हिरड्यांमधून रक्त येणे ही वरवरची समस्या वाटते. पण हि इतरही आरोग्यविषयक समस्यांची सुरुवात असू शकते याचा विचार मात्र आपण कधी करत नाही, म्हणूनच हिरड्यांमधुन रक्त येऊ नये यासाठीच्या काही घरगुती उपायांविषयी आज या लेखात आपण बोलू.
कधी कधी हिरड्यांमधून रक्त येणे बरेचदा कडक ब्रश वापरल्याने किंवा योग्य प्रकारे न बसणारे डेन्चर (कृत्रिम दात) वापरल्याने सुरु होऊ शकते.
याकडे दुर्लक्ष्य केले तर पेरीओडोंटायटिस (हिरड्यांचा एक आजार), व्हिटॅमिनची कमतरता, मुखदुर्गंधी यासारखे आजार पुढे होऊ शकतात.
हिरड्यांमधून येणार्या रक्तावर घरगुती उपाय
1) मिठाच्या पाण्यांनी गुळण्या करा- ‘मीठ’ एक अँटिसेप्टिक आहे. त्यामुळे घश्याचे इन्फेक्शन तसेच दातांच्या आजारात मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या तर आराम पडतो. हि गोष्ट कोरोना काळात तर अगदी न चुकता केली पाहिजे.
अश्या प्रकारे मिठाच्या गरम पाण्याने दिवसातून 2 ते 3 वेळा गुळण्या केल्याने हिरड्यांमधून येणार्या रक्ताचे प्रमाण कमी होईल. तसेच हिरड्यांवर आलेली सूज कमी होईल.
2) मध- हिरड्यांमधून रक्त येत असल्यास ‘मध’ सुद्धा अत्यंत गुणकारी आहे. मधामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीइंफ्लेमेट्री गुण असतात की ज्यामुळे हिरड्या आणि दात यामधील सूक्ष्म किटाणू मारले जातात. दातदुखी, हिरड्यांना सूज येणे, हिरड्यांमधून रक्त येणे अशा तक्रारींमध्ये मध गुणकारी ठरते.
असा करा वापर- बोटावर मधाचे एक दोन थेम्ब घेऊन हिरड्यांना हळू हळू मसाज करा.
3) हळद- ‘हळद’ आपल्या सर्वांच्या घरात असतेच. कोणतीही लहान जखम झाली की आपण त्यावर प्रथमोचर म्हणून हळद लावतो. हळदीमध्ये उत्तम नैसर्गिक अँटी मायक्रोबियल आणि अँटी इंफ्लेमेट्री गुण असतात. हळदीच्या वापरानेही हिरड्यांमधून येणारे रक्त कमी होऊ शकते. हळदीमध्ये असणारे करक्युमिन कुठल्याही प्रकारची सूज आणि बॅक्टेरिया कमी करण्यासाठी गुणकारी आहेत.
असा करा वापर- हळद आणि मीठ याने हळुवार हिरड्यांवर मसाज केल्याने हिरड्यांमधून येणारे रक्त कमी होते.
4) नारळाचे तेल (खोबरेल तेल)- ‘नारळाचे तेल’ हिरड्यांमधून येणार्या रक्तावर आणि दात दुखी, हिरड्या सुजणे, दुखणे यावर गुणकारी आहे. नारळाच्या तेलातही अँटी इन्फ्लेटरी आणि अँटी मायक्रोबियल गुण असल्याने आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकेल असा हाहि एक चांगला उपाय आहे.
असा करा वापर- 1 चमचाभर नारळाचे तेल घ्या. ते तोंडात थोडावेळ धरून ठेवा आणि सतत तोंडातल्या तोंडात फिरवत रहा. असे दिवसातून निदान 3 ते 4 मिनिटे करा. त्यामुळे नक्कीच आराम मिळेल.
5) बेकिंग सोडा- ‘बेकिंग सोडा’ हा आपण बर्याच पदार्थांमध्ये वापरतो. पण, याच्या वापराने हिरड्यांमधून येणार्या रक्ताच्या तक्रारी दूर होऊ शतात. बेकिंग सोड्यामध्ये एल्केलाइन आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात. त्यामुळे हिरड्यांमधील अतिसूक्ष्म किटाणू मरतात.
असा करा वापर- १ ग्लास पाण्यात, १ चमचा बेकिंग सोडा घेऊन त्या पाण्याच्या गुळण्या केल्या तर हिरड्यांमधून रक्त येणे थांबवले जाऊ शकते.
6) लवंग- ‘लवंग’ ही मसाल्याच्या अनेक पदार्थांमधील गुणकारी वस्तु आहे. यात अँटी-मायक्रोबायोटिक, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-प्लाक असे गुण असतात. प्राचीन आयुर्वेदात दातांच्या अनेक आजारांवर ‘लवंग’ वापरली जात होती.
अनेक वैद्यकीय चाचण्यांमधून सिद्ध झाले आहे की, लवंगेच्या वापराने घसा, नाक आणि दातांच्या तक्रारी दूर झाल्या आहेत. त्यातील अँटी-मायक्रोबायोटिक तत्वामुळे विषाणू मारले जातात आणि आराम मिळतो. लवंगेच्या तेलाचा अनेक प्रकारच्या ‘माऊथ वॉश’ मध्ये सर्रास वापर होतो.
असा करा वापर- 1) हिरड्यांमधुन रक्त येत असेल तर थोडावेळ एक ‘लवंग’ दातावर धरून ठेवा. 2) बाजारात मिळणार्या लवंग तेलचाही वापर करू शकता. 3) चमचाभर लवंगतेल काही वेळ तोंडात घोवत ठेवा…. यामुळे हिरड्यांच्या आतील किटाणू मरतील आणि त्यामुळे येणारी मुख-दुर्गंधी कमी होईल.
7) ग्रीन-टी- ‘ग्रीन टी’ च्या वापराने आपल्याला अनेक शारीरिक लाभ होतात. अनेक आजारात ‘ग्रीन-टी’ चे सेवन गुणकारी ठरले आहे. ग्रीन-टी मध्ये सुद्धा अँटी-मायक्रोबायोटिक गुण असतात. ज्यामुळे हिरड्या आणि दातांच्या तक्रारी दूर होतात.
अनेक वैद्यकीय चाचण्या आणि संशोधनातून ग्रीन-टी घेण्याने दात दुखी, हिरड्यातून रक्त येणे आदि समस्या दूर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ‘ग्रीन-टी’ तुम्हाला फ्रेश ठेवण्यासही मदत करते. हिरड्यांमधून येणारे रक्त पोटात गेल्याने होणार्या आजारालाही यामुळे आळा बसतो. याच्या वापराने हिरड्या आणि दात मजबूत होण्यास मदत होते
8) बर्फ- आपण हे जाणतोच की, कोणत्याही लागलेल्या भागावर किंवा सूजलेल्या भागावर बर्फ लावल्यास वेदना कमी होतात. सूज कमी होते. बर्फाचा वापरही आपण हिरड्यांतून येणारे रक्त थांबण्यावर करू शकतो.
असा करा वापर- बर्फाच्या तुकड्याने सुजलेल्या हिरड्यांवर हलकेच मसाज करा. त्यामुळे रक्त येणे कमी होऊन हिरड्यांची सूजही कमी होईल.
9) विटामीन ‘सी’ चे भरपूर सेवन- आपल्याला माहीतच आहे की ‘विटामीन-सी’ हे आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयोगी ठरते. दातांच्या आरोग्यासाठीही विटामीन-सी ने भरपूर असणार्या भाज्या, फळे यांचा वापर आहारात असणं गरजेचं आहे.
अशा प्रकारे तुम्ही घरगुती उपचार करून दातांचे आरोग्य चांगले ठेऊ शकता. प्रत्येक वेळी डेंटिस्टकडे जाण्याची गरज भासत नाही. असे उपाय करून तुम्ही थोडा आराम नक्की मिळवू शकता. पण, जर समस्या अधिक तीव्र असेल तर डेंटिस्टचा सल्ला नक्की घ्या.
तुमची छोटीशी ‘स्माईल’ खूप काही करून जाते. म्हणून ‘हर मुश्किल काम आसन कर देने वाली आपकी मुस्कुराहट बरकरार रहे’ हीच शुभकामना.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.