ऑक्टोबर स्काय – स्वप्नाला सत्यात उतरावणारी जिद्द

१९५७ चा काळ होता. अमेरिका आणि रशिया मध्ये अवकाशात पहिल्यांदा कोण जाते ह्याची चढाओढ सुरु होती. त्यातच रशिया ने स्पुटनिक १ अवकाशात यशस्वीपणे सोडून अमेरिकेवर कुरघोडी केली. रशियाच्या ह्या यशाची बातमी अमेरिकेतल्या कोलवूड ह्या गावात पोचली. कोळशाच्या खाणीवर चालणाऱ्या ह्या गावात हॉमर हिकमॅन नावाचा एक मुलगा तेव्हा मोठेपणी काहीतरी वेगळ करण्याची स्वप्न बघत होता. पारंपारिक असलेल्या कोळशाच्या व्यवसायातून बाहेर पडून आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची त्याची स्वप्न…

sputnik-1-launch
Sputnic 1 Launch – स्पुटनिक १

ऑक्टोबर महिन्याच्या त्या दिवसात स्पुटनिक १ कोलवूड च्या आकाशातून जाताना ते बघण्यासाठी पूर्ण गाव जमल होतं. स्पुटनिक १ ला अवकाशातून बघताना हॉमर हिकमॅन ने आपलं स्वप्न त्यात बघितल. ते स्वप्न होत स्पुटनिक १ सारख रॉकेट बनवण्याचं. आपलं स्वप्न साकार करण्यासाठी हॉमर हिकमॅन ने आपल्या मित्रांसोबत रॉकेट बनवण्याची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याच ठरवलं. आपले मित्र आणि विज्ञानाची शिक्षिका मिस रायले ह्यांच्या पाठींब्यावर पूर्ण गावाचा आणि आपल्या कुटुंबाचा विरोध पत्करून हॉमर हिकमॅन ने रॉकेट बनवायला सुरवात केली.

हॉमर हिकमॅन ने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अनेक अपयशांचा सामना करत रॉकेट अभियांत्रिकी मधील बारकावे आत्मसात करत यशाची चव चाखली. आपल्या सगळ्यात चांगल्या रॉकेट च नामकरण त्याने आपल्या विज्ञानाच्या शिक्षिकेच्या नावावर ठेवल. त्याच्या मिस रायले रॉकेट ने ३०,००० फुट (९१०० मिटर) पेक्षा जास्त उंची गाठली. त्याकाळी हॉमर हिकमॅन आणि त्याच्या मित्रांना रॉकेट बॉईज अस म्हंटल जाऊ लागल. हॉमर हिकमॅन च्या ह्या स्वप्नांचा प्रवास आपल्या समोर आणला आहे ऑक्टोबर स्काय ह्या चित्रपटातून. एक साधा कोळसा खाण कामगाराचा मुलगा, दोन वेळच्या जेवणासाठी प्रसंगी शाळा सोडण्याचा प्रसंग आलेला हॉमर हिकमॅन चा हा प्रवास बघण खूपच सुंदर आहे.

october_sky
ऑक्टोबर स्काय चित्रपटाच पोस्टर

ऑक्टोबर स्काय मधील हॉमर हिकमॅन चा प्रवास आपल्याला आपल्या स्वप्नांना मूर्त स्वरूप देण्याचा एक सुंदर अनुभव आहे. मोठी स्वप्न सत्यात उतरवायला अनेक अपयश येतात, अनेक अडचणी समोर उभ्या राहतात. पण जेव्हा आपण स्वप्नांचा पाठलाग सचोटीने सुरु ठेवतो तेव्हा एक ना एक दिवस आपण यशाची चव चाखतोच. हॉमर हिकमॅन ने आपल्या स्वप्नांचा असाच पाठलाग केला. अमेरिकेत सैन्यात प्रवेश घेऊन व्हियेतनाम युद्धात देशाकडून लढला. नासा ने हॉमर हिकमॅन ला एरोस्पेस इंजिनियर म्हणून आपल्या सेवेत घेतल. आपल्या सेवेमध्ये हॉमर हिकमॅन ने स्पेसक्राफ्ट च डिझाईन तसेच त्यातील सदस्यांना ट्रेनिंग दिल. स्पेस लॅब, स्पेस शटल मिशन, हबल स्पेस टेलिस्कोप सारखे मिशन यात समाविष्ट आहेत. १९९८ मध्ये नासा मधून रिटायर होण्याआधी हॉमर हिकमॅन पेलोड ट्रेनिंग मॅनेजर स्पेस स्टेशन साठी कार्यरत होता.

एका साधारण कुटुंबात जन्म घेऊन आकाशात जाणाऱ्या रॉकेट ला बघताना प्रभावित होऊन रॉकेट उड्डाणाची स्वप्न बघून ती प्रत्यक्षात जगणाऱ्या हिकमॅन चा प्रवास थक्क करणारा आहे. ऑक्टोबर स्काय हा चित्रपट हॉमर हिकमॅन च्या रॉकेट बॉईज ह्या पुस्तकावर आधारित असून चुकवू नये असाच आहे.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय