वाचक हो, चला आजपासून आपण सहज सुलभ आरोग्यप्राप्तीची रहस्य जाणून घेऊयात!
मला आज पोटात कसं तरीच😒 होतंय आज जडं अन्न नको! मी हलकं फुलकं काहीतरी खाईन!
हे जड नि हलकं अन्न काय असत? नि त्यामागील आयुर्वेद संदर्भ काय? ते पाहूयात!
जड अन्न म्हणजे गुरु आहार
हलके अन्न म्हणजे लघु आहार
गुरु लघु आहाराची चर्चा करताना द्रव्य- स्वभाव, संस्कार, मात्रा, अन्नकाल आदि बाबींचा विचार करावा लागतो.
स्वभाव
काही पदार्थ स्वभावतःच गुरू असतात. उदाः श्रीखंड, मांसाहार 🍗🍖🍤इ.
तर काही स्वभावतःच लघु असतात. उदाः साळीच्या लाह्या, कुरमुरे इ.
संस्कार
दूधापासून बनवलेले खवा, रबडी, श्रीखंड आदि पदार्थ गुरु असतात तर दूधात सुंठ🥛घातली कि ते लघु होते.
म्हणजे संस्काराने जसे आपले स्वभाव गुण बदलता येतात तसेच अन्नसंस्काराने अन्नाचे गुण🍿बदलतात बरं का!
मात्रा
मात्रा म्हणजे प्रमाण. श्रीखंड असले की पोटास तडस लागेपर्यंत न खाता थोडे घास भर कमी खाणे किंवा त्यावेळी भात न खाणे अशा युक्त्या आपण करतो कि नाही ? हाच मात्रा विचार!
अन्न
ताप असेल किंवा अजीर्ण झाले असेल तर आपण काय करतो बरं? भाताची किंवा मूगाची पेज🍵पितो, राजगीरा लाडू खातो हा विचार अंगवळणी पडलाय ना आपल्या!
काल
रात्रीचे जेवण पचायला जड नसावे, कारण रात्री जेवणानंतर शरीराला दिवसाप्रमाणे श्रम न करता थोड्यावेळाने झोपायचे असते, त्यामुळे गुरु आहार खाल्ल्यास अपचन होण्याची किंवा त्या आहाररसाचे चरबीत वा कफात रुपांतरीत होण्याची शक्यता अधिक असते. तसेच रात्रीचा आहार फारच लघु म्हणजेच पचायला फारच हलका असल्यास बर्याच जणांना डोळ्यावर योग्यवेळी झपडंच न आल्याने उशीरा झोप लागते.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.