अपयशातून मनाला उभारी कशी द्यावी? जाणून घ्या काही सोपे उपाय

अपयशातून मनाला उभारी कशी द्यावी?

तुमच्या उदास मनाला पुन्हा उभारी दिलीच पाहिजे कारण आख्खे आयुष्य आपल्यापुढे उभे आहे. इतक्यात हारून कसे चालेल..??

सतत देवाला ‘व्हाय मी…??’ म्हणण्यापेक्षा आता ‘ट्राय मी’ म्हणायची सवय लावूयात.. ‘अपयशातून मनाला उभारी कशी द्यावी?’ यासाठी काही सहज सोपे उपाय अभ्यासले आहेत ते आज या लेखात खास तुमच्यासाठी मांडतो आहोत.

तो हाऊसफुल सिनेमातला आरुष आठवतो का..??

एका अपयशी माणसावर त्याचे कॅरक्टर बेतलेले आहे. आणि संपूर्ण सिनेमात त्याचे ‘अनलकी’ असणे आपल्याला हसवून सोडते.

मात्र आपल्या खऱ्या आयुष्यात आपल्याच बाबतीत असे झाल्यास आपण पार रडकुंडीला येऊन जातो नाही का..?

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हणत म्हणत आपण खूप पायऱ्या चढतोय आणि तरीही यशाची पायरी काही दृष्टीक्षेपात येत नाही.. असे भयंकर स्वप्न पडू लागते..

तर कधी एक पनोती असल्याचे फील भेडसावते.. सतत अडचणींचा सामना करावा लागल्याने कितीही समजूतदार असलेला माणूस अशा वाईट परिस्थतीमुळे कधी ना कधी खचतोच आणि थेट डिप्रेशन मध्ये सुद्धा जाऊ शकतो.

हे सत्य आहे.. पण हे आपण काही अंशी थांबवू शकतो..

आपल्या उदास मनाला पुन्हा उभारी दिलीच पाहिजे कारण आख्खे आयुष्य आपल्यापुढे उभे आहे. इतक्यात हारून कसे चालेल..??

सतत देवाला ‘व्हाय मी…??’ म्हणण्यापेक्षा आता ‘ट्राय मी’ म्हणायची सवय लावूयात..

कशी..?? ऎका….

आम्ही तुमच्या साठी काही सहज सोपे उपाय अभ्यासले आहेत ते खास तुमच्यासाठी मांडतो आहोत आज..

तर मग मित्रांनो, “Just Give it a try..”

१. आपल्या भवतालच्या लोकांकडून काहीतरी नक्कीच घेण्यासारखे असते: सतत कोणाचे यश पाहून आपल्याला वाटते मीच का मागे आहे..?

मीच का फेल होतो.? मी त्याच्या सारखा कधी होऊच शकणार नाही.. असेच विचार आपल्यावर गारुड करतात.

मात्र त्या यशस्वी माणसाकडून आपण काहीच का शिकत नाही..? अगदी त्यांच्या चुकांमधून सुद्धा आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे असते.

दर वेळी आपला अनुभव घेतलाच पाहिजे असेही नाही.. दुसऱ्यांकडून धडा घ्या, शिका आणि पुढे चालत राहा..

२. उत्तम आहार घ्या: आपण जे खातो त्या प्रमाणे आपले आचार विचार बनत जातात.

हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. सकस आहार जसे भाज्या, दूध, दुधाचे पदार्थ, फळे, सुका मेवा हे मेंदूला चालना देणारे पदार्थ आहारात असू द्यात..

त्या जंक फूड ला जितके कमी करता येईल तितके उत्तम.. हेल्दी फूड तुम्हाला मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही बळ देते.

वाटतो तितका हा बदल अवघडही नाही.. सुरुवात केली की आवड निर्माण होते. परत इंटरनेट आहेच नवनवीन हेल्दी रेसिपींची माहिती द्यायला..

३. मेडिटेशन आणि व्यायाम: खाली दिमाग शैतान का घर म्हणतात ते खरे आहे..

व्यायाम आणि ध्यान लावायची सवय ठेवली तर मेंदूलाही चालना मिळेल. सतत चे उदासीन विचार निघून जाऊन तिथे उत्साह संचारेल..

थोडे रिलॅक्स आणि आनंदी राहणे केव्हाही उत्तम. प्रॉब्लेम सोडवायला इथूनच प्रेरणा मिळते.

व्यायाम केल्याने शरीरात एन्डोर्फीन नावाचे द्रव स्त्रावते. ज्यामुळे आपले मन प्रसन्न राहण्यास मदत होते. मूड चांगला राहतो आणि आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो. सो, एन्डोर्फीन ला तुमच्या शरीरात वाहू द्या..

४. स्वतःची तुलना कोणाशीच करू नका: स्वतःची तुलना आपल्यापेक्षा मोठ्याशी किंवा लहानाशी, कोणाशीच करू नका. प्र

त्येकाचा प्रगती करण्याचा वेग वेगवेगळा असतो. आपण सुद्धा खास आहोत ही भावना ठेवा..

तुलना करणे हे एक तर तुम्हाला चुकीचा संदेश देते किंवा तुम्हाला आणखीन उदासीनतेकडे ढकलते..

आपण खूप युझलेस आहोत असा न्यूनगंड किंवा अतीशहाणे आहोत असा गैरसमजही होऊ शकतो..

त्यापेक्षा स्वतःशीच तुलना करा. आपण काय काय कमावतोय ते पहा आणि त्यात भर कशी घालता येईल ह्याचे मार्ग शोधा..

५. दृष्टिकोन सकारात्मक ठेवा: सकारात्मकता आपल्याला संपूर्ण बदलून टाकते. रोज स्वतःला थोडी पॉझिटिव्हीटी द्या. रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि उठल्यावर लगेच सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या गोष्टींचे वाचन करा. यासाठी मनाचेTalks सदैव तुमच्या बरोबर आहेच.

सकाळी उठल्यावर रात्री झोपताना स्वतःला विश्वस्त करा. बघा तुमच्या मनाला ह्याचा किती फायदा मिळतो. सकारात्मकता मनाला नवीन उभारी देते. ‘थिंक पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह.!!’

६. वाईट सवयी सोडून द्या: अपयशामुळे सगळ्यात पाहिलं आपल्या मागे लागतं ते वाईट सवयीचं भूत..

सिगरेट च्या धुरात चिंता विरून जातील किंवा दारूच्या नशेत कटकटी हरवून जातील असे सगळ्यांना वाटते आणि नको ती सवय आपल्याला जडते.

आपण त्याच्या आधीन होतो आणि अजूनच निराश होत राहतो. त्यापेक्षा ज्या काही वाईट सवयी आहेत त्या लिहून काढा आणि एकेक समूळ उपटून काढा..

पैसे, शक्ती आणि मन:स्वास्थ्य सगळेच टिकून राहील..

७. बदल न होणे आणि बदल होणे हे दोन्ही स्वीकारा: सगळ्यात अवघड काही असेल ह्या जगात तर अवतीभवती घडणारे बदल स्वीकारणे..!!

माणसाला नेमके हेच नको असते. ऑफिस मध्ये वर्कस्टेशन बदलले, घरात खोली बदलावी लागली, कोणासाठी स्वतःमध्ये काही बदल करायचा झाल्यास तोंडे वेंगाडली जातात.

अशा गोष्टींना सरसकट विरोधच केला जातो. आवडत्या माणसांच्या स्वभावात झालेले बदल पाहून, मन खट्टू होत राहते.

त्यापेक्षा होणारे बदल हे मोठ्या मनाने स्वीकारण्यास शिकले पाहिजे. त्याच बरोबर काही गोष्टी अजिबात बदलत नाहीत.

परिस्थिती असो वा माणसांचा स्वभाव, आपण कितीही डोके आपटले तरी काही बदल आपण घडवूनच आणू शकत नाही..

मग स्वतःला का त्रास करून घ्या..?? त्यालाही स्वीकारा.. स्मार्ट तडजोड करा… अशी की त्याने आपल्या ‘पीस ऑफ माईंड’ / मनःशांतीला धक्का लागता कामा नये. पटतंय ना…?!

८. थोडेसे औदार्य दाखवा: स्वार्थ न ठेवता कोणा गरजूला मदत करा. मदत कितीही आणि कशाचीही असो आपण दान केल्याने स्वतःला खूप बरे वाटते.

स्वतःच्या नजरेत आपली पत वाढते. आपण कोणासाठी हे जग जगण्यालायक बनवत आहोत ही भावना आपल्याला मनाला मजबूत बनवते.

समाजाप्रती असलेली जबाबदारी घेण्यासाठी आपण मनाने खरेच खूप खंबीर बनतो. खचून जाणे हा शब्दच आपल्या डिक्शनरीतुन गायब होतो.

९. नवीन काहीतरी शिका आणि वाचन वाढवा: आपण फॉर्मल शिक्षण कितीही घेतले तरी आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच राहिले पाहिजे.

सतत शिकत राहण्याची उर्मी आपल्याला प्रसन्न ठवते.. नवीन भाषा असो, नवीन कला असो किंवा नवीन रेसिपी अशा नवनवीन गोष्टी शिकण्यात आपल्या मनाला आनंद वाटेलच आणि रिकामे बसून नसते विचार मनात येण्यापासून आपण दूर ही राहू.

तसेच वाचन वाढवा. जितकी पुस्तके वाचू तितके अगाध ज्ञान आपल्याला मिळत राहते. एवढेच नाही तर वाचन आपल्यातल्या कला वाढवते, लेखन, भाषा ह्यातले ज्ञान वाढवते.

चिंता आणि नकारात्मकता आपल्यापासून दूर ठेवते. वेगवेगळे ब्लॉग, आर्टिकल, पुस्तके वाचून आपण आपली वैचारिक प्रगल्भतादेखील वाढवू शकतो..

१०. नवीन निग्रह करा: कशात अपयश आले आहे, ते कशामुळे आले आहे, त्याचे निवारण कसे आणि कधी पर्यंत करू शकू ह्या वर विचार करा.

नवीन गोल्स सेट करा. त्यांना मनातल्या मनात सत्यात उतरताना पहा. त्यासाठी लागतील ते कष्ट उचलण्याची तुमच्या मनाची तयारी आपोआप होईल.

एका सुंदर भविष्याकडे तुमची वाटचाल सुद्धा सुरू होईल..!!

११. ज्याची भीती वाटते त्या कामांना हात घाला: Fight your fears असे आपण नेहमीच म्हणतो.

पण हे जणू फक्त दुसऱ्याला सांगण्यासाठीच असते. स्वतःवर वेळ आली तर आपण कच खातो. पण दोस्तांनो स्वतःच्या मनातल्या भीतीला टक्कर देण्याइतके साहसी काम दुसरे कोणते नसेल.

शिकणे आणि स्वतःला सुधारणे ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी ‘भीतीला’ हद्दपार केल्यावरच घडू शकतात.

जे येत नाही, अवघड वाटते, ज्याची भीती वाटते पण ते आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरू शकते अशा कामांना हिरीरीने सामोरे जा.

सुरुवात तर करा, सवय आपल्या-आपण लागते. आणि स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडताना सुद्धा जाणवते.

ह्या सवयी आंगिकरून तर पहा. तुम्हाला स्वतःला उडायला तुम्ही स्वतःच मदत करू शकता.

सेल्फ मोटिवेशन आपल्याला ऊंच भरारी मारण्यास प्रवृत्त करते. थकून हारून निराश होऊन बसू नका.

स्वतःच स्वतःवरचा नकारात्मकतेचा पडदा सारा.. आख्या जगाला तुमच्यातला नवीन चेहरा, नवीन उमेद नवीन अटीट्युड दिसू द्या. स्वतःला शोधा म्हणजे सगळे जग नवीन भासेल…!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

3 Responses

  1. Vithal tekale says:

    आपण विचार ने मनात चागले विचार येतात व मनात उत्साह येतो

  2. प्रमोद रा. नाईक says:

    सकारत्मक विचारसरणी साठी मेंदूला सकारत्मक खाद्य पुरविण्याचा अतिशय महत्वाचा, उपयुक्त व काळाची खरी गरज आहे आणि ते ओळखून मनाचे talks टीम खुप सुंदर असा उपक्रम आहे त्या बद्धल मनापासून धन्यवाद आणि खुप साऱ्या शुभेच्छा 🙏.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!