासून कायम दूर ठेवतात.

या जगाला नकारात्मकतेची कचराकुंडी बनवण्यापेक्षा संधीची खाण बनवणं संयुक्तिक नाही का?

आज महाराष्ट्रात अनेक व्यापारी आपण असे बघतो जे त्यांची मायभूमी दूर सोडून इकडे आलेले आहेत.

पण स्वतःच्या मेहनतीने, अथक परिश्रमाने त्यांनी आज साम्राज्य उभं केलेलं आहे.

त्यामुळे संकटांना संधी माना. जगात कुठेही असलात तरी मेहनतीला पर्याय नाही.

ही मेहनत तुमच्या जगण्याचा स्तर वाढवू शकते हे लक्षात ठेवा.

4) श्रीमंत व्यक्ती स्वतःची मूल्यं जाहीरपणे सांगतात.

श्रीमंत व्यक्तीला नेमकं माहिती असतं की त्यांचा कशावर प्रभुत्व आहे?

त्याविषयी ते इतरांना ठामपणे सांगतात.

ज्यांना स्वतःचं कौशल्य सांगताना संकोच वाटतो, भीती वाटते, ती व्यक्ती कधीही प्रगती करू शकत नाही.

स्वतःची कौशल्य विकण्याची कलाच तुमच्या आयुष्यात प्रगती आणि संपत्ती घेऊन येऊ शकते.

5) श्रीमंत व्यक्ती समस्यांपेक्षा स्वतःला मोठं बनवतात.

बऱ्याच वेळेला तुम्ही किंवा तुमच्या आसपासचे लोक असं म्हणतात “नही बाबा, ये अपने बस की बात नही यार”

अशा पद्धतीने लवकर शस्त्र खाली ठेवून हार स्वीकारली तर संपत्ती कशी मिळणार?

एक छोटेसं उदाहरण. एका शहरात एक प्रॉपर्टी “निवासी प्रॉपर्टी” म्हणून विक्रीला निघाली होती.

तिथं व्यावसायिक बांधकाम करायचं तर खर्च अव्वाच्या सव्वा होणार होता.

त्यामुळे बांधकाम क्षेत्रातले दिग्गज ही जागा घ्यायला पुढे येतच नव्हते.

अशावेळी एका महिलेनं मात्र प्रयत्न करायचं ठरवलं.

वकिलांची फौज कामाला लावली आणि ती जागा “व्यावसायिक मालमत्तेत रूपांतर करून विकत घेतली.

त्यावर बांधकाम करून त्या महिलेनं अफाट संपत्ती मिळवत यश संपादन केलं.

मात्र यासाठी ती काही महिने अथक प्रयत्न करत राहिली हा मुद्दा सुद्धा लक्षात घेतला पाहिजे.

6) श्रीमंत व्यक्ती दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करतात.

आयुष्यात तुमच्यावर अशी वेळ केंव्हा ना केंव्हा येते, जिथं “हे” किंवा “ते” निवडावं लागतं.

अशा वेळेला सामान्य व्यक्ती फक्त एकच पर्याय निवडतात.

समजा फ्रीज घ्यायचा का टीव्ही? त्यातला एकच खर्च परवडू शकतो, तर सामान्य व्यक्ती एकाच वस्तूची निवड करून ती विकत घेतात.

मात्र श्रीमंत व्यक्ती या दोन्हीची सांगड कशी घालायची? याचा विचार करतात.

त्यासाठी हातात असणारी रक्कम ते अशा जागी गुंतवतात की त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात फ्रीज आणि टीव्ही या दोन्ही वस्तू ते आरामात घेऊ शकतात.

श्रीमंत व्यक्तींची मानसिकता हीच असते की “हे” किंवा “ते” नाही तर दोन्ही वस्तू मिळवायच्या.

7) श्रीमंत व्यक्ती संपत्ती वरती विश्वास ठेवतात. कामाच्या उत्पन्नावर नाही.

सामान्य लोक दर तासाला किती मिळकत होईल? यावरती चर्चा करत राहतात.

श्रीमंत व्यक्ती ना माहिती असतं किती मिळवले? याच्यापेक्षा किती साठवले? हे जास्त महत्त्वाचं असतं.

पैसा पैशाला आकर्षित करू शकतो, त्यामुळे भविष्यात मोठी संधी सुद्धा निर्माण होऊ शकते.

यावर श्रीमंत व्यक्तींचा विश्वास असतो.

8) श्रीमंत व्यक्ती सतत नवं शिकून प्रगती करतात.

एकदा शालेय शिक्षण कसंबसं पूर्ण केलं की पुन्हा अभ्यास म्हणून करायचं नाही ही वृत्ती तुमची प्रगती थांबवते.

व्यवहारज्ञान, व्यवहारचातुर्य, बोलणं किंवा अशा असंख्य गोष्टी असतात ज्या सातत्याने शिकण्याची तयारी असेल तरच श्रीमंत व्यक्ती होता येतं.

जेवढं तुमचं ज्ञान वाढत जाईल तेवढीच सांपत्तिक समृद्धीही वाढते.

श्रीमंत व्यक्ती वाचनातून ही प्रेरणा घेतात स्वतःला प्रोत्साहन देतात.

जगाच्या पुस्तकातून तर ते सतत शिकत राहतात.

9) अवघड गोष्टी करायला श्रीमंत व्यक्ती पुढे सरसावतात.

श्रीमंत लोकांना आव्हानं पेलायला आवडतात.

कारण त्या पुढं जाऊनच यश संपत्ती असते हे त्यांना माहिती आहे .

प्राणपणाने लढण्यासाठी केवळ मैदानातली लढाईच हवी असं नाही तर आपले ध्येय साध्य करण्यासाठी मौज-मजा बाजूला ठेवून सतत कामात गुंतण्याची तयारी हवी.

श्रीमंत लोक ही आव्हानं स्वीकारून कामात बुडून जातात आणि म्हणूनच ती श्रीमंत होतात.

तुम्हालाही श्रीमंत व्हायचं असेल तर या सवयींचा विचार पूर्वक अंगीकार करा.

या 9 सवयी स्वतःला लावून घ्या.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “श्रीमंत व्हायचं असेल तर या 9 सवयींचा विचार पूर्वक अंगीकार करा.”

  • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

   मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

   #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

   व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

   https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

   टेलिग्राम चॅनल👇

   https://t.me/manachetalksdotcom

   मनाचेTalks फेसबुक पेज:

   https://www.facebook.com/ManacheTalks/

   मनाचेTalks हिंदी फेसबुक पेज:

   https://www.facebook.com/ManacheTalksHindi/

   Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय