Cattle Class म्हणून हिणवणाऱ्या ब्रिटिश स्त्रीला आपले कर्तृत्व दाखवणाऱ्या सुधा मूर्ती

सुधा मूर्ती

एप्रिल १९७४ चा काळ होता. आय.आय.एस.सी. च्या नोटीस बोर्ड वर एक सूचना लागली होती. टाटांच्या पुणे येथील टेल्को कंपनीसाठी अभियंते हवे होते.

पण त्या नोटीशीच्या खालच्या बाजूस लहान अक्षरात लिहिलं होतं “स्त्रियांनी अर्ज करू नये” तिथे शिकणाऱ्या तरुण सुधा मूर्ती यांच्या मनात हे वाक्य खूप टोचलं.

आपण कुठे कमी आहोत मग आपल्याला नाकारण्याचा अधिकार टाटा नां कोणी दिला. सुधा मूर्ती नी मागचा पुढचा विचार न करता एका पोस्टकार्ड वर जेआरडी टाटांना एक पत्र लिहिलं. त्यात मजकूर होता

टाटांना लिहिलेल्या पत्रातील मजकूर

THE GREAT TATAS HAVE ALWAYS BEEN PIONEERS. THEY ARE THE PEOPLE WHO STARTED THE BASIC INFRASTRUCTURE INDUSTRIES IN INDIA, SUCH AS IRON AND STEEL, CHEMICALS, TEXTILES, AND LOCOMOTIVES. THEY HAVE CARED FOR HIGHER EDUCATION IN INDIA SINCE 1900 AND THEY WERE RESPONSIBLE FOR THE ESTABLISHMENT OF THE INDIAN INSTITUTE OF SCIENCE. FORTUNATELY, I STUDY THERE. BUT I AM SURPRISED HOW A COMPANY SUCH AS TELCO IS DISCRIMINATING ON THE BASIS OF GENDER.

ह्या पत्रानंतर त्यांना लगेच टेल्को कडून बोलावणं आलं. एक स्त्री म्हणून आपल्याला कमी लेखलं गेल्याची खंत त्यांना भारतातल्या सगळ्यात मोठ्या गाड्या बनवणाऱ्या कंपनीत पहिल्या महिला इंजिनिअर म्हणून नोकरी देऊन केली गेली.

पुरुषसत्ताक आणि पुरूषांच क्षेत्र मानल्या गेलेल्या औद्योगिक क्षेत्रात स्त्री म्हणून आपण कुठे कमी आहोत असं न मानता आपल्या अन्यायाचा सामना कणखरपणे करताना भारताच्या औद्योगिक क्षेत्रात स्त्रियांना स्थान देण्याचं श्रेय नक्कीच सुधा मूर्ती ह्यांना जाते.

सुधा मूर्ती ह्यांना टाटा मध्ये घ्यायला कारण जेआरडी टाटांनी घेतलेली पत्राची दखल नुसती कारणीभूत नव्हती तर सुधा मूर्तींच्या कर्तुत्वाचं नाणं ही तितकचं खणखणीत होतं.

एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झालेल्या सुधा मूर्ती लहानपणापासून खूप हुशार होत्या. आपली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ची पदवी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.

त्यांनतर त्यांनी आपलं पदवित्युर शिक्षण पण प्रथम क्रमांकाने आय.आय.एस.सी. इकडून उत्तीर्ण केलं. त्यासाठी त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर कडून गोल्ड मेडल सुद्धा मिळालेलं आहे. त्यांची ओळख नंतर नारायण मुर्तींशी झाली.

लग्नानंतर आपली कंपनी काढण्याचा निर्णय सुधा आणि नारायण मूर्ती यांनी घेतला. ह्या वेळेस पण आपल्या नवऱ्याला तोलामोलाची साथ देताना आपल्याजवळ जमवलेले १०,००० रुपये त्यांनी इन्फोसिस च्या निर्मितीसाठी दिले.

ते देताना त्यांनी नारायण मूर्तींना सांगितल की पुढली ३ वर्ष ती घराची पूर्ण काळजी आणि खर्च बघेल तुम्ही आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा.

नारायण मूर्ती यांनी आपल्या घरीच इन्फोसिसचं ऑफिस बनवलं असताना सुधा मूर्ती नी वालचंद ग्रुप मध्ये जॉब करायला सुरवात केली. एकाच वेळी जेवण बनवणारी, घर सांभाळणारी त्या सोबत एक क्लार्क आणि इन्फोसिस ची प्रोग्रामर अश्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी नारायण मूर्तींना इन्फोसिस च्या उभारणीत पूर्ण सहकार्य केलं.

इन्फोसिस वाढत गेली त्यासोबत सुधा मूर्ती श्रीमंत होत गेल्या. पण गर्वाचा लवलेश आणि पैश्याचा माज आपल्याला त्यांनी कधी चिकटू दिला नाही.

आजच्या घडीला सुधा मूर्ती भारतातील सगळ्यात श्रीमंत स्त्रियांपेकी एक आहेत. आज ७७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त मिळकत सुधा मूर्तींची आहे. त्यांच्या मते

MONEY CAN GIVE YOU CERTAIN COMFORTS BUT MONEY HAS LIMITED USE. AND ONCE YOU REALIZE THAT, MONEY BECOMES A BURDEN TO YOU. YOU DONATE IT. MONEY IS A HEAVY BAG ON YOUR BACK AND YOU SHOULD LEAD A SIMPLE LIGHTWEIGHT LIFE.

NO JEWELRY OR SARIS FOR ME… I HAVE EVERYTHING I NEED

इतका प्रचंड पैसा असताना सुद्धा आगदी साधं आयुष्य जगण्यात सुधा मूर्ती समाधान मानतात. साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी ह्याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी भारतातील सगळ्याच स्त्रियांसमोर ठेवलं आहे.

टाटा सोडताना जेआरडी टाटानीं सुधा मूर्तींना काही उपदेशाचे बोल सांगितले होते. जे सुधा मूर्ती नी नेहमीच लक्षात ठेवले.

IF YOU MAKE LOTS OF MONEY YOU MUST GIVE IT BACK TO SOCIETY AS YOU HAVE RECEIVED SO MUCH LOVE FROM IT.

जेआरडी च्या शब्दाला जागत सुधा मूर्ती नी १९९७ मध्ये इन्फोसिस फौंडेशन ची स्थपना केली. ह्या माध्यमातून त्यांनी अनेक हॉस्पिटल, शाळा, अनाथश्रम बांधले. प्रत्येक शाळेत ग्रंथालय असलं पाहिजे ह्या आपल्या स्वप्नाला त्यांनी आकार द्यायला सुरवात केली त्यातून आजवर ५०,००० ग्रंथालयांची स्थापना त्यांनी केली आहे.

१०,००० पेक्षा जास्त स्वच्छतागृह त्यांनी उभी केली आहेत. २३०० पेक्षा जास्त घरं पुराचा फटका बसलेल्या भागात बांधलेली आहेत. आपल्या स्वबळावर त्यांनी तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, ओरिसा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश अश्या राज्यातील दुष्काळग्रस्त आणि वादळात, पुरात, त्सुनामी च्या तडाख्यात सापडलेल्या अनेक कुटुंबाची मदत केली आहे.

त्यांच्या ह्या सामाजिक कार्यासाठी भारत सरकारने त्यांना २००६ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

फक्त पैसा दिला म्हणजे मदत होत नाही तर त्यापलीकडे खूप काही करण्यासारखं असते हा आदर्श ठेवताना सुधा मूर्ती सांगतात,

DONATING 100 CRORE ISN’T MORE VALUABLE THAN TEACHING 100 CHILDREN

आपल्या आयुष्याचा अनुभव शब्दातून मांडताना सुधा मूर्ती ह्यांनी आजवर २४ पेक्षा जास्त पुस्तकं लिहली असून आजवर त्याच्या १५ लाखापेक्षा जास्ती प्रती विकल्या गेल्या आहेत.

भारतातील सगळ्यात प्रभावी आणि प्रसिद्ध लेखिकांमध्ये सुधा मूर्ती ह्याचं नाव सगळ्यात वरती येतं.

इन्फोसिस फौंडेशन च्या कामानिमित्त महिन्यातले २० दिवस गावातून फिरत असताना पण इतक्या सगळ्या व्यापातून त्यांनी आपले छंद जोपासले आहेत.

चित्रपट बघण्याचं त्यांना प्रचंड वेड आहे. टेल्को मध्ये असताना प्रत्येक दिवशी एक चित्रपट बघण्याच चॅलेंजही त्यांनी जिंकल आहे. आजही त्यांच्याकडे डी.व्ही.डी चा मोठा संग्रह असून त्या एका मुलखातीत म्हणाल्या होत्या, “जर मी आज जी आहे ती झाली नसते तर चित्रपटांची पत्रकार झाले असते’.

I HAVE 500 DVDS THAT I WATCH IN MY HOME THEATRE. I SEE A FILM IN TOTALITY – ITS DIRECTION, EDITING… ALL ASPECTS. PEOPLE KNOW ME AS A SOCIAL WORKER, AS AN AUTHOR… BUT NO ONE KNOWS ME AS A MOVIE BUFF. THAT’S WHY I AM GLAD TO DO THIS INTERVIEW WITH FILMFARE. I COULD HAVE ACTUALLY BECOME A FILM JOURNALIST. I NEVER GET BORED OF MOVIES!

सुधा मूर्ती ना ह्या प्रवासात कटू अनुभव ही आले. लंडन मध्ये एका हाय फाय स्त्री ने सलवार कमीज मध्ये असलेल्या सुधा मूर्ती ना ‘cattle class’ अस म्हंटल.

तिच स्त्री नंतर सुधा मूर्तींचे लेक्चर ऐकण्यासाठी त्याच हॉल मध्ये बसली होती. कपड्यावरून माणसाची उंची ठरवणाऱ्या लोकांमध्ये ही सुधा मूर्ती ह्यांनी आपलं वेगळेपण आपल्या कर्तुत्वाने दाखवून दिलं.

एकदा अमेरिका एकटीने फिरताना न्यू योर्क पोलिसांनी त्यांची रवानगी इटालियन ड्रग्सची तस्करी करणारी स्त्री समजून थेट ग्रँड केनीयन च्या तळाशी असणाऱ्या तुरुंगात केली.

तिकडे एका वृद्ध दांपत्या सोबत त्यांना तुरुंगात रात्र काढावी लागली. अश्या परिस्थितीचाही त्यांनी डगमगून न जाता मोठ्या धैर्याने सामना केला.

एक अभियंता, एक शिक्षिका, एक लेखिका, एक समाजसेविका, एक उद्योजिका, एक सॉफ्टवेअर इंजिनिअर, एक क्लार्क, एक ट्रस्टी, एक गृहिणी, एक आई अश्या दुर्गेच्या सगळ्या रूपांच प्रतिनिधित्व आपल्या आयुष्याच्या भूमिकातून साकारताना प्रत्येक ठिकाणी आपल्या कर्तुत्वाची छाप सोडत भारतातील आणि जगातील सगळ्याच स्त्रियांनसमोर एक आदर्श निर्माण करून आयुष्यात चांगल काहीतरी करण्याची सतत प्रेरणा देणाऱ्या दुर्गाशक्ती पद्मश्री सुधा मूर्ती ह्यांना माझा साष्टांग नमस्कार.

सुधा मूर्ती यांची अमेझॉन वर उपलब्ध मराठी पुस्तके

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!