सीरियामध्ये युद्धकाळात राहिलेली निडर युद्ध संवाददाता, ‘मेरी कोल्विन’

जगभरात कोणती युद्ध चालू आहेत ह्याची कल्पना भारतासारख्या लोकशाही राष्ट्रातील लोकांना नसते.

लोकशाही संविधानाने दिलेल्या हक्कांवरून नको तितकं राजकारण करणाऱ्या लोकांना बघितलं की युद्ध लढल्या गेलेल्या देशातील परिस्थीची कल्पना त्यांना करून द्यावी असं मनोमन वाटतं.

युद्ध मग ते कोणीही लढो, त्यात नुकसान सामान्य निष्पाप लोकांच होतं ही सत्य परिस्थिती आपण डोळे बंद करून बघतो.

जेव्हा हे युद्ध आपलं राज्य टिकवण्यासाठी, आपल्याला फायदा मिळवण्यासाठी जागतिक पातळीवर केले जाते तेव्हा होणारा नरसंहार हा आपल्या विचारांच्या पलीकडला असतो.

पूर्ण देश वेठीस धरला जातो. जिंकणारे जिंकतात आणि हरणारे हरतात; पण ह्यात जीव जातो तो निष्पाप लोकांचा.

जगात अशाच युद्ध छायेखाली जगणारे काही देश आहेत. त्यात होणारा नरसंहार आपल्या जीवावर उदार होऊन जगापुढे आणणाऱ्या पत्रकारांमध्ये एक नाव होतं ते म्हणजे ‘मेरी कॅथेरीन कोल्विन’.

‘मेरी कोल्विन’ जगातील एक अग्रगण्य वृत्तपत्र ‘द संडे टाईम्स’ मध्ये युद्ध संवाददाता म्हणून नोकरीला होती.

मेरी प्रसिद्धीला आली ती १९८६ साली.

लिबिया चे प्रमुख ‘मुआमार गद्दाफी’ ह्यांची मुलाखत घेणारी मेरी पहिली पत्रकार होती.

ह्या मुलाखतीत गद्दाफी ह्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रेगन ह्यांना ‘मूर्ख, वेडा आणि इस्राईलचा कुत्रा म्हटलं होतं. तिची ही मुलाखत खूप गाजली होती.

ह्यानंतर युद्ध संवाददाता म्हणून मेरी कोल्विन चं नाव मोठं होत राहिलं.

चेचन्या, कोसावो, झिम्बाब्वे, श्रीलंका, इस्ट तिमोर अशा सगळ्या युद्ध पेटलेल्या देशात जाऊन अगदी युद्धभूमीवरच्या घटना मेरी ने आपल्या शब्दातून, लेखणीतून आणि इतर दृकश्राव्य माध्यमातून जगापुढे आणल्या.

इस्ट तिमोर च्या युद्धात इंडोनेशिया च्या सैनिकांपासून जवळपास १५०० स्त्रिया आणि लहान मुलांच्या जीवाचं तिने रक्षण केलं.

‘चेचन्या’ आणि ‘कोसावो’ इकडे ‘युनायटेड नेशन’च्या सैनिकांसोबत राहून तिने तिथल्या घटनांची नोंद पेपरमधून आणि बातमीपत्रात घ्यायला लावली.

ह्या साहसासाठी तिला ‘इंटरनेशनल वुमन मिडिया फौंडेशन’ ने पत्रकारीतेतील साहसाचा पुरस्कार दिला.

१६ एप्रिल २०११ ला श्रीलंकेच्या सैनिकांनी डागलेल्या ग्रेनेड च्या हल्ल्यात तिचा डावा डोळा निकामी झाला.

ह्या नंतर आयुष्यभर तिला एका डोळ्यावर पट्टी बांधावी लागली. तब्बल ६ वर्ष ती श्रीलंकेतील हे युद्ध आपल्या शब्दातून मांडत होती.

ह्या सगळ्याचा मानसिक परिणाम तिच्या मनावरही झाला.

युद्धातील अतिशय क्रूर अशा घटनांनी तिच्या मनावर खोल आघात केला. तिला ह्या साठी हॉस्पिटलमध्ये ही जावं लागलं. एका डोळ्याने देखील, तिने युद्धभूमीवरची आपली पत्रकारिता सुरु ठेवली. तिच्या शब्दात सांगायचं झालं तर,

You’re never going to get to where you’re going if you acknowledge fear.

२०११ साली तिला पुन्हा एकदा गद्दाफी ची मुलाखत घेण्याची संधी मिळाली.

त्यावेळेला न घाबरता तिने गद्दाफीसमोर युद्धामुळे निष्पाप जीवांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडली. तिने गद्दाफीला सांगितलं होतं,

My job is to bear witness. I have never been interested in knowing what make of plane had just bombed a village or whether the artillery that fired at it was 120mm or 155mm.

फेब्रुवारी २०१२ ला सिरीयन सरकारच्या धमक्यांना भिक न घालता त्यांची परवानगी न घेता सिरीया मधील युद्धातील घटना जगापुढे मांडण्यासाठी तिने मोटरसायकल वरून युद्धभागात प्रवेश केला.

होम्स शहरात राहून तिने तिथली परिस्थिती उपग्रह, फोन च्या मार्फत २१ फेब्रुवारी २०१२ ला बी.बी.सी., सी.एन.एन., चॅनेल ४ आणि आय.टी.एन. न्यूजसारख्या जगातील सगळ्या प्रसिद्ध बातमीपत्रातून मांडली.

ते मांडताना आपल्या आयुष्यातील सगळ्यात संहारक असा नरसंहार आपण अनुभवत असल्याचं तिने सांगितलं.

२२ फेब्रुवारी २०१२ ला आई.ई.डी. च्या स्फोटात ‘मेरी कोल्विन’ मृत्युमुखी पडली.

तिच्या मृत्यूनंतर होम्स ह्या शहरातले सर्व लोक युद्धाला न घाबरता तिच्या सन्मानासाठी घराबाहेर निघाले होते.

पत्रकारितेच्या आणि संपूर्ण जगात तिच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली. सिरीया आर्मी ने ते आय.ई.डी. अतिरेक्यांनी टाकल्याचा दावा केला पण हे खोट असल्याचं नंतर सप्रमाण सिद्ध झालं.

तिच्या साहसी युद्ध पत्रकारितेला बंद करण्यासाठी आणि सिरीया मधील परिस्थितीचं आकलन जगाला होऊ नये म्हणून सिरीया च्या आर्मी ने तिला संपवलं होतं.

२०१९ मध्ये सिरीयाच्या सरकारला ‘मेरी कोल्विन’च्या हत्येसाठी जबाबदार धरण्यात आलं.

सिरीयन सरकारला ३०२ मिलियन अमेरिकन डॉलर ह्या हत्येसाठी नुकसानभरपाई देण्याचा आदेश कोर्टाने दिला.

युद्धाला न घाबरता अक्षरशः युद्धभूमीवरून युद्ध संवाददाता म्हणून तिथल्या परिस्थितीची जाणीव पूर्ण जगाला करून देणारी ‘मेरी कोल्विन’ तीनवेळा प्रतिथयश अशा ‘ब्रिटीश प्रेस’ बक्षिसाची मानकरी ठरली होती.

तिचा हा प्रवास “A Private WAR” ह्या चित्रपटातून समोर आला आहे.

हा चित्रपट आणि एकूणच मेरी कोल्विन च्या निर्भीड पत्रकारितेचा प्रवास अनुभवणं एक वेगळा अनुभव आहे.

तळटीप :- ह्या चित्रपटात काही दृश्य पूर्ण नग्न स्वरुपाची (Full Nude Scene) तसेच काही युद्धभूमीची दृश्येही विचलित करणारी असू शकतात. चित्रपट बघताना काळजी घ्यावी.

मनाचेTalks च्या वाचकांच्या प्रतिक्रिया:


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय