Psycho – पाठमोरी……

मी दचकले एकदम त्या दिवशी म्हणजे भास होता की काय का खरंच ते दृश्य सत्य होते ह्याबद्दल गोंधळ निर्माण झाला होता माझ्या जाणिवेत ,मी सहज बाल्कनीत उभे होते आमचा सातव्या माळ्यावर उच्चभ्रू वस्तीत फ्लॅट आहे, दोघेही उच्च शिक्षित आणि उच्च आर्थिक स्थितीत असल्याने श्रीमंत ह्या वर्गात कदाचित आम्हाला लोक बसवत असतील म्हणजे नातेवाईक मागून हेवा करतात आमचा हे मला जाणवतं कधी कधी, हल्ली ह्या दोन महिन्यात मी व्हिआरएस घेतली, तशी मी वयानी फार नाही पन्नाशीच्या आतली त्यामुळे कदाचित मी सध्या स्त्रीच्या आदर्श वयाच्या उंबरठ्यावर होते कदाचित, चार जण वळून बघतील असा आकर्षक बांधा आहे हे मला माहिती आहे.

मी समोर त्या नवीन कंस्ट्रक्शनच्या बिल्डिंगमध्ये बघत होते सध्या हाच धंदा दिवसभर म्हणजे वाचन तरी किती करणार, अधून मधून सकाळी सतार काढून प्रॅक्टिस नाहीतर आठवड्यातून चार दिवस जिम, मी शरीरसौष्ठव राखून होते माझे सर्व छंद जोपासत होते हे त्यांच्या कामात बिझी, सहसा मी नातेवाईकांत न रमणारी, हल्ली नवीन बांधकामाकडे निरीक्षण हाच एक उद्योग दुपारचा, समोर म्हणे पंचवीस माळ्याची बिल्डिंग उभी होत होती, काम धडाक्यात सुरु होतं, मी बाल्कनीतून तीच गम्मत बघत होते…..

इतक्यात माझं लक्ष त्या आमच्याच समोर असलेल्या सातव्या माळ्यावरच्या उघड्या पण काम चालेल्या फ्लॅट कडे गेलं आणि मी दचकलेच म्हणजे ती बाई, तिकडे काम करणारी बाई पाठमोरी, साडीच्या पाळण्यात झोपवलेल्या बाळाला झोका देत होती, बाप रे पाठमोरी, मीच होते की काय? मी वाट बघत राहिले ती माझ्याकडे बघण्याची पण शेवटपर्यंत म्हणजे मलाच कंटाळा आला तिने काही चेहरा दाखवला नाही, पण माझीच उंची, माझाच बांधा, माझीच लकब असावी फक्त रंग जरा डार्क सावळा होता, तिच्या समोर…. तिचा नवरा असावा, म्हणजे गालफाड आत बसलेला आणि हाड वर आलेला, डोक्याला पांढरा फडका गुंडाळलेला, काहीतरी दोघे बोलत होते….. त्यांच्या भाषेत म्हणजे दाक्षिणात्य भाषा असावी, तावातावानी ती बोलत होती, दोघेही विड्या ओढत होते, मला तिचा चेहरा बघायचा होता पण ती काही दाखवायला तयार नव्हती, मी कंटाळून घरात आले बेडवर अंग झोकून दिलं, मला तेच दृश्य दिसत होतं माझ्यासारखी ती…. कामाठी बाई आणि तिचा नवरा,

संध्याकाळी हा घरी आला तरी माझं लक्षच नव्हतं त्याच्याकडे, अधून मधून मी बाल्कनीत जाऊन बघत होते ती दिसते का ते, पण दुपारनंतर दिसली नाही मला, बहुतेक बिल्डिंगच्या त्या बाजूला काम करत असावी, ह्याचा चहा झाला, जरा चवकशी झाली दिवसभराची आणि हा परत त्याच्या कामात रमला, मी पटकन बाल्कनीत आले, शंभरचा बल्ब लावला होता आणि तोच साडीचा झोळणा आणि तो आणि ती दोघे बसले होते त्याच पोझिशनवर, फक्त चूल मांडली होती तिनं आणि भाकऱ्या करत होती बहुतेक, मला आश्चर्य वाटलं हुबेहूब मी अगदी बसून पाठमोरी भाकऱ्या करतीये जणू…..

तिकडे पलीकडे जाऊन तिने हात धुतले अगदी माझ्या स्टाईलमध्ये आणि नवऱ्याकडे काहीतरी मागू लागली, नवऱ्यानी विडीचं बंडल आणि काड्याची पेटी दिली, ती तिकडेच बसली आणि झर्रकन विडी पेटवून झुरके घेत नवऱ्याशी तावातावनी बोलायला लागली, अगदी माझीच लकब फक्त मी इतकं भांडखोर आवाजात ह्याच्याशी कधी बोलली नाही आजपर्यंत….

हल्ली हे असंच चाललं होतं म्हणजे वेडच लागले होते मला तिचा चेहेरा बघण्याचे, पण मला काही दिसत नव्हता, फक्त पाठमोरी, विडी, तिचा चुलीवरचा स्वयंपाक आणि शंभरच्या दिव्याखालचा तिच्या बाळाचा झोळणा….. मला चैन पसेनासे झाले… ह्याच्या लक्षात आलं….. आठवडाभर मी नुसती बैचैन होते…..

“काय होतंय?…..” याने विचारलं….

“काही नाही हो, काही झालं नाहीये मला”….. त्याने विषय थांबवला पण त्याचं बारीक लक्ष होत माझ्यावर…. मला एकच ध्यास, मी त्या कामठी बाईच्या रूपात कशी?

“अगं तू त्या पानाच्या स्टॉलवर गेली होतीस का आज?” मी म्हंटल “नाही…. का?”

“अगं त्यांनी मला हाक मारून विचारलं साहेब सिगरेटचा बॉक्स हवाय का म्हणून? बाईसाहेब आल्या होत्या पण काहीच बोलल्या नाहीत, दोन मिनटं उभं राहून गेल्या……”

मी दचकले ,मी गेले होते पानाच्या स्टॉलवर?

संध्याकाळी तो आला आणि स्तंभितच झाला, “अगं हे काय? मी भानावर आले एकदम, काय झाले? अंग हा साडीचा झोळणा कशाला बांधलायस हॉल मध्ये, बाप रे मी एकदम कावरीबावरी झाले….. काही नाही हो, सहज!” करून वेळ मारून नेली…….

रविवारी हे प्रदीपला घेऊन आले जेवायला, म्हणजे त्यांचा कार्यक्रम पण होता पिण्याचा, “वाहिनी या तुम्ही पण बसा….” प्रदीप म्हणाला….

मी घेते एखादा पेग, जरा रिलॅक्स होण्यासाठी…… गप्पा सुरु झाल्या….. माझी चवकशी केली….. आणि त्या घटनांबद्दल विचारलं मी काही नाही म्हणून वेळ मारून नेली, दोघांनी सिगारेट्स पेटवल्या माझी परवानगी घेऊन त्यांना माहिती होतं…. मला घरात आवडत नाही धूर झालेला सिगरेटचा….. “लायटर बेड मध्ये राहिला बघ प्लिज इफ यु डोन्ट माईंड” मी उठले आणि आले परत लायटर घेऊन, ते दोघे बघतच राहिले माझ्याकडे, मला समजलच नाही का बघतायत ते?

वाहिनी ठीक आहत ना? मी काय करते मलाच समजत नव्हतं कदाचित, मी सरळ जमिनीवर बसले आणि….. फार्रकन विडी पेटवली त्या दोघांसमोर…… “अहो वाहिनी?”….. हा पण धसकला, हे काय झालंय हिला?….. प्रदीपला याच कारणाकरता आणलं होत तो मानसोपचार तज्ज्ञ होता, विडीचा झुरका घेतला आणि मोठया आवाजात ह्याच्याशी आणि प्रदीपशी बोलायला लागले…… ग्लासपण जमिनीवर घेतला……

सकाळी आम्ही प्रदीपच्या कन्सल्टन्सी मध्ये गेलो, वाहिनी तुम्हाला स्ट्रेस आलाय एकटेपणाचा, जरा अँटी डिप्रेसंट्स देतो ते घ्या बरं वाटेल, मी घरी आले तो परस्पर ऑफिसला गेला, माझी नजर समोरच्या त्या बांधकामावर स्थिर, मी बाल्कनीत आले, आज झोळणा दिसत नव्हता, राख साठलेली चूल दिसत होती, मी गोंधळले मला तिला बघायचं होतं कुठे गेली?

माझी नजर सहज वरच्या माळ्यावर गेली तर तोच साडीचा झोळणा मला ओझरता दिसत होता, मला आनंद झाला, पण नीट दिसत नव्हती, फक्त तिचा तावातावाने बोलण्याचा आवाज येत होता आणि अधून मधून तिची सावली दिसत होती,
संध्याकाळी हा घरी आला तर मी घरी नव्हते….. हा घाबरला…. “वहिनींना ऐकट सोडू नको” प्रदीप नि सांगितलं होतं, वॉचमन आणि हे वर आले टेरेस वर, मी प्रयत्न करत होते तिचा चेहरा बघण्याचा आटोकाट प्रयत्न, साब दुपेर से मॅडम यही खडी है टेरेस पे, मैने बोला, सुना नही उन्होने…..

शांत वाटत होतं, पांढऱ्या स्वच्छ चादरी आणि छान हवेशीर रूम, प्रदीप बसला होता बाजूला मासिक वाचत, मी डोळे उघडले, कसं वाटतंय? मी फिक्कटशी हसले, डोकं रिकामं असल्यासारखं वाटत होतं, सहज खिडकीतून बाहेर लक्ष गेलं, आणि मी झटक्यात बेडवर उठून बसले आणि खिडकीबाहेर बघण्याच्या दृष्टीने बेडवरुन उतरले, मला ती दिसली होती पण पाठमोरी…… आणि तो झोळणा…..

“सिस्टर…..सिस्टर” हा हाका मारत होता नर्सला..…


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय