शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने । सर्व आसने समजून घ्या व्हिडीओसह

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: वजन कमी करण्यासाठी व्यायाम | शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने सर्व आसने समजून घ्या व्हिडीओसह

सध्याच्या काळात वाढत्या वजनाच्या समस्येने अनेक जण त्रासलेले आहेत. आजकाल स्थूलता लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सतावत आहे.

ओबेसिटी म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात वजन वाढणे. ही एक गंभीर समस्या आहे.

वाढत्या वजनाचे कारण बहुतेक वेळा जीवनशैलीत दडलेले आढळते.
व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, रात्री जागरण, जंक फूड, बैठी जीवनशैली अशी अनेक कारणे यामागे आहेत.

स्थूलतेमुळे डायबिटीस, हृदय विकार, हाय बीपी, सांधेदुखी, वंध्यत्व अशा अनेक समस्या निर्माण होतात.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टींचे संतुलन साधले पाहिजे.
सात्विक अन्न, पालेभाज्या, भरपूर पाणी पिणे याचबरोबर शरीराला योग्य प्रमाणात व्यायाम झाला पाहिजे.

यासाठी काही योगासने उपयुक्त आहेत. यात शरीराचे स्नायू ताणले जातात. शारीरिक हालचाल विशिष्ट पद्धतीने केली जाते त्यामुळे चरबी कमी होते.

पोटावर साठलेली चरबी म्हणजे तर विविध रोगांना आमंत्रण देणे !!! या योगासनांचा अभ्यास नियमितपणे केला तर वजन कमी होण्यास मदत होते.

शरीर लवचिक होते. शरीरात साठून बसलेली चरबी तर अवघ्या सात दिवसांत कमी होऊ लागते. पण एवढ्यावरच न थांबता योगासने हा आपल्या जीवनशैलीचा एक भाग होणे आवश्यक आहे.

तरच आपण निरोगी आयुष्य दीर्घ काळ जगू शकतो.

या लेखातून वजन कमी करण्यासाठी उपयोगी अशा काही योगासनांची माहिती आम्ही सांगणार आहोत.

१. चतुरंग दंडासन

chaturanga dandasan

यालाच ‘लो प्लॅंक’ असे म्हणतात. सूर्यनमस्कारात जी बारा आसने समाविष्ट आहेत त्यातच चतुरंग दंडासन येते. पायाची बोटे व तळवे यांनी जमिनीचा आधार घेऊन पाय जमिनीला समांतर ठेवावे.

या आसनामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात. पोटावरील चरबी कमी होऊन पोट सपाट होते.

हे आसन दिसायला साधे असले तरी याचे पुष्कळ फायदे आहेत.

२. वीरभद्रासन

वीरभद्रासन

यालाच ‘योद्धा मुद्रा’ अथवा ‘warrior pose’ म्हणतात. मांड्या व खांद्यावर साठलेले फॅटस् कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.

या आसनामुळे एकाग्रता वाढते. शरीराचे संतुलन साधणारे आसन असून या आसनामुळे शरीराचा मागचा भाग, पाय व हात सुडौल होतात.

हे आसन करताना पोटाचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे पोट सपाट होते. जेवढा जास्त काळ हे आसन तुम्ही कराल तेवढा जास्त लाभ होईल.

३. त्रिकोणासन

त्रिकोणासन

यालाच त्रिकोणी मुद्रा असेही म्हणतात. या आसनामुळे पचन सुधारते. कंबर व पोटावरचे फॅटस् कमी होतात.

त्रिकोणासनामुळे संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते. मांड्या व मागील भागावर साचलेली चरबी कमी होते.

एकाग्रता व शरीर संतुलन हे देखील याचे फायदे आहेत.

४. अधोमुख श्वानासन

अधोमुख श्वानासन

कुत्रा ज्याप्रमाणे मान खाली करून शरीर ताणून धरतो त्याप्रमाणे या आसनात शरीराची स्थिती दिसते. संपूर्ण शरीराचे टोनिंग करणारे हे एक श्रेष्ठ आसन आहे.

या आसनाचा सराव केला असता हात, पाठ व मांड्या बळकट होतात. श्वासावर लक्ष केंद्रित करुन हे आसन करावे. त्यामुळे एकाग्रता वाढते. रक्ताभिसरण सुधारते तसेच वजन कमी होते.

५. सर्वांगासन

सर्वांगासन

सर्व अवयवांना लाभ देणारे हे आसन आहे. नियमितपणे सर्वांगासन केले तर पचन सुधारते.

शरीर मजबूत होण्यासाठी मदत होते.
या आसनाचा सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे चयापचय क्रिया सुधारते. थायरॉईड पातळी संतुलित रहाते.

फुप्फुसांची क्षमता वाढते. त्यामुळे श्वसनाच्या तक्रारी दूर होतात. हे आसन केल्यामुळे शांत झोप लागते.

शरीराचा वरचा भाग, पोट आणि पायांवरील चरबी कमी होते. स्थूलता कमी करण्यासाठी हे आसन खूपच उपयुक्त आहे.

या आसनांचा नियमितपणे अभ्यास करुन तुम्ही वेगाने वजन कमी करु शकता. पण यासाठी योगतज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

या आसनांचा उपयोग फक्त वजन कमी करण्यासाठी नाही तर त्यापेक्षा उच्च प्रतीचे लाभ आपल्याला होतात.

सर्वात महत्वाचे म्हणजे मानसिक स्वास्थ्य सुधारते. मनावर ताण असेल तर वजन वाढते. चिंता, डिप्रेशन यामुळे झोप लागत नाही. निद्रानाशाचा व वजन वाढण्याचा जवळचा संबंध आहे.

या आसनांमुळे मानसिक तसेच आध्यात्मिक पातळीवर प्रगती होते. योगासनांमुळे खऱ्या अर्थाने आपली स्वतःशीच ओळख होते. साधक नेहमीच एका शांत, अविचल स्थितीत रहातो. त्यामुळे बाह्य घटक त्याच्यावर नकारात्मक परिणाम करु शकत नाहीत.

शारीरिक, मानसिक आणि भावनिक संतुलन साधले तर कोणत्याही परिस्थितीत सकारात्मकता अनुभवता येते.

या लेखातून सांगितलेली योगासने करुन स्वतःला फिट ठेवणे तुम्हाला सहज शक्य आहे.

लेख आवडला तर लाईक व शेअर करा. तुमचे अनुभव कमेंट्स करुन आम्हाला सांगा.

Manachetalks

असेच मनाचेTalks चे विविध लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

  • अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं!!!
  • तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.
  • निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग!!!
  • अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?
  • मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला शिकवणारे आठ सोपे मार्ग.
  • वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे, यासाठीचे तीन नियम!!
  • आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल
  • हे तेरा प्र श्नं स्वतःला विचारून स्वतः मधले उत्तम व्हर्जन विकसित करा!
  • तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे.
  • नीरस आयुष्य सप्तरंगी करण्याचे दहा उपाय.
  • आपला अंतरात्मा काय सांगतो ते ऐका.. या पाच कारणांसाठी.
  • आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा.
  • स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका
  • पॉझिटिव्ह एनर्जी साठी करा हे पाच उपाय!!!
  • मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय.
  • स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!
  • स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी हे करा…!!!
  • जीवन मूल्य म्हणजे काय? आणि ती जपायची कशी?
  • समाधानी आयुष्याची त्रिसूत्री!!!
  • एक मुक्तपत्र… तुमच्या मनाचे मैत्र!!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय