सुंदर ते ध्यान!

sundr-te-dhyan

ध्यान (Meditation) म्हणजे काय? ते कसं करायचं असतं? त्याचे फायदे काय असतात? नुसते डोळे बंद करुन, एका जागी बसणं, म्हणजे वेळेचा अपव्यय नाही का? ध्यान करण्याची योग्य पद्धत कोणती?

ध्यान करणं, खरचं आवश्यक आहे का? असे कित्येक प्रश्न मला पडायचे, आणि अशातच पुण्याच्या वि. वि. गोखले यांचं, ‘ध्यानविद्या’ हे पुस्तक लायब्ररीतुन कुतुहलातुन आणलं, आणि ते वाचुन, त्याचा अभ्यास करुन, खरचं माझं आयुष्यच बदलुन गेलं, १९८० मध्ये लिहलेलं, हे पुस्तक म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने ‘ध्यान-उपासना’ केल्या जाणार्‍या पद्धतींच वर्णन आहे.

ध्यानाचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की संतांनी सांगितलेले मंत्रातुन किंवा नामस्मरणातुन केले जाणारे ध्यान असते, तसेच कसल्याही शब्दाचा वापर न करता ‘भावातीत ध्यान’ गुळवणी महाराजांनी आणि महर्षी महेश योगी यांनी वर्णन केलं.

स्वामी सत्यानंदानी क्रियायोग सांगितला, तर थिऑसॉफी पंथामध्ये ओंकार-उपासना शिकवतात व करुन घेतात, अनेक जाणकार शक्तिपाताने योगदिक्षा देतात, तर श्रीमती निर्मला देवींनी सोप्या भाषेत समजावुन ‘सहजयोग’ प्रसिद्ध केला आहे.

ठाण्याच्या स्वामी मुक्तानंदानी सिद्धयोग समजावला आहे, आणि धारवाडच्या कुमारस्वामींनी तृतीय नेत्र जागृतीचे तंत्र शिकुन साधकांना ‘शिवयोग’ उपलब्ध करुन दिला आहे,

ध्यान करताना दोन भुवयांच्या मध्ये पहाणे, ह्याला ‘शांभवी मुद्रा’ असे नाव आहे, तर ध्यानात बसुन, नाकाच्या शेंड्याकडे पाहणं, ह्याला ‘अगोचरी मुद्रा’ म्हणतात.

कश्मिरचे पंडीत गोपीकृष्ण यांनी सहा चक्रामधल्या संवेदनांचा अभ्यास करत कुंडलीनी स्फोट करणारी योगसाधना शिकविली, तर बंगालचे स्वामी प्रभुपाद भक्तिवेदांत यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी कृष्णभक्तीतुन मनःशांती प्राप्त करण्यासाठी इस्कॉनची स्थापना केली, ज्याचं आजचं वैश्विक रुप आपण सर्व जाणतोच.

स्वातंत्रपुर्ण भारतात पॉंडिचेरीच्या योगी अरविंदांनी समन्वयकारी पुर्ण योग जगापुढे मांडला, पारंपारिक धर्मावर कठोर प्रहार करणार्‍या रजनीश ओशोने ‘नवसंन्यास’ सांगुन जगभरातल्या लाखो लोकांना मोहीनी घातली, ज्यात हे साधक आधी मनसोक्त हसतात, संगीतावर नाचतात, आणि मग शरीर पुर्णपणे थकल्यावर ध्यानाला बसतात, ओशोने ध्यानाचे मनोरंजक प्रकार शोधुन काढले, ‘समाधी टॅंक’ पद्धतीमध्ये पाण्यामध्ये दोन तास बसुन ध्यान करतात, तर गिबरीश ध्यानामध्ये निरर्थक बडबड करुन भावना व्यक्त केल्या जातात.

दादा लेखराज यांनी सुरु केलेल्या प्रजापिता ब्रम्हकुमारीमध्ये राजयोग शिकवतात, अग्निहोत्र केले जाते. पावसचे स्वामी स्वरुपानंद यांनी सोहम साधना वर्णन केली.

प्राणायामाचे महत्वाचे दोन प्रकार आहेत, उज्जयी आणि अनुलोमविलोम. डोळ्यावर बोटे ठेवुन हुंकार करण्याला नादानुसंधान म्हणतात.

अनेक योगसिद्ध आणि आत्मज्ञानी लोकांनी प्रसार केलेला ‘योगनिद्रा’ हा एक प्रकारच्या प्रत्याहाराचा अभ्यास आहे, ज्याच्या रोजच्या अभ्यासाने प्रचंड शारीरीक आणि मानसिक लाभ होतो.

उदा. पुण्याच्या डॉ. संप्रसाद विनोद यांनी आपल्या अनेक वर्षांच्या संशोधनातुन रक्तदाब, ह्रद्यविकार, निद्रानाश, मरगळ, निरुत्साह, नैराश्य अशा अनेक रोगांवर शवासन ध्यान हा रामबाण उपाय आहे, हे सप्रमाण सिद्ध केले, तर स्वामी शिलानंदांनी शुद्ध वेदावर आधारित मनाला आनंदीत करणारे, आणि व्यक्तीला सत्कृत्याकडे वळवणारे, यजुर्वेदीय ध्यान शिकवले.

पु. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी ‘स्वाध्याय’ करुन, ‘कृतिभक्ती’ मधुन ध्यान साध्य करण्याची आगळीवेगळी पद्धती समजावली, निखळ आनंदाचा झरा प्रवाहीत होण्याचा मार्ग सांगितला ‘प्रत्येकाच्या हृदयात देव वसतो’, ह्या एका शिकवणीला आत्मसात केल्यास व्यक्तीच्या जीवनात आमुलाग्र बदल घडतो, व्यक्ती भगवंताशी सहजपणे जोडला जातो, ध्यानात प्रभुशी एकरुप होण्याला त्यांनी ‘भावभक्ती’ हे नाव दिले. ह्या मार्गावर चालणार्‍या लाखोकरोडो स्वाध्यायींच्या चेहर्‍यावर सतत स्मितहास्य असते आणि हृदयात सर्वांबद्द्ल आपलेपणा असतो.

‘आनंदमुर्ति’ नावाच्या स्वामींनी गुप्त पद्धतीचा ‘आनंदमार्ग’ सांगितलाय, जो त्यांच्या अनेक शिष्यांनी आत्मसात केला. लोणावळ्याच्या स्वामी विद्यांनंदांनी सत्कृत्यावर भर देत आध्यात्मिक साधना शिकवली.

गौतम बुद्धांच्या विपश्यना पद्धतीला श्री. गोएंकाजींनी पुनर्जिवीत केले, आणि तितकेच लोकप्रिय करुन अनेक लोकांना मनःशांती प्राप्त करुन दिली. जाणकार सांगतात, कोणताही ध्यानाभ्यास शंभर तास झाला पाहीजे, विपश्यनेच्या दहा दिवसात, रोज दहा तास ध्यान केल्याने हे शंभर तास पुर्ण होतात आणि स्वभावात परिवर्तन घडते. विपश्यना करणारा प्रत्येक साधक आगळ्यावेगळ्या आनंदाचे वाटेकरी झाल्याचा भाव व्यक्त करतात.

‘निखळ अवधान’ हा शब्द रुजवणारे जे. कृष्णमुर्ती यांनी पद्धत नसलेली पद्धत सोप्या शब्दात मांडली. माऊंट अबु मध्ये राहणार्‍या त्यांच्या शिष्या, सुश्री विमलाजी ठकार यांनी ह्या ध्यानकलेची अपुर्वाई ‘अवधान योगशिबिरांतुन’ घराघरात पोहचवली.

डॉ. कौशिक यांनी मंत्र, पद्धती, षटचक्रावरील ध्यान याची स्पष्ट कल्पना देत, दर्शनयोग व जीवनकिमया यांची सांगड घातली, अशाच अनोख्या ध्यानपद्धतींना, पाचगणीचे श्री. दादा उपाख्य दत्तोराम गावंद कोकणातुन थेट कॅलीफोर्नियात घेऊन गेले, आणि आयुष्यभर अखंड साधनेत रमले.

सुदर्शन क्रिया, योगासने, प्राणायाम, आणि ध्यान यांचा प्रचार प्रसार करुन आर्ट ऑफ लिविंगचे अर्ध्वयु, श्री. श्री. रविशंकर हे आजही लाखो लोकांना जीवन जगण्याची कला शिकवत आहेत.

मित्रांनो, तुमच्यापैकी कितीजन नित्यनेमाने ध्यान, प्राणायाम, योगासने करतात? कुठे आणि काय शिकलात? त्याचा तुम्हाला कसा लाभ झाला? मनमोकळेपणाने तुमचे ध्यानाविषयीचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांसोबत शेअर करा, तुमचे ध्यानाविषयीचे, आणि इतर आध्यात्मिक अनुभव जाणुन घ्यायला मला खुप आवडेल.

धन्यवाद!

वाचण्यासारखं आणखी काही…

माणसं जोडावी कशी?
निर्भय बना!
उत्कृष्टतेचा ध्यास


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 Response

  1. राजेश तोमर says:

    ध्यान मनुष्य के लिए बहुत-प्रभावशाली पद्धति है मैंने खुद महर्षि महेश योगी प्रणीत भावातीत ध्यान का अभ्यास कई वर्षों से किया है इससे मेरे व्यक्तित्व में बहुत बदलाव आया है मैं कई तरह की बीमारियों से अच्छा हूं और मेरा मानसिक स्वास्थ्य अच्छा हुआ है

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!