होठ फाटले, त्वचेवर खरचटलं, त्वचा कोरडी पडली, भाजली असं काहीही झालं की त्याच्यावरचा जालीम इलाज म्हणजे ती एक हिरव्या रंगाची ट्यूब, बोरोलीन…
कित्येक घरांमध्ये हक्काचं स्थान पटकावून बसलेली ही अँटी सेप्टिक क्रीम…
आपल्याला माहीत नसेल पण आत्मनिर्भर भारताचं प्रतीक असलेल्या बोरोलीनचा इतिहास हा नव्वद वर्षांपूर्वीचा म्हणजेच ब्रिटिश शासना पासूनचा आहे.
१९२९ साली बंगालच्या मोहन दत्ता यांच्या जी. डी. फर्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड ने एका सुवासिक क्रीमची निर्मिती करून बाजारात विकण्यास सुरुवात केली.
त्या काळी स्किन केअरच्या विदेशी वस्तू बाजारात उपलब्ध होत्या त्यांच्या विरोधात स्वदेशीच्या वापरासाठी बोरोलीन कडे बघितले जात होते.
विदेशी कंपन्यांच्या वस्तू महाग दरात विकल्या जाऊन होणाऱ्या शोषणाला उत्तर म्हणून भरतीयांकडून बोरोलीनचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता.
विशेषतः बोरोलीन बंगाली संस्कृतीचा हिस्सा बनली होती.
तरुण-तरुणी चेहऱ्यावरील मुरुमं घालवण्यासाठी, तर वयस्कर लोक जखमांवर इलाज म्हणून या उत्पादनाकडे बघत होते.
बोरीक ऍसिड, झिंक ऑक्सइड ऑक्साईड, अत्तर, पॅराफिन यापासून बनवलेली ही क्रीम दिवसेंदिवस लोकप्रिय होत गेली.
असंही म्हंटल जातं की १५ ऑगस्ट १९४७ साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा जी. डी. फर्मास्युटिकल्स ने १००००० बोरोलीन च्या ट्युब्ज मोफत वाटल्या.
Image Sourse : The Borolin People
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.