नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची सात सूत्रं

नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची सात सूत्रं

या लॉक डाउनच्या काळात मनःस्वास्थ्य सांभाळणं हे तुमच्या समोरचं सर्वात मोठं चॅलेंज आहे.

आणि म्हणूनच आता वाचा नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची सात सूत्रं.

बरेचदा आपण वाचतो, ऐकतो की नकारात्मक विचारांचा आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होतो आणि त्याच नकारात्मक घटना आयुष्यात घडत जातात.

बरेच जणांना तर अक्षरशः सवय जडलेली असते, नकारात्मक विचार करण्याची. वडीलधारी मंडळी असंही सांगतात, ‘घरात बसून वाईट साईट विचार करू नका, बोलू नका कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणते!’

या गोष्टी कळतात आणि म्हणूनच फोर्सफुली या निगेटिव्ह विचारांना थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न करता.

पण होतं असं की जितका तुम्ही या विचारांना बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतात. तितकेच ते विचार तुमच्या मनावर, मेंदूवर आदळत जातात.

आणि ही सवयच होऊन जाते. बरेच जणांचा असा प्रॉब्लेम असतो की हे विचार थांबवण्यासाठी ते मेडिटेशन करतात.

पण मेडिटेशन च्या शांततेतसुद्धा डोक्यात या विचारांची गर्दी जास्त वाढते आणि सिच्युएशन हाताबाहेर जाते.

पुढे हळूहळू याचे रूपांतर मानसिक आजारात होते.

तर या निगेटिव्हीटीपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आज मी तुम्हाला सात सूत्र सांगणार आहे.

निगेटिव्हीटी पासून सुटका मिळवण्याची सात सूत्रं

१) आपली बॉडी लँग्वेज बदला

ही गोष्ट करण्यासाठी आधी तुमची बॉडी लँग्वेज तपासा. तुम्ही बसता कसे, चालता कसे, तुमच्या वागण्यात आळशीपणा आहे का? कळत नकळतपणे तुम्ही कपाळावर आठ्या आणून बोलता का? याचे ऍनलिसिस करा.

अशी बॉडी लँग्वेज जर तुमची असेल तर ‘दुबळी स्वप्रतिमा आणि आत्मविश्वास नसणं’ यामुळे साहजिकच नको नको ते निगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यात आणि मनात थैमान घालतील.

तुमच्या बसण्यात, चालण्यात, बोलण्यात अगदी जाणून बुजून एक रुबाब आणा.

चेहऱ्यावर स्माईल आणा. हळूहळू आशा वागण्यालाच तुमची सवय बनवा.

बोलण्यात रुबाब, आत्मविश्वास आणणं जरी सहज शक्य नसलं तरी सवयीने ते करता येइल का ते बघा.

आपल्याला ते जमत नसेल तर काही ठिकाणी असे सेल्फ गृमिंगचे क्लासेस घेतात. तो ही प्रयत्न करून बघा. ‘मला माझी बॉडी लँग्वेज सुधारायचीच’ हे मनाशी पक्कं ठरवा म्हणजे हा पहिला पडाव तुम्ही गाठलाच समजा👍

२) व्यक्त व्हा

बरेचदा असं असतं की येणारे निगेटिव्हीट विचार हा तुमच्या मनाचा खेळ नसून तुमच्या आजूबाजूला, तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटनांमुळे तुमचं मन भित्र झालेलं असतं.

या भावनिक गुंत्यातून निघणं हाच त्यावरचा पर्याय असतो. पण त्यातून निघण्याचा मार्ग नाही असं वाटून ती निगेटिव्हीटी तुम्हाला न सुटणारा तिढा वाटायला लागते.

तेव्हा व्यक्त होणं, कोणाजवळ तरी बोलणं यातून तुम्हाला तुमचे विचार क्लियर करता येतात.

बरेचदा बोलणं सुद्धा तुम्हाला नको वाटतं तेव्हा अगदी वही, पेन घ्या आणि लिहून काढा सगळी घालमेल. आणि बघा लिहिता लिहिता या सगळ्या गुंत्याकडे त्रयस्थासारखं बघायला जमतं का?

तुम्हाला आश्चर्य वाटेल बरेचदा दुसऱ्याशी बोलून व्यक्त होण्यापेक्षा लिहिण्यातून व्यक्त होणं तुम्हाला तुमचा तिढा सोडवायला जास्त मदत करेल. करून तर बघा, म्हणजे हा अवघड वाटणारा टप्पा सुद्धा तुम्हाला सोप्पा वाटायला लागेल👍

३) एक मिनिटभर शांत (मन, बुद्धी empty करण्याची) राहण्याची सवय करा

जर तुमचं मन सैरावैरा धावत असेल तर सगळंच कठीण होऊन जाईल. अशा वेळी सलग काही वेळा साठी मेडिटेशन करायला तुम्ही बसलात तर विचारांची ट्रेन सुसाट धावायला सुरू होते.

आणि या ट्रेनचा टप्या टप्प्याला स्टॉप येतो तो निगेटिव्ह विचारांचा.

आणि म्हणून या विचारांना थांबवण्याचा प्रयत्न अगदी मिनिट मिनिटभर माईंड रिकामं करण्यापासून सुरू करायचा. यासाठी तुम्ही काहीही करू शकता.

लयीत हळूहळू श्वासोच्छ्वास घ्या, मनात आकडे मोजा. एक मिनिटभर शांत राहणं जमायला लागलं की ही वेळ अगदी हळूहळू वाढवा. हे करता करता नकारात्मक विचार शिरकाव करायला लागले तर शांतपणे विचार येऊन जाऊ द्या. बघा करून जमतंय का👍

४) तुमच्या विचारांचा पॅटर्न बदला

कधी कधी तुम्ही एखाद्या घटनेकडे ज्या पर्सस्पेक्टिव्हने बघतात त्यामुळे तुमचे विचार नकारात्मक होत जातात. तर ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होतोय त्याचं आकलन करा.

उदाहरण बघा. ‘किती वाईट दिवस मी ढकलतोय. कसं निघणार आता यातून बाहेर.’ असा विचार करण्याऐवजी ‘ही जी आव्हानं आज माझ्यासमोर उभी राहिली त्यावर सोल्युशन काढलं तर पुढचं सोपं होईल.’

खरंतर दोनीही वाक्य वाईट वेळच दाखवतात. पण दुसरं वाक्य पिझिटिव्हीटी कडे झुकतं. आणि हा छोटासा विचारांचा पॅटर्न सुद्धा मोठ्ठा चमत्कार घडवू शकतो.

५) क्रिएटिव्ह व्हा

जेव्हा निगेटिव्ह विचार त्रास देतील तेव्हा क्रिएटिव्ह गोष्टींवर भर द्या. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. लिहा, कविता करा, पेंटिंग करा यासाठी तुम्हाला कलाकार, लेखक, कवी असलं पाहिजे असं काहीही नाही.

साधं क्रेयॉन घेऊन चित्र काढा. डान्स करा. बघा तुमच्या निगेटिव्हीटीला हकलायसाठी अगदी ‘गाय गवत खाऊन गेली’ हा चित्रकलेचा प्रकार सुद्धा हुकमी एक्का ठरू शकेल. 👍

६) फेरफटका मारून या

आपल्याला वाटत की कुठेही जा विचार काही आपली पाठ सोडणार नाही. आता हे बरोबर आहे की मनात विचार येणार नाहीत हे होणं तसं अशक्य.

पण जर तुमच्या भोवती निगेटिव्ह लोक, निगेटिव्ह वातावरण यांचं बळ जर जास्त असेल तर कुठलेही प्रयत्न फोल ठरतील. त्यामुळे एकटं काही वेळासाठी फिरून या.

बघा मेडिटेशन करून निगेटिव्ह विचार घालवणं आम्हाला जमत नाही असं म्हणणाऱ्यांनी तर हे करूनच बघा👍

७) तुमच्याबरोबर असलेल्या/ घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचा विचार करा

होतं असं की निगेटिव्ह विचार मनात येता येता तुमच्याबरोबर काय चांगलं होतं हेच तुम्ही विसरून जाता.

अहो असं कधी असतं का की एखाद्या बरोबर सगळं काही वाईटंच घडतं. तुमच्याबरोबर घडलेल्या चांगल्या गोष्टींवर फोकस करा. त्यासाठी कृतज्ञ राहा.

एक काहीतरी शक्ती, देव, दैव ज्यावर विश्वास असेल त्याचे आभार माना.

अशी एक लिस्ट करा छोट्यात छोट्या का असेना अशा गोष्टी लिहून काढा. बरेचदा तुमच्यासमोर चांगल्या गोष्टी असतात पण त्या तुम्हाला दिसतंच नाहीत.

त्यांना तुम्ही गृहीत धरलेलं असतं. म्हणून अगदी आठवून- आठवून विचारपूर्वक लिहून काढा आणि मग तुम्हाला आश्चर्य वाटेल ‘अरेच्चा, मला तर माहीतच नव्हतं मी इतका नशीबवान आहे!!’

बघा विचार करा आणि कमेंट्स मध्ये सांगा काय पोजिटीव्ह आहे तुमच्याकडे. जेव्हा तुम्ही व्यक्त व्हाल तेव्हा तो पॉझिटिव्ह विचार तुमच्यात खोलवर बिंबेल. आणि निगेटिव्हीटीला हद्दपार करण्यासाठी हा लेख तुमच्या मित्र परिवारात जास्तीतजास्त शेअर करा👍

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

3 Responses

  1. Nilesh says:

    Thanks lot

  2. Karishma Dhumal says:

    Nice

  3. Guru says:

    Very good sir 👌👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!