Psycho – जगणे थिजलेले…

कुंद मळभ असलेली सकाळ आणि मनातही मळभ दाटलेलं, ते दोघे आज सकाळी उठलेच नाहीत बेडवरुन, म्हणजे दोन सिंगल बेड बेडरूममध्ये होते आणि दोन्हीच्या वर मोठ्या खिडक्या होत्या, त्यामुळे पडल्यापडल्या आकाशाचं सहज दर्शन व्हायचं त्या दोघांना, अनेक वर्ष एकटेच होते, त्यांचा हाच छंद होता…..

आकाश कसं आज? ह्यावर त्यांची नजरेनी चर्चा घडायची, संवाद कमी झाला होता, संवाद करण्याची खरं म्हणजे त्यांना गरजच नव्हती, इतके एकमेकात ते मिसळलेले होते, हल्ली ह्या दोन चार वर्षात त्याची तब्येत बरी नसायची, ती त्याच्याकडे तिरक्या नजरेने बघत होती, आज परत परत काहीतरी होणार त्याला असं तिला तीव्रतेने वाटत होते, त्याचा आजार एकदम उफाळून येत असे आणि त्याचा जीव घाबरा होत असे…….

असे अनेकदा घडले होते ह्या दोन चार वर्षात, ती मनातल्या मानत घाबरली होती, आज परत त्याचा जीव त्याच्या शरीराच्या वेशीबाहेर येण्याचा प्रयत्न करणार बहुतेक, मी आधी जाईन तर बरं, असे विचार यायचे मनात तिच्या नेहमी, पण तिची तब्येत ठणठणीत होती, अजूनही पुरुष त्या नजरेनी तिच्याकडे बघत असत, पण ती कधीच मेली होती हे त्यांना कसे आणि कोण सांगणार?

लग्न होऊन घरी आली ह्याच्या, तो खूपच स्वभावाने मृदू होता आणि ही एकदम विरुद्ध, हळू हळू तिला तो समजायला लागला आणि त्याचा आजारही, खूप दमवयाचा आजार त्याला, ती सर्व ऍडजेस्ट करायची, एकमेकांवर प्रेम जडलं होत त्यांचं असं वाटायचं कदाचित?

ती नोकरी करत होती, तो ही चांगल्या हुद्यावर होता, पण वर्षातले सहा महिने घरीच असायचा आजारपणामुळे, संसार आपोआप आपल्या गतीने सरकत होता त्यांचा, मुलबाळ झालेच नाही, त्याच्या आजाराचे निमित्त, तिला सारखी भीती वाटायची कधी तो जाईल सोडून आपल्याला ह्याची, संध्याकाळी घरी आली की चाहूल घ्यायची, घरात हालचाल जाणवते का ह्याची?

काळजाचा ठोका चुकायचा…… कसलीच चाहूल नाही लागली तर…..

तो बेडवर सत्ताड डोळे उघडे ठेऊन खिडकीबाहेर नजर लावून पडलेला असायचा…. समजायचं नाही जीव आहे की नाही डोळ्यात ते? ती मुद्दामून काहीतरी आवाज करायची आणि हालचालींचा अंदाज घ्यायची त्याच्या….. तो नुसते डोळे फिरवायचा तिच्याकडे, ती मग कामाला लागायची चटचट, जीव भांड्यात पडायचा……

अधून मधून त्याच्या मोबाईलवर कॉल करायची ती, तो नुसता हूं हं असा प्रतिसाद दयायचा, हल्लीच त्याने व्ही. आर. एस. घेतली होती त्यामुळे घरीच असायचा दिवसभर, कसला विचार करायचा कोणास ठाऊक?

मी कधी मरीन का असा विचार करत असतेस ना? त्याच्या गळ्यात आवंढा होता आणि डोळ्यात पाणी, तिचा हात हातात घ्यायचा आणि म्हणायचा तयारीत रहा, ती कावरीबावरी व्हायची, नका हो असं बोलू कळवळून ती म्हणायची, आजारांनी पोखरलंय मला मी नाही राहणार फार दिवस, ती आतल्याआत हुंदका द्यायची, जीवनाची भीती म्हणजे काय हे तिला जाणवायचं, कोण होत तिला दुसरं? तो नुसता घरात पडून असला तरी तिला घरी आल्यावर आधार वाटायचा, परवा डॉक्टरनी सांगितलं काळजी घ्या स्वतःची पण, सांभाळा त्यांना, त्यांना काय हवं ते द्या, ती खूपच धसकली, त्याला समजायचं तिच्या नजरेतून की तो लवकरच ह्या जगातून जाणार आहे तिला एकटीला सोडून, त्याला पण तिच्या भविष्याची भीती वाटायची……. इलाज नव्हता.

हल्ली असेच सकाळी पडून राहायचे, जीवनातली सकाळ असं वाटायचंच नाही त्यांना, बाहेरचं आकाश आणि त्याचा बदलणारा पोत बघत बसायचे दोघे वेगवेगळ्या खिडक्यांतून, तिकडे आकाशात त्यांच्या नजरेचं मिलन व्हायचं आणि संवाद घडायचं तोंडातून शब्द न काढता……

आज तिला सुट्टी, आराम, दोघेही आपापल्या सिंगल बेडवर, आकाशात नजर, दोघांच्याही स्थिर नजरा, तिने एकदा तिरक्या नजरेनी त्याच्याकडे पाहिलं, एक सुस्कारा सोडला..…

तो शांत तसाच पडून होता बाहेर…. सत्ताड नजरेनी, जीव नसलेल्या……

दाराची बेल वाजली तरी लक्ष नव्हतं त्याचं आणि तिचंही,

घरात बऱ्याच वर्षांनी नातेवाईक जमले होते, तिच्याबद्धल खूपच कणव आणि तिच्या जिद्दीची तारीफ वगैरे….. त्याला नातेवाईकांनी बाहेर आणलं, तिला त्याने त्या शुभ्र चादरीत बघितलं आणि त्याला समाधान वाटलं….

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय