​मराठी संस्कृती- २०१८ च्या उंबरठयावर!

मानवसमूहाच्या अनुभवाने पाहिलेले रंग जितके मनमोहक असतील तितकी त्या रांगोळीत अधिक मोहकता असेल. ह्या रांगोळीतील विविध रंग म्हणजे त्या समूहाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक विचारांची तिच्या अस्तित्वापासून झालेली घुसळण!

संस्कृती म्हणजे माणसाच्या जगण्याच्या अनुभूतीच्या संचिताची मांडलेली रांगोळी. त्या मानवसमूहाच्या अनुभवाने पाहिलेले रंग जितके मनमोहक असतील तितकी त्या रांगोळीत अधिक मोहकता असेल. ह्या रांगोळीतील विविध रंग म्हणजे त्या समूहाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक विचारांची तिच्या अस्तित्वापासून झालेली घुसळण! जेंव्हा जेंव्हा समूह विविध आंदोलनातून जातत, तेव्हा ते रंग बदलतात. मात्र जाणीवपूर्वक ह्या रंगांची पुन्हा फेररचना करून रांगोळी अधिकाधिक सुंदर बनवणे हे जाणत्या आणि जागत्या समाजाचे लक्षण असते.

मराठी संस्कृती एक मनमोहक आटोपशीर रांगोळी आहे. हजारो वर्षातील विविध स्तरावरील झालेल्या जडणघडणीतून तिचे रंग अधिक गडद, सुंदर आणि रेखीव होत गेले. मात्र कधीच कुठली संस्कृती पूर्णत्वास पोहोचली असे म्हणता येत नाही. एखादी रांगोळी सुंदर दिसतेच तरी ती पूर्ण असतेच असे नाही. एखाद्या विशिष्ट रंगाची छटाच इतकी सुंदर उमटते की ती संपूर्ण रांगोळीचे सौंदर्य वाढवते. पण याचा अर्थ असा नव्हे की इतरही रंग तसेच पडले असतील. कालानुरूप रांगोळीचे रंग फेररचना करतात. पण, काही रंगांची रचना आपल्याला जाणीवपूर्वक करावी लागणार आहे, बदलावी लागणार आहे. हे करताना, संपूर्ण रांगोळीचे चित्रही बिघडणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. ‘मराठी’ सारखी एखाद्या समाजसंस्कृतीला रांगोळीची उपमा द्यावी असा समाज खोऱ्याने सापडत नाही. त्यामुळेच जे संचित तुम्हा आम्हाला वारशात मिळाले आहे, तिची जपणूक करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.

काय बदल करावे लागतील आपल्या संस्कृतीच्या रंगावलीत?

सांस्कृतिक क्षेत्रात मराठीचा हात धरेल अशी रचना देशात काय पण जगात विरळा असावी. वर म्हटल्याप्रमाणे ह्याच सांस्कृतिक रंगांची इतकी सुंदर उधळण झालीये की इतर काही त्रुटी लपवून रांगोळी अधिक मोहक झाली आहे. त्यामुळे आपण त्याकडे नंतर वळू.

पु.ल. असामी मध्ये म्हणतात, आमच्या भाऊबंदकीवर इथल्या वकिलांच्या पिढ्यांच्या पिढ्या जगल्या असतील. भावा भावांमधील भांडणे असोत वा आपल्याच जातिबांधवांशी भांडण्यात असो आम्ही आमची किती ऊर्जा, वेळ, पैसा यावर खर्च करतो, निरर्थक अभिमान आणि विजयोन्मादाची तृष्णा शांत करण्यासाठी, आणिक त्यात आम्ही स्वतःला आणि समोरच्याला किती मनस्ताप करीत आहोत, याची एकदा समस्त मराठी जनांनी शांतपणे बसून विचार करण्याची आवश्यकता आहे खचितच!

सर्वात पहिला बदल करावा लागेल, आपल्या सामाजिक मानसिकतेत. काही मानसिक रोग मराठी मनाला जडून गेले आहेत, काही स्वभावाला चिकटले आहेत. असाच एक मोठा दुर्गुण मराठी मनाला चिकटला आहे, भाऊबंदकीचा. भांडणात, एकमेकांचा दुस्वास करण्यात आणि एकमेकांना पाण्यात पाहण्यात, आम्ही मराठी किती वेळ फुकट घालवतो. इतक्या मोठ्या अर्थाने “भाऊबंदकी” मधील “भाऊ” हा शब्द इथे योजला आहे. पु.ल. असामी मध्ये म्हणतात, आमच्या भाऊबंदकीवर इथल्या वकिलांच्या पिढ्यांच्या पिढ्या जगल्या असतील. भावा भावांमधील भांडणे असोत वा आपल्याच जातिबांधवांशी भांडण्यात असो आम्ही आमची किती ऊर्जा, वेळ, पैसा यावर खर्च करतो, निरर्थक अभिमान आणि विजयोन्मादाची तृष्णा शांत करण्यासाठी, आणिक त्यात आम्ही स्वतःला आणि समोरच्याला किती मनस्ताप करीत आहोत, याची एकदा समस्त मराठी जनांनी शांतपणे बसून विचार करण्याची आवश्यकता आहे खचितच!

या भांडणात अजून एक विषवल्ली वाढत आहे, जातीभेदाची. ही वेल वेळीच ठेचायला हवी. ब्राह्मणांनी तुमच्यावर शतकानुशतके अन्याय केले, म्हणून आज तुम्ही त्यांच्या सातही पिढ्यांचा उद्धार करा असे सांगणाऱ्या विघातकशक्तींचा वावर वाढतो आहे. उद्या कळेल की फक्त ब्राह्मणच नव्हे, सर्वच स्वतःला वरचे म्हणवणाऱ्यांनी खालच्या मानल्या जातींवर अन्याय केले आहेत. मग प्रत्येकाशी आपण भांडत बसणार आहोत का? मग स्वतःला सुसंस्कृत म्हणवण्याचा काय फायदा? मध्ययुगापासून जातीभेदाच्या वृक्षाचा वेल महाराष्ट्रात वाढत होता. आज जेंव्हा तो ठेचून काढून त्याच्या जंगलाला आग लावण्याची आपण स्वप्ने पाहत आहोत, तेंव्हा त्याच्या आठवणी किंवा इतिहासाची उजळणी सुद्धा करणे म्हणजे जातीभेदाच्या विषाला उराशी जपून ठेवणेच आहे. त्यामुळे, त्याकाळी पोळलेल्या जातींना हे कितीही कटू वाटले, तरी आजचा आणि उद्याचा विचार करून, आपल्या पूर्वजांवर झालेल्या अन्यायाच्या कुठल्याही सुडाची आग सुसंस्कृतीच्या पाण्याने आज शमवलीच पाहिजे. सुजाण सज्ञान म्हणवलं जाणाऱ्या सर्व समाजाने एवढा समंजसपणा दाखवलाच पाहिजे. केवळ भाऊबंदकी आपण टाळू शकलो तर मराठी संस्कृतीची आपली आजची रंगावली शतपटीने खुलून दिसेल.

आर्थिक विकास करण्याचा मार्ग उद्योगातून’च’ जातो. कुठलाही माणूस दुसऱ्याला दाबू शकतो ते आर्थिक जोरावरच.

दुसरी मानसिकता एक समाज म्हणून काही स्वभावगुण स्वतःला चिकटवणे. आजपर्यंत सांस्कृतिक मंचावर मराठी मने एकसंध झाली आहेत. पण विशेषतः भौतिक बाबतीत मराठी मने एकत्र होण्याची नितांत आवश्यकता आहे. यातील पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक विकासाचा. आज अवघ्या मराठी तरुणाने पुढील वीस वर्षे फक्त आर्थिक विकासाचा मुद्दा हाती घेऊन काम केले पाहिजे. याचे कारण, तुमची आर्थिक घडी तुमच्या राज्य आणि धर्माची संजीवक असते. आजच्या घडीला, कुठल्याही राजकीय आणि सामाजिक संघटनेपेक्षा आर्थिक संघटन अधिक महत्वाचे आहे. आर्थिक विकास करण्याचा मार्ग उद्योगातून’च’ जातो. कुठलाही माणूस दुसऱ्याला दाबू शकतो ते आर्थिक जोरावरच. आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या सामाजिक दुर्बल जातीतील माणूसही अन्यायाचा बळी ठरत नाही,एवढे साधे तत्व आपण लक्षात घेतले पाहिजे. यासाठी, अधिकाधिक मराठी तरुणांनी उद्योगाची कास धरली पाहिजे. उद्योजकता ही एक पूजा आहे, ज्यात तुमचा उद्योग हा देव आहे. एवढी तीव्र श्रद्धा ठेऊन उद्योग करता आला पाहिजे. महाराष्ट्रातीलच काय पण देशाच्या आणि जगाच्याही उद्योगपटलावर मराठी तरुणांचेच नाव असले पाहिजे. तर महाराष्ट्रातील बाजार बाहेर जाण्याची, आर्थिक केंद्र दुर्बल होण्याची मराठी माणसावर कुणी शिरजोर होण्याची भीती राहणार नाही.

एकवेळ राजकीय सामाजिक संघटनांचे भाग होऊ नका, कुणाचे गंडे घालू नका, कुणा साहेबांच्या घरची किंवा ऑफिसची पायरी चढू नका पण, एखाद्या चेम्बर ऑफ कॉमर्सची पायरी नक्की चढा!

दुर्दैव हेच की आर्थिक शस्त्राने मारावयाचा साप आपण राजकीय काठीने मारण्याचा प्रयत्न करीत आहोत. हे राजकीय युद्ध नाही. हे वास्तविक राजकारण्यांचे युद्ध नाहीच. हा तुमच्या आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि ह्याचे एकमेव उत्तर आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे हेच आहे. दुसरीकडे, आर्थिक विषयावरील संघटना वाढीस लागल्या पाहिजेत. एकवेळ राजकीय सामाजिक संघटनांचे भाग होऊ नका, कुणाचे गंडे घालू नका, कुणा साहेबांच्या घरची किंवा ऑफिसची पायरी चढू नका पण, एखाद्या चेम्बर ऑफ कॉमर्सची पायरी नक्की चढा! दुसरीकडे, मराठी माणसांनी एकत्र येण्याची सुरुवात केली पाहिजे. यासाठी विविध व्यासपीठे तयार केली पाहिजेत (राजकीय सोडून). लॉबिंग तयार करणे आवश्यक आहे. मराठी माणसाचा वाढलेला पैसा, आपल्या किंवा दुसऱ्याच्या उद्योगात लागला पाहिजे. मराठी माणसाचीच, मराठी माणसाकडून उत्पादने घेईन असे मराठी ग्राहकांनी ठरवले पाहिजे. अवघे धरू उद्योग पंथ.

मराठी शिक्षण सम्राटांनी आता याचा विचार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सुजाण झाले पाहिजे, आणि हो, पालकांनी सुद्धा!

शिक्षणात नवीन शिक्षणाची कास धरणे आवश्यक आहे. जिथे संधी आहे, तिकडे जा, संधी निर्माण करा. उद्योगासारखाच मराठी तरुण यंत्रणेत जाणे आवश्यक आहे. यासाठी शासकीय नोकऱ्यांची दालने त्याने स्वतःसाठी उघडली पाहिजेत. मराठी शिक्षण सम्राटांनी आता याचा विचार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सुजाण झाले पाहिजे, आणि हो, पालकांनी सुद्धा!

सांस्कृतिक दृष्ट्या आपण नक्कीच सुस्थितीत आहोत, पण सगळेच चांगले आहे असे नाही. आज लोककलाकारांना उपेक्षेला सामोरे जावे लागते आहे. मराठी चित्रपट आणि नाटकांविषयी सुद्धा काही वेळेस अस्तित्वाची भीती का व्यक्त केली जाते? मराठी चित्रपटकर्त्यांनी अधिक प्रमाणात दर्जेदार चित्रपट दिले पाहिजेत. प्रेक्षकांनी आवर्जून ते पहिले पाहिजेत. मराठी कुटुंबांनी पुढील महिन्यापासून ठरवावे, की दर महिन्याला एक मराठी चित्रपट आणि मराठी नाटक सहकुटुंब पाहू, नंतर एका मराठी हॉटेलमध्ये जेऊन घरी येऊ. मराठी मुले क्रीडा क्षेत्रात कितपत आहेत, आणि येतात ती सर्वोच्च पातळीवर किती पोहोचू शकतात. मराठी चित्रकार, शिल्पकार किती आहेत? जी जाऊ इच्छितात त्यांना मराठी पालक किती सपोर्ट करतात? अशा मराठी कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी मराठी माणूस किती घराबाहेर जातो?

पुढील वीस वर्षांचे लघु उद्दिष्टय ठेऊन (एका राष्ट्राच्या विकासासाठी वीस हा लहान काळच आहे) आपण आराखडा बांधण्यास सुरवात केली पाहिजे. त्याचे लहान टप्प्यात विभाजन करता येईल. तो भाग पुढील लेखात पाहू. २०१८ च्या आगमनाला फक्त एक ठरवूया, मराठी संस्कृतीची रांगोळी आता पुन्हा सजवायला घ्यायची आहे, आणि त्यासाठी तुम्ही तुमचे हात देणार आहात.

२०१८ च्या आगमनाला फक्त एक ठरवूया, मराठी संस्कृतीची रांगोळी आता पुन्हा सजवायला घ्यायची आहे, आणि त्यासाठी तुम्ही तुमचे हात देणार आहात. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “​मराठी संस्कृती- २०१८ च्या उंबरठयावर!”

  1. सर खूपच छान… मराठी तरुणांसाठी खूप मोटिवेशन आहे तुमच्या बोलण्यात.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय