कधी मल्ल्या, कधी मोदी..
समजत नाही गोष्ट साधी,
झोपली होती का यंत्रणा या आधी ?
प्रसूती वेदना जाणवल्या नाहीत का ?
बँकांना,उदरातल्या या ,
भ्रष्ट अभ्रकांच्या…?
की, या कुमातेलाच हे रावण पैदा करायचे होते..
हजार कोटींचे आकडे ऐकून,
माझी मती गुंग होते…
माझी माय अजूनही,
रेशनच्या तांदुळाची वाट पहाते..!
वाकडं काहीच होणार नाही,
मल्ल्याअन् मोदीचं…
नुसता सिग्नल तोडल्यावर
तुम्ही मात्र कैदेत जाल कायमचं..!
अजुन किती व्हायच्यात,
अशा भ्रष्ट डीलवऱ्या..?
आम्ही मात्र बातम्यांचा सूटवडा खाऊ..
पुढच्या डीलव्हरीची वाट पाहू ,
आम्हाला काय… चर्चेचे पेढे वाटायचेत ! !
वाचण्यासारखे आणखी काही…..
तु नेहमीच म्हणायचा, आपल्या प्रेमाचा गूलकंद कसा गं चाखायचा?
माझे मलाच कळले नाही…..
गेले द्यायचे राहून….शोकांतिकेची गाथा..(भाग ३)
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.