या सात प्रकारे विश्रांती घ्या आणि गॅरंटीने पूर्णपणे ताजेतवाने व्हा!!!

मानवी शरीराला विश्रांतीची खूप आवश्यकता असते. दिवसाचे चोवीस तास कुणीच सतत काम करु शकत नाही. त्यामुळे शरीराला आणि मनाला आराम देणारी विश्रांती प्रत्येकालाच मिळणे गरजेचे आहे.

पण विश्रांती म्हणजे झोप काढणे असं आपल्याला वाटतं. आणि ते काही प्रमाणात खरंसुद्धा आहे. झोपेमुळे थकवा, मरगळ निघून जाते. आणि पुन्हा माणूस ताजातवाना होऊन कामाला लागतो. पण विश्रांती म्हणजे फक्त झोप असं मुळीच नाही.

खरं तर शरीर,मन, भावना या सर्वांना शांत अवस्थेत ठेवणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे विश्रांती !!! श्रांत होणे म्हणजे थकणे, दमणे आणि त्याचा परिहार करणारी ती विश्रांती !!!

मग चला तर जाणून घेऊया सात प्रकारच्या विश्रांती कोणत्या आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला कोणता फायदा होतो.

१. शारीरिक विश्रांती.

शारीरिक श्रमामुळे आपण थकतो आणि हा थकवा दूर करण्यासाठी शरीराला झोपेची गरज असते. शांत झोप लागली की आपल्याला प्रसन्न वाटतं.

अगदी दमून गेल्यावर पाच दहा मिनिटे डुलकी जरी काढली तरी खूप छान वाटतं. मेंदूची सक्रीयता टिकवून ठेवण्यासाठी अशी डुलकी काढणं चांगलं आहे. याचबरोबर शारीरिक विश्रांती मध्ये शरीर रिलॅक्स करणाऱ्या क्रीयांचा समावेश होतो. योगाभ्यास, चालणे, हलका व्यायाम यामुळे शरीर रिलॅक्स होते.

याशिवाय दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ वामकुक्षी घेणे आरोग्यासाठी चांगले आहे. म्हणजे जेवणानंतर डाव्या कुशीवर दहा ते पंधरा मिनिटे पडून रहाणे. यामुळे सकाळपासून सतत कामात गुंतून गेलेले शरीर व मन थोडे सैलावते. आणि पुन्हा उरलेल्या दिवसाचे काम करण्यासाठी सज्ज होते.

आपल्या पूर्वजांनी वामकुक्षीचे महत्त्व ओळखले होते. आता नवीन युगात आधुनिक संशोधनाने पुन्हा यावर शिक्कामोर्तब केले आहे. अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ नॅप टाइम देतात. यामुळे सतत काम करणाऱ्या मेंदूला विश्रांती मिळते.

२. मानसिक विश्रांती.

आपलं मन सतत विचार करत असतं. अनेक प्रकारचे ताण, चिंता, भीती यामुळे मनावर दडपण येते. म्हणूनच काही काळ या सर्व नकारात्मक विचारांपासून मनाला सुटका देणं गरजेचं आहे.

मनाला शांत करण्याचा उत्तम उपाय म्हणजे मेडिटेशन अथवा ध्यानधारणा. ध्यान करत असताना मन एखाद्या विशिष्ट विषयावर एकाग्र केले जाते. त्यामुळे सतत येणारे उलटसुलट विचार कमी होतात.

मानसिक विश्रांतीसाठी दुसरा प्रभावी उपाय म्हणजे छंद जोपासणे. वाचन, संगीत, बागकाम असा आपले मन रमवणारा कोणताही छंद मनाला रिलॅक्स करतो.

छंद हा आपला विरंगुळा असतो त्यामुळे सर्व व्यापातून मनाला थोडावेळ मोकळीक मिळते. रोजच्या आयुष्यात असणाऱ्या कटकटींचा काही वेळ का होईना विसर पडतो. आणि पुन्हा आपण प्रसन्नपणे रोजची कामे करु लागतो.

३. पंचेंद्रियांना विश्रांती.

नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचेंद्रिये आपल्याला वास, आवाज, दृश्य, चव आणि स्पर्श या जाणीवा करुन देतात.

या अवयवांना सुद्धा विश्रांती हवी असते. सतत वाचन करुन, अभ्यास करुन डोळे थकून जातात. अशावेळी डोळे मिटून शांत पडून राहील्यास लगेच फ्रेश वाटते.

या अवयवांना आराम मिळण्यासाठी एखाद्या शांत, निसर्गरम्य ठिकाणी जावे. गर्दी, गोंगाट, प्रदूषण यापासून दूर निसर्गाच्या कुशीत खरा आनंद मिळतो.

भगभगीत कृत्रिम उजेड, कर्णकर्कश आवाज यामुळे आपण थकून जातो. म्हणून शहरापासून दूर चार दिवस एखाद्या खेड्यात गेलं की खूप छान वाटतं. असा स्वतःला रिफ्रेश करणारा ब्रेक अधूनमधून घेतलाच पाहिजे.

४. भावनिक विश्रांती.

बऱ्याच वेळा काय होतं की आपण आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करत नाही. यामागची कारणं वेगवेगळी असू शकतात. काही वेळा आपल्याला खूप रडू येत असतं.

पण आपण चारचौघात रडू शकत नाही. किंवा समजा तुम्हाला बॉसचा खूप राग आला तरीही तुम्ही राग गिळता कारण वरिष्ठांना तोंडावर बोलणे शक्य होत नाही.

आणि मग अशाच अव्यक्त भावना मनात साचून रहातात. हे भावनिक ओझं अगदी दमवून टाकणारं असतं. त्यामुळे आपली घुसमट होते. म्हणून या भावनांना वाट मोकळी करून द्यावी. अगदी एकांतात मनसोक्त रडून घ्यावे. बघा किती हलकं वाटेल.

आपल्या मनात येणारे विचार लिहून काढणे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे साचलेला राग, अपमान, दु:ख यांचा निचरा होण्यास मदत होते. चित्रकला, रंगकाम, पझल्स किंवा कोडी सोडवणे यामुळे सुद्धा भावनांचे नियमन होते.

५. सामाजिक जीवनापासून दूर जाणे.

सतत लोकांच्या संपर्कात रहाणे, चर्चा, वादविवाद, अती सोशलायझेशन यामुळे सुद्धा थकवा येतो. याचे कारण म्हणजे मनाला अजिबात विश्रांती न मिळणे. अशावेळी या सर्व कोलाहलापासून दूर जाणं गरजेचं असतं.

यासाठी मी टाईम ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. एकटेपणात आनंद शोधता आला की सतत माणसांनी घेरलेलं असणं नकोच वाटतं. एकटेपणा म्हणजे एकाकीपणा नव्हे. स्वतःशी संवाद साधणे, आपलीच आपल्याशी नीट ओळख पटवून घेणे यासाठी स्वतःला वेळ देणे गरजेचे आहे. आणि याकरिता समाजापासून थोडं अंतर ठेवून चिंतन, मनन करावं.

सोशल मिडीयावर आपले हजारो मित्र असतीलही पण काही जवळची, खरीखुरी नाती जपावीत. त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारल्या की कसं अगदी हलकं हलकं वाटतं. माणसांच्या गर्दीत घुसमटून जाण्यापेक्षा मोजकीच, आपले विचार जुळणारी माणसे ओळखून त्यांच्या सान्निध्यात आनंदाने वेळ घालवावा.

६. आध्यात्मिक साधनेतून शांतता मिळवणे.

प्रार्थना, मंत्र, जप यात सकारात्मक ऊर्जा आहे. काही धार्मिक प्रथा किंवा पूजाअर्चा यामुळे मन प्रसन्न होते. आपापल्या श्रद्धेनुसार हे आचरणात आणावे. जरी तुम्ही नास्तिक असाल तरीही काही हरकत नाही.

तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करु शकता. निरनिराळ्या सेवाभावी संस्थांमार्फत इतरांना मदत करणे, गरजूंची सेवा करणे यामुळे एक निराळीच शांतता अनुभवता येते. कोणताही अंतस्थ हेतू न बाळगता, निरपेक्षपणे केलेले कोणतेही काम मनाला सात्त्विक समाधान देते. आपले अस्तित्व या जगात कोणाच्यातरी उपयोगाचे आहे ही भावना निश्चितच मनाला उभारी देणारी आहे.

७. समग्र विश्रांती.

यात निरनिराळ्या प्रकारची विश्रांती अंतर्भूत आहे. आणि यामुळे शारीरिक, मानसिक व भावनिक पातळीवरील अनेक गरजा पूर्ण होतात. खरंतर वर ज्या विविध विश्रांती सांगितल्या आहेत त्या एकमेकांशी संबंधित आहेत.

म्हणूनच त्यांना एकत्रितपणे होलिस्टिक रेस्ट किंवा समग्र विश्रांती असे म्हणतात.

रिलॅक्स होण्यासाठी जे उपाय या लेखातून सुचवलेले आहेत ते सर्वच प्रभावीपणे काम करतात. आता आपल्या गरजेनुसार किंवा व्यक्तिमत्त्वाप्रमाणे कोणत्या प्रकारची विश्रांती आपल्यासाठी योग्य आहे हे आपणच ठरवायचं.

तर मित्रांनो तुम्ही सुद्धा स्वतःच्या मनावरचे दडपण दूर करा. शरीर,मन आणि आत्मा यांना ताजेतवाने करण्यासाठी न विसरता विश्रांती घ्या व जीवनाचा आनंद साजरा करा.

लेख आवडला तर लाईक व शेअर करा. तुमची विश्रांतीची कल्पना कमेंट्स करुन आम्हाला सांगा.

मनाचे Talks वाचून विविध प्रकारची माहिती जाणून घ्या. तसेच हे लेख शेअर करून उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय