झोपेत लाळ गळते का? तर दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा संकेत

तुम्ही लहान बाळाच्या तोडांतून झोपेत लाळ गळताना पाहिले असेल. झोपेतच नाही तर दिवसाही लहान बाळांच्या तोंडात भरपूर लाळ असते.

18 ते 24 महिन्यांचे होईपर्यंत लहान मुलांच्या तोंडात लाळेचे प्रमाण अधिक असते. लाळ ही निद्रावस्थेत तयार होते. जागेपणीदेखील लाळ तोंडात असते परंतु ती गिळली जाते.

झोपेत आपले शरीर आरामावस्थेत असल्याने ती गिळली जात नाही व तोंडातून बाहेर पडते.

हे जर फक्त नवजात शिशुसोबत होत असेल तर यामध्ये गंभीर असे काही कारण नाही. कारण जोपर्यंत लहान मुलांना दात येत नाही तोपर्यंत ते त्यांच्या लाळेवर नियंत्रण मिळवू शकत नाही.

दात येण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या तोंडातून झोपेत लाळ गळणे बंद होऊ शकते. हे सर्वच बालकांमध्ये सामान्य आहे.

परंतु तुमच्यासारख्या वयाने मोठ्या व्यक्तीच्या तोंडातून देखील झोपेत लाळ गळत असेल, तर या समस्येकडे दुर्लक्ष करता कामा नये.

यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात आणि त्याकडे तुम्ही लक्ष देऊन उपाय देखील केले, तर तुमची ही समस्या दूर होईल.

लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथींना लाळग्रंथी म्हणतात. तुमच्या तोंडाचा खालील भाग, गाल आणि पुढील दात याठिकाणी लाळ साठून राहते. जेव्हा तुम्ही या लाळेस गिळू शकत नाही तेव्हा ती तोंडातून बाहेर गळते.

लाळ गळण्याची लक्षणे पाहुयात

1. जीभेवर नियंत्रण नसणे.

2. अधिक प्रमाणात लाळ गळणे, यासाठी तुमची झोपण्याची पध्दतदेखील कारणीभूत असू शकते.

3. चार वयाच्या मूलापर्यंत लाळ गळणे ही सामान्य बाब आहे, परंतु त्यापुढील मुलांमध्ये ही समस्या भेडसावत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल.

4. जेवण, पाणी गिळण्यास त्रास होत असेल

या समस्या तुम्हाला भेडसावत असतील तर या समस्येकडे दुर्लक्ष न करता, डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे.

झोपेत लाळ गळण्याची कारणे

१. वय – वर सांगितल्याप्रमाणे, वयानुसार लाळ गळणे थांबू शकते. परंतु ते न थांबल्यास तुमच्या तोंडातील भागात काहीतरी समस्या आहे हे समजून घेतले पाहिजे.

२. अंमली पदार्थांचे सेवन – गुटखा, तंबाखू यासारख्या पदार्थांचे सेवन केल्याने देखील तुमच्या तोंडात प्रमाणाबाहेर लाळ तयार होऊ शकते. आणि यामुळे मग झोपेत तिच्यावर नियंत्रण न झाल्याने ती बाहेर गळू शकते.

३. अतिरिक्त गोळ्यांचे सेवन – अतिरिक्त गोळ्या खाल्ल्याने देखील तोंडात अतिरिक्त लाळ उत्पन्न होते.

4) तुम्हाला काहीही गिळण्यास समस्या येत आहे का?- तुम्हाला जर गिळताना त्रास होत असेल तर, हि एक गंभीर समस्या सुद्धा असू शकते. यास डिस्फेगिया असे म्हणतात. याचे स्वरूप पुढे जाऊन पार्किसन्स, मस्क्युलर डिस्ट्रॉफी किंवा कँसरमध्ये देखील बदलू शकते. त्यामुळे हा त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

5) स्लीप एपनीया – या आजारात तुमचे तुमच्या झोपेवर नियंत्रण राहत नाही, झोपेत तुमचा श्वासोच्छवास रोखला जातो. जागे असताना तुम्ही कोणत्याही एका कामावर मन नियंत्रण करू शकत नाही. तुमचे मन सतत अस्थिर असते.

या आजारामध्ये केवळ लाळ गळत नाही तर यामध्ये तुम्ही अचानक गाढ झोपेतून उठता, झोपेतून उठल्यावर घशात खवखव जाणवते किंवा गळा सूजतो अशाप्रकारच्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागतो.

6) सर्दी, खोकला – जर तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तर तुमच्या नाकातील पोकळी ही संपूर्णपणे सूजली जाते, यामुळे आतमध्ये काही ब्लॉकेज आणि स्त्राव निर्माण होतो. जो स्त्राव लाळेमार्फत गळू शकतो. त्यामुळे या समस्येबाबत देखील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

झोपेत लाळ गळत असल्यास करण्याचे उपाय

यासाठी काही उपाय आहेत, ते जर तुम्ही करून पाहिलेत तर नक्कीच फरक जाणवेल

१. झोपण्याच्या पध्दतीमध्ये बदल करावा – अनेक जणांना तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असते. तसे न करता तोंड बंद करून झोपावे. तसेच काहीजण उशीचा देखील वापर करत नाही त्यामुळे तोंडातली लाळ बाहेर गळू शकते. उशीचा वापर करावा.

२. अतिरिक्त प्रमाणात पाणी पिणे – पाणी पिणे हा सर्वच आजारावरील सर्वोत्तम उपाय मानला जातो. भरपूर प्रमाणात/ योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने तुमचे शरीर हायड्रेट राहील त्यामुळे तोंडात देखील पाणी राहील व शरीराला अतिरिक्त प्रमाणात लाळ तयार करण्याची आवश्याकता राहणार नाही.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय