लहानपण देगा देवा! (Childhood) – भाग २

मित्रांनो, मागच्या लेखात मी बालपणीच्या आंनदाबद्दल तुमच्याशी संवाद साधला होता, लेख वाचुन सर्वांच्या खुप छान प्रतिक्रीया मिळाल्या, बर्‍याच जणांनी सांगीतले की आम्हाला आमच्या बालपणीची (Childhood) आठवण झाली, आपण लहान असताना इतके आनंदी होतो, मग तो आनंद मोठं झाल्यावर टिकुन का राहत नाही?

लहान असताना आपण किती गोंडस, निरागस होतो, वयाने कितीही मोठे झालो तरी आपण आपल्यातली निष्पापता, निरागसता जपु शकत नाही का?

असं जर झालं तर आयुष्याकडे बघणं, आणि जीवन जगणं, किती सोप्पं होवुन जाईल ना? आपण लहान असताना आपल्यात काय होतं, जे मोठं झाल्यावर आपल्याकडुन कळत-नकळत निसटुन जातं?

हे लहानपणीचं आनंददायी आयुष्य, नक्कीच संपुर्ण जीवनभर जगता येतं, पण त्यासाठी लहान मुलाचे काही गुण जे आपल्यात बाय डिफॉल्ट आहेत ते आपल्याला पुन्हा आपल्यात रुजवावे लागतील, ते आपल्यात आधीपासुनच आहेत, फक्त रोजच्या जीवनात आपल्याला त्यांचा जास्तीत वापर करायचा आहे.

लहान मुल कसं वागतं, त्याच्यात कोणकोणते गुण असतात.

१) आश्चर्यभाव –

प्रत्येक लहान मुलाच्या मनामध्ये, प्रत्येक गोष्टीसाठी प्रचंड कुतुहल आणि भरपुर जिज्ञासा असते, आपण जेव्हा पहील्यांदा फ्रीज आणि बर्फ पाहीला होता तेव्हा कसले आश्चर्यचकित झालो होतो, मी तर शंभरदा उघडुन बघितला होता, निरखला होता. पहील्यांदा आपण जेव्हा झुकझुक चालणारी, आणि धुरांच्या रेषा काढणारी ट्रेन पाहिली होती तेव्हा उड्या मारत आनंदाने खिदळलो होतो.

रस्त्यावरच्या प्रवासात, कधी आपल्याला चुकुन हरीण, मोर, किंवा मुंगुस दिसलं, तर कसली एक्साईटमेंट वाटायची, माकड दिसलं तर मजा वाटायची, हत्ती, घोडा, उंट दिसले तर आनंदाच्या उकळ्या फुटायच्या.

आपण मोठे होतो, तेव्हा ह्या जगात असलेल्या चमत्कारिक गोष्टींकडे त्याचं कुतुहलाने बघणं, आपण सोडून का देतो, नारळाच्या पोटात गोड गोड पाणी कोण ठेवतं, असा प्रश्न आता आपल्याला पडत नाही, आताशा आपण गडबडीने नारळपाणी पिऊन, नारळ फेकुन, पुढच्या कामाला पळतो.

खरं तर लहान असतानाचा हा गुण खुप कामाचा आहे, आयुष्यात कसलाही वाईट प्रॉब्लेम असु देत, त्याकडे आश्चर्यभावाने बघायचं, विस्मयाने स्वतःशी बोला ना!

“पैशाचा प्रॉब्लेम आहे”, – अरे बापरे, पैसा किती आवश्यक आहे ना? बरं झालं, खुप लवकर आयुष्यात त्याचं महत्व कळालं,
“एखाद्याशी जमत नाहीये, सतत भांडणं होतायतं”, – अरे! लोक असे पण वागतात का?

२) कृतज्ञता –

आपण शाळेत असताना, कधी कधी खाऊसाठी पैसे मिळायचे, तर कसले खुष असायचो ना आपण! मुठीत असलेले ते चार रुपये आपल्याला जगातला सर्वात श्रीमंत माणुस असल्याची, समृद्धतेची फिलींग द्यायचे, लहानसहान गोष्टींनी आपण आनंदी व्हायचो, एक रुपयाचे पॉपिन्स असो, वा पन्नास पैशाचे मुरकुल, आपण जगाचे राजे आहोत, असा आपला तोरा असायचा.

बरं, ते जाऊ द्या, अलिकडचे उदाहरण देतो, अगदी बावीस तेवीसाव्या वर्षी जेव्हा आपल्याला स्वकष्टाची पहीली पगार मिळाली होती, तेव्हा आपण किती भारावुन गेलो होतो, आनंद गगनात मावत नव्हता, आयुष्य किती सुंदर वाटलं होतं, आज ती पगार कित्येक पटीने वाढली असेल, पण त्याबद्द्लचं आपणच आपलं करवुन घ्यायचं कौतुकाचं प्रमाण किती कमी झालं? का?

का समाधानाची जागा अतृप्ततेला घेऊ देतो आपण? का आपल्याजवळ असलेल्या गोष्टींना कवडीमोल ठरवुन आपल्याजवळ नसलेल्या गोष्टींना अतिमहत्वाचे ठरवतो आपण?

इतकं महत्वाचं की आपल्याला हवं ते, आपल्याला पाहीजे आहे, ते जवळ नसेल, मिळत नसेल, तर आपलं अनमोल आयुष्यही व्यर्थ वाटायला लागतं!

बायबल मध्ये एक वचन आहे, “जो कृतज्ञ आहे, त्याला अजुन दिलं जाईल, जो कृतज्ञ नाही, त्याच्याकडुन ते काढुन घेतलं जाईल”, जर तुम्हाला जीवन अधिकाधिक आनंदी, सुखी आणि समृद्ध हवं असेल, बनवायचं असेल, तर अधिकाधिक कृतज्ञ असायला हवं! नाही का?

३) गुंग होणे – हरवुन जाणे –

लहान मुलं जेव्हा आंबा खातात, तेव्हा तुम्ही त्यांना बघितलयं का? ते कोपर्‍यापर्यंत, रसाने हात भरवुन घेतील, कपडे भरवुन घेतील, चॉकलेट खातील तर त्यात पुर्ण हरवुन घेतील, तसेच जेव्हा कार्टुन बघतील, तेव्हा कानापाशी हजारदा ओरडलं तरी त्यांना ते ऐकुच जाणार नाही, एखादी कृती करताना, लहान मुलं त्यात पुर्णपणे गुंग होतात.

लहान मुलं जेव्हा चित्र काढतात तेव्हा ती त्यात पुर्ण पणे हरवुन जातात, त्यावेळी इतर कसलाही विचार त्यांच्या मनात येत नाही, मनाने ते पुर्णपणे त्या चित्रात रंगुन जातात, एका वेळी अनेक कृती करायची मल्टीटास्किंग त्यांच्यात नसते, त्यांना त्याची आवश्यकताही नसते, म्हणुन त्याचं आयुष्य साधं, सोपं सरळ असतं, म्हणुन ते जीवनाचा खरा आनंद लुटतात, मोठं झाल्यावर आपल्याला जेवताना टी.व्ही. चालु हवा असतो, मोबाईलवर व्हॉट्सएप फेसबुक बघायचे असते, त्यामुळे अन्नाची खरी चव आपल्याला समजतच नाही.

ऑफीसमध्ये असताना आपल्याला घरचे विचार सतवतात, घरी गेल्यावर ऑफीसची कामं आठवायला लागतात, आपण आहोत तिथे मनाने शंभर टक्के उपस्थित राहायची सवय लावली तर आपणही जीवनाचा निखळ आनंद घ्यायाला लागु.

एखादं गाणं ऐकतोय, तर पुर्णपणे त्यात रममाण व्हावं, फेसबुकवर लेख वाचतायं, तर लेखकाला नेमकं काय म्हणायचंय, हे समजुन घ्यावं, एखादा लेख, कविता आवडली तर एक मिनीट डोळे बंद करुन त्याचा आशय मनार उतरु द्यावा. विचारांचा प्रवाह मनात पुर्ण पाझरु द्यावा. एखादं पुस्तक वाचताय तर त्या संपुर्णपणे कल्पनेच्या त्याच विश्वात उतरुन जावे.

जो व्यक्ती टेंशन फ्री, स्ट्रेस फ्री असतो, त्याच्यातच अपरंपार सर्जनशक्ती निर्माण होवु शकते.

४) सळसळता उत्साह –

कसली उत्साहाने फसफसलेली असतात लहान मुलं? कधीही विचारा, सदानाकदा खेळायला तयार, दमणं, थकणं त्यांच्या गावीही नसते, त्यांना उत्साहित व्हायला हिरवळ, फुगे, पाऊस, खेळणी यापैकी काहीही पुरेसं असतं.

जे लोक मोठ्ठं झाल्यावर हा सळसळता उत्साह टिकवुन ठेवतात, ते खुप मोठी मोठी कामगिरी सहज पार पाडतात. जिकडेतिकडे त्यांच्याच नावाचा बोलबाला असतो. लहान मुलांसारखं वागायला लागलं की आपणही आपोआप उत्साहाने काठोकाठ भरायला लागतो.

५ ) सदा हसतमुख –

निराश, उदास, चेहरा पाडुन बसलेलं, डोक्याला हात लावुन बसलेलं, लहान मुल पाहीलयं तुम्ही, माझं काय होईल?, कसं होईल?, माझ्याच वाट्याला हे भोग का? असले प्रश्न त्याच्या मनातही येत नाहीत!

त्याच्या चेहर्‍यावर खेळत असेल तर फक्त आणि फक्त निरागस हास्य!

६) प्रेमाचा झरा –

लहान मुलाजवळ एक आपलेपणा असतो, त्याला नेहमीच आपल्याशी खुप बोलायचं असतं, खुप सांगायचं असतं, आपल्याला घरी जायला रोजच्यापेक्षा उशीर झाला तर ते कावरंबावरं होतं, तो समोर असताना, आपल्या डोळ्यात कधी पाणी आलं की ते आपले डोळे पुसतं, आपल्याला दुःखी उदास राहु देत नाही, त्याच्यासमोर दोन मोठे लोक मोठ्यामोठ्याने भांडु लागले की ते रडुन निषेध व्यक्त करतं, त्याला ते सहन होत नाही, कारण त्याच्या ह्रद्यात अखंड प्रेमाचा झरा वाहत असतो.

७) निर्मळ मन –

लहान मुल निष्कपट असतं, त्याचं मन पवित्र असतं, एखादी सुंदर स्त्री पाहुन त्याच्या मनात वासना जन्म घेत नाही, ते वळुन वळुन अधाशासारखं डोळे फाडुन तिला बघत नाही,

भांडणं झाले म्हणुन ते राग मनात धरुन बसत नाही, बदला घेत नाही, झालेलं भांडण पाच मिनीटात विसरुन नवा डाव मांडायचा, त्याचा स्वभाव असतो.

८) निश्चिंत मन –

आई वडील मुलांना घेऊन प्रवासाला निघाले तेव्हा गाडी मिळेल का? बसायला जागा मिळेल का? खाण्यापिण्याचे काय करायचे? गावी गेल्यावर रहायची व्यवस्था काय आहे? असले प्रश्न आईवडीलांपुढे पडतात, मुलांना त्याचे काही देणेघेणे नसते, ते आपापल्या खेळण्यात मग्न असतात. कारण त्यांचे जीवन त्यांनी आईवडीलांवर सोपवलेले असते!

लहान मुलासारखं आपणही आपलं जीवन विश्वासाने त्या परमपित्या भगवंतावर सोपवुन निश्चिंत व्हायला शिकलो तर सार्‍या चिंता नष्ट होतील. मन हलकं हलकं होवुन पिसासारखं हवेत तरंगु लागेल. जीवन कृतार्थ होईल.

आपल्या सर्वांच हरवेललं बालपण आणि निर्भेळ हास्य पुन्हा एकदा आपल्याला मिळो, ह्या हृदयपुर्वक प्रार्थनेसह,

धन्यवाद!..

क्रमशः

लेखक मोटिव्हेशन संदर्भात व्हाट्सअप वरती विविध कोर्सेस घेतात. त्यासाठी अभिप्रायातून त्यांना सम्पर्क करता येईल.

वाचण्यासारखे आणखी काही…..

पंकज कोटलवार यांचा ब्लॉग
संगीत शेंबेकर यांचा ब्लॉग
शब्द तुझे नि माझे ब्लॉग


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय