रसरशीत तारुण्य जपण्यासाठी म्हणा, बाय बाय ज्यूस!! वेलकम फ्रूट्स

रोज व्यायाम करण्याचं महत्त्व आपल्याला सर्वांना माहीतच आहे.

आणि रोजच्या रोज सहजपणे करता येणारा व्यायाम म्हणजे चालणे, जॉगिंग किंवा धावणे. दिवसाची सुरुवात अशी ॲक्टीव्ह होऊन चपळतेने केली की प्रसन्न वाटतं.

मॉर्निंग वॉक घेणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. मोकळी मैदाने, सार्वजनिक बागा किंवा बीच वर रोज कित्येक व्यक्ती व्यायामासाठी येतात आणि इथेच ज्यूस सेंटर मोठ्या प्रमाणात दिसतात.

आकर्षक जाहिराती, रंगीबेरंगी पोस्टर पाहून ग्राहकांचे पाय नकळत इथे वळतात. व्यायाम करून येणारा थकवा घालवण्यासाठी बरेच जण इथे ज्यूस पिऊन मगच पुढे जातात.

या ज्यूस मध्ये विविध प्रकार उपलब्ध असतात. फळांचे ज्यूस, औषधी हर्बल ज्यूस किंवा मिक्स फ्रुट ज्यूस. विविध रंगांनी ज्यूस सेंटर सजलेली दिसतात.

या लेखातून आम्ही तुम्हाला नैसर्गिकरीत्या मिळणारी फळे आणि त्यांच्या रसापासून बनवलेला ज्यूस यातून काय निवडावे याची संपूर्ण माहिती देणार आहोत.

ज्यूस बद्दल ही माहिती जाणून घ्या

बहुतेक वेळा फळांचा गर ज्यूसर मध्ये फिरवून फक्त त्यातला रस वापरला जातो. फळांचा गर वापरला जात नाही.

ज्यूस बनवताना साखर वापरली जाते. किंचित मीठ किंवा चव वाढवण्यासाठी इतर घटक वापरतात. यामुळे कॅलरीज वाढतात.

स्थूलता, मधुमेह, हृदयरोग असेल तर अतिरिक्त कॅलरीज मुळे वजनवाढ, शुगर वाढणे असे त्रास संभवतात.

ज्यूस जास्त वेळ बनवून ठेवला असेल तर खराब होऊ शकतो किंवा त्याच्यातील पोषणमूल्य कमी होतात.

ज्यूस साठी वापरले जाणारे पाणी, एकंदरीत या ज्यूस सेंटर वरील स्वच्छता, माश्यांचा प्रादुर्भाव यामुळे आरोग्य बिघडू शकते.

आयुर्वेदिक या नावाने विकली जाणारी विविध औषधी युक्त ज्यूस ही खरं तर आयुर्वेदानुसार निषिद्ध आहेत.

काही वेळा दोन किंवा त्यापेक्षा जास्त वनस्पती एकत्र करून ज्यूस बनवला जातो पण या वनस्पतींचे गुणधर्म परस्पर विरोधी असतील तर फायदा होण्याऐवजी नुकसानच होते.

प्रत्येक व्यक्तीने आपली शरीर प्रकृती जाणून त्याप्रमाणे औषधी सेवन करावे. एखादी पित्त प्रकृतीची व्यक्ती जर वारंवार कारल्याचा किंवा कडूलिंबाचा ज्यूस घेत असेल तर काही काळानंतर तिची तब्येत निश्चितपणे बिघडू शकते.

ज्यूस सेंटर वर विक्री करणाऱ्या व्यक्तींना वनस्पतींचे गुणधर्म, त्यांचा शरीरावर होणारा परिणाम याबाबत सखोल ज्ञान नसल्याने त्यांच्याकडून सरसकट एकाच प्रकारचा ज्यूस सर्वांना दिला जाऊ शकतो.

आता फळांविषयी जाणून घेऊया

संपूर्ण फळ खाल्याने त्यातील फायबर पोटात जातो. बद्धकोष्ठ, पचनाच्या तक्रारी असतील तर या फायबर मुळे खूप फरक पडतो.

काही फळांच्या सालींमध्ये जीवनसत्त्वे असतात. सालीसकट फळ खाल्याने यांचा लाभ घेता येतो.

ऋतुमानाशी निगडीत असा आहार पचायला सोपा असतो. याशिवाय त्या त्या ऋतुंमध्ये पिकणाऱ्या फळांचे गुण हे थंडी किंवा उन्हाळा यानुसार बदलत असतात. उदा. आंब्याची चव, त्याचे गुणधर्म उन्हाळ्यात अधिक चांगले असतात.

फळांमध्ये असणारी शर्करा नैसर्गिक स्वरूपात असते. त्यामुळे अतिरिक्त साखर शरीरात जात नाही.

घरी आपण स्वच्छतेची पूर्ण काळजी घेऊ शकतो. उदा. फळे नीट धुऊन घेणे.

फळ कापून खात असताना एकाच वेळी खाल्ले जाते. त्यामुळे त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होत नाहीत.

हे फरक जाणून घेतल्यानंतर आता निश्चितच संपूर्ण फळ खाण्याचे फायदे तुम्हाला समजले असतील.

व्यायामानंतर खूप थकवा आला आणि द्रवपदार्थ पिण्याची इच्छा असेल तर नारळपाणी किंवा लिंबूपाणी उत्तम. परंतु कफाचा त्रास असेल, सायनस, सर्दी, पडसे असेल तर नारळपाण्याने कफ वाढण्याची शक्यता असते. अश्यावेळी पाणी पिऊन थकवा दूर करावा.

आवळा प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. दररोज एक आवळा जरुर खावा.

आता वर्षभर सर्व प्रकारची फळं बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. पण कोणता ऋतु आहे हा विचार करून त्या दिवसांत पिकणारी फळे आवर्जून खावीत.

केळी हे बारमाही फळ आहे. त्यामुळे ते रोज खाऊ शकता. चार, पाच प्रकारच्या फळांपासून बनवलेले फ्रुट सलाड सुद्धा तब्येतीसाठी योग्य नाही.

आयुर्वेदानुसार दूध आणि फळे हा विरूद्ध आहार आहे. सतत असा आहार घेतल्याने ॲलर्जी, दमा यासारखे आजार होण्याची शक्यता असते.

म्हणून आपली शरीर प्रकृती नीट समजून घ्या. काही शंका असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आहारशास्त्राचे साधे, सोपे नियम पाळा आणि कोणत्याही फॅड डाएट किंवा चुकीच्या कल्पनांना बळी पडू नका.

काळजी घ्या, स्वस्थ रहा आणि म्हणा, “बाय बाय ज्यूस….. वेलकम फ्रूट्स!!!”

लेख आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय