नोकरीत उत्तरोत्तर प्रगती करायची असेल तर हे दहा नियम पाळा

तुम्ही कामाच्या ठिकाणी अधिक आनंदी, समाधानी कधी होऊ शकता?

बहुतेक जणांना असं वाटतं की ऑफिसमध्ये असलेला त्रास कमी झाला की मग नो टेन्शन.

कोणी म्हणेल सध्याचा बॉस बदलला की मग काही प्रॉब्लेम नाही. तर कुणाला आपल्या सहकाऱ्यांमुळे कामावर जावंसं वाटत नाही.

इतकंच काय ऑफीसची सकाळची वेळ बदलून थोड्या उशीराने जायची सूट मिळाली तर खूपच आनंद होईल असंही म्हणणारे लोक असतीलच.

ही सगळी विधानं बारकाईने पाहिलीत तर एक गोष्ट लक्षात येईल. इथे आपण नाखूष आहोत ते इतरांमुळे अशी मनाची धारणा दिसते.

आपण सगळेच कधीना कधी अशी कारणं शोधून बाह्य गोष्टींना जबाबदार ठरवतो.

या लेखातून आम्ही असे दहा नियम तुम्हाला सांगणार आहोत की त्यामुळे तुम्ही कामावर असताना जास्त आनंदी, उत्साही राहू शकाल.

आणि जरी नियम असं म्हटलेलं असलं तरी प्रत्यक्षात हे छोटेसे बदल आहेत.
आपल्या सवयी आणि विचार यात परीवर्तन करणं एवढं काही कठीण नाही.

मग नीट वाचा हे दहा नियम आणि हो, लगेच अंमलात पण आणा.

१. आपला आनंद इतरांवर अवलंबून नसावा.

लोकांच्या सवयी, त्यांचं बोलणं तुम्हाला त्रासदायक वाटतं, हे जरी खरं असलं तरी त्यांना बदलणं तुम्हाला शक्य नाही.

त्यांच्यावर फोकस न करता स्वतः ची प्रगती कशी होईल यावर लक्ष द्यावे.

आपलं ध्येय ठरवावं आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत. मग इतरांकडे लक्ष द्यायला वेळच मिळणार नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या आनंदासाठी आपण जबाबदार आहोत हे समजणे.

कृतिशील राहूनच आहे त्या परिस्थितीत आनंदी आणि समाधानी रहाता येतं. आजूबाजूची माणसे किंवा परिस्थिती बदलली तरच काहीतरी चांगले घडेल असा विचार केलात, तर तुम्ही अधिकाधिक दु:खी होत रहाल.

म्हणून आपल्या आयुष्याच्या गाडीचे सारथी स्वतः व्हायला शिका.

२. निर्णय घ्या आणि कृतीत उतरवा.

इतरांच्या सांगण्याप्रमाणे वागत राहिलात तर तुम्हाला आनंद मिळेल का? मग आयुष्याची दिशा भरकटत जाईल.

आपल्याला काय साध्य करायचे आहे हे ठरवा. त्यासाठी एक निश्चित आराखडा तयार करा.

तुमचं ध्येय किती वेळात गाठणार आहात याचा निर्णय घ्या आणि त्याप्रमाणे कामाला लागा.

जेव्हा डोळ्यासमोर निश्चित ध्येय्य असते तेव्हा काम करण्याचा आनंद आणि ऊर्जा वाढते.

३. मनाची दारं खिडक्या खुल्या ठेवा.

संकुचित विचाराने वागलं की आपण इतरांची मतं स्विकारु शकत नाही. याउलट विशाल दृष्टिकोन असेल तर आपण एखाद्या समूहात सहज सामावले जातो.

आजकालच्या जगात तुम्ही किती बुद्धिमान आहात यापेक्षा टीम वर्क करु शकता की नाही यालाच जास्त महत्त्व दिलं जातं.

म्हणजे तुम्ही हटवादी आहात की लवचिक भूमिका घेता यावर तुम्ही कामाच्या ठिकाणी किती आनंदात आहात हे अवलंबून आहे.

अतिआग्रही असाल तर इतरांशी वारंवार खटके उडत रहातील आणि तुमची शक्ती नको तिथे वाया जाईल.

४. आपल्या कामावर जास्त फोकस ठेवा.

या जगात असंख्य गोष्टी अशा आहेत की, त्या तुम्हाला पटणार नाहीत किंवा आवडणार नाहीत.

पण जर त्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला जमलं की मग अशा विषयांचा त्रास होण्याचा प्रश्नच येत नाही. आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं की या गोष्टी हळूहळू नजरेआड होतात.

म्हणून गॉसिपिंग, ऑफीस पॉलिटिक्स यापासून दूर राहिलं की मन शांत आणि कार्यक्षम रहातं. इतर कोणाच्या नको त्या विषयांत आपण भागच घेतला नाही की मग आपला अपमान, चेष्टा, निंदा होण्याची शक्यता खूपच कमी होते.

५. स्वतःला कौतुकाची थाप द्या.

एखादी गोष्ट सवयीची झाली की त्याबद्दल विशेष कौतुक वाटत नाही. जेव्हा तुम्ही नवीन असता त्यावेळी खूप उत्साहाने काम करत असता.

नवीन गोष्टी शिकण्याची प्रबळ इच्छा असते. पण एक दोन वर्षे झाली की तुम्ही सेटल होता. मग तेच ते रुटीन काम कंटाळवाणं होऊन जातं.

अशावेळी तुम्ही हे काम, हा जॉब का स्विकारला ते आठवा. आतापर्यंत तुम्ही जे काही शिकलात त्यामुळे तुमच्यात कोणती सुधारणा झाली, नवीन कौशल्य शिकल्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडली याचा आनंद माना.

त्याबद्दल स्वतःचं कौतुक करा. यामुळे आपण सतत प्रगती करत आहोत हे समजतं आणि रुटीन काम करण्याचा उत्साह टिकून रहातो.

६. आपल्या कामात समाधान शोधा.

कधीकधी असं होतं की आपण अगदी हरवून जातो. काहीच समजत नाही. जे काम करतोय ते यांत्रिकपणे करत रहातो.

अशावेळी आपलं काम किती महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे किती लोकांना फायदा होतोय हे विचारात घेतलं पाहिजे.

म्हणजे हरवलेलं पॅशन किंवा ती झोकून देण्याची तळमळ नव्याने जागी होते. जर तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेत असाल तर थोडं थांबून विचार करा. आपण अधिक चांगल्या प्रकारे काम कसं करु शकतो हे पहा.

७. आपल्या कामात रस घ्या.

ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट, एखादी नवीन संधी, ट्रेनिंग प्रोग्राम यात भाग घ्या. सतत तेच तेच काम करुन कंटाळा आला असेल तर नवीन कामामुळे तुमचा इंटरेस्ट वाढेल शिवाय ज्ञानातही भर पडेल.

नवीन काम शिकून त्यात प्राविण्य मिळवलंत तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी असेल. त्यामुळे नवीन संधीचं स्वागत करा त्यासाठी पुढाकार घ्या.

८. कामाच्या ठिकाणी सर्वांशी मिळून मिसळून रहा.

तुमचे बॉस, सहकारी आणि इतर स्टाफ यांच्याशी तुमचे संबंध चांगले नसतील तर तुमची प्रगती होणे शक्य नाही.

मग तुम्ही एकटे पडत जाल. आपण दिवसाचे आठ ते दहा तास ऑफिस मध्ये असतो.

त्यामुळे तिथली माणसे ही एक प्रकारे आपले कुटुंबीय असतात. त्यांना आपल्याशी वागणं बोलणं आवडलं पाहिजे.

आपलं व्यक्तिमत्त्व हसतमुख, उत्साही असावं आणि आवश्यक ती मदत करण्यासाठी आपण तयारी दाखवली तर सर्वांनाच आपण हवेसे वाटतो.

आणि हे फक्त कामाच्या ठिकाणी आनंदी रहाण्यासाठी नाही तर इतर अनेक गोष्टींकरीता आवश्यक आहे.

यातूनच नेतृत्व गुण विकसित होतात. नवीन संधी मिळतात आणि आर्थिक प्रगती सुद्धा होते.

९. सतत रडगाणे गाऊ नका.

या जगात कोणाला समस्या नाहीत?

त्यामुळे कोणताही त्रास असेल तर सतत तेच तेच दळण दळत बसू नका. यावर उपाय काय आणि किती वेळात मी यातून बाहेर पडणार आहे हे ठरवा.

एकदा ठरवलंत की लगेच त्या दृष्टीने प्रयत्न सुरू करा. जर तुम्ही नेहमीच आपले प्रॉब्लेम इतरांना सांगत असाल तर तुमची संगत त्यांना आवडेल का?

म्हणून कोणताही त्रास असला तरी त्याची एक्सपायरी डेट ठरवून टाका. आणि जर का एखाद्या समस्येचे निराकरण तुम्ही करु शकत नसाल तर तिचा मनापासून स्विकार करा आणि पुढे जा. आहे तिथेच अडकून पडू नका.

१०. आपली तत्त्वं सोडू नका.

एक व्यक्ती म्हणून आपण कसे आहोत याचा अभ्यास करा. आपण कोणत्या गोष्टी करु शकतो आणि कोणत्या नाही हे तपासून पहा. तसंच आपल्यासाठी सर्वात महत्वाचे काय आहे हे आपल्याला पक्कं ठाऊक पाहिजे.

तुम्हाला न पटणारी एखादी गोष्ट करायला तुम्हाला भाग पाडण्यात येईल, अशावेळी मात्र कोणत्याही दबावाला बळी पडू नका.

स्पष्ट आणि स्वच्छ शब्दात नकार द्या. आपली मन:शांती नष्ट करणारं कोणतंही काम करू नये.

जर अशा नकारात्मक वातावरणात काम करणं असह्य होत असेल तर नवीन काम शोधा. पण आपली तत्त्वं सोडून देऊ नका.

यातल्या काही गोष्टी तुम्हाला सोप्या वाटतील तर काही गोष्टी प्रयत्नपूर्वक जमतील. पण यातील काही नियम पाळायचे असतील तर तुम्हाला तुमच्या वागण्यात बदल करावा लागेल, थोडं धैर्य दाखवावेच लागेल. पण यामुळे तुम्ही अधिक आनंदी असाल हे मात्र नक्की.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. यातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.

लेख आवडला तर लाईक व शेअर करून उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय