यशस्वी आणि धनवान एकाच वेळी कसे होता येईल? जाणून घेऊयात वॉरन बफेट ह्यांच्या मौलिक सल्ल्यांमधून..
‘वॉरेन बफेट’ नाम तो सुना होगा..??!!
करेक्ट.. तेच वयाची नव्वदी पार केलेले गृहस्थ, जे जगातील सर्वात जास्ती श्रीमंतांच्या यादीत आपले नाव नोंदवून मजेत आपले आयुष्य घालवत आहेत..
अमेरिकेतील आणि जगातील श्रीमंतांच्या यादीत अग्रक्रमावर असणारी व्यक्ती म्हणजे वॉरेन बफेट…
कोण आहेत हे वॉरेन बफेट..?? थोडीशी उजळणी करून घेऊयात..
१९५६ मध्ये बफेट यांनी ‘बफेट पार्टनरशिप लिमिटेड‘ ही कम्पनी अमेरिकेच्या ओमाहा ह्या स्वतःच्या राहत्या शहरात चालू केली..
त्यानंतर सध्याची अतिशय प्रसिद्ध अशी बर्कशायर हॅथावे नावाची कंपनी देखील त्यांच्याच मालकीची!!
जगातले मोठे इन्व्हेस्टर म्हणून ओळखले जाणारे मोठे बिझनेस टायकून…
सालमन ब्रदर्स, कोका कोला, सिटीग्रुप ग्लोबल, ग्रॅहम होल्डिंग्स, जिलेट कँपनी अशा बऱ्याच कंपन्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट्स केल्या आहेत..
आयुष्यात फक्त पैसा कमावणे इतकेच त्यांचे ध्येय कधीच नव्हते.. त्यांनी अफाट पैसा दानही केला आहे..
बिल गेट्स ह्या जगातील अजून एका श्रीमंत व्यक्तीबरोबर हात मिळवणी करून त्यांनी गरजूंना भरपूर मदत केली..
असा हा इन्व्हेस्टर पैशांनी आणि मनानेही खूप श्रीमंत आहे..
‘ओरॅकल ऑफ ओहामा’ म्हणून ओळखले जाणारे वॉरेन बफेट भल्याभल्यांचे ‘इन्व्हेस्टमेंट गुरू’ आहेत..
आयुष्यात पैसा कसा कमवायचा आणि तो योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करून कसा वाढवायचा ह्याची त्यांना उत्तम जाण आहे.
ते सतत आपले अमूल्य मार्गदर्शन जगाला करत असतात.. आज आम्ही तुमच्यासमोर, आयुष्यात यशस्वी आणि धनाढ्य होण्यासाठी त्यांनी दिलेल्या टिप्समधून काही महत्वाचे मुद्दे मांडणार आहोत..
त्यांच्या अनुभवाचे हे बोल तुमच्या करिअर मध्ये तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील अशी आमची खात्री आहे…चला तर बघुयात काय म्हणतायत वॉरेन बफेट….
१. भरपूर वाचन करा:
स्वतः दिवसातले ५ ते ६ तास वाचन करणारे मिस्टर बफेट सांगतात की रोज पुस्तक वाचन करा…
जे मिळेल ते आधाश्यासारखे वाचत राहा.. वाचन आपल्याला खूप प्रगल्भ बनवते.
काही वेळेला स्वानुभव घ्यायची गरज पडत नाही.. वाचनातून आपल्याला खूप प्रॅक्टिकल नॉलेज मिळते..
बफेट स्वतः पुस्तकांव्यतिरिक्त, रोज ४-५ वर्तमानपत्र, मॅगझीन्स, वार्षिक अहवाल आणि इतरही बरेच वाचन करतात…
त्यांच्या आवडत्या छंदात वाचन प्रथम क्रमांकावर आहे.. आत्मचरित्र वाचणे त्यांच्या अत्यंत आवडीचे..
वाचनामुळे तुम्हाला आयुष्य जगण्याच्या बऱ्याच क्लृप्त्या समजतात.. मोठ्या मोठ्या अडचणीतून पार होण्याकरता हे ज्ञान निश्चितच कामी येते..
२. स्वतःची आवड जोपासा:
यशस्वी होण्यासाठी जगात चाललेल्या रॅट रेस मध्ये सहभागी होऊ नका.. तुम्हाला जे आवडते त्यातच यश मिळवता आले पाहिजे…
त्यासाठी तुमच्या आवडीनिवडीचा कल पहा.. त्या दिशेने प्रयत्न कराल तर यश आणि धन तुमच्या पायाशी लोळण घालेल..
बफेट ह्यांना सुद्धा वयाच्या ७-८ व्या वर्षीच, त्यांना मोठे झाल्यावर काय करायचे आहे ह्याचा अंदाज आलेला होता..
एवढेच काय तर लहान वयातच त्यांनी एक हजार डॉलर्स कसे कमवायचे ह्या अनुषंगाचे पुस्तक वाचून ते पैसे कमवायचेच असा निश्चय देखील केला होता..
त्यातूनच त्यांना स्वतःमधले इन्ट्रप्रेन्युअरचे गुण जाणवले. बफेट सांगतात जर तुमच्याकडे पैसाच नाही तर मिळेल ती नोकरी करून तो कमवा आणि नंतर आपल्या आवडीच्या क्षेत्रात उतरा..
मात्र जर तुमच्याकडे वडिलोपार्जित संपत्ती असेल तर बेधडक स्वतःचे आवडते करिअर बनवायला हरकत नाही..
पण काही लोकांकडे मात्र स्वतःची उपजत बुद्धी हीच संपत्ती असते. तेव्हा ती वेळीच ओळखून त्यातून आपला व्यवसाय करता येणं हि तर काळाची गरज…
३. लोकांची पर्वा करू नका:
‘लोक काय म्हणतील’ ही वैश्विक चिंता आहे.. सगळ्यांना असते..
लोक दुतोंडी असतात हे माहीत असताना देखील भारता सारख्या देशात तर ह्याला अवाजवी महत्व आहे.. लोक काय म्हणतील ह्या विचारानेच ५०% काम बारगळते..
त्यापेक्षा स्वतःच्या मनगटावर विश्वास असेल तर बेधडक आपल्या कामात स्वतःला झोकून द्या.. लोक काय म्हणतील ते नंतर पाहू..
काही तरी सतत म्हणत असलेल्या लोकांना दुर्लक्षित करून आत्मविश्वास असणाऱ्या लोकांच्यामध्ये वावर ठेवा.. कोणी काही नकारात्मक सांगितलेच तर खचून जाऊ नका..
आपले बेसिक ज्ञान तापासून घ्या, वाढवा, फॅक्टस् पुन्हा एकदा अभ्यासून पक्के करा.. आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात दमदार पाऊल ठेवा..
आत्मविश्वासाने काहीही केल्यास यश हमखास मिळते असे त्यांचा अनुभव सांगतो..
४. चांगल्या माणसांमध्ये इन्व्हेस्ट करा:
आपला धंदा सांभाळताना हिरे हेरण्याचे कसब अंगी बाळगा. आपल्या कामात मदतीला कामगार ठेवताना ते चाणाक्षपणे निवडणे गरजेचे आहे.
ऑफिसमधले एम्प्लॉईज कसे पाहिजेत ते सांगताना बफेट म्हणतात, त्यांना पारखताना ३ गोष्टी लक्षात घ्या..
- कामाशी असलेला प्रामाणिकपणा.
- काम करायला लागणारी हुशारी.
- काम करण्यासाठी लागणारी मेहनत घ्यायची तयारी.
ह्या ३ गोष्टी ज्यांच्या मध्ये असतील त्यांची नीट पारख करून घेऊन कामावर ठेवा..
बाकी शिक्षण, डिग्री हे तितकेसे महत्वाचे नाही.. काही जणांकडे पुस्तकी घोकंपट्टीचे शिक्षण नसले तरी काम कसे केले जाते ह्याचे कसब असते..
डिग्रीच्या नादी लागून उत्तम कौशल्य असलेल्यांना दुर्लक्षित करू नका. अशी वाकबगार माणसे सोबत असतील तर यश दुपटीने तुमच्याकडे झेप घेते…
५. स्पर्धेला घाबरू नका:
स्पर्धा ही माणसाला सजग ठेवते.. बफेट म्हणतात आळसात लोळत पडणारा कधीच यशस्वी होऊ शकत नाही..
स्पर्धकांमुळे तुमची विचारशक्ती आणि बुद्धी सतत जागरूक असते. तुमच्या विचारांना सतत खुराक मिळत राहतो..
एक तर कमी पैसे गुंतवून जास्ती नफा मिळवण्याचे तंत्र विकसित करा किंवा चांगले रिसोर्सेस कामाला लावून स्पर्धा जिंका.. स्पर्धा असेल तरच काहीतरी करत राहण्याची जिद्द अंगात भिनते.
आपला स्पर्धक आपल्या पुढे जाईल किंवा आपलाच बिझनेस खाऊन टाकेल ही भीती आपल्या मनात असली पाहिजे..
त्यानेच आपल्या मेंदूचे सगळे दरवाजे उघडतात. आपण सगळ्या दिशेने अडचणींवर मात करायला उद्युक्त होतो..
आहे त्या परिस्थितीत नेटाने करणाऱ्या सगळ्यांचाच यशाचा आलेख उंचावत राहतो..
६. आपल्या समोर एखादे उदाहरण असुद्या:
रोल मॉडेल म्हणजेच आपले गुरू हे प्रत्येक क्षेत्रात गरजेचे आहेत..
आपण ज्या कामात हात घालणार आहोत त्यातील यशस्वी गुरूंचे उदाहरण डोळ्यासमोर असून द्या. त्यांनी दिलेले ज्ञानरुपी मोती तुम्ही जपून ठेवा..
त्यांच्या अनुभवातून तुम्हाला काय फायदा करून घेता येईल ते बघा..
बफेट स्वतः बेन ग्रॅहम ह्यांना गुरू मानतात.. त्यांची पुस्तके वाचून अफाट ज्ञान मिळवून त्यांनी आयुष्यात खूप काही मिळवले असे ते सांगतात..
इतकेच काय तर आपल्या मुलाचे नाव देखील बेन ग्रॅहम ह्यांच्या नावावरून वॉल्टर ग्रॅहम ठेवले असल्याचे ते सांगतात..
एखादे उदाहरण उत्तम डोळ्यापुढे ठेवून काम करणे हे यशाचे गमक आहे..
७. बिझनेस मध्ये स्वतःच्या गाठीशी काही राखून ठेवा:
तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी दहा हजार रुपये असतील तर त्यातील एक हजार स्वतःकरता सेफ्टी फन्ड म्हणून राखून ठेवा.. बाकीचा पैसा तुमच्या धंद्यावर लावा..
पैसे हातचे राखून धंदा करायला शिकल्यास तुम्ही भरपूर पैसे जोडू शकाल.. कंगाल होऊन धंदा करता येत नसतो..
अडीअडचणीला आपला राखून ठेवलेला पैसाच कमी येतो.. बाकी कोणीही नाही..
८. अखंड प्रेम देत राहा:
आपल्या भावी पिढीला, जे भविष्यात उत्तम उद्योजक बनू शकतात त्यांना भरभरून प्रेम द्या..
बफेट सांगतात त्यांच्या आईवडिलांनी देखील त्यांना अनकंडीशनल प्रेम दिल्याने ते एक स्वतंत्र विचारांचे, आत्मविश्वास असणारे आणि उत्तम स्वभावाचे नागरिक बनू शकते..
आज आपल्या पालकांकडून प्रेम, माया, आपुलकी मिळालेली मुले मोठी होऊन एक सुजाण नागरिक बनतात..
द्वेष भावना त्यांच्या मनात उत्पन्न होऊ देऊ नका.. भेदभाव न करता, सगळ्यांना प्रेम देऊ शकणारी मुलेच आपल्या आईवडिलांचा आदर्श घेऊन, पुढच्या पिढ्यांना उत्तम नागरिक बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात..
उत्तम व्यक्ती हा यशस्विच मानला जातो..
हे सल्ले वॉरेन बफेट दुसऱ्यांना देऊ शकतात कारण त्यांनी आधी ते स्वतःच्या आचरणात आणले आहेत..
वयाच्या चाळिसाव्या वर्षी एका कंपनीचे CEO होणे हे खूप मोठे यश त्यांनी ह्याच स्वतःच्या तत्वांवर साध्य केले आहे..
तेव्हापासून मागे कधीच वळून बघायची गरज त्यांना पडली नाही..
पैशाने आणि मनाने असलेल्या श्रीमंतीच्या उच्चस्थानी ते इतक्या वर्षांपासून विराजमान आहेत..
त्यांचे म्हणणे आहे की स्वतःच्या मुलांना देखील इतकीच संपत्ती द्या ज्यातून ते स्वतःचे राज्य स्वतःच्या अक्कलहुषारीने, हिमतीने उभारू शकतील..
तुमचा पैसा तुम्ही मरेपर्यंत वापरा आणि नंतर पैसा दान करून टाका. मुलांना जन्माअधीच, विना मेहनत श्रीमंत आणि आयतोबा बनवू नका..
पैशांचे, यशाचे महत्त्व त्यांना पटवून द्या.. प्रयत्न करण्यास प्रोत्साहन द्या.. भावी पिढी स्वावलंबिच असू द्या.. त्यांचे हे ज्ञान शिंपले खरेच घेण्यासारखे आहेत.. तुम्हाला काय वाटते..??
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Very good….
Very nice
Very good