हे सात धडे गिरवले तर तुमची श्रीमंतीकडे वाटचाल निश्चितच होईल!!

श्रीमंतीकडे वाटचाल

जगात श्रीमंत कुणाला व्हायचं नसतं?

मोक्ष प्राप्त केलेल्या, समाधीअवस्थेत पोहोचलेल्या ज्ञानी महापुरुषांना, किंवा पैशाची किंमत न समजणार्‍या निरागस बाळाला सोडलं तर, ह्या जगात प्रत्येकालाच आता आहेत त्यापेक्षा जास्त श्रीमंत व्हायला आवडत असतं!

त्यासाठीच तर आपली सकाळपासुन संध्याकाळपर्यंतची धावपळ चाललेली असते, पण तरीपण प्रत्येकजण हवा तेवढा श्रीमंत का होत नाही?

आपल्याला श्रीमंत होण्यापासुन कोण रोखतं!

आपण स्वतः! हो! आपण स्वतः!

श्रीमंत लोक एका विशीष्ट मानसिकतेने जगतात. त्यांच्या मनाची एक जडणघडण झालेली असते.

श्रीमंत लोकांच्या अशाच काही विशिष्ठ सवयींबद्द्ल मी आज तुम्हाला सांगणार आहे.

धडा पहिला – आज नगद, कल उधार

तुम्ही दुकानात लटकलेलं ‘हे’ चित्र बघीतलयं का?

एक गलेलठ्ठ शेठजी गल्ल्यावर बसलेले, त्यांची तिजोरी पैशानी गच्च भरलेली, जिकडेतिकडे नाणी आणि नोटा,

आणि वर बोर्डवर लिहलेले – आम्ही नगदी विकतो.

आणि दुसरा मरतुकडा व्यापारी, चेहर्‍यावर बारा वाजलेले.

कारण त्याचा बोर्ड – ‘मैने उधार बेचा!’

श्रीमंत माणसं नगदी पैसे घेतात, वाजवुन पैसे घेतात, आणि चोख सेवा देतात.

पाच वर्षांपुर्वी मी खुप भिडस्त होतो, पैसे मागायला मला ऑड वाटायचे, अनेक लोकांनी माझ्या ह्या भित्र्या स्वभावाचा फायदा घेतला.

माझ्या चुकातुन मी शिकत गेलो.

आणि आज मी पैसे बिनधास्त न लाजता पैसे मागतो. मला काम मिळेल का नाही याची मला अजिबात चिंता नसते, कारण.

  • जे चांगले आहेत, ते तर मला काम देतीलच.
  • जे चांगले नाहीत, अशा लोकांशी मी व्यवहार का करु?

धडा दुसरा – ‘कस्टमर केअर’ करा!

  • एक समाधानी कस्टमर पुढच्या वेळी सोबत अनेक कस्टमर घेऊन येतो. पण एक असमाधानी कस्टमर त्याहुन जास्त ठिकाणी आपल्या नावाने बोंबलतो.
  • सर्व्हिस देताना प्रॉम्ट रहा, दिलेली वेळ आणि दिलेला शब्द पाळा.
  • ग्राहकांकडे ग्राहक म्हणुन नाही, अन्नदाता म्हणुन बघा.
  • आपलं काम चोख करा आणि निर्धास्त रहा. ब्रह्मांड त्याचं काम करेल.

धडा तिसरा – भव्य स्वप्ने पहा!

आमच्या व्हॉट्सएप कोर्समध्ये एक तेवीस वर्षांची तरूणी आहे, ती मला नेहमी म्हणायची, सर, मला कशातच इंटरेस्ट येत नाही, मला माझ्या आयुष्याची ध्येय काय, तेच क्लिअर होत नाही, वगैरे, वगैरे..

मी तिला दोन असाईनमेंट दिल्या.

  • एके दिवशी मी तिला सांगितले, तुझ्या आवडत्या कारची टेस्ट ड्राईव्ह घेऊन ये.
  • दुसर्‍या दिवशी मी तिला शहरातल्या सर्वात महागड्या ज्वेलरीशॉपमध्ये विंडो शॉपिंगला पाठवली.

ती ही बिचारी माझ्या शब्दवर विश्वास ठेऊन दोन्ही ठिकाणी गेली आणि सांगितल्याप्रमाणे तिने मला सेल्फ्या काढुन पाठवल्या.

यानंतर ती कधीही मला म्हणाली नाही की मला बोअर होत आहे.

कारण आता तिने तिच्या हृदयात भव्य स्वप्नांची बीजे पेरली आहेत.

धडा चौथा – थोडीतरी जोखीम घ्या.

भित्र्या आणि नेभळट माणसांवर भाग्य ही प्रसन्न होत नाही. काही माणसं सतत तुम्हाला घाबरवतील, “टेक केअर, टेक केअर”, हे शब्द ऐकले की मला हसु येते

“अरे, मी कशाची काळजी करु कारण, काळजी करायसारखं काही नाहीच!

  • प्रवास एंज्यॉय करायचाच, का काळजी करत बसायचंय, तुम्हीच ठरवा!
  • कधीकधी तरी फ्रंट फुट खेळा, नेहमी डिफेन्सिव्ह राहीलं की पब्लिक बोअर होतं!…
  • चाकोरीबद्ध आयुष्य जगाल तुमच्या असण्यानसण्याने जगाला फरक पडणार नाही!
  • धाडसी व्हा, साहसी व्हा, नवे प्रयोग करा, नव्या वाटा चोखाळा, जीवनात रस निर्माण होईल, आपोआप थ्रिल निर्माण होईल.
  • हा आनंद तुमच्या जीवनाला सार्थक बनवेल.

धडा पाचवा – पैशाचा द्वेष करु नका!

कुठेही अध्यात्मात जा, सत्संगात जा, बाबा-गुरु-तत्वज्ञानी तुम्हाला सांगतील,

  • पैसा क्षुद्र आहे,
  • पैसा माणसाचा शत्रु आहे,
  • पैसा माणसाला भोगवादी बनवतो,
  • पैसा माणसाला सैतान बनवतो,

असं का?

आणि मग हेच भिकारचोट लोकं शेवटी डोनेशन का मागतात?

संपत्तीचा द्वेष करणारं तत्वज्ञान माणसाची प्रगती होवु देत नाही. आपल्या संस्कृतीमध्ये संपत्तीला कधीही तुच्छ मानलेलं नाही.

पैशाचा गर्व करणं चुकच आहे, पण पैशाचा द्वेष आतिशय भयंकर आहे.

तेव्हा कधीही रिकाम्या पाकिटाने फिरु नका.

नोटांशी बोला, त्यांचा ‘स्पर्श’ फिल करा, नोटांचं चुंबन घ्या.

प्रत्येक वेळी नोट देताना, त्याला सांगा, “जगाचं कल्याण कर, दहापटीने माझ्याकडे वापस ये.”

सात पापे ह्या आपल्या जगप्रसिद्ध उतार्‍यामध्ये गांधीजी म्हणतात, कृतीशिवाय आलेला पैसा पाप आहे.

म्हणजे कृती करुन आलेला पैसा पुण्यच आहे.

पैशासंदर्भात नेहमी दोन तत्वे पाळावीत.

१) पैसा येताना त्याच्यासोबत कुणाचे तळतळाट आणु नयेत, कोणाची संपत्ती ओरबाडू नये.

२) पैसा खर्च करताना त्याच ठिकाणी वापरावा, जिथे आपले व जगाचे कल्याण होईल.

ही दोन पथ्ये पाळली की बस्स!…

धडा सहावा – नेहमी काहीतरी नवनवीन शिकत रहा!

  • तुमच्याकडे येणार्‍या ग्राहकांना आधिकाधिक आकर्षित करण्यासाठी, २०१९ मध्ये तुम्ही अशी कोणती एक नवी गोष्ट ठरवलीये का, जी तुम्ही २०१८ मध्ये वापरली नव्हती.
  • तुम्हाला एक छानशे प्रेरणादायी पुस्तक वाचुन किती दिवस झाले आहेत?
  • तुमच्या क्षेत्रातलं एखादं प्रेरणादायी चरित्र तुम्ही आदर्श म्हणुन डोळ्यासमोर ठेवलं आहे का?
  • तुम्हाला छान छान मोटीव्हेशनल व्हीडीओज पाहण्याचा छंद आहे की नाही?
  • गुंतवणुकीवर एखादी कार्यशाळा, एखादं व्याख्यान असल्यास तुम्ही आवर्जुन जाता का?
  • नवीन काही चांगलं शिकण्यासाठी पैसे खर्च करण्याची तुमची तयारी असते का?

धडा सातवा – Energy Exchange

चारपाच वर्षांपुर्वी मी खुप संकुचित विचारांचा होतो.

माझ्याकडे असलेल्या पैशांना, माझ्याकडे असलेल्या शक्तीला, उर्जेला, ज्ञानाला मी घट्ट पकडुन बसलो होतो.

मी दुसर्‍यांना का देऊ? दिल्यानं कमी होईल अशी माझी भावना होती.

जोपर्यंत माझे असे विचार होते, तोपर्यंत मला म्हणावं तसं यश कधीही मिळालं नाही.

आणि जेव्हापासुन मी हे विचार टाकुन नवे विचार आत्मसात केले, तेव्हापासुन माझं आयुष्यच बदलुन गेलं.

मागच्या एप्रिलपासुन मी व्हॉट्सएपवर सात पेड कोर्स घेतले.

शेकडो लोकांनी पैसे भरुन, त्यात सहभाग घेतला.

त्यांच्यासाठी मी दोनशेहुन अधिक लेख लिहले, त्यातुन मला जे रुपये मिळाले, ते मी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांना, वेगवेगळ्या अनाथआश्रमांना प्रेमपुर्वक सादर केले.

आत्मिक समाधान मिळाले ते सोडा.

मी द्यायला पुढे झालो आणि लक्ष्मीमाता माझ्यावर प्रसन्न झाली, दोन्ही हातांनी माझ्या झोळीत कृपा भरु लागली.

मी अनुभवले आहे, दिल्याने वाढते. फक्त देताना प्रसन्न आणि उदात्त हेतुने द्यावे, अहंभाव नसावा.

तर मित्रांनो ह्या होत्या श्रीमंत करणार्‍या काही सवयी!

खुप शुभेच्छा आणि मनःपुर्वक आभार!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

18 Responses

  1. राजेंद्र महाजन says:

    नमस्कार हॅपी थॉट्स
    सर आपले लेख नेहमी वाचतो आपल्या ग्रुप मध्ये सामील व्हायचे आहे
    दिलेल्या लिंक चा ग्रुप फुल्ल झालेला आहे
    कृपया दुसरा ग्रुप असल्यास पेड ही चालेल

  2. Bella says:

    Khup Khup abhar. Nice line

  3. Amol patil says:

    Thnks u sir…

  4. Sunil gaikwad says:

    सृर मला तुमचे रोज वाचतो मला लेख वाचल्याशिवाय झोप येत नाही. मला Eartmover business loss मध्ये माझी मशिनरी हैवा (dumper सगळे गेले त्यामुळे मी dipression मध्नये गेलो तुमच्या लेख वाचून व कृती करुन dipression मधून बाहेर आलो नविन ध्येय ठेवली आणि नविन जोमाने पुन्हा कामाला सुरुवात करतो आहे. Thank you sir thank you –

    • https://chat.whatsapp.com/I88xtjj261l9JZIzPsdgee

      मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स विनामूल्य मिळवण्यासाठी👆वरती दिलेले ग्रुप लिंक क्लिक करून त्यामध्ये जॉईन व्हा. या ग्रुपमध्ये फक्त ऍडमिन पोस्ट करू शकणार असल्याने ग्रुपमध्ये अपडेट्स शिवाय काही इतर असणार नाही.

  5. मलाही व्यावसायिक व्हायचे आहे .सुरुवात कशी करावी आणि कोणती वस्तु विकावी हे समजत नाही .हे सांगावी .मी आपला आभारी राहील .

  6. Mukesh Chaudhari says:

    Plz give details about your WhatsApp paid course

  7. Ganesh Shelar says:

    Na bap bada na bhaiya ,sabase bada rupaya

  8. Santosh Kamble Arjapurkar says:

    खुपच छान…. त्याहूनही बरं वाटलं नियम वाचून….
    पैसा कुणाला नकोय….?
    करेक्ट…..!
    पण त्यासाठी लागणारी कष्टाची कुवत मात्र फक्त तुरळकचं लोकाकडे….,
    साचा बनविता आला की, पेसा मागे लागतो म्हणे.साचा बनवायला मात्र अक्कलच लागते.खरं सुख कशात असेल तर…? ते ज्ञानात आहे म्हणून माणसानं प्रथम प्राधान्य ज्ञानालाच द्यावं.मग पैसा आपोआपच हातधुऊनचं मागे लागतो.
    पैसा खुदा नही लेकीन खुदासे कम नही । असं म्हणत्यात ते काही खोट नाही.असं असलं तरी मी तरी म्हणेन…
    ” Mony is power… but.., Mind is power. ” असं म्हणनसुद्धा तितकचं रास्तं आहे असेच तर म्हणावे लागेल. नाही का…?

  9. Kishor Jadhav says:

    Mala Kam kartana bhiti khup vatate, kahi chukal ka, aan kelee barobar aahe ka. Ya vichran
    To bhiti nahisi karnysathi sir tumi Kay suchval

  10. Shridhar Hedulkar says:

    Good motivational thoughts, like to join your what’s up group for course what will be the procedure.

  11. दिनेश जोशी says:

    अतिशय सुंदर लेख. धन्यवाद.

  12. Ganesh Jagtap says:

    Nice Sir

  13. Suhas Patwa says:

    Lai bhari!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!