तुम्ही मस्त खुप सार्या शॉपींगच्या मुडमध्ये मार्केटला जाता, पण तुम्हाला तुमच्या फिटींगचे छान छान कपडेच भेटत नाहीत,
थोडं चाललं की तुम्ही लगेच दमता, थकता!
तुमच्यातल्या उत्साहाची जागा आळसाने घेतली आहे!
तुम्ही आपल्या ड्रीम पार्टनरच्या शोधात आहात, पण तुम्हाला आवडलेली स्थळ तुम्हाला लवकर पसंती कळवत नाहीत, उलट दुर दुर जातात.
स्लीम फिट लोकांच्या गराड्यामध्ये तुम्हाला स्वतःचीच लाज वाटायला लागते.
असं तुमच्यासोबत होतं का? मग आजचा लेख तुमच्यासाठी आहे.
आजकाल सगळे एवढे हेल्थ कॉन्शस झाले आहेत, तरीपण आपलं वजन नियंत्रणात ठेवणं, आपल्याला का जमु नये.
आम्ही महागड्या जिम लावतो, सतराशे साठ ऍप डाऊनलोड करतो, डाएट चार्ट बनवतो.
नव्याचे नऊ दिवस संपतात, आणि आमची गाडी मुळपदावर येते.
वजन वाढतेय, असे सारखे विचार मनात येतात, त्रास देतात, आणि नळकत सतात विचार करुन करुन, लॉ ऑफ अट्रेक्शनचा परीणाम म्हणुन वजन अजुनच वाढतच राहतं.
तोडता येईल का हे दुष्टचक्र? हो! नक्कीच!
का वाढतं वजन?
हा एकदम साधा सिंपल आणि सिद्ध होणारा नियम आहे, अगदी भौतिकशास्त्रातल्या प्रमेयासारखा!
कॅलरीज इन = कॅलरीज आऊट!
म्हणजे आपण आपल्या शरीरात जितका आहार ग्रहण करतो, त्यातुन आपल्याला दिवसभर काम करायला उर्जा मिळते. पण समजा, तुम्हाला आवश्यक असणार्या उर्जेपेक्षा तुम्ही जास्त जेवलात तर एक्स्ट्रा कॅलरीजचं काय होईल?
त्यांचं फॅट मध्ये रुपांतर होईल, त्या कॅलरीजना तुम्ही तुमच्या अंगावर वागवाल!
शरीराच्या इतर भागात काही प्रमाणात फॅट्स आपलं घर करतील, जसं की चेहरा, गळा, मांड्या, हिप्स!
पण सर्वात जास्त फॅट्स आपल्या पोटामध्ये साठुन राहतील.
आणि आपल्या कोणालाचं असे ढेरपोट्या बनलेलं आवडत नाही.
पण समजा, तुम्हाला कोणीतरी एक डेरीमिल्क सिल्क चॉकलेट गिफ्ट दिले.
आता आटोक्यातलं वजन आणि प्रमाणबद्ध शरीर हवं असेल तर तुमच्यासमोर दोन उपाय उरतात.
- चॉकलेटवर तुटुन पडा, त्यातुन दिडशे कॅलरीज कंझ्युम करा पण त्या कॅलरीजला जाळण्यासाठी दिड तास जॉगिंग करा.
- चॉकलेट खाण्याचा मोह टाळा!
तुम्ही काय करता?….. कितीदाही ठरवुन वजन कमी करण्याच्या आपल्या मोहिमेमध्ये खंड का पडतो?……कारण तेच – कळतयं पण वळत नाही!
आपलं शरीर प्रमाणबद्ध ठेवण्यासाठी मी आज तुम्हाला पाच अत्यंत सोप्या, सहज अंमलात आणण्यासारख्या आणि पुर्णपणे मोफत टिप्स सांगणार आहे.
अघोरी व्यायाम नको, सर्जरी ऑपरेशनं नको, उपाशीपोटी राहणं नको.
फक्त ह्या पाच सवयी तुम्हाला आकर्षक व्यक्तिमत्व आणि निरोगी उत्साही जीवनशैली प्रदान करतील.
१) जेवताना भरपूर चावून खा
हे खुप सोपं आहे, तितकचं प्रभावी आहे.
तुम्हाला जेवायला किती वेळ लागतो? मी आधी दहा मिनीटात जेवण करायचो, आता मात्र मला जेवायला पद्धतशीर वीस-पंचवीस मिनीटे लागतात.
आपलं पोट भरलं आहे, हे कळायला मेंदुला वीस मिनीटे लागतात, भरभर खाल्ल्याने पोट तुडुंब भरलेले असुनही आपण खातच राहतो, जे खुप धोकादायक आहे.
जेव्हापासुन मी प्रत्येक घास चावुन चावुन बारीक बारीक करुन खाऊ लागलो, माझा आहार आपोआपच खुप कमी झाला, पण पुर्वीपेक्षा जास्त तृप्ततेचा अनुभव येऊ लागला.
जेवण अधिकच रुचकर लागु लागले. उगीच जीभेसाठी खाणे संपुर्णपणे बंद झाले.
‘चावुन चावुन खाणे’ ही उत्तम आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी सवय आहे!
- ह्यामुळे पाचक रस तयार होतात.
- पचनक्षमता प्रचंड सुधारते.
- इमोशनल इटींग पुर्ण बंद होते.
- स्वनियंत्रण वाढते.
- बॉडी फिट राहते.
- शरीरातले बहुतांश आजार दुर होतात.
- आळस, सुस्ती यांचे प्रमाण आपोआप कमी झाले.
२) लहान प्लेट
जेवताना ३०% लहान प्लेटचा वापर करा. आपोआप आहार नियंत्रणात राहील.
बुफे जेवण असतं, तसं स्वतःच्या हाताने वाढुन घ्यायची सवय तुम्हाला प्रचंड फायदा देऊन जाईल.
“कुणी बिचारी कितीही खाऊ घाला, अशी मेंढरे बनु नका!”
शेवटी अति गुबगुबीत बनल्याने बी.पी, मधुमेह, अटॅकच्या देवाला आपल्यालाच बळी चढवले जाईल.
३) उपाशापोटी कार्डीओ
जेव्हा आपण रात्रभर काही तास झोपलेलो असतो, सकाळी उठल्यावर आपल्या शरीराला उर्जेची गरज असते, आणि शरीरातल्या अतिरीक्त चरबी जाळण्यासाठी ही वेळ सर्वोत्तम आहे.
अर्धा पाऊण तास कुठलाही कार्डीओ एक्सरसाईज करा.
कार्डीओ म्हणजे ह्र्दयाला कार्यरत करणारा कोणताही व्यायाम.
अविवाहीत लोकांसाठी – जॉगिंग, स्विमींग, सायकलींग, सुर्नमस्कार आणि योगासने!
विवाहीत लोकांसाठी – जॉगिंग, स्विमींग, सायकलींग, सुर्नमस्कार, योगासने आणि सेक्स!
४) जेवताना पाणी विषासमान
आपण हे शंभरदा ऐकले असेल, जेवणाच्या आधी अर्धा तास आणि नंतर पंचेचाळीस मिनीटे पाणी पिऊ नये.
पण पुन्हा कळतयं पण वळत नाही!
जेवणात असलेले साखर आणि मिठाचे पदार्थ आपल्याला पाणी प्यायला प्रवृत्त करतात.
पाणी पिल्याने पचनशक्तीला आवश्यक एंझाएम्स आपले काम नीट करु शकत नाहीत.
परिणामी इन्सुलीनचे प्रमाण वाढते, त्यामुळे अन्न नीट पचत नाहीत, मग ढेकर, गॅसेसचा त्रास होतो.
पाणी फक्त जेवताना टाळायचेय पण दिवसातुन प्रत्येकाने दोन लिटर म्हणजे आठ ग्लास पाणी प्यायलाच हवे!
५) उपाशी राहु नका
डायेट म्हणजे उपाशी राहणं अजिबात नाही.
खुप वेळ उपाशी राहण्याने एका बेसावध क्षणी संयम संपतो, आणि दुप्पट इमोशनल इटींग चालु होते.
हरीदासाची कथा मुळपदावर येते.
म्हणुन खातेपिते रहा, फक्त काही नव्या सवयींसह डायटला पण आनंददायक बनवा.
सकाळी उठल्यावर भरपुर ब्रेकफास्ट करावा.
लंच आणि डीनर त्यापेक्षा कमी असावेत, रात्रीचे जेवण आठच्या आत घेतल्यास अतिउत्तम.
अधुनमधुन नारळपाणी, ज्युस, ताक घेतल्यास बॉडी ताजीतवानी आणि चेहरा टवटवीत राहतो.
नुसते वजन कमी करणे उद्देश्य नसावा.
तर शरीरातल्या मसल्सची वाढ करण्यासाठी प्रोटीन्स घ्या, उदा. दुध, बॉईल्ड एग!
कार्बोहायड्रेट आणि फॅट्सला सुरुवातीला निग्रहाने नको म्हणा, नंतर तुम्हाला बघुनच ते स्वतःच दुर दुर पळुन जातील.
ह्या पाच सवयी वापरुन मी मागच्या एका वर्षात माझे वजन आठ किलोंनी कमी करण्यात यशस्वी ठरलो.
शेवटी एक सुविचार सांगतो, जो मी मनावर कोरुन ठेवला आहे.
“तुम्ही जेव्हापण काही खाण्यासाठी तोंड उघडता, तेव्हा एकतर आजारी पडण्यासाठी, किंवा शक्ती मिळवण्यासाठी!”
तुम्ही आजपासुन कशासाठी खाणार आहात!
वजन कमी करण्याचे तुमचे अनुभव मला ऐकायला आवडतील.
धन्यवाद आणि शुभेच्छा!
वाचण्यासारखे आणखी काही…
व्यक्तिमत्व
पालकत्व
प्रेरणादायी/MOTIVATIONAL
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Dear sir,
Interested in your whatsapp courses plz update for it
सध्या कुठलाही कोर्स शेड्युल नाही. मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स विनामूल्य मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या व्हाट्स ऍप नम्बरवर ‘अपडेट्स’ असा मेसेज पाठवल्यास अपडेट्स पाठवले जातील. ‘अपडेट्स सब्स्क्रिप्शन’ बंद करायचे असल्यास STOP UPDATES असा मेसेज पाठवावा लगेल.
धन्यवाद.
Ssss
हे वाचून खूप छान अनुभव मिळतो व त्यागून जगण्याची प्रेरणा मिळते
Sir ek chhan as app ch banvla tar far upyogi hoil