विचार करा आणि श्रीमंत व्हा! – भाग १ (Think And Grow Rich)

नेपोलियन हील यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एक पत्रकार बनुन सुरु केली, जेमतेम वीस वर्षाचे असताना एका वृत्तपत्रात नौकरीवर रुजु झाले होते तेव्हाची गोष्ट! त्यांच्या संपादकांनी त्यांना, पुर्वी प्रचंड गरीबीमध्ये असलेले पण थोड्या कालावधीत प्रचंड श्रीमंत झालेल्या लोकांची यादी बनवायला सांगितली आणि त्या श्रीमंत लोकांचे, संपत्तीवान बनण्याच्या मार्गावरच्या अनुभवांचा अभ्यास करुन, त्यांच्यावर लेख लिहण्याची कामगिरी सोपवली.

ह्या निमीत्ताने त्यांची भेट तेव्हाचे जगातले एक सर्वात श्रीमंत व्यक्तीमत्व आणि पोलाद उद्योगाचे सम्राट एण्ड्रु कार्नेजी यांच्याशी होते. मुळचे स्कॉटलंडचे असलेले एण्ड्रु कार्नेजी यांचा पुर्ण अमेरिकेत दबदबा होता. पण इथपर्यंतचा त्यांचा प्रवास, इतरांसाठी, अत्यंत गुढ, जादुई आणि चमत्कारिक असा होता, कारण कुमारवयात असताना ते एक गोदी कामगार असल्यापासुन कामाची सुरुवात केली होती.

माणसं श्रीमंत कशी होतात? आणि श्रीमंत होण्यासाठी एखाद्याने आपल्यामध्ये कोणकोणते गुण जोपासावेत? ह्या विषयावर नेपोलियन हीलने त्यांची मुलाखत घेतली, तेव्हा तरुण नेपोलियनची जिज्ञासुवृत्ती, चिकाटी आणि ह्या विषयातला रस पाहुन एन्ड्रु कार्नेजी प्रसन्न होतात. मुलाखत पुर्ण झाल्यावर ते युवा, तडफदार नेपोलियनला एक ऑफर देतात, “ यश मिळवण्याचं तत्वज्ञान आणि गुपितं शोधण्यासाठी, तु तुझ्या आयुष्यातली काही वर्ष खर्चण्यासाठी तयार असशील, आणि ते सुत्रबद्ध करुन जगापुढे मांडण्यासाठी तयार असशील तर मी तुला ते सुत्र आणि त्यातील रहस्ये पुर्णपणे शोधण्यासाठी पुर्ण मदत करीन.”

एन्ड्रु कार्नेजी मिनीटवॉच हातात घेऊन नेपोलियनच्या उत्तराची वाट पाहतात, एकोणतीस सेकंद विचार करुन नेपोलियन ‘हो’ असे उत्तर देतो. “बरे झाले, तु लवकर होकार दिलास, मी तुझ्या उत्तराची फक्त एक मिनीट वाट पाहणार होतो. त्यानंतर हो असते, तरी त्याचा फायदा नव्हता.”

तर अशा थरारक पद्धतीने यशाचे तत्वज्ञान शोधण्याच्या मोहीमेवर नेपोलियन हील निघतात, पुढची तब्बल वीस वर्ष ते एक ध्यास घेतात, हजारो यशस्वी आणि अपयशी लोकांच्या जीवनाचा अभ्यास करतात. ‘द लॉ ऑफ सक्सेस’ आणि ‘थिंक एंड ग्रो रिच’ ही त्यांची पुस्तकं अमेरीकेतचं नाही तर पुर्ण जगात गाजली. १९३० च्या महामंदीनंतर संपुर्ण अमेरीका एका निराशेच्या छायेत गेली होती, पण ह्या पुस्तकांच्या कोट्यावधी प्रति खपल्या, आणि संपुर्ण अमेरीकेला नेपोलियनच्या पुस्तकांनी नैराश्येच्या मळभातुन बाहेर काढलं, आणि श्रीमंत बनण्यासाठी प्रेरणा दिली.

ह्या पुस्तकात लेखकानं श्रीमंत होणारा हा प्रवास फक्त पंधरा पावलांचा असल्याचं सांगितलं आहे. काही लेख लिहुन त्या पंधरा पावलांची मी तुम्हाला ओळख करुन देणार आहे.

पाऊल पहीले – तीव्र इच्छाशक्ती

लेखकाने हा गुण क्रमांक एक वर ठेवला आहे, आपल्याला आयुष्यात नुसत्या इच्छा खुप असतात, पण त्याला ‘बर्निंग डिझायर’ बनवलं पाहीजे. साधी इच्छा आणि तीव्र इच्छा यांच्यातला एक फरक आहे. ज्यावेळी माणुस आपल्या इच्छापुर्तीसाठी सर्वस्व पणाला लावतो, ती इच्छा पुर्ण करण्यासाठी तो समर्पित होतो, अशा इच्छेला तीव्र इच्छा असे म्हणतात.

आपल्याकडे एक म्हण आहे, गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली, म्हणजे करुन बघुया, झाले तर ठिक, नाही झाले तरी काही प्रॉब्लेम नाही, असे अर्ध्या मनाने केलेले प्रयत्न अजिबात यशस्वी होत नाहीत. म्हणुनच बहुतांश वेळेला गाजराची पुंगी वाजतच नाही, मोडुनच खावी लागते.

जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत त्याच्या पिच्छा सोडणार नाही, असा एटीट्युड असलेले लोकच ह्या जगात आपलं कर्तुत्व दिमाखाने मिरवतात. एडविन सी बार्नस ह्याला एडीसनचा भागीदार बनण्याची तीव्र इच्छा होती, त्याच्याजवळ त्या तोडीचे कसलेही ज्ञान नव्हते, पैसा नव्हता, कौशल्य नव्हते, आणि एडीसन सोबत ओळखही नव्हती, पण तीव्र इच्छाशक्ती होती, आणि त्या विचाराने तो झपाटुन गेला होता.

एके दिवशी तो एडीसनच्या ऑफीसमध्ये येऊन धडकतो. त्याचा गबाळा वेष पाहुन इतर लोक त्याची मस्करी करतात मात्र त्याची चिकाटी आणि त्याचा ठामपणा पाहुन एडीसन त्याला ऑफीसबॉय म्हणुन नाममात्र पगारीत ठेवुन घेतात.

महीने जातात, वर्षे जातात, आपल्या स्वभावाने बार्नस सर्वांचा लाडका बनतो, पडेल ते काम करत जातो, एडीसनचा विश्वासु होतो आणि एके दिवशी एडीसनच्या कंपनीत भागीदार होतो. हे सर्व त्याने आपल्या विचारांच्या सहाय्याने प्राप्त केले. तो खरोखर विचार करुन, तीव्र इच्छाशक्ती वापरुन श्रीमंत झाला.

लेखक म्हणतो, अपयश हा चकवा आहे, लोकांनी नाही म्हण्टलं म्हणुन आपण हार मानुन थांबायचं नसतं! प्रयत्न सोडुन द्यायचे नसतात. त्यासाठी ते डर्बी नावाच्या एका गृहस्थाची गोष्ट सांगतात. डर्बीनी एक सोन्याची खाण घेतलेली असते, कित्येक फुट खोदल्यवर अचानक सोन्याचे कण गायब होतात. डर्बी निराश होतात, आणि सारी साधनसामुग्री भंगारवाल्याला विकतात, तो एका निष्णात इंजिनीअरचा सल्ल घेतो, फक्त तीन फुटांवर त्याला अमाप सोने मिळते.

आपल्या आयुष्यात आपणही कदाचित आपल्या स्वप्नांपासुन अवघे तीनच फुट दुर असु, तेव्हा तात्कालिक अपयशांनी माघार न घेता सातत्याने कृती करायला हवी!

यश गंमतीशीर असतं, अगदी जवळच्या टप्प्यावर असताना, आपल्याला चकवण्यात त्याला आसुरी आनंद मिळतो, पण निश्चित उद्देश आणि विशिष्ट मानसिकता असली की आपण विनाकष्टाने किंवा थोड्या कष्टाने श्रीमंत होवु शकतो.

पाऊल दुसरे – श्रद्धा

श्रद्धा एक अशी मानसिक अवस्था आहे, जी सुप्त मनाला ठामपणे सांगुन निर्माण करता येते. प्रत्येक धर्मात श्रद्धेला आणि प्रार्थनेला निर्विवाद महत्व देण्यात आलं आहे.

कुठलेही विचार सुप्त मनावर सतत बिंबवले, तर ते त्याप्रमाणे क्रिया करतं, विचारांचं भौतिक जगात रुपांतर होतं. उदा. आपण जर दिवसभरामध्ये शंभर वेळा “माझं डोकं दुखत आहे”, असं म्हणत राहीलो तर अखेरीस खरोखर डोकं दुखायची सुरुवात होते!

एखादा गुन्हेगार पहीला गुन्हा करतो, तेव्हा त्याला अपराधी वाटतं, तो स्वतःचा तिरस्कार करतो, मात्र दिर्घकाळ तो गुन्हे केल्यास निर्ढावतो, आणि त्याला त्यात काहीच चुक वाटत नाही.

जे लोक स्वतःला दुर्देवी, नियतीचे बळी किंवा कमनशीबी मानतात, हे लोक स्वतःच त्यांच्या दुर्दैवाचे निर्माते असतात, कारण एक नकारात्मक विश्वास त्यांच्या मनात रुजलेला असतो. स्वयंसुचना देऊन तो बदलता येतो.

एखाद्या वरवर कठिण किंवा अशक्य ध्येयासाठी, म्हणजे आपल्या सुप्त मनाला फसवावं लागतं, चकवावं लागतं, ती गोष्ट आपल्याला आधीच प्राप्त झाली आहे अशा थाटात वावरावं लागतं!

विश्वासपुर्वक सुप्त मनास आज्ञा दिल्या की आपोआप सकारात्मक भावनांना उत्तेजन आणि प्रोत्साहन मिळते.

मनाला एखादं असत्य पुन्हा पुन्हा सांगीतलं की ते खरं वाटु लागतं.

‘मी हे सहज प्राप्त करु शकतो’ हा विचार म्हणजे स्वतःवर श्रद्धा!

‘मला जे हवं आहे ते प्राप्त करण्यास अदृश्य शक्ती मदत करेल’, हा विश्वास म्हणजे अनंतावर श्रद्धा! ह्या दोन श्रद्धा मनात जोपासल्यास अशक्य काहीही नाही.

हृदयात आणि डोक्यात निद्रिस्त असलेली प्रतिभा जागृत केल्यास आपलं रुपांतर एका महान व्यक्तीत होतं.

पाऊल तिसरे – स्वयंसुचना

स्वयंसुचना म्हणजे स्वतः स्वतःला दिलेली सुचना. आपल्या मनाद्वारे आपल्या ज्ञानेंद्रियांना दिलेलं प्रोत्साहन! मनाच्या संवेदनशील भागात, आपल्याला जे मिळवायचे आहे, त्याची पेरणी करणं!

स्वयंसुचना म्हणजे फक्त शब्द वाचणं नाही, त्यात भावनाही ओतायला हव्या. त्या शब्दांशी एकरुपही व्हायला हवं.

श्रद्धायुक्त भावनांनी ओथंबलेले विचार सुप्त मनाकडे पाठवायला हवे.

सुप्त मनावर प्रभाव पाडण्याची क्षमता मिळवण्यासाठी चिकाटी हवी.

आपल्याला किती संपत्ती हवी आहे, तिची रक्कम ठरवा, आणि दिवसातुन चार पाच वेळा, डोळे मिटुन, त्या संपत्तीवर लक्ष केंद्रित करा.

तुमच्या हाती, प्रत्यक्षात ती संपत्ती आलेली आहे, असा विचार करा. त्या संपत्तीला अनुभवा!

ह्या जगात फुकट काहीही मिळत नाही, तेव्हा ही रक्कम मिळवण्यासाठी ह्या जगाला तुम्ही तुमच्या कृतीतुन कोणती सेवा देणार आहात, हे जाहीर करा.

एक निश्चित योजना बनवुन झपाटुन कामाला लागा, ती संपत्ती तुमची वाट पाहत आहे!

तुम्हाला अपेक्षित असलेली रक्कम तुम्हाला लवकरात लवकर मिळो, अशी ब्रम्हांडाकडे हृदयपुर्वक प्रार्थना,

धन्यवाद!..

(क्रमशः)

विचार करा आणि श्रीमंत व्हा (पुस्तक खरेदीसाठी येथे क्लिक करा)

Think And Grow Rich (Click here to buy book)

लेखक मोटिव्हेशन संदर्भात व्हाट्सअप वरती विविध कोर्सेस घेतात. त्यासाठी अभिप्रायातून त्यांना सम्पर्क करता येईल.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय