विश्वाच्या पसाऱ्यात दुसऱ्या पृथ्वीचा शोध

पृथ्वीचा शोध

माणूस ह्या सजीवाचं अस्तित्व ह्या वसुंधरेवर निर्माण झालं त्याला आता बराच काळ लोटला आहे. साधारण ५ ते ७ मिलियन वर्षांपूर्वी माकडाच्या जातीने दोन पायावर चालण्यास सुरवात केली आणि ह्या वसुंधरेच्या जमिनीवर एका नवीन उत्क्रांती ने जन्म घेतला. साधारण २.५ मिलियन वर्षापूर्वी माणूस माणसात येऊन दगडाची हत्यारे बनवायला शिकला. साधारण २ मिलियन वर्षापूर्वी त्याचा प्रसार पूर्ण भूतलावर होण्यास सुरवात झाली. आज पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेलं आहे. एकेकाळी हाताच्या बोटावर मोजता येईल इतकं अस्तित्व असणाऱ्या माणसाची आजची लोकसंख्या साधारण ७.२ बिलियन इतकी आहे. २०५० पर्यंत ती ९.६ बिलियन च्या घरात जाईल असा अंदाज आहे. इतक्या मोठ्या मानवाच्या विस्तारला आता ही वसुंधरा कमी पडायला लागली आहे. त्या मुळेच आता मानवाने विश्वाच्या ह्या पसाऱ्यात दुसऱ्या वसुंधरेचा शोध घ्यायला सुरवात केली आहे.

नवीन वसुंधरा शोधणं तितकं सोप्प नाही. आपली वसुंधरा एकमेवाद्वितीय का आहे ह्यासाठी विश्वाची जडणघडण समजून घ्यावी लागेल. आपली वसुंधरा सूर्यापासून ज्या अंतरावर आहे ते अंतर आणि पृथ्वीचा आकार ह्या पूर्ण सजीवांच्या विश्वाला कारणीभूत आहे. पृथ्वी ज्या अंतरावर सूर्यापासून आहे. ते अंतर म्हणजे हॅबिटायटल झोन. आता ह्या झोन मध्ये जे ग्रह येतात त्यांचा शोध घेणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ते किती अंतरावर आहेत? त्यावर जीवसृष्टी आधीच आहे का? तिकडे जायचं कसं? तिथे आपण वस्ती कशी करणार? हे प्रश्न नंतरचे आहेत. मुळात विश्वात असणाऱ्या बिलियन ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या बिलियन ग्रहांमधून वसुंधरेचा शोध घेणं प्रचंड किचकट आहे. कारण ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसल्याने त्यांना शोधणं तितकंच कठीण आहे.

विश्वातल्या ग्रहांचा शोध घेण्यासाठी दोन पद्धती आहेत. त्यातली एक आहे वोबली पद्धत ज्यात वोबली म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी थोडं बेसिक बघू. कोणत्याही वस्तूचे एक सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असते. जशी एखादी फुटपट्टी घेतली तर तिच्या मध्यावर जर आपण सपोर्ट केला तर आपण तिला तोलू शकू. हे शक्य होते ते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मुळे. जेव्हा कोणत्याही दोन गोष्टी अवकाशात फिरत असतात तेव्हा त्यांच्या वस्तुमानाचा सुद्धा एक सेंटर अथवा मध्य असतो. हा मध्य त्यांच्या वस्तुमानावर अवलंबून असतो. म्हणजे जी वस्तू वस्तुमानाने अधिक तिच्या जवळ हा मध्य जसं सूर्य आणि पृथ्वी ह्यांचा मध्य काढला तर तो सूर्याच्या आत सेंटर पासून जवळच असेल कारण सूर्याच्या मानाने पृथ्वीचं वस्तुमान खूप कमी आहे. पण हेच सूर्य आणि गुरु ह्यांचा मध्य सूर्याच्या थोड्या बाहेर आहे. कारण गुरु पृथ्वी पेक्षा ३१८ पट वस्तुमानाने जास्त आहे. ह्या मध्याला बॅरीसेंटर असं म्हणतात. तर ह्या गुणधर्मामुळे जेव्हा गुरु सारखा एखादा अजस्त्र ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो तेव्हा तारा त्या बॅरीसेंटर भोवती फिरतो. ह्यामुळे तारा स्थिर न वाटता वोबली म्हणजे मागे पुढे होत आहे असं वाटतं. जेव्हा तारा असा दिसतो तेव्हा आपण तर्क बांधू शकतो कि ह्याच्या आसपास एखादा मोठा ग्रह परिक्रमा करत आहे. पण ह्या पद्धतीत मोठे ग्रह आपण शोधू शकतो म्हणजे गुरु सारखे. पण पृथ्वी सारख्या ग्रहांच्या शोधात हि पद्धत तितकीशी उपयोगी पडत नाही. कारण वस्तुमानातील फरक हा खूप कमी वोबली मोशन निर्माण करतो जे खूप लांबून ओळखणं शक्य नसते.

मग पृथ्वी सारख्या ग्रहांचा शोध घेण्यासाठी दुसरी पद्धत वापरली जाते ह्यात ताऱ्यांभोवती समजा ग्रह परिक्रमा करत आहेत आणि आपण लांबून कुठून तरी त्यांना बघत असू तर त्याचं अस्तित्व कळून येणं अशक्य आहे. एकतर त्यांचा आकार कमी असेल ताऱ्यांच्या मानाने आणि ताऱ्यांच्या प्रकाशात त्याचं अस्तित्व दिसून येणं शक्य नाही. पण जो प्रकाश ताऱ्यांकडून आपल्याकडे येतो तो मात्र आपल्याशी बोलतो. तर जेव्हा ताऱ्या समोरून कोणताही लहान मोठा ग्रह जातो. तेव्हा ताऱ्याकडून येणारा प्रकाश अंधुक होतो. ते अंधुक होणं किती असेल हे त्या ग्रहाच्या आकारावर अवलंबून आहे. तसेच ते किती वेळानी होते ह्यावरून आपण त्या ताऱ्याभोवती तो ग्रह फिरण्याचा अंदाज लावू शकतो. समजा आपण आपल्याच सौरमालेकडे लांबून बघितलं तर जेव्हा गुरु ग्रह सूर्यासमोरून जाईल तेव्हा सूर्याकडून येणाऱ्या प्रकाशात २% घट होईल. हे कमी होणं पण विशिष्ठ वेळाने असेल ज्यावरून आपण गुरु ची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ठरवू शकतो.

नासा च्या केपलर दुर्बिणीने दुसऱ्या तत्वाचा वापर करत आजवर १,००,००,०० ताऱ्यांचा अभ्यास करून ३८०० पेक्षा जास्ती असे ताऱ्यांभोवती परिक्रमा करणारे ग्रह शोधले आहेत. त्यांना एक्सोप्लानेट असं म्हणतात. पण हे शोधलेले ग्रह ३००० प्रकाशवर्ष इतक्या दूर पर्यंत विखुरलेले आहेत. ह्यात आपल्या वसुंधरेशी साधर्म्य असणारे नाहीतच. केपलर दुर्बिणीने ९ वर्षापेक्षा जास्त सेवा दिल्यानंतर ह्याच वर्षी १५ नोव्हेंबर २०१८ ला नासा ने हे मिशन संपवलं. तिची जागा घेण्यासाठी नासाने त्या आधीच अजून एका दुर्बिणीला अवकाशात पाठवलं आहे. ज्याचं नाव आहे टेस. ( Transiting Exoplanet Survey Satellite (TESS) ) टेस दुर्बीण केपलर पेक्षा सुमारे ४०० पट जास्ती अवकाशाचा शोध घेण्यास सक्षम असून त्याचा उपयोग करून येत्या दोन वर्षात सुमारे २०,००० एक्सोप्लानेट ( ग्रह ) शोधले जातील असा अंदाज आहे. ह्याही पेक्षा महत्वाचं आहे ते टेस मुख्य करून आपल्यापासून २०० प्रकाशवर्ष लांब असणाऱ्या क्षेत्रात अश्या ग्रहांचा शोध घेणार आहे. ह्यामुळे कदाचित अशी वसुंधरा मिळाली तर त्यावर भविष्यात जाण्याचा विचार कदाचित आधुनिक तंत्रज्ञानाने शक्य होऊ शकेल. टेस शोधलेल्या ग्रहाचं वस्तुमान, आकार, घनता तसेच त्याची आपल्या ताऱ्यापासून असलेली कक्षा ही शोधण्यास सक्षम आहे.

टेस नी शोधलेल्या ग्रहांच वर्गीकरण करून मग जे ग्रह आपल्या वसुंधरेशी साधर्म्य साधत असतील त्यांचा अभ्यास जेम्स वेब टेलिस्कोप तसेच पृथ्वीवर असलेल्या इतर दुर्बिणी कडून केला जाणार आहे. एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित न करता टेस विश्वाला सेक्टर मध्ये विभाजित करून पूर्ण विश्वात असलेल्या अश्या ग्रहांचा शोध घेते. ७ ऑगस्ट २०१८ पासून आपल्या कार्याला प्रारंभ केल्यापासून आजवर टेस ने ३०० ग्रह शोधले आहेत. ह्या शिवाय ८ ग्रह हे नक्की केले आहेत. ज्यांचा आकार गुरु पासून ते आपल्या वसुंधरेच्या आकाराशी मिळता जुळता आहे. तूर्तास दुसऱ्या वसुंधरेचा शोध खूप वेगाने सुरु आहे. येत्या काही वर्षात आपल्या वसुंधरे सारखा दुसरा ग्रह मिळाल्यास त्यात आश्चर्य वाटायला नको.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय