स्वयंपाकासाठी कोणते तेल सर्वात चांगले

खमंग फोडणीचा तडका असो की चटकदार भजी, स्वयंपाकासाठी तेल हे हवेच. रोजच्या वापरासाठी कोणते तेल वापरावे? आरोग्यासाठी कोणते तेल चांगले? असे प्रश्न आपल्याला नेहमीच पडतात.

मनाचेTalks खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे तेलाबद्दल परीपूर्ण माहिती देणारा हा लेख.

खाद्यतेलाचे प्रकार

१. घाण्यावर तेलबिया फिरवून काढलेले पारंपारिक पद्धतीचे तेल. याला कोल्ड प्रेस्ड ऑइल्स म्हणतात.

२. रिफाईंड ऑईल्स यात तेलावर विशिष्ट प्रक्रिया केली जाते. याला हॉट प्रेस्ड ऑइल्स म्हणतात.

पारंपारिक तेलाचे गुणधर्म

यात तेलबिया लाकडी घाण्यावर फिरवून तेल काढले जाते. तेलावर कोणत्याही प्रकारची केमिकल प्रक्रिया केली जात नाही त्यामुळे या तेलाचे पोषणमूल्य चांगले असते. तीळ, शेंगदाणा, जवस, सूर्यफूल, करडई, बदाम, सुके खोबरे इत्यादी पासून तेल मिळते.

पारंपारीक पद्धतीने तेल काढताना उष्णता जास्त प्रमाणात निर्माण होत नाही त्यामुळे तेलामधले Vitamin E आणि ओलेइक ॲसिड हे घटक नष्ट होत नाहीत.

म्हणूनच घाण्यावरचे तेल स्वयंपाकासाठी वापरले तर प्रतिकारशक्ती वाढते.

तेलबियांचे औषधी गुणधर्म या प्रकारात टिकून रहातात. यापैकी काही प्रमुख तेलांचे गुणधर्म पाहूया

१. तीळ तेल यातील सिसॅमॉल हा घटक ॲंटीऑक्सीडंट्स व बुरशीनाशक आहे. याच्यामुळे vitamin E चे शोषण चांगल्या प्रकारे होते. म्हणून तीळ तेल त्वचेचे आरोग्य सुधारते. मालिश करण्यासाठी आयुर्वेदामध्ये तीळ तेल सर्वश्रेष्ठ मानले जाते.

यात vitamin B6, vitamin B12 असते. याला एक प्रकारचा उग्र वास असतो. हे स्वयंपाकात वापरताना अगदी कमी प्रमाणात वापरावे.

२. खोबरेल तेल यात कोकोसिटॉल हा घटक असतो. हे तेल शरीरातील चांगले कोलेस्टेरॉल वाढवत असल्याने हृदय रोगात गुणकारी आहे. स्वयंपाकासाठी वापर करताना मंद आचेवर तापवावे.

३. जवस तेल यात omega 3 fatty acids मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे शरीराची चयापचय प्रक्रिया सुधारते. त्यामुळे शरीरातील चरबी कमी होते. म्हणून वेटलॉस करीता उपयुक्त आहे. हे तेल डायबिटीस, स्थूलता यात वापरावे. यामुळे यकृताचे कार्य सुधारते तसेच शरीरावर सूज असेल तर हे तेल जेवणात वापरावे.

कारण शरीरात पाणी साठून राहीले की सूज येते. या तेलामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते.

पारंपारिक तेल वापरताना कोणती काळजी घ्यावी

पारंपारिक तेलावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया केली जात नाही त्यामुळे त्यांचा रंग आणि गंध रिफाईंड तेलांच्या तुलनेत आकर्षक नसतो. मूळ तेलबियांचा वास या तेलाला येतो.

या तेलाचा वापर स्वयंपाकासाठी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ती म्हणजे तळण्यासाठी हे तेल वापरणे योग्य नाही. कारण deep fry करत असताना जास्त उष्णतेची गरज असते आणि या तापमानावर पारंपारिक तेलातील अनसॅट्युरेटेड फॅटस् बाहेर पडतात. यामुळे खाद्यतेल म्हणून वापर करताना काळजीपूर्वक करावा.

परंतु कोरड्या चटण्या, भाकरी यावर वरून घेण्यासाठी कमी प्रमाणात यांचा वापर करावा.

पाश्चात्य देशात सॅलड ड्रेसिंग साठी ॲव्होकॅडो, बदाम, अक्रोड यांचे तेल व्हर्जिन ऑईल्स म्हणून वापरतात.

रिफाईंड तेलाचे गुणधर्म

या पद्धतीने तेलबियांपासून तेल काढताना उच्च तापमान वापरले जाते. त्याचप्रमाणे उग्र वास घालवण्यासाठी, रंग चांगला दिसावा याकरिता वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया सुद्धा केल्या जातात.

पण यामुळे रिफाईंड तेलातील पोषणमूल्य निघून जाते. त्यामुळे रोजच्या वापरात ही तेले असतील तर शरीराची आवश्यक ती पोषणाची गरज पूर्ण होत नाही.

परंतु जर चकली, पुरी असे डीप फ्राईड पदार्थ करायचे असतील तर रिफाईंड तेलाचा तळण्यासाठी वापर करावा.

पारंपारिक तेलांचा वापर अनेक वर्षांपासून आपल्याकडे होत होता. परंतु वाढते हृदयरोग, मधुमेह, स्थूलता यामुळे काही वर्षांपासून रिफाईंड तेलाचा प्रचार व प्रसार जास्त प्रमाणात होत आहे.

पण विज्ञानाने पारंपारिक तेलाचे महत्त्व नव्याने अधोरेखित केले. त्यामुळे पुन्हा पूर्वापार वापरल्या जाणाऱ्या घाण्यावरच्या तेलाला जास्त मागणी आहे. अल्झायमर सारख्या रोगात मेंदूची झपाट्याने कमी होणारी कार्यक्षमता जर रोखायची असेल तर आहारात पारंपारिक पद्धतीने काढलेले खोबरेल तेल वापरावे.

कोणतेही तेल गरम करताना काय काळजी घ्यावी

तेल गरम करत असताना कधीही तेल उकळुन त्यातून धूर निघेपर्यंत गरम करू नये. या अवस्थेला तेलाचा स्मोक पॉइंट असे म्हणतात.

प्रत्येक तेलाचा स्मोक पॉइंट वेगवेगळ्या तपमानाला दिसून येतो.

 • सूर्यफूल तेल : ४५०°c
 • शेंगदाणा तेल : २२५°c
 • मोहरी तेल : २५०°c
 • ऑलिव्ह तेल : १६०°c

यावरून लक्षात येते की ज्या तेलाचा स्मोक पॉइंट कमी ते तळण्यासाठी उपयोगी नाही कारण ते लवकर जळते व जास्त स्मोक पॉइंट असलेले तेल तळण्या साठी वापरावे.

खाद्यतेलाचे पृथक्करण

खाद्यतेलामधे Glycerol आणि fatty acids असतात. Fatty acids ही saturated आणि unsaturated अशी दोन प्रकारची असतात.

खाद्यतेलांमधील unsaturated fatty acids चे तीन प्रकार पडतात

 • Monosaturated यात ॲव्होकॅडो, ऑलिव्ह ऑइल यांचा समावेश होतो.
 • Polysaturated यात मका, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, सरकी यांचा समावेश होतो.
 • Transfats याचे उदाहरण म्हणजे वनस्पती तूप

यापैकी ट्रान्सफॅट्स हानीकारक असून त्यांच्या अती वापरामुळे कोलेस्टेरॉल वाढते, यकृताचे रोग होतात.

रिफाईंड तेल पुन्हा पुन्हा गरम करून वापरू नये. हे तेल अती तापवले तर त्यातील आवश्यक घटक नष्ट होऊन काही विशिष्ट केमिकल प्रक्रिया सुरू होतात. त्यातून free radicals निर्माण होतात. हे शरीरातील पेशींमध्ये जाऊन त्यापासून अनेक घातक रोग होतात.

Free radicals मुळे होणारे आजार पुढीलप्रमाणे

 • डायबिटीस
 • कॅन्सर
 • हृदयरोग
 • यकृताचे आजार
 • मोतीबिंदू
 • लवकर वृद्धत्व येणे
 • आधीपासून असलेल्या आजारांमध्ये वाढ
 • पुरुषांमधील वंध्यत्व

हातगाडीवर मिळणारे खाद्यपदार्थ हे पुन्हा पुन्हा उरलेल्या तेलात तळलेले असतात त्यामुळे यात free radicals प्रचंड प्रमाणात असतात. हे खाणे शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे.

घरात स्वयंपाक करताना फोडणी जळू देऊ नये. तळणीचे पदार्थ करताना गरजेपेक्षा जास्त तेल तापवू नये. अंदाजाने बरोबर संपेल एवढेच तेल वापरावे. पोळी करताना सुद्धा तव्यावरून उतरली की नंतर तेल/ तूप लावावे. अन्यथा गरम तव्यावर तेल जळते.

खाद्यतेलाबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते जरुर सांगा. योग्य प्रकारचे तेल निवडा व आपल्या पारंपारिक तेलांचा वापर करून खाद्यजीवन समृद्ध करा. लाईक व शेअर करा. उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

असेच मनाचेTalks चे विविध लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय