जाणून घ्या झोपण्याचे मेंदूला होणारे फायदे याविषयीची शास्त्रीय माहिती.

zop-yenyasathi-upay-in-marathi

झोप येण्यासाठी घरगुती उपाय काय असू शकतील, याचा नेहमीच तुम्ही शोध घेता. झोपेचे महत्व, झोपेचे मेंदूच्या आरोग्याशी असणारे निकटचे नाते सांगणारा हा लेख वाचा. म्हणजे रोज सकाळी उत्साहाने दिवस कसा सुरु करावा याची ‘आयडिया’ तुम्हाला मिळेल.

झोप ही आपल्या सर्वांनाच प्रिय असते. पुरेशी झोप घेण्यामुळे शरीराला आलेला थकवा, मरगळ दूर होते. शक्ती भरून येते. नवीन काम करण्यासाठी उत्साह वाटतो आणि मनालाही ताजेतवाने वाटते.

झोपेचे हे सर्व फायदे तर आपल्याला माहीत आहेतच. परंतु झोप घेण्यामुळे मानवाच्या मेंदूला होणारे फायदे, मेंदूच्या आरोग्यावर पुरेशी झोप घेण्याचा होणारा सकारात्मक परिणाम याविषयीची शास्त्रीय माहिती आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

सर्वसामान्य निरोगी असणारी व्यक्ती दिवसाच्या चोवीस तासांपैकी सात ते आठ तास झोप घेते. याचा अर्थ आपल्या एकूण आयुष्यापैकी एक तृतीयांश आयुष्य आपण झोपण्यात घालवतो.

आपल्या आयुष्याचा इतका मोठा भाग आपण निद्रितावस्थेत घालवतो यामागे नक्कीच काहीतरी शास्त्रीय कारण असणार हे तर उघडच आहे.

मानवी उत्क्रांती होत असल्याच्या काळापासून मनुष्याच्या झोपेबाबत संशोधक आणि शास्त्रज्ञांना अनेक प्रश्न पडले आहेत आणि या विषयावर वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन देखील झाले आहे.

तज्ञ संशोधकांच्या मते केवळ शरीराची झीज भरून काढणे आणि मनाला ताजेतवाने वाटणे एवढ्यासाठीच झोपेची आवश्यकता नसते तर झोप घेण्याचे यापेक्षा अनेक मोठे फायदे आहेत.

ठराविक कालावधीनंतर सगळ्या सजीवांना आपोआप झोप का येते आणि झोप पूर्ण झाल्यावर आपोआप जाग कशी येते याविषयी संशोधकांना नेहमीच कुतूहल होते. याबाबत अनेक प्रकारचे संशोधन झाले असून अजूनही वेगवेगळी माहिती संशोधनातून पुढे येत असते.

मनुष्याची झोप हा ह्या विषयातील तज्ञ संशोधकांसाठी एक गहन विषय ठरला आहे.

मेंदूतील त्रासदायक आठवणी, कामामुळे आलेला ताण घालवण्यासाठी महत्त्वाची ठरते झोप

गिनिपिगवर केलेल्या संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की पुरेशी झोप घेतल्यामुळे मेंदुतील आदल्या दिवशीच्या नको असलेल्या आठवणी, कामामुळे आलेला ताण नाहीसा होतो.

झोपेमध्ये मेंदू स्वतःचे क्लिनिंग म्हणजेच एक प्रकारची स्वच्छता करतो. यामुळे मनुष्य झोपेतून उठल्यानंतर नव्या उमेदीने आयुष्याला सामोरे जाण्यास तयार असतो.

२०१३ साली प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात अशी थेअरी मांडली गेली आहे की झोपलेले असताना मेंदूतील न्यूरॉन्समध्ये असलेल्या गॅप मधून एक प्रकारचे द्रव्य (fluid) वाहते. या द्रव्यामुळे मेंदूमध्ये निर्माण झालेल्या अनावश्यक पेशींचा निचरा होतो.

हे एक प्रकारचे नको असलेले घटक बाहेर टाकण्याचे काम आहे.

संशोधकांना असे आढळून आले आहे की आपला मेंदू जागृत अवस्थेत असताना दिवसभरातील कामे करत असताना त्याच वेळी या द्रव पदार्थाद्वारे स्वच्छतेचे काम करू शकत नाही.

त्यामुळे निद्रितावस्थेत असताना मेंदू या द्रवपदार्थाद्वारे स्वच्छतेचे काम करून टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतो.

यामुळेच संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की हा विशिष्ट द्रवपदार्थ मनुष्य रात्री झोपलेला असताना जास्त प्रमाणात स्त्रवतो तर दिवसा जागृतावस्थेत असताना याची मात्रा कमी प्रमाणात आढळून येते.

मेंदूतील पेशीमधील अंतर झोपेमध्ये वाढते

संशोधकांना असे आढळून आले आहे की मेंदूची स्वच्छता करणारा द्रवपदार्थ (फ्लूइड) योग्य पद्धतीने वाहत पुढे जावा यासाठी सजीव झोपलेले असताना त्यांच्या मेंदूच्या पेशींमधील अंतर वाढलेले दिसून येते.

या वाढलेल्या अंतरामुळे हे फ्लुईड म्हणजेच द्रवपदार्थ सहजपणे पेशींमधील गॅपमधून पुढे जाऊन टाकाऊ घटक बाहेर टाकण्याचे काम परिणामकारकपणे करू शकते.

मेंदूच्या विशिष्ट विकारांवर याबाबतीतील संशोधन महत्त्वाचे ठरू शकते अशी आशा शास्त्रज्ञांना वाटत आहे.

विविध प्रकारचे मेंदूशी निगडीत असणारे आजार उदाहरणार्थ अल्जाइमर, डिमेन्शिया, स्क्रिजोफेनिया आणि पक्षाघात हे आजार झोपेशी निगडीत आहेत असे आढळून आले आहे.

त्यामुळे मनुष्याच्या मेंदूत तो झोपलेला असताना घडणारे बदल याविषयी जर अधिकाधिक संशोधन झाले तर वरील मेंदूशी निगडीत असणाऱ्या आजारांवर योग्य औषधोपचार करता येतील, तसेच भविष्यात असे आजार होणे टाळता येऊ शकेल, निदान त्याचे प्रमाण कमी करता येऊ शकेल याबाबत संशोधक आणि शास्त्रज्ञ अतिशय आशादायी आहेत.

आज जगभरात सर्वत्र मनुष्य झोपलेला असताना त्याच्या मेंदूमध्ये होणारे बदल, मेंदूचे क्लिनिंग म्हणजे स्वच्छतेची प्रोसेस या सर्व विषयांवर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे.

वेगवेगळ्या न्यूरोलॉजिकल कंडीशन असणाऱ्या लोकांचा अभ्यास करून शास्त्रज्ञ याबाबत जास्त संशोधन करीत आहेत.

मेंदूशी निगडीत असणाऱ्या विविध आजारांवर उपाय शोधण्यासाठी या संशोधनाचा निश्चितपणे उपयोग होईल अशी आशा आपण करुया.

महत्त्वाचे म्हणजे या निमित्ताने झोपेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होते. बारा ते चौदा तास काम केल्यानंतर किमान सात ते आठ तास शांत झोप घेणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय आवश्यक असते हे हे वारंवार सिद्ध झाले आहे.

तेव्हा मित्र-मैत्रिणींनो, दररोज पुरेशी झोप घ्या. जागरणे टाळा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.

ही शास्त्रीय माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख शेयर करायला विसरू नका.

झोप येण्यासाठी घरगुती उपाय

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

1 Response

  1. Nitin Yadav says:

    Thanks for sharing

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!