दुर्गाशक्ती – पद्मश्री सुभासिनी मिस्त्री…

कधी कधी कर्तुत्वाची उंचीच इतकी असते की पुरस्काराचे वजन त्यामुळे वाढते. काहीसा हाच अनुभव ह्या वर्षीच्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या सुभासिनी मिस्त्रींमुळे पद्मश्री पुरस्काराला आला आहे. सुभासिनी मिस्त्री वय वर्ष ७५ जेव्हा अगदी साध्या साडीत आणि साध्या स्लीपर घालून राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांच्याकडून पद्मश्री पुरस्कार स्वीकारत होत्या तेव्हा पूर्ण भारत काय पूर्ण जग अवाक होऊन बघत होतं. कारण एक स्त्री ठरवलं तर काय करू शकते ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुभासिनी मिस्त्री.

अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेल्या सुभासिनीच लग्न अवघ्या १२ व्या वर्षी झालं. १२ वर्ष संसार आणि ४ मुलं खांद्यावर असताना त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. ह्या अकाली मृत्यूला कारण होतं ते म्हणजे वेळेवर न मिळालेले उपचार. अतिशय गरीब आणि पैसे नसल्याने वेळेवर नवऱ्याला हॉस्पिटल मध्ये प्रवेश न मिळाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. त्याच क्षणी सुभासिनी मिस्त्री नी आपलं आयुष्याचं ध्येय निश्चित केलं ते म्हणजे आपण हॉस्पिटल काढायचं. असं हॉस्पिटल जिकडे सगळ्या गरजुंचे उपचार होतील. एकही माणूस उपचार नाही मिळाले म्हणून मृत्युमुखी पडणार नाही. ज्या गावात आपल्या नवऱ्याला मरण आलं तिकडे मी हॉस्पिटल काढेन असं तिने निक्षून सांगितलं. लोकांनी तिचं हसं केलं. एक २३ वर्षाची स्त्री अंगावर ४ मुलं ज्यात सगळ्यात मोठा ८ वर्षाचा तर लहान ४ वर्षाचा, अशिक्षित आणि गरीब. हॉस्पिटल तर सोडाच पण स्वतःचं घर नीट करून दाखव अशी लोकांनी तिची अवहेलना केली.

हरेल तर ती भारतीय स्त्री कुठली. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सुभासिनी मिस्त्री यांनी आपल्या लक्षाकडे वाटचाल सुरु केली. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत तिने लोकांच्या घरी काम करायला सुरवात केली. ५ लोकांच्या घरी धुण्याभांड्याची कामं करून तिला महिन्याला १०० रुपये मिळायला लागले. आपल्या मुलांना तिने अनाथआश्रमात ठेवलं आणि बाकीच्यांची जबाबदारी घेत भाजी विकायचा व्यवसाय सुरु केला. तिने बँकेत आपलं खातं सुरु केलं. आपल्या मुलांची शिक्षणं आणि खर्च करून जे काही पैसे वाचले ते ती बँकेत टाकत गेली. तब्बल २० वर्ष हे प्रामाणिकपणे करत राहिली.

१९९२ साल उजाडलं सुभासिनी मिस्त्री नी हन्सपुकुर ह्या गावात १०,००० रुपयांना जमीन खरेदी केली. हे तेच गाव होतं जिकडे तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता. २० वर्षात बरचं पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. तिच्या सगळ्यात लहान मुलाने आईचं स्वप्न पूर्ण करण्याचं निश्चित केलं होतं. त्यासाठी आपल्या मेहनतीच्या जोरावर कोलकत्ता मेडिकल कॉलेज मधून डॉक्टर ची पदवी मिळवली होती. जी लोक २० वर्षापूर्वी तिच्या स्वप्नावर हसली होती त्याच गावातील लोकांना आपण ही जमीन हॉस्पिटलसाठी दान देत आहोत गावकऱ्यांनी ह्या हॉस्पिटल च्या उभारणीसाठी आपलं योगदान द्यावं असं त्यांनी गावातील लोकांना आवाहन केलं. लोक येत गेले आणि कारवा बनता गया. पुढील २-३ वर्षात ह्युमॅनिटी हॉस्पिटलने २५० लोकांना वैद्यकीय मदत दिली होती. ही सगळी मदत एकही रुपया न घेता तिथल्या डॉक्टरांनी केली होती. ज्यात सुभासिनी मिस्त्री ह्यांचा डॉक्टर मुलगा अजय मिस्त्री ह्यांचा समावेश होता.

पद्मश्री सुभासिनी मिस्त्री

ह्युमॅनिटी हॉस्पिटलचं नाव सगळीकडे पसरलं. त्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी अनेक लोक आणि संस्था पुढे आल्या. एका वर्षाच्या आत ह्युमॅनिटी हॉस्पिटल ट्रस्टकडे १० पट पैसा जमा झाला जो हॉस्पिटल उभारणीच्या पहिल्या टप्प्यात गरजेचा होता. आज हे हॉस्पिटल पूर्णतः अद्यावत असून ह्यात ऑपरेशन थेटर, सोनोग्राफी, एक्स रे आणि इतर विविध उपकरणांनी सज्ज आहे. ह्या हॉस्पिटलचं एक युनिट त्यांनी प्रथारप्रतिमा, सुंदरबन इकडे सुरु केलं. ज्याचा उद्देश प्रत्येक माणसाला वैद्यकीय सेवा देणं हाच आहे.

अशिक्षित, गरीब आणि वयाच्या ऐन उमेदीच्या काळात ४ मुलांची आई असूनपण समाजातील प्रत्येकाला वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील एक एक पैसा वाचवून ह्युमॅनिटी हॉस्पिटलचं स्वप्न बघून ते प्रत्यक्षात उतरवणं हे शब्दात व्यक्त करता येणार नाही इतकं मोठ काम त्यांनी केलं. भारताचा ४ था सगळ्यात मोठा नागरी सन्मान पद्मश्री मिळाल्यावर त्यांचे शब्द होते.

I am very happy to get the award but I would like to request all hospitals in the world, please don’t refuse a patient who needs immediate medical attention. My husband died because he was refused admission and I don’t want anyone else to die in a similar way.

पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना सुद्धा अगदी साध्या वेशात आणि स्लीपरवर सुभासिनी मिस्त्री राष्ट्रपती भवनात गेल्या होत्या. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यावर पण गर्वाचा एक लवलेश सुभासिनी मिस्त्री ह्यांच्या बोलण्यात नव्हता. त्यांच्या मते माझ्या कामाचा पुरस्कार मला केव्हाच मिळाला. जेव्हा आमच्या हॉस्पिटल मधून पहिला रुग्ण बरा होऊन घरी गेला तेव्हा मला माझ्या कामाचा पुरस्कार मिळाला.

सुभासिनी मिस्त्री ह्यांना पद्मश्री देऊन सरकारने त्यांचा गौरव नाही केला तर त्या पुरस्काराचा गौरव केला आहे. गरीब, अशिक्षित, उमेदीच्या काळात विधवा होऊन ४ मुलांची कर्तव्य वयाच्या २३ व्या वर्षी असणारी एक स्त्री एक स्वप्न बघते की आपण हॉस्पिटल काढायचं आणि ह्या समाजात एकाही व्यक्तीचा मृत्यू हा वैद्यकीय मदतीशिवाय होता कामा नये. ते पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्याची सगळी पुंजी तिने हॉस्पिटल काढण्यासाठी लावून नुसतं हॉस्पिटल काढून न थांबता आपल्या मुलाला डॉक्टर करून समाजाच्या सेवेसाठी रात्रंदिवस वाहून घेतलं. स्त्रीने ठरवलं तर तिला काहीच अशक्य नाही आणि कोणाच्या आधाराशिवाय ती आपली स्वप्नं पूर्ण करू शकते हा आत्मविश्वास भारतात आणि जगातील सगळ्याच स्त्रियांना आपल्या विनम्र वागणुकीतून देणाऱ्या दुर्गाशक्ती पद्मश्री सुभासिनी मिस्त्री ह्यांना माझा दंडवत.

वाचण्यासारखे आणखी काही…

व्यक्तिमत्व


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय