मौजमजा करायला पैसाच लागतो हा गैरसमज घालवण्यासाठी हा लेख वाचा
आयुष्य हे मौजेत जगण्यासाठी असते आणि त्या साठी लागतो पैसा हे समीकरण सगळ्यांना पाठ आहे..
पण गंमत अशी होते की पैसे नाही म्हणून आयुष्य मजेत जगता येत नाही आणि पैसा कमवायला लागलो की इतके व्यस्त होऊन जातो की तेव्हाही आयुष्य फाट्यावरच मारतो.. म्हणजे इथून तिथून आपले आयुष्य हारतेच..
बरं चिक्कार पैसा कमावला आणि तो वेळच्या वेळी मौज मजेत उडवला तरीही डोक्याला ताप होतो.
म्हणजे अवाजवी उडवा उडव झाल्याने बजेट गंडते, पैसा कमी पडायला लागतो आणि महत्वाच्या गोष्टी जमवायला पैसा उरतच नाही.. म्हणजे पुन्हा आपल्या शॉपिंग वर, पार्ट्यांवर, औटिंग्जवर घाला येतो..
एकंदर फार अवघड होऊन बसलेले हे गणित आहे.. मग आपण आयुष्य हप्त्याहप्त्यांत जगायला सुरुवात करतो..
त्या आयुष्याचा ‘कधी दिवाळी तर कधी शिमगा’ होतो.. आणि राहून राहून असे वाटते ‘अरे आपण जगतोय तरी कशासाठी..!’
खरंय की नाही..!! कारण तेच तेच यंत्रमानवासारखं आयुष्य कोणाला आवडतं..?
पोटापाण्याचा प्रश्न सोडवायला नोकरी धंदा करणे हे तर आपण सोडू शकत नाही.. आणि ही मेहनतीने कमावलेली लक्ष्मी वाचवायला आयुष्याची मजाही घेऊ शकत नाही..
हे इकडे आड तिकडे विहीर असे जगण्यापेक्षा एक स्मार्ट फॉर्म्युला आजमावून पहा मित्रांनो..
मजा करायची ती अमुक एक लाख, अमुक एक हजार उडवल्यावरच करता येते असे नसते..
काही हजार वाचवूनही धमाल करायचे फंडे आम्ही आज आणले आहेत.. वाचा तर खरं..
१. लायब्ररी लावा: वाचन ही अगदीच स्वतातली मौज आहे.. तुम्ही म्हणाल पुस्तकं इतकी महाग असतात मग स्वस्त कशी..?? तर मित्रांनो लायब्ररी ची मासिक फी भरल्यावर तुम्हाला भरपूर पुस्तकांचा खजानच मिळेल जणू. हल्ली तर डिजिटल लायब्ररी सुद्धा असतात. तिकडे संगीत, डीव्हीडी, पुस्तकं ह्याची तर रेलचेल..!! तुमची तासंतास करमणूक पक्की..
२. हायकिंग ला जा: निसर्ग ही एक अद्भुत गोष्ट आहे. तिच्या सानिध्यात तुमचे किती तास मजेत जातील हे सांगताच येणार नाही..
मज्जा घ्यायची तर निसर्गाची घ्या. हायकिंग ला जा. पर्वत, टेकडी काहीही चालेल. अगदीच काही नाही तर एखादी बाग सुद्धा फिरायला जायला चालेल तुमचे चालणे होईल. तसे निसर्गामध्ये रमताना तुम्हाला कंटाळा येणारच नाही पण तरीही सोबत म्हणून मित्र मैत्रिणी किंवा तुमचा पाळीव दोस्त घेऊन जा..
पाळीव कुत्र्याबरोबर थोडी धावपळही होईल.. चाला, पळा आणि गाडीला आराम द्या. मस्त शरीराला व्यायाम मिळेल. आहे का नाही स्वस्त अन मस्त आयडिया.
३. चाय पे चर्चा होऊद्या: घरात भोजनाला कोणाला बोलवायचे म्हणजे साग्रसंगीत प्लॅन बनवावा लागतो. पण दोस्तांना झटपट चहा पार्टीचे निमंत्रण देऊन बघा..
हलका नाष्टा, फक्कड चहा आणि धमाल दोस्त.. आहा क्या बात है..!!
गप्पा टप्पा आणि अमृततुल्य चहा.. भन्नाट कॉम्बो आहे हा..
करमणूक तर होतेच पण एक चहाच्या प्याल्यासोबत अनेक आठवणी जाग्या होतात, नवीन आठवणी बनतात आणि अनेक नवीन इन्व्हेन्शनही होतात बरं का..!!
३. स्वस्त दुकानांची सैर करा: ४९ टू ९९ शॉपी, चोर बाजार, बार्गेनिंग बाजार अशा जरा हटके स्थळांना भेट द्या.. स्वस्त आणि मस्त शॉपिंगची मजा लुटा.
तुम्हाला घासाघीस करता येत असेल तर बार्गेनिंग करण्यासारखे बाजार तुमच्या शहरात नक्की असतील.. तिथे शॉपिंगची झिंग तर काही औरच..
४. जवळच्या बागेत व्यायामाला जा: फिटनेस हा सध्याच्या युगाचा मंत्र झाला आहे. जागो जागी बागेत वेगवेगळे व्यायाम, योग वर्ग भरलेले आपल्याला दिसतात.
जिम ला जाऊन व्यायाम म्हणजे हजारांचा फटका त्यापेक्षा हल्ली फिटनेस पार्क लोकांना आवडते. सगळे मेकॅनिकल मशीन वापरायला सोप्पे असतात आणि फुकटही..
५. पाककलेची मजा घ्या: टीव्ही वर आपण कित्येक फूड शो बघतो.. पण त्यातल्या रेसिपी कधी करून बघतो का..??
हल्ली तर अशा शो मध्ये स्पर्धाही असतात.. क्यू ना स्पर्धा घर पे हो जाये..??!! 🤗
फ्रीज मध्ये धुंडाळा, फडताळात पहा, कणग्यांमध्ये शोधा आणि नवनवीन साहित्य समोर घ्या..
त्या सगळ्यांची मिळून एखादी धमाल रेसिपी बनवा.. घरातल्यांना चकित करा..
तुमचा वेळ तर जाईलच पण ‘शेफ’ चा बहुमान आणि टाळ्यांचा, प्रेमाचा सन्मान मिळेल तो बोनस..
६. वीकेंडला गेम आणि धमाल नाईट प्लॅन करा: सोसायटीतले लहान तरुण जमवा.. सगळ्यांकडून थोडी फार वर्गणी जमवा आणि धमाल गेम प्लॅन करा.
वन मिनिट गेम, संगीत खुर्ची, मिमिक्री असे खुसखुशीत कार्यक्रम ठेवा. सगळ्या शेजाऱ्यांना बोलवा..
सगळे मिळून कार्यक्रमाला चार चांद लावून टाका.. अशी धमाल तुम्हाला लाखो रुपयांनी कधीच मिळणार नाही..
जिवाभावाचे शेजारी आणि एक बहारदार धमाल रात्र.. कोजागिरी, ख्रिसमस, न्यू इअर, असे काही खास दिवस अशीच धमाल करण्यासाठी असतात नाही का..??
७. हॅप्पी अवर्स चा फायदा उचला: म्युझियम, हॉटेल, शॉपिंग मॉल, कॉन्सर्ट, फन पार्क ठिकाणी बऱ्याचदा तुम्हाला कमी तिकिटांची ऑफर असते.
कधी हॅपी अवर्स म्हणजे कमी पैशात जास्ती फायदा अशा मजेदार ऑफर्स असतात. क्यू ना इनका लाभ उठाये..?? दोस्तांनो अशा सगळ्या ऑफर्स कधीच सोडू नका.. सगळं ग्रुप घेऊन करा की धमाल..
८. झू मध्ये फिरायला जा: झू आणि म्युझियम ह्या दोन अशा जागा आहेत जिथे ३-४ तासही कमी पडतात.
दर वेळी काही तरी नवीन पहायला मिळते, नवीन शिकायला मिळते, नवीन माहिती मिळते आणि स्वतःचा वेळ सदुपयोगी लागतो..
९. पॉटलक पार्टी करून पाहा: आपल्या लहानपणी आपण सगळेच आपापल्या बाल मित्रांसोबत अंगतपंगत करायचो तुम्हाला आठवते का..?? तशीच अंगतपंगत आता पॉटलक म्हणून ओळखली जाते हं..
पॉटलक म्हणजे थोडक्यात काय तर सगळ्यांनी आपापल्या घरातून काहीतरी खास पदार्थ बनवून आणायचा आणि सगळ्यांनी मिळून त्या पदार्थाची मजा लुटायची..
ह्यात कोणा एकट्याला खर्च असा काहीच नाही.. आणि बिन खर्चाची पार्टी ही करा..!!
१०. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही कमी खर्चात किंवा बिन पैशात करू शकता. ऑनलाइन सिनेमा पाहणे, नेटफ्लिक्स बघणे, ऑनलाइन गेम खेळणे, मित्रांना एकत्र बोलावून पत्ते खेळणे, पोपकॉर्नचा टब घेऊन निवांत जुने सिनेमे पहाणे, वृक्षारोपण करायला जाणे, मॅरेथॉन मध्ये पाळायला जाणे, ब्लड डोनेशन कॅम्प/सरकारी माहिती लोकांपर्यंत पुरवणे आशा समजोपयोगी उपक्रमात सहभागी होणे, वृद्धाश्रम, अनाथाश्रमात तिथल्या लोकांशी गप्पा मारायला, त्यांची सेवा करायला जाणे अशा अनंत प्रकारच्या इव्हेंट्स मध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता..
मित्रांनो कंटाळा हा शब्द तुम्ही विसरून जाल असे असंख्य करमणुकीचे प्रकार ह्या जगात आहेत.
ह्यातले कित्येक तुम्ही करतही असाल. त्यामुळे त्यात असलेली मजा तुम्हाला माहीतच असेल. आम्ही दिलेले आणखी उपक्रम करून पहा..
तुम्हाला आणि तुमच्या मित्रमंडळींना ते कसे वाटले हे आम्हाला जरूर कळवा.. शेवटी लाईफ कशी ‘मज्जानी’ असली पाहिजे नाही का..?!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
खुप छान