एरंडेल तेलाचे औषधी आयुर्वेदिक गुणधर्म आणि फायदे जाणून घ्या या लेखातून

Castor-Oil-erandel-telache-upyog

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: एरंडेल तेलाचे उपयोग आणि फायदे मराठी । एरंडेल तेलाचे नुकसान । एरंडेल तेल उपयोग पोटासाठी । castor oil in marathi । एरंडेल तेल केसांसाठी उपयोग मराठी

एरंड ही वनस्पती आयुर्वेदानुसार खूप उपयोगी आहे. एरंडाच्या पानांना संस्कृत भाषेत गंधर्वहस्त असे म्हणतात. कारण या पानांचा आकार हाताच्या पंजासारखा दिसतो. याचेच दुसरे नाव आहे वर्धमान!!!

कारण या वनस्पतीची कमी वेळात भरपूर वाढ होते. सतत वाढणारे या अर्थाने वर्धमान असे समर्पक नाव दिले आहे.

एरंडाच्या बियांपासून एरंडेल तेल काढले जाते. एरंडेल तेल पोट साफ करण्यासाठी वापरतात हे तुम्हाला माहित असेलच. पूर्वीच्या काळात आजी किंवा पणजी घरातील लहान मुलांना रविवारी सकाळी सुट्टीच्या दिवशी एरंडेल तेल पाजायची.

ठराविक काळाने हा कार्यक्रम घरोघरी असायचाच. यामुळे मुलांच्या पचनाच्या समस्या नाहीशा होत. पण याचा हा एकच उपयोग नसून अनेक रोगांवर एरंडेल गुणकारी आहे.

या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एरंडेल तेलाचे विविध उपयोग. कोणकोणत्या आजारांमध्ये ते वापरले जाते तसेच याचा औषधी उपयोग कोणत्या स्वरूपात करतात.

चला तर मग जाणून घेऊया एरंडाचे आयुर्वेदानुसार कोणकोणते उपयोग सांगितले आहेत.

एरंड विशेषतः वातविकारांवर रामबाण उपाय म्हणून वापरला जातो.

कफाचे विकार कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो.

हा वृष्य गुणाचा आहे. म्हणजे शरीरातील शुक्र धातू वाढविण्यासाठी एरंडाचा वापर करतात. त्यामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्वावर उपचार करताना हे महत्त्वाचे औषध ठरते.

आपण पाहिले की वातविकारांमध्ये एरंड अतिशय उपयुक्त आहे. वातविकार म्हटले की त्यात अनेक रोगांचा समावेश होतो. अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत संपूर्ण शरीरात वातदोष संचार करत असतो.

आणि याच्या कार्यात जर का काही बिघाड झाला तर शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी निर्माण होतात. या वातविकारांत प्रमुख लक्षण असते वेदना!!!

संधीवात, केस गळणे, टक्कल पडणे, पचनाच्या समस्या अशा सर्व अवस्थांत एरंडेल अतिशय उपयोगी आहे.

पण विविध रोगांवर याचा वेगवेगळ्या मात्रेत उपयोग केला जातो.

एरंडाचे गुणधर्म जाणून घेऊया

एरंड गुरु गुणाचा म्हणजे पचायला जड असतो. उष्ण, तीक्ष्ण गुणात्मक असून शरीरात साठलेला अवरोध अथवा ब्लॉकेज दूर करणारा आहे.

याशिवाय हा स्निग्ध गुणात्मक सुद्धा आहे. म्हणजेच एरंडाचे गुण हे वाताच्या विरुध्द काम करणारे आहेत. वातदोष थंड, रुक्ष तसेच शरीरात अवरोध निर्माण करतो. याविरुद्ध काम करण्यासाठी एरंडेल सर्वात प्रभावी आहे.

शरीरावर सूज आली असेल तर एरंड शोथनाशक म्हणजे सूज कमी करण्यासाठी वापरतात.

वेदनाशामक गुण हा याचा सर्वात मोठा फायदा आहे.

आयुर्वेदानुसार वातविकार ८० प्रकारचे सांगितले आहेत.

शरीरात कोणत्याही कारणाने वेदना होत असल्यास त्याचे कारण बिघडलेला वातदोष आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

मानेचे दुखणे, स्पॉन्डिलायटिस, सायटिका, कंबरदुखी, पाठदुखी, मणक्यांमध्ये गॅप पडणे, गुडघेदुखी, टाचदुखी, फ्रोजन शोल्डर, लहान सांध्यांना सूज व वेदना, पॅरालिसिस म्हणजे पक्षाघात किंवा लकवा, अर्धांगवायू , फेशिअल पॅरॅलिसिस, युरीक ऍसिड वाढणे (वातरक्त), शरीराला कंप येणे (पार्किन्सन्स) या सर्व रोगांना वातविकार म्हणता येईल.

एरंडाचा वापर बाह्य उपचारांसाठी तसेच शरीरांतर्गत असा दोन्ही प्रकारे केला जातो.

एरंडेल तेलाचे बाह्य उपचार

एरंडाचे पान घेऊन त्याला एरंडेल तेल लावून घ्यावे. हे पान तव्यावर गरम करावे. सूज आलेल्या किंवा दुखऱ्या भागावर या पानाने शेक द्यावा. यामुळे सूज व ठणका कमी होतो.

एरंडाची पाने वाटून त्याची जाडसर पेस्ट किंवा कल्क (चटणी सारखा गोळा) बनवावा. ही पेस्ट एरंडेल तेलात थोडीशी शिजवून घ्यावी. गरम असतानाच याने वेदना होणाऱ्या भागावर शेक द्यावा किंवा याचा लेप त्याठिकाणी लावावा.

आमवातावरचे रामबाण औषध म्हणजे एरंडेल तेल

1) आमवात हा एक चिवट रोग आहे. एकदा का याने शरीरात ठाण मांडले की, याच्यापासून सुटका होणे कठीण असते. पण यावर गुणकारी असा एक आयुर्वेदिक काढा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हा काढा करण्यासाठी गुळवेलीचे तुकडे (खोड) व सुंठ दोन कप पाण्यात उकळून अर्धे पाणी शिल्लक राहील इतपत शिजवावे.

थोडे कोमट असतानाच गाळून यात दोन चमचे एरंडेल तेल घालून सकाळी रिकाम्या पोटी प्यावे.

साधारणपणे पाच ते सात दिवस हा उपाय करावा. त्यानंतर वेदना कमी होईपर्यंत एरंडेल न घालता फक्त गुळवेल व सुंठीचा काढा प्यावा. हा उपाय खूपच लाभदायक आहे.

2) मलावरोध असेल तर रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात एक मोठा चमचा एरंडेल तेल मिसळून प्यावे. सकाळी पोट साफ होते. पण हा उपाय थोडेच दिवस करावा.

मलावरोध होण्याचे मूळ कारण शोधून त्यावर इलाज करणे आवश्यक आहे. जरुरीप्रमाणे आहारात बदल करावा. फायबर युक्त अन्न आणि भरपूर पाणी पिणे यामुळे शौचाला साफ होते.

लहान मुलांना शौचाला खडा होत असेल तर एरंडेल तेलात कापूस भिजवून तो गुदद्वाराच्या तोंडाशी लावून ठेवावा. म्हणजे हे तेल शोषले जाते व संडासला साफ होते.

त्याचप्रमाणे नाभीवर एरंडेल तेल लावल्याने देखील फायदा होतो. एरंडाच्या पानावर एरंडेल तेल लावून हे पान लहान मुलांच्या नाभी वर लावून ठेवले असता मलावरोध नाहीसा होतो.

3) फक्त पोट साफ करणे एवढाच मर्यादित उद्देश ठेवून एरंडेल तेल सेवन करु नये. तर संपूर्ण पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी याचा वापर करावा.

आतड्यातील घाण निघून जाऊन संपूर्ण पचनसंस्थेचे शुद्धीकरण करण्यासाठी वर्षातून दोन वेळा एरंडेल तेल सेवन करावे.

पण यासाठी काही पथ्ये पाळणे गरजेचे आहे. आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपर्यंत रात्रीचे भोजन उरकून घ्यावे. हे जेवण पचायला हलके असावे.

उदा. मूगडाळ खिचडी किंवा दहीभात. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता रिकाम्या पोटी एरंडेल तेल प्यावे. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृती नुसार याचे प्रमाण वेगवेगळे असते. ज्यांना नेहमीच मलावरोध असतो त्यांनी ३० मिली तर ज्यांचे पोट लवकर साफ होते अशा व्यक्तींनी १५ ते २० मिली तेल पिण्यासाठी घ्यावे. साधारणपणे तीन तासांतच याचा परिणाम दिसून येतो. तीन ते चार वेळा जुलाब होऊन पोट साफ होते. यालाच मृदुविरेचन असे म्हणतात. म्हणजे सौम्य असे जुलाबाचे औषध.

वसंत व शरद ऋतूत अर्थात मार्च व ऑक्टोबर महिन्यात हा उपाय केला तर वर्षभर कोठा साफ रहातो व पचनाचे त्रास जाणवत नाहीत.

4) नैसर्गिक पद्धतीने शरीर डिटॉक्स करण्यासाठी हा उपाय सुरक्षित आणि फायदेशीर आहे.

एरंडेल पोटातील जंतांना मारण्यासाठी उपयोगी आहे.

5) जठराग्नी चांगल्या प्रकारे वाढविण्यासाठी सुद्धा एरंड उपयुक्त आहे. ज्यांना कडकडून भूक लागत नाही त्यांना एरंडेल जरुर द्यावे.

6) पोटातील ट्यूमर किंवा सूज यासाठी हे उपयुक्त आहे.

7) लिव्हर आणि स्प्लीन यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी याचा उत्तम उपयोग होतो.

एरंड तीक्ष्ण व उष्ण गुणात्मक असल्याने मेटॅबॉलिझम सुरळीत होतो. म्हणजे चयापचय क्रिया योग्य प्रकारे झाल्यामुळे पचन सुधारते.

8) नाभीच्या खालच्या अवयवांवर वातदोषाचा प्रभाव असतो. त्यामुळे याठिकाणी काही रोग झाल्यास त्यावर उत्तम औषध म्हणजे एरंड.

9) महिलांना होणारे मासिक पाळी संबंधित आजार, पोटात दुखणे, PCOD, गर्भाशयशुद्धीसाठी उपयुक्त आहे.

एरंडाचे मूळ दुधात उगाळून सकाळी घेतले तर या स्त्रीरोगांमध्ये लाभ होतो.

याशिवाय एरंडापासून विविध प्रकारची आयुर्वेदिक औषधे बनवली जातात. डॉक्टरांचा सल्ला घेऊन यांचा वापर करावा.

10) पुरुषांमध्ये सिमेनची गुणवत्ता सुधारणे आणि वीर्य दोष दूर करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.

11) जर रुक्षतेमुळे केसांत कोंडा होऊन जास्त प्रमाणात केस गळत असतील तर कोमट एरंडेल तेलाने हेड मसाज करावा. यामुळे केस मुलायम आणि चमकदार होतात.

12) सोरायसिस सारख्या त्वचाविकारातही एरंडेल तेल लावल्याने त्वचा नरम रहाते.

कोणत्याही कारणाने त्वचा कोरडी पडली असेल तर एरंडेलाच्या स्निग्ध गुणामुळे त्याठिकाणी आलेला रुक्षपणा निघून जातो.

13) शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी तसेच मेधाशक्ती (मेंदूची कार्यक्षमता) सुधारण्यासाठी एरंड उपयोगी आहे. मेधाशक्ती म्हणजे धारणा शक्ती व स्मृती. त्यामुळे विद्यार्थी दशेत एरंडेल दिले तर त्याचा फायदा होतो.

14) वातदोष बिघडला तर चंचलता वाढते. सतत हालचाल करणे, अस्वस्थता अशी शारीरिक लक्षणे दिसतात. याचबरोबर मानसिक चिंता, झोप न लागणे अशा समस्या निर्माण होतात. एरंडेल उत्तम वातशामक असल्यामुळे शरीर व मनाची अस्वस्थता दूर करते. अतिचंचल बालकांना याचा चांगला उपयोग होतो. त्याचप्रमाणे वयोवृद्ध व्यक्तींना सुद्धा मानसिक शांती लाभण्यास मदत होते.

15) याशिवाय निरोगी व्यक्ती आरोग्य चांगले रहावे म्हणून एरंडेल सेवन‌ करु शकतात.

16) वात व कफदोष बिघडल्याने अस्थमा होतो. यात एरंडेल तेल वापरले असता श्वास कोंडणे, धाप लागणे ही लक्षणे कमी होतात.

एरंडेल तेल वापरताना कोणती काळजी घ्यावी?

उष्ण व तीक्ष्ण गुणात्मक असल्याने पित्त प्रकृतीच्या लोकांनी जपून वापरावे. यांचा कोठा नाजूक असतो त्यामुळे जास्त जुलाब होण्याची शक्यता असते. गरोदर स्त्रिया तसेच नवजात बालकांना देऊ नये.

प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृती नुसार व रोगांच्या अवस्थेप्रमाणे किती प्रमाणात औषध घ्यावे, किती दिवस घ्यावे हे डॉक्टरांशी चर्चा करून ठरवावे.

बहुगुणी एरंड व त्याचे औषधी उपयोग तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्स करुन सांगा.

लेख आवडला तर लाईक व शेअर करा.

Manachetalks

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

 • अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं!!!
 • तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.
 • निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग!!!
 • अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?
 • मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला शिकवणारे आठ सोपे मार्ग.
 • वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे, यासाठीचे तीन नियम!!
 • आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल
 • हे तेरा प्र श्नं स्वतःला विचारून स्वतः मधले उत्तम व्हर्जन विकसित करा!
 • तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे.
 • नीरस आयुष्य सप्तरंगी करण्याचे दहा उपाय.
 • आपला अंतरात्मा काय सांगतो ते ऐका.. या पाच कारणांसाठी.
 • आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा.
 • स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका
 • पॉझिटिव्ह एनर्जी साठी करा हे पाच उपाय!!!
 • मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय.
 • स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!
 • स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी हे करा…!!!
 • जीवन मूल्य म्हणजे काय? आणि ती जपायची कशी?
 • समाधानी आयुष्याची त्रिसूत्री!!!
 • एक मुक्तपत्र… तुमच्या मनाचे मैत्र!!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!