हृदयाच्या आजारांची मूलभूत कारणं काय असतात, त्यातील काही आपल्या नियंत्रणात नसतात, पण काही मात्र नक्कीच आपल्या नियंत्रणात असतात.
तर आपल्या नियंत्रणात असलेली कारणे कोणती आणि ती टाळण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल अतिशय उपयुक्त माहिती देणारा हा लेख आज तुमच्यासाठी.
उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल हा तीन तिघडा कित्येक आजारांना निमंत्रण देणारा ठरतो. आणि याचे मुख्य कारण असते आपली जीवनशैली.
त्याशिवाय इतरही काही कारणे असतात ज्यामुळे हृद्यरोगाचा धोका संभवू शकतो.
त्यातले काही जरी नियंत्रणात ठेवणे शक्य नसते किंवा कठीण असते तरी काही गोष्टींची खबरदारी मात्र नक्कीच आपण घेऊ शकतो.
या लेखात वाचा हृद्यरोगाचा धोका कशामुळे होऊ शकतो? त्यापासून वाचण्यासाठी आपण काय करावे? कुठली काळजी घ्यावी, जीवनशैलीत कसे बदल करावे…
हृदय विकाराचे आपल्या नियंत्रणात नसलेले धोके…
१) वय: जसं तुमचं वय वाढतं तसे हृदयरोग होण्याचे धोके वाढतात.
पुरुषांसाठी ४५ तर स्त्रीयांसाठी ५५ व्या वर्षांनंतर हृद्यरोगाचा जास्त धोका असतो.
२) लिंग: स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये हृदयविकाराचे रिस्क फॅक्टर्स काहीसे बदलतात.
जसे, इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन स्त्रियांना हृद्यरोगापासून संरक्षण देतात याचा परिणाम कमीत कमी मोनोपॉझ च्या काळापर्यंत तरी राहतो.
https://manachetalks.com/11408/natural-ways-reduce-symptoms-menopause-marathi-health-blog/
पण डायबिटीस मुळे मात्र स्त्रियांना हृदयविकाराचा पुरुषांपेक्षा जास्त धोका असतो.
३) फॅमिली हिस्ट्री: कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जर कमी वयात हृदय रोग जडला असेल तरी हृद्यरोगाचा जास्त धोका असू शकतो.
या काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसल्या तरी हृद्यरोगाचा धोका कमी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो.
कुठल्या घटकांची काळजी आपण हृद्यरोगाचा धोका टाळण्यासाठी घेतली पाहिजे ते बघू.
१) रक्तदाब नियंत्रणात ठेवा: उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना हृदय रोगाचा धोका जास्त असतो. पण त्यासाठी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही.
उच्च रक्तदाब असणे हे जीवनशैली बदलून नियंत्रणात आणता येऊ शकते.
उच्च रक्तदाबा बद्दल खाली दिलेल्या लेखात तुम्हाला माहिती मिळेल. (शिवाय हे लेखन शेअर करण्याचे पर्याय ठिकठिकाणी दिलेले आहेत. कॉपी पेस्ट न करता लेखन शेअर नक्कीच करता येतील)
https://manachetalks.com/11789/home-remedies-high-blood-pressure-marathi-uchh-raktdabavril-ghrguti-upay-marathi-health-blog/
३) कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवा:
आपण जसजसे मोठे होतो तसे शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचे थर साठू लागतात.
याचा परिणाम म्हणून रक्तपुरवठया मध्ये अडथळे येऊ लागतात.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ओट्स, काजू, बदाम, शेंगदाणे, ऑलिव्ह ऑइल, कोळंबी यांचा आहारात समावेश असावा.
नियमितपणे व्यायाम, योग करणे हा सवयीचा भाग असेल तर कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी ठेवणे शक्य होते.
याशिवाय महत्त्वाचे म्हणजे दारू, सिगारेट पासून दूर राहणे हे कटाक्षाने पाळले पाहिजे..
सिगारेट सोडण्यासाठी काय करावे याबद्दलचा व्हिडीओ खाली बघा. आणि व्यसनाचा आजार असलेल्या कुटुंबाला शेअर करा.
४) वजन नियंत्रणात ठेवा:
ओव्हरवेट असणं हे हृदय विकाराला निमंत्रण देण्यासारखं आहे हे कधीही लक्षात असू द्या.
वजन जास्त असल्यास उच्च रक्तदाब, वाईट कोलेस्ट्रॉलचे अति प्रमाण, डायबिटीस यांचा धोका जास्त असतो म्हणून वजन नेहमी नियंत्रणात ठेवा.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैली कशी असावी याबद्दल हा लेख वाचा. (सगळे निन्जा टेक्निक्स आम्ही फक्त तुमच्यासाठी शोधून काढले आहेत 😍)
वजन कमी करण्यासाठी म्हणजेच वेट लॉस करण्यासाठी पाच साधे सोपे उपाय
५) तणावाचे नियोजन करा:
चिंता, काळजी, ताण-तणाव याचा हृदय विकारांशी घनिष्ठ संबंध आहे.
तणावाचे वेळीच नियोजन केले गेले नाही तर उच्च रक्तदाब, डायबिटीस यासारख्या आजारांमुळे हृदय विकार जडण्याच्या शक्यता वाढतात.
https://manachetalks.com/8034/how-to-handle-stress-tnav-ghalvnyache-upay-marathi-information-manachetalks/
हृदय विकाराची ही अगदी मूलभूत करणे झाली. ही करणे आपल्याला ज्ञात असतील, हृदय विकाराचे कारण माहीत असेल तर या धोक्यापासून वाचण्यासाठी काही पावले आपण उचलू शकतो. हाच या लेखाचा उद्देश.
लेख कसा वाटला ते कंमेंट्स मध्ये कळवा आणि आपल्या मित्र परिवाराला हि माहिती द्यायची असेल तर, शेअर करण्यासाठी दिलेले पर्याय वापरून लेख शेअर करा…
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
अगदी महत्वाची बाब तूम्ही यात स्पष्ट केले आहे तरी माझी आपणास विनंती आहे की आपण असे वेळोवेळी महिती देत राहावी.
#मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇व्हाट्सएप तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होता येईल.
सर्व लेख नियमितपणे पोहोचण्यासाठी मनाचेTalks चा व्हाट्सएप नंबर, 8308247480 तुमच्या डिव्हाईस मध्ये सेव्ह असू द्या.
तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप अथवा चॅनल ‘लिव्ह’ करून द्यावा.
त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेल्या तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…
व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇
https://chat.whatsapp.com/HZrrJaEmF2J9sM5RJml8U2
टेलिग्राम चॅनल👇
https://t.me/manachetalksdotcom