नकार पचवणे जड जात असेल, तर या २० गोष्टी स्वतःला समजवा!!

नकार पचवणे जड जात असेल, तर या २० गोष्टी स्वतःला समजवा!!

कित्येक मोठमोठ्या माणसांना त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये बरेच नकार पचवावे लागले. ‘अमिताभ बच्चन’ ना त्यांच्या सुरुवातीच्या काळात नकार मिळाला होता, तो त्यांच्या आवाजामुळेच, पण तोच आवाज पुढे त्यांच्या यशाचं कारण ठरला…

जेव्हा तुम्ही भूतकाळात डोकावता तेंव्हा तुमच्या लक्षात येतं की बऱ्याच वेळा एखादी गोष्ट किंवा एखाद्या व्यक्तीनं तुम्हांला नाकारलं आहे.

लग्नाच्या बाजारात उभं राहिल्या नंतर समोरच्या स्थळांकडून मिळालेला नकार, इंटरव्ह्यू चांगला जाऊनही आवडीच्या कम्पनीतून नोकरी साठी मिळालेला नकार, प्रेमात पचवलेला नकार असे जिव्हारी लागलेले नकार मिळाल्यानंतर बरेचदा त्याचं शल्य घेऊनच तुम्ही जगत राहता.

आणि मग काय होतं चारी बाजूने टीका होऊन तुम्हाला पुन्हा पुन्हा नाकारलं जातं

तुम्ही विचार करता की छे! माझ्यातच काहीतरी कमतरता असणार.

लक्षात घ्या मित्रांनो, काहीही झालं तरी तुम्ही कधीही स्वतःला कमी लेखू नका.

काही वेळा एखादी व्यक्ती किंवा त्या वेळची परिस्थिती किंवा त्या वयाची घटना ही तुमच्या योग्यतेची नसते.

त्यामुळं कोणत्याही नकारानंतर निराश होऊ नका.

नकार हे कडूजार, पण गरजेचं औषध आहे. पचवलेला नकार तुम्हांला आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी नकळत शिकवतो.

अयोग्य संधीला कसं नाकारायचं चुकीच्या नात्यांना ठाम नकार कसा द्यायचा? आणि योग्य नाती कशी प्रस्थापित करायची हे तुम्हाला एखाद्या जीवघेण्या नकारा नंतरच शिकायला मिळतं.

तुमच्या भोवतीची परिस्थिती नकारात्मक असेल तर त्यात तुमची चूक नसते.

अशा वेळी, तुमची योग्य किंमत समोरच्या व्यक्तीला समजू शकलेली नाही, हे लक्षात घ्या.

आता तुम्हाला तुमच्यात सुधारणा करायला पुरेसा वेळ मिळू शकतो हाही एक प्लस पॉइंट.

नकार मिळाल्यानंतर तो अनुभव कडवट होतो ना ?

अहो ! तुम्ही तर एक माणूस आहात.

कुठल्याही संवेदनशील माणसाला एखाद्या नकारानंतर ह्रदयात बारीक कळ उमटणारच ना ?

तरीही लक्षात ठेवा ही वेळही निघून जाईल.

तुम्ही स्वत:लाच प्रश्न विचारू शकता माझं काय चुकलं? त्यांनी माझ्या भावनांची काळजी का केली नाही? हे सारं कसं घडलं?

पण मित्रांनोमहत्त्वाचे हे आहे, या प्रश्नांमध्ये बुडून जाऊ नका. आयुष्यात गटांगळ्या खाऊ नका

दुःखाचा भर ओसरल्यानंतर जाणीवपूर्वक तुम्हांला सकारात्मक गोष्टींना चालना द्यावी लागेल.

तुम्हाला नाकारलं गेलं आहे हीच भावना तुम्हाला नव्या गोष्टींसाठी प्रेरित करू शकते, तुमच्या यशाचा नव्या अध्याय लिहू शकते.

तुमच्या आत असलेल्या गुणांना वाव देऊ शकते

तुम्हाला कोणी किंमत देत नसेल आणि असं जर सातत्याने घडत असेल तर आधी स्वतः कडे लक्ष द्या.

कळत-नकळत तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये काही कमतरता निर्माण झाली आहे का? काही खोट आहे का याकडे लक्ष द्या?

आणि तुमच्यात बदल घडवण्यासाठी तुम्हीच पाऊल उचला.

तुमच्यासाठी बाकीच्यांनी वेळ खर्च करावा आणि तुमच्याकडे इतरांनी लक्ष द्यावं इतकं स्वत:ला महत्व आणा.

त्यासाठी तुम्ही स्वतःचा आदर करा. जर तुम्ही स्वतःचा आदर केला नाही तर दुसरं कोणीही तुमचा आदर करणार नाही.

या गोष्टी सहज सोप्या नक्की नाहीत पण अशक्य ही नाहीत.

भूतकाळातल्या एखाद्या नकारात अडकून तुम्ही स्वतःला कमी लेखत असता.

एखाद्या असंवेदनशील व्यक्तीची तुमच्याबद्दलची चुकीची मत तुम्ही खरी मानायला लागता.

पण आता जागे व्हा. अंतर्मनातील न्यूनगंडाची भावना दूर करा….

तुम्हाला यापेक्षा चांगल्या दर्जेदार गोष्टी मिळायला हव्यात, तुम्ही यापेक्षा चांगले डीझर्व्ह करता… यावर विश्वास ठेवा, आणि हे तुम्ही स्वतःच घडवायला हवं हे ही विसरू नका…

नकार पचवणे जड जात असेल तर, या २० गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

१) भूतकाळात एखाद्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवला असेल आणि त्यांनी तुम्हांला नाकारलं असेल तर आता तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करण्याची गरज नाही.

किंवा तुमच्या नोकरीच्या ठिकाणी एखाद्या कामात सहभागी होण्याची तुमची इच्छा असेल, पण तुम्ही त्यासाठी योग्य नाही म्हणून तुम्हाला डावलले गेले असेल तर, त्या विचारात गुरफटून जाऊ नका.

२) जीवनातला सगळ्यात निर्णयक क्षण म्हणजे, ज्या गोष्टींना तुम्ही बदलू शकत नाही त्या गोष्टींना विसरून जाणं.

सगळ्यात पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीचा चुकीचं वागणं विसरा.

३) आयुष्य आणि नशिबाने तुमच्यासाठी खूप मोठ्या गोष्टींची योजना केली आहे.

त्यामुळे सतत रडून त्रास करून घेऊ नका किंवा खचून जाऊ नका.

४) बाण दूर जाण्यासाठी त्याची प्रत्त्यंचा मागे खेचावी लागते, तसंच आयुष्यात पुढे जाण्यासाठी कधी कधी माघार घ्यावी लागते हे कटू सत्य स्वीकारा.

५) मित्रांनो लक्षात ठेवा जगाचा अंत लगेचच होणार नाहीये, त्यामुळे एखादी घटना तुमच्या आयुष्यातली शेवटची घटना नसते.

आयुष्याच्या प्रवासातले अनेक सुंदर रस्ते तुम्हाला अनुभवायचे आहे ते लक्षात ठेवा.

६) कधी कधी काही लोक तुम्हाला गृहीत धरतात .

त्यामुळे जोपर्यंत तुम्ही फुकट राबणं थांबवत नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही.

तुम्ही स्वतःला जितकं कमी लेखाल तितकी अपमान करण्याची संधी समोरच्या व्यक्तीला द्याल.

एकदा ठरवाच की बास ! आता हे घडू द्यायचं नाही. एखाद्या व्यक्तीला तुमचा अपमान करण्याची संधी पुन्हा पुन्हा द्यायची नाही.

जोपर्यंत तुम्ही हे मनाशी ठरवत नाही तोपर्यंत समोरची व्यक्ती तुम्हाला गृहीत धरणं थांबवणार नाही.

जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावरच हसू पुसून टाकेल तुम्हाला अनिश्चिततेच्या झोक्यावरती टांगून ठेवेल अशा व्यक्तींना निग्रहाने दूर करा.

जी व्यक्ती तुम्हाला समजून घेईल तिच्यासह जगण्याचा पर्याय स्वीकारा.

७) आयुष्यातला एखादा रटाळ, दुखरा अध्याय तुम्ही स्वतःहून कायमचा संपवला पाहिजे.

उगाच भिडेखातर, लोक काय म्हणतील असा विचार करत ताणलेल्या गोष्टी सावरण्याचा प्रयत्न करू नका.

८) एक दीर्घ श्वास घ्या. ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचं वागणं किंवा परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणं सोडाल त्या क्षणी तुम्हाला मानसिक समाधान मिळेल.

९) इतर लोक तुमच्या विषयी काय मत मांडतात ते मनावर घेऊ नका तो त्यांचा दृष्टिकोन आहे. तुमचं खरं रूप नाही.

१०) ज्यांच्याकडे लढण्याची ताकद असते ते टीकेतून ही स्वतःला घडवण्याची संधी शोधतात.

११) तुमच्या मनावरचे घाव खोल वर उमटलेले आहे. त्या घावांमुळेच आज तुम्ही कणखर हुशार आणि लवचिक बनू शकता.

१२) एखाद्या घटनेत तुम्हाला बरंच काही गमवावं लागलं तर दु:खी होण्यापेक्षा त्या घटनेकडे पहाण्याचा तुमचा दृष्टिकोन बदला.

मिळालेल्या नकाराने तुमच्या हक्काच्या गोष्टीं काढून घेतलेल्या नाहीत, तर तुमच्या डोक्यावरचा अतिरिक्त भार कमी झाला आहे यात आनंद माना.

१३) जे यश, जो सन्मान तुमच्यासाठी आहे तो तुमच्याकडे स्वतःच्या पायाने चालत येणारच.

तोपर्यंत मात्र तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला हवी

१४) एखादी भव्यदिव्य योजना म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता नाही.

हे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीला तुमच्या मनावर कब्जा करू देऊ नका.

त्यापेक्षा पुढं जा तुमच्यातली गुणवत्ता ओळखा आणि स्वबळावर मेहनत करा.

१५) ज्या गोष्टी तुमच्याकडे नाहीत त्या तुम्हाला हव्याशा वाटतात.

पण त्याहून कितीतरी जास्त अनमोल वस्तू तुमच्याकडे असतील तर त्याची मात्र तुम्हाला फिकीर नसते, ही वस्तुस्थिती आहे.

तुमच्यामध्ये कोणते गुण आहेत ते नीट समजून घ्या आणि मग धाडसाने एक एक पाऊल उचला.

हे पाऊल अशक्य अव्यवहार्य वाटलं तरी स्वतःवरती विश्वास ठेवून निर्णय घ्या.

१६) स्वतःची कोणाशीही तुलना करू नका.

कारण या तुलनेमुळे तुमची योग्यता, शैक्षणिक पात्रता आणि तुमच्या समंजसपणाची किंमत कमी होते.

१७) जितक्या उत्कटतेनं आयुष्य जगायला सुरुवात कराल तेवढा तुमचा वेळ वाचेल.

तेंव्हा तुम्ही स्वतःच दुसऱ्यांची मर्जी सांभाळण्याची धडपड सोडून द्याल.

१८) तुमचा संघर्ष, निराशा आणि मिळालेला नकार हा थकून भागूनदमून निराश होण्यासाठी नसतो तर परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी असतो.

जीवनातल्या गोष्टींकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता यावर तुमचं भवितव्य घडतं.

१९) काही वेळा बदल घडतात तेव्हा नवं चांगलं काहीतरी घडणार असतं.

त्यामुळे बदलांना घाबरू नका किंवा आहेत त्याच गोष्टींना कवटाळून ठेवायचा अट्टाहासही करू नका.

२०) नकारातून बाहेर पडून आपलं आयुष्य आनंदाने जगणं ही एक नवी सुरुवात आहे.

त्यानंतर अनंत मार्ग तुमच्यासाठी उपलब्ध होतील.

नको असलेल्या गोष्टी सोडून देण्याइतके खंबीरता तुमच्यात निर्माण होईल.

तुमचे ज्ञान तुमची कठोर मेहनत यामुळे तुम्ही इतरांना तुमची दखल घ्यायला भाग पाडा.

मित्रांनो, नकार मिळालेली जगातली तुम्ही एकमेव व्यक्ती नसता.

कित्येक मोठमोठ्या व्यक्तींना त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये बरेच नकार पचवावे लागले. अमिताभ बच्चन ना त्यांच्या सुरुवातीच्या काळात नकार मिळाला होता, तो त्यांच्या आवाजामुळेच, पण तोच आवाज पुढे त्यांच्या यशाचं कारण ठरला…

त्या नकारांना पुरुन त्यांनी आपला स्वतःचं नाव, स्वतःचं यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवलं.

त्या व्यक्तींना पहा आणि नकाराचं दुःख बाजूला सारून आयुष्याला आकार देण्यासाठी पुढं या.

कोणता नकार पचवणं तुम्हाला अवघड गेलं, तुम्ही त्या दु:खातून कसे बाहेर पडला, आम्हांला कमेंट करून जरूर कळवा.

Manachetalks

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

2 Responses

 1. Suchitra Kedar says:

  Sir please send me my email ID – [email protected]

  • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

   मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

   #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

   व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

   https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

   टेलिग्राम चॅनल👇

   https://t.me/manachetalksdotcom

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!