आज तुमची मुलं ज्या वयात आहेत, त्या वयाचे असताना तुम्ही काय करत होता?
विटीदांडू, लगोरी, लगंडी असे खेळ खेळायचात? गाणं म्हणत होता? सुंदर चित्र काढत होता? माउथ ऑर्गन वाजवत होता? काय करत होता? आठवा!!!
आजचा दिवस तुम्ही तुमचं बालपण तुमच्या मुलांना दाखवा. आजची जीवनशैली पुर्ण बदलली आहे. आजच्या मुलांचे खेळ वेगळे आहेत. मोबाईल शिवाय तुम्ही लोक कसं जगू शकत होतात, याचा विचार सुद्धा आजची मुलं करू शकत नाहीत.
तुम्ही पण तुमच्या उद्योग धंद्यात, नोकरीत इतके बुडून गेला आहात की तुम्हांला काय आवडतं हेच विसरला आहात.
आज स्वतःला शोधा. तुमच्या आवडी-निवडींमध्ये तुमच्या मुलांना सहभागी करून घ्या.
आई आणि बाबा, म्हणजेच पप्पा आणि मम्मी दोघंही आपल्या आवडीची अँक्टिव्हिटी मुलांसोबत करु शकतात.
विश्वास ठेवा तुमचं एक दिवसाचं बालपण शेअर करायला तुमच्या मुलांना नक्की आवडेल!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.