निर्णय घेताना गोंधळ उडतो? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

मित्रांनो, आपण आयुष्यात आता ज्या कोणत्या अवस्थेत आहोत त्यासाठी जबाबदार आहेत आपण वेळोवेळी घेतलेले निर्णय.

असं म्हणतात की, योग्य वेळी घेतलेला एक योग्य निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो आणि याविरुद्ध एक अयोग्य निर्णय आपलं जग उद्ध्वस्त करु शकतो.

लहानपणापासून शाळेत, कॉलेज मध्ये आपण विविध विषय शिकतो, ज्ञान मिळवतो पण निर्णय कसा घ्यावा हे मात्र कुठेच शिकवलं जात नाही.

बऱ्याच वेळा आपण झालेल्या चुकांमधून शिकतो, काही वेळा बहुमताने घेतला गेलेला निर्णय मान्य करतो, तर काही वेळा एखाद्या विषयावर आपलं नेमकं मत काय हेच आपल्याला समजत नाही. आणि मग आपण कोणताच निर्णय घेऊ शकत नाही.

या लेखातून मनाचेTalks काही विशिष्ट मुद्दे वाचकांसाठी घेऊन येत आहे. यावरुन तुमच्या लक्षात येईल की, कोणताही निर्णय घेण्यामागे ठराविक पद्धतीने विचार करता येणे गरजेचे आहे. आणि ही पद्धत आपल्याला शिकता येते.

विचार कसा करावा हे कुठेही शिकवलं जात नसलं, तरी योग्य निर्णय घेण्याकरिता आपल्या मनाचा कल आणि कौल दोन्ही तपासून पहावे लागतात. यासाठी काही गोष्टी प्रयत्नपूर्वक शिकणे आवश्यक आहे.

निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणताही निर्णय घेताना आपण निष्पक्ष आणि तटस्थपणे विचार करणे गरजेचे आहे.

जर आपल्या मनात आधीपासूनच निर्णय झालेला असेल तर आपण विवेकनिष्ठ राहू शकत नाही.

मग आपण फक्त आपल्या निर्णयाची पुष्टी करणारी कारणे शोधत बसतो.

याचं एक सोपं उदाहरण पाहूया. समजा दहावीनंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला एखादी शाखा निवडायची आहे. तुम्ही आधीपासूनच असा निर्णय घेतलात की सायन्स मला जमणारच नाही म्हणून मी इतर शाखांमध्ये प्रवेश घेईन. अशावेळी तुम्ही आधीच निर्णय घेऊन टाकलेला आहे त्यामुळे सायन्स शाखेवर तुम्ही सरळ फुली मारुन टाकता.

कदाचित तुम्हाला गणित जमत नसेल पण यातील इतर विषय जमतीलही. आणि त्यात उत्तम करिअर करण्याची संधी तुम्ही गमावून बसता कारण साधकबाधक विचार न करता थेट निष्कर्ष काढणे आणि तोच निर्णय घेऊन टाकणे.

व्यवहारात देखील दोन व्यक्तींचे म्हणणे पूर्णपणे ऐकून न घेता आपण त्यातील एका व्यक्तीला पाठिंबा देतो, कारण मनातल्या मनात आपण त्या व्यक्तीच्या बाजूने झुकलेले असतो.

त्यामुळे तिचा दृष्टिकोन योग्यच आहे हे आपले ठाम मत असते. वास्तविक पाहता नाण्याच्या दोन्ही बाजू तपासून पहाणे आवश्यक आहे.

दोन्ही बाजूंनी तटस्थ आणि निष्पक्ष विचार केला तर आपले मत संपूर्णपणे बदलून जाण्याची शक्यता असते. यासाठी न्यायालयात दोन्ही बाजू पूर्ण तपासून मगच निवाडा केला जातो.

यानंतर पुढील भाग येतो तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे.

तर्क किंवा लॉजिक

जेव्हा आपण भावनेच्या भरात एखादा निर्णय घेतो तेव्हा पुढे जाऊन आपण मोठीच चूक केली असं वाटू शकतं. म्हणूनच कोणतीही भावना शिखरावर असताना महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत.

संतापाच्या भरात कधी-कधी माणूस एखादि शक्यता पूर्णपणे संपवून टाकतो आणि प्रेमात आंधळे होऊन एखादी व्यक्ती आयुष्याचा जोडीदार म्हणून योग्य आहे की नाही हे तपासून न पहाताच त्याचासुद्धा स्विकार करतो. ही उदाहरणे आहेत भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेण्याची.

या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. भविष्यात यामुळे खूपच त्रास होऊ शकतो. पण वेळ निघून गेलेली असते म्हणून भावनांच्या प्रवाहात वाहवत जाऊ नये. तर्कसंगत आणि व्यावहारिक पातळीवर विचार करता आला पाहिजे.

निर्णय प्रक्रियेत आवश्यक असलेले इतर घटक कोणते?

जास्तीत जास्त माहिती घेणे.

एखाद्या निर्णयाप्रत येण्यासाठी घडलेल्या घटना, त्यामागील कारणे, त्यांचे परीणाम, सामाजिक मान्यता, वैयक्तिक विचारधारा अशा सर्व बाजू तपासून पहाव्यात.

घाईघाईने निष्कर्ष न काढता आवश्यक तेवढा वेळ घ्यावा. काही वेळा वरवर दिसणाऱ्या घटना वेगळ्या आणि पडद्यामागील घटना वेगळ्याच असतात.

त्या आपल्याला कळण्यासाठी काही काळ जावा लागतो. जेवढा सखोल विचार करुन, सर्व पैलूंची माहिती घेऊन आपण निर्णय घेऊ, तेवढी चूक होण्याची शक्यता कमी असते.

निर्णय घेताना कोणत्या चुका टाळाव्यात?

आपली माहिती आणि घेतलेला निर्णय यात अंतर असू नये. म्हणजे एखाद्या घटनेबाबत जेवढी माहिती आपल्याला असेल तेवढ्यावर जो निर्णय आपण घेऊ तेवढाच बरोबर.

त्यापलीकडे जाऊन अर्थ काढू नयेत. किंवा अंदाज बांधू नयेत. विशेषतः दोन व्यक्तींमधील नात्याची आपल्याला जेवढी माहिती आहे तेवढीच आपल्या निर्णयासाठी मर्यादित ठेवावी.

त्यापुढे जाऊन त्या दोन व्यक्तींमध्ये एखादे विशिष्ट नाते असलेच पाहिजे असा अंदाज बांधणे चुकीचे आहे. त्यामुळे आपला स्वभाव गॉसिपिंग कडे झुकत जातो. इतरांकडे पहाण्याची निखळ दृष्टी आपण हरवून बसतो. पूर्वग्रहदूषित मनाने घेतलेला निर्णय चुकण्याची जास्त शक्यता असते.

अतिविचार करणे.

जर इतरांनी रागाच्या भरात आपला अपमान केला, निंदा केली तर त्यावर अती विचार करुन त्याप्रमाणे निर्णय घेणे चुकीचे आहे. कारण असे केल्याने स्वतःला दोष देणे, आत्मविश्वास कमी होणे, पुढाकार न घेणे असे स्वभावदोष निर्माण होतात.

व त्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात. म्हणून इतरांचे बोलणे अती गांभीर्याने घेऊ नये. याचा अर्थ कोणाचे काहीच ऐकू नये असा अजिबात नाही.

योग्य तो फीडबॅक जरुर घ्यावा. निंदेप्रमाणेच स्तुतीसुद्धा नुकसान करते. समोरची व्यक्ती जर तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवत असेल तर त्यामुळे हुरळून जाऊन कोणताही निर्णय घेणे देखील चुकीचेच आहे.

यामागे कोणता हेतु असेल हे ओळखले पाहिजे. त्यामुळे इतरांचे शब्द आपली निर्णय प्रक्रिया बदलणारे नसावेत. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही म्हण लक्षात घेऊन वागावे.

एकाच चष्म्यातून सर्व गोष्टी पहाणे.

आपल्याला एखाद्या व्यक्तीबाबत काही विशिष्ट अनुभव आला तर त्याच नजरेने सर्व गोष्टी पहाणे योग्य आहे का? याचे एक सोपे उदाहरण पाहूया.

समजा एखाद्या मुलीला एका मुलाने फसवले. ब्रेक अप झाल्याचे एवढे दु:ख तिला झाले की सर्व पुरुष फसवणारेच असतात असा निष्कर्ष काढून आता यापुढे कोणत्याही पुरुषाला मनात जागा देणार नाही असा निर्णय घेणे.

याचंच दुसरं उदाहरण म्हणजे विशिष्ट जात किंवा पंथातील माणसांबाबत काही टोकाची मते असणे.

वास्तविक जगातील प्रत्येक माणूस वेगळा आहे. पण जेव्हा आपण असे एकाच नजरेने सर्वांकडे पहातो तेव्हा निर्णय चुकतो. आपण माणसाची पारख करायलाही चुकतो. म्हणून अशी टोकाची भूमिका ठेवू नये.

ब्लॅक अँड व्हाइट विचार करणे.

एखाद्या अनुभवातून ती व्यक्ती संपूर्ण चांगली किंवा पूर्णपणे वाईट असे लेबल लावणे. खरंतर या जगात कोणीही परिपूर्ण नाही. प्रत्येक व्यक्तीचे काही चांगले गुण आहेत तसेच काही दुर्गुणही आहेत. फक्त त्याचे प्रमाण कमीजास्त असते एवढेच.

त्याचप्रमाणे एखादी विचारधारा संपूर्ण योग्य आणि दुसरी पूर्ण अयोग्य असा विचार करणे चुकीचे आहे.

यामुळे अतिरेकी किंवा एकांगी विचार करण्याची सवय लागते. आणि त्यामुळे निर्णय चुकतात. कोणतीही व्यक्ती ही एक पॅकेज आहे. ती प्रत्येक प्रसंगात

वेगवेगळ्या पद्धतीने वागत असते. आपल्याला जो अनुभव आला तो त्या प्रसंगापुरता होता. पण त्यामुळे ती व्यक्ती इतर बाबतीत सुद्धा कुचकामी आहे हे सिद्ध होत नाही. म्हणून व्यक्तीपूजा करणे किंवा टोकाची निंदा करणे सोडून दिले पाहिजे.

विशेषतः राजकारणात जेव्हा नेत्याला दैवत मानले जाते तेव्हा त्याने घेतलेले चुकीचे निर्णय नजरेआड केले जातात. तसेच एखाद्या नावडत्या नेत्याने केलेले चांगले काम दुर्लक्षित रहाते.

पण त्यामुळे देशहित साधले जात नाही. म्हणून तारतम्य बाळगून निर्णय घ्यावा.

लवचिकता नसणे.

आपला निर्णय म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असे कधीही समजू नये. जर काही काळानंतर आपली चूक कळून आली तर निर्णय बदलण्याची क्षमता असली पाहिजे. नाहीतर माणूस म्हणून आपली प्रगती होत नाही.

झालेली चूक मान्य करण्यात कोणताही इगो मध्ये आणू नये. आपले काय चुकले हे

उमगल्यानंतरही आधीच्या निर्णयावर अडून रहाणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे.

विचारांमध्ये लवचिकता असणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. त्याचप्रमाणे अयोग्य निर्णय बदलणे व योग्य दिशेला वळणे हे सुद्धा मॅच्युरिटीचे लक्षण होय.

या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपण निर्णय घेताना गोंधळून जाणार नाही. खरं तर कोणताही निर्णय हा शंभर टक्के बरोबर किंवा चूक नसतो. प्राप्त परिस्थितीत सर्व बाजूंनी विचार करून जास्तीत जास्त योग्य निर्णय घेणे हे महत्त्वाचे असते.

हा लेख वाचून विचार कसा करावा आणि निर्णयाप्रत कसे यावे याबाबत तुम्हाला कल्पना आली असेल. यातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे कमेंट्स करुन आम्हाला सांगा.

तुम्ही निर्णय घेताना कोणत्या गोष्टी विचारात घेता हे ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.

हा लेख आवडला तर लाईक व शेअर करा. उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

Manachetalks

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय