श्रीमंत लोक मार्गातले अडथळे न बघता संधीवर लक्ष केंद्रित करतात – भाग १

तो मार्च किंवा एप्रिल महीना असावा, वर्ष २०१५, एका संध्याकाळी, उदास चेहर्‍याने मी ऑफीसमध्ये बसुन होतो, पैशाची प्रचंड चणचण जाणवत होती.

लातुरमध्ये भयाण दुष्काळ पडला होता, जिकडेतिकडे भीषण पाणीटंचाईच्याच चर्चा चालु होत्या. बांधकामे पुर्णपणे ठप्प झाली होती, व्यवसायाने मी आर्किटेक्ट, मागचा एक वर्ष तुटपुंज्या बचतीवर कसेबसे निभावले होते, पण आता खिसे रिकामे झाले होते.

गरजा कशा भागवायच्या अशी चिंता सतावत होती, कसलाच मार्ग दिसत नव्हता, पैशाचे दुखणे खरचं अवघड जागचे दुखणे असते, “सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही”, कुणापुढे आर्थिक अडचणी सांगितल्या तर उरलीसुरली अब्रुही जाते.

विशेष काही काम नव्हतं, (खरतरं कसातरी टाईमपास करुन दिवस ढकलायचो, बस्स!) मन मोकळं करायला जवळचा, आपला म्हणावा, असा कोणी मित्रही नव्हता, उदास राहण्याने आणि टेंशन घेण्याने कशाचाही कंटाळा येवु लागतो.

अशा वेळी मुड बदलण्यासाठी चांगलं पुस्तक वाचणं आणि रिचार्ज होणं, हाच एक हुकुमी उपाय असतो आपल्याजवळ. मग त्या संध्याकाळी खुप दिवसांनी जड मनाने लायब्ररीत गेलो.

काचेच्या कपाटात ओळीने पुस्तकं मांडुन ठेवली होती, त्या कपाटांपुढे मी रेंगाळत होतो, अचानक एका पुस्तकाच्या टायटलमधल्या ‘करोडपती’ शब्दाने माझं लक्ष वेधुन घेतलं.

पैशासाठी खुप भुकेला होतो मी, इतकं माझ्याएवढं गरजु ह्या ब्रम्हांडात कोणीच नव्हतं! आणि एका भाग्यवान क्षणी एक पुस्तक हाती पडल!, माझं आयुष्य उजळुन टाकणारं, ‘Secrets of the Millionaire Mind’ ‘करोडपती मेंदुचं रहस्य’ हे ते पुस्तक!

मी तात्काळ ते बुक इश्शु केलं, पुन्हा ऑफीसला येवुन वाचायला बसलो, सात वाजले असतील, वाचायला सुरुवात केली, आणि पुढचा अडीच तास कसा गेला, कळालंच नाही!

ते पुस्तक वाचताना, माझ्यात एका आगळ्यावेगळ्या शक्तीचा संचार झाला, काही वेळा मी हसलो, कधी डोळ्याला धारा लागल्या, कधी आश्चर्यचकित झालो, कधी आनंदाने बेभान!,

अंतर्मुख होवुन, आत्मपरीक्षण करण्यास ह्या पुस्तकाने भाग पाडलं.

ह्या पुस्तकाचा लेखक आहे, टी. हार्व एकर, ह्या अमेरीकेतल्या माणसानं हे पुस्तक लिहलयं, हार्व एक जो प्रचंड मेहनती, कष्टाळु माणुस होता, पण अनेक बिजनेस करुनही, वयाच्या तिशीत कफल्लकच होता, दहा वर्षात तीनदा दिवाळखोर जाहीर झाला होता आणि अद्याप सुशिक्षीत बेकारच होता, त्याला तीव्र निराशेने घेरलेले असते आणि आईवडीलांच्या मदतीवर तो जगत होता.

एका रात्री त्याच्याकडचे पुर्ण पैसे संपलेले असतात, आणि त्याला आपल्या गाडीत पेट्रोल भरायचे असते, तेव्हा आपल्याकडचे सुटे पैसे, पिशवीमध्ये तो एकत्र करतो आणि आपली खटारा कार घेऊन पेट्रोल पंपावर जातो, आणि ती चिल्लरची पिशवी पाहुन तिथले लोक जोरजोरात हसु लागतात.

हार्वला खुप ओशाळवाणे वाटते, तिथुन कसाबसा बाहेर पडून तो, पुढे जाऊन तो रस्त्याच्या कडेला गाडी थांबवतो, झालेला अपमान त्याला सहन होत नाही, तो ओक्सबोक्शी रडु लागतो, त्याला स्वतःच्या गरीब असण्याचा तिटकारा येत असतो, स्वतःवरच दया येत असते, प्रचंड बुद्धीमान असुनही ही वेळ का आली? हा प्रश्न त्याला सतावत असतो.

आणि तो एक गर्जना करतो, “बस्स! हे सगळे मी आता बदलुन दाखवीन! या जगाला मी श्रीमंत बनुन दाखवीन!”

त्या दिवसांपासुन त्याने झपाटुन मेहनत घेतली, त्याची रोमहर्षक कथा मुळ पुस्तकात वाचता येईल, पण थोडक्यात सांगायचे तर पुढच्या फक्त दोन वर्षांनी हार्वची कंपनी, “फॉर्चुन ५००” मध्ये जाऊन पोहचली, गरीबीवर मात करुन हार्व ‘श्रीमंत कसे व्हावे’ हे शिकवणारा मोटीव्हेटर टिचर झाला.

आता जगभर त्याचे सेमिनार होतात.

काय होतं हे करोडपती होण्याचं तंत्र!

अशी पुस्तकं वाचुन, खरचं एका रात्रीत, असं आयुष्य बदलतं का?

झटपट श्रीमंत व्हायला शॉर्टकट असतात का, ही पुस्तकांना खपवुन बेस्ट सेलर बनवण्याची नुसती बुवाबाजी?

असले प्रश्न पडले असतील तर मुळ पुस्तक वाचुन तुम्हीच उत्तर शोधा.

श्रीमंत बनण्यासाठी हार्वने ह्या पुस्तकात सतरा नियम सांगीतलेत, जे वापरुन मलाही खुप फायदा झाला, मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालो, रोजच्या ब्रेड-बटर च्या फाईट मधुन सुपरफास्ट वेगाने बाहेर पडलो, आता मी फक्त आनंद घेण्यासाठी जीवन जगतोय.

व्यवसायामध्ये आता ज्यात मला आत्मिक समाधान आणि अपेक्षित पैसा मिळेल, अशीच कामं करतो.

प्रत्येक दिवशी लेखण, वाचन, व्यायाम, बागकाम, टिचींग, मोटीव्हेशन असे छंद जोपासतो.

आयुष्यातली, पैसे कमवण्याची मजबुरी संपवणं, म्हणजे आर्थिक स्वतंत्रता!..

वयाच्या तेहतीसाव्या वर्षी हे साध्य करायला कारणीभुत ठरलं, हे पुस्तक!..

हे संपुर्ण पुस्तक, ‘श्रीमंत’ आणि ‘गरीब’ ह्या दोन शब्दांभोवती फिरते, लेखक स्प्ष्ट करतो की कुणालाही गरीब म्हणुन त्याला अजिबात हिणवायचं नाहीये, श्रीमंत आणि गरीब हे शब्द फक्त आपल्या मानसिकता दाखवण्यासाठी वापरले आहेत.

तर श्रीमंत बनण्यासाठी काय करायला हवे? याबद्द्ल या पुस्तकातुन मला जे काही समजले, ते मी तुम्हाला सांगणार आहे.

१. श्रीमंत लोकांना वाटते, मी माझं आयुष्य घडवतोय!, गरीब लोकांना वाटते, नियती माझ्याशी खेळत आहे! हार्व म्हणतो, माणुस पहीले मनाने श्रीमंत होतो, आणि मग प्रत्यक्षात पैसा त्याच्यापाशी येतो, श्रीमंत लोक यश-अपयशाची जबाबदारी घेतात, गरीब लोक दुःखाचा बागुलबुवा करतात, त्यांना वाटतं, की आयुष्य त्यांना शिक्षा देत आहे, म्हणुण ते अधिकाधिक गरीब होतात.

२. श्रीमंत लोक जिंकण्यासाठी मनसोक्त खेळतात, गरीब लोक न हरण्यासाठी लढत राहतात. श्रीमंत लोक उराशी मोठी ध्येय बाळगतात, आणि संधी मिळताच पुर्ण ताकतीनिशी त्यावर तुटुन पडतात, म्हणुन बहुतांश वेळा फत्ते होतात.

गरीब लोक आयुष्याकडून जेमतेम अपेक्षा ठेवतात, मग समोर दडलेल्या संधीही त्यांना दिसत नाहीत, आणि असलीच तर तिचा वापर करण्याची उर्जाही त्यांच्यात निर्माण होत नाही.

३. श्रीमंत लोक श्रीमंत होण्यासाठी समर्पित असतात, गरीब लोकांजवळ श्रीमंत व्हायची फक्त इच्छा असते. समर्पित होणं म्हणजे झपाटुन जाणं, वेळ पडल्यास, न कुरकुरता, दिवसातुन अठरा-वीस तास सहज काम करणं, ध्येयासाठी वेडं होणं, मग इतरांना अशक्यप्राय आणि स्वप्नवत वाटणार्‍या गोष्टीही, पायाशी येऊन सलाम करु लागतात.

नुसती इच्छा बाळगुन स्वप्ने पुर्ण होत नाहीत, त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी वाटचाल करावीच लागते. ह्या जगात फुकट काहीही मिळत नाही, कशाच्या तरी बदल्यात काहीतरी मिळतं.

४. श्रीमंत लोकं मोठा विचार करतात, गरीब लोकं अल्पसंतुष्ट असतात….. तुमचं व्यक्तीमत्व आणि तुमचा व्यवसाय किती जास्त लोकांवर प्रभाव टाकतयं, त्यावरुन तुमच्याकडे येणार्‍या संपत्तीचा ओघ नक्की होतोय.

करोडपती लोकं असे व्यवसाय निवडतात की जो हजारो-लाखो लोकांच्या आयुष्यावर परीणाम करेल. व्यवसायाला अशा पातळीवर नेऊन ठेवतात…….

गरीब लोकं मर्यादित लोकांच्या जीवनावर परीणाम करतात, त्यांच्या असण्याने नसण्याने समाजाला विशेष फरक पडत नाही, त्यामुळेच त्यांचं शोषणही होतं, जे मिळेल ते खुप आहे, आता नवीन खटपटी नको, अशी वृत्तीही त्यांना संपत्तीचा परीघ ओलांडु देत नाही.

५. श्रीमंत लोक संधीवर लक्ष केंद्रीत करतात, गरीब लोकांना मार्गातले अडथळे तेवढे दिसतात, प्रत्येक रस्त्यावर खाच खळगे असणार, पण म्हणून प्रवासच टाळायचा का?

अडथळ्यांवर मात करुन गंतव्य स्थानी पोहचण्याचा आगळावेगळा आनंद लुटायचा का खड्ड्यांना नाके मुरडायची? श्रीमंत आणि गरीब लोकांमध्ये हाच फरक असतो.

६. श्रीमंत लोक इतरांच्या संपत्तीचा द्वेष करत नाहीत, गरीब लोक इतरांच्या श्रीमंतीचा हेवा करतात.

इथे लेखक एक अनुभव कथन करतो, जेव्हा स्वतःची महागडी जॅग्वार कार घेऊन एका झोपडपट्टीत मित्राला भेटायला गेला, तेव्हा तिथल्या रहीवाशांनी कारवर स्क्रॅचेस पाडुन बहुमुल्य गाडीची नासधुस केली, दुसऱ्या वेळी त्याने एक खटारा गाडी नेली, ती सुखरुप होती.

जे लोक स्वतःला पिडीत, व्यवस्थेचे बळी मानतात, त्यांच्या मानसिकतेमुळे त्यांच्या उत्कर्षात ते स्वतःच बाधा बनतात, ते श्रीमंताचा तिरस्कार करतात, पर्यायाने संपत्तीचा तिरस्कार करतात, ज्या गोष्टीचा आपण तिरस्कार करु, ती जवळ कशी येईल?

म्हणुन श्रीमंत दिवसेंदिवस अधिक श्रीमंत होतात आणि इतरांविषयी, त्यांच्या चांगल्या गोष्टींचा मत्सर करणारे, द्वेषभावना बाळगणारे, दिवसेंदिवस, अधिकाधिक गरीब होतात.

म्हणुन एखाद्याचा सुंदर बंगला बघितल्यास, आणि तुम्हालाही तसा हवा असल्यास त्याला मनःपुर्वक आशिर्वाद द्या, एखाद्याची अलिशान कार, एखाद्याचं सुंदर व्यक्तीमत्व बघुन, त्याची मनमोकळेपणाने स्तुती करा.

तो करु शकतो, मग मी ही करु शकतो, ह्या एटीट्युडने अशा परिस्थीतीला सामोरे जा.

तुम्हा सर्वांना इच्छित संपत्ती प्राप्त होवो, ह्या प्रार्थनेसह.

Manachetalks

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

8 thoughts on “श्रीमंत लोक मार्गातले अडथळे न बघता संधीवर लक्ष केंद्रित करतात – भाग १”

    • कोर्सच्या माहितीसाठी 8308247480 या व्हाट्स ऍप्प नम्बरवर ‘LOA UPDATES ‘ असा मेसेज पाठवा. नवीन batch सुरु होताना तुम्हाला माहिती दिली जाईल.

      धन्यवाद.

      Reply
    • सध्या कुठलाही कोर्स शेड्युल नाही. मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स विनामूल्य मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या व्हाट्स ऍप नम्बरवर ‘अपडेट्स’ असा मेसेज पाठवल्यास अपडेट्स पाठवले जातील. ‘अपडेट्स सब्स्क्रिप्शन’ बंद करायचे असल्यास STOP UPDATES असा मेसेज पाठवावा लगेल.

      धन्यवाद.

      Reply
    • सध्या कुठलाही कोर्स शेड्युल नाही. मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स विनामूल्य मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या व्हाट्स ऍप नम्बरवर ‘अपडेट्स’ असा मेसेज पाठवल्यास अपडेट्स पाठवले जातील. ‘अपडेट्स सब्स्क्रिप्शन’ बंद करायचे असल्यास STOP UPDATES असा मेसेज पाठवावा लगेल.

      धन्यवाद.

      Reply
  1. खुप सुंदर रीतीने पुस्तकाचा परिचय करून दिलेला आहे. पंकज कोटलवार सरांनी हया आधी सुद्धा बऱ्याच पुस्तकाचा परिचय करून दिलेला आहे त्यामुळे चांगली चांगली पुस्तकं वाचायला मिळतात त्या बद्दल त्यांचे व मनाचे Talks टीम चे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो.
    योगायोगाने आज हया पुस्तकाचा परिचय वाचला आणि तेच पुस्तक मी ऍमेझॉन वरून मागवलेले ते वाचत आहे १०९ पान वाचून पूर्ण झाली व अजून फक्त ८३ पान वाचायची बाकी आहेत खरच खुप छान पुस्तक आहे.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय