फिंगरप्रिंट्स वरून पर्सनॅलिटी आणि स्वभाव कसे ओळखायचे? वाचा या लेखात

जगात कोणत्याही दोन माणसांचे बोटांचे ठसे सारखे नसतात. म्हणूनच बोटांचे ठसे आपली ओळख पटवायला सगळ्यात चांगली पद्धत आहे आणि म्हणूनच क्रिमनल्स पकडण्यात या फिंगरप्रिंट्सचा उपयोग होतो.

बोटांच्या ठस्यांच्या, म्हणजेच फिंगरप्रिंटच्या अभ्यासाला डर्माटोग्लायफिक्स (dermatoglyphics) म्हणतात.

यात बोटांच्या ठशांचा आकार, उंचवटे, त्यावर असलेली रेषा याचा अभ्यास केला जातो.

हातावरच्या रेषा (palmistry) वाचून जसं आपण एखाद्याबद्दल सांगू शकतो अगदी त्याच प्रकारे बोटांच्या ठशांवरून सुद्धा एखाद्याच्या स्वभावाबद्दल, त्याच्यात असलेल्या गुणांबद्दल किंवा त्यांच्या हुशारीबद्दल सांगता येतं.

Palmistry चे जसे विरोधक आहेत तसेच Dermatoglyphics चे सुद्धा आहेत.

पण त्याचबरोबर यावर विश्वास ठेऊन त्याचा अभ्यास करणारे सुद्धा अनेक अभ्यासक आहेत.

याच अभ्यासकांच्या मेहनतीमुळे आज आपल्याला माहीत असणारे असे ११ वेगवेगळे बोटांच्या ठशांचे प्रकार आहेत ज्यावरून लोकांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, स्वभावाबद्दल अंदाज व्यक्त करता येतो.

तुमच्या बोटांच्या ठशांचा आकार काय आहे? आणि त्यावरून तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय समजतं हे जाणून घ्यायची इच्छा आहे ना?

त्याचसाठी आज हा लेख आहे ज्यात आम्ही या ११ प्रकारच्या बोटांच्या ठशांबद्दल सांगणार आहोत.

चला तर मग पटकन तुमच्या बोटांचा ठसा कागदावर उमटवून बघा आणि तो खाली दिलेल्या कोणत्या ठश्याशी जुळतोय ते बघा.

१. सिम्पल आर्क

simple arch

ज्यांची फिंगरप्रिंट या आकाराची, म्हणजे सरळ साधी कमान असते ती लोकं सहसा आपल्या कामात, नातेसंबंधात कमालीची निष्ठावंत असतात म्हणून अशा लोकांवर आजिबात विचार न करता विश्वास ठेवता येतो.

ही लोकं जे काम करतील ते मन लावून करतात, त्यांना आपल्या कामाबद्दल आदर आणि प्रेम असते.

त्यामुळे त्यांच्यावर एखादं काम सोपवताना सुद्धा निर्धास्त राहता येतं.

ही लोकं कोणतीही रिस्क घेणं मात्र टाळत असतात, त्यांना साधं, सरळ आयुष्य जास्त पसंत असतं.

त्याचबरोबर बाहेर फिरण्यापेक्षा घरी बसून वेळ घालवण्याकडे या लोकांचा कल जास्त असतो.

२. टेन्टेड आर्क

tented arch

या आकाराची फिंगरप्रिंट असलेल्या लोकांचा स्वभाव आपल्यालाच गोंधळवून टाकणारा असतो.

एखाद्या दिवशी ते फार प्रेमळ असतात तर कधीतरी एकदम रुक्ष.

कलेत या लोकांना गती असते आणि त्यांच्यात वेगवेगळ्या संकटांना सामोरं जाण्यासाठी लागणारं मानसिक बळ पण असतं..

फक्त ती कमालीची मूडी असतात.

३. अल्नर लूप्स

ulner loop

अल्नर लूप्स प्रकारची फिंगरप्रिंट असणारी लोकं सहसा कोणाच्या अध्यात मध्यात नसतात.

लोकांना विरोध करून, स्वतःचं तेच खरं करण्यात यांना रस नसतो.

ते आपले आपल्याच धुंदीत, वारा येईल त्या दिशेने जाणारे असतात.

त्यांचा स्वभाव अतिशय शांत असतो. त्यांचा कोणाला त्रास होत नाही आणि ते सुद्धा कोणाचा त्रास करून घेत नाहीत.

४. रेडिअल लूप

Radial loop

या प्रकारची फिंगरप्रिंट असणारी लोकं आत्मकेंद्रित असतात.

त्यांना किंचितसा इगो सुद्धा असतो.

त्यांना स्वतःच्या विश्वात रमायला आवडतं. दुसऱ्याला चूक ठरवून त्यांना आपलं म्हणणं खरं करायची सुद्धा सवय असते.

ही लोकं मात्र विलक्षण हुशार आणि स्वतःच्या स्वतंत्र विचाराची असतात. कदाचित त्यांच्या हुशारीमुळेच त्यांना इगो असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

५. पिकॉक आय

peacocks eye

या आकाराची फिंगरप्रिंट असणारे लोक, कोणत्याही समूहाचे नेतृत्व खूप उत्तम प्रकारे करू शकतात.

ते इतरांना समजून घेऊन त्यांच्या गतीने काम करू शकतात.

त्यांना कला क्षेत्रात, लिखाणात गती असते.

या लोकांची दूरदृष्टी सुद्धा चांगली असते, म्हणूनच ते व्यवस्थित नियोजन करून इतरांचं नेतृत्व उत्तमरीत्या करू शकतात.

६. व्हेरिएन्ट पॅटर्न

varient eye

अशा आकाराची फिंगरप्रिंट असणाऱ्या लोकांची आपली वेगळीच मतं असतात.

आणि ती मांडण्याची त्यांची पद्धत सुद्धा काहीशी वेगळीच असते.

त्यामुळे त्यांची मतं जरी चुकीची नसली तरी ती मांडण्याची त्यांची पद्धत बऱ्याचदा चुकीची असते आणि त्याचमुळे ते विनाकारण इतरांचा रोष ओढवून घेतात.

७. प्रेस व्होर्ल

press-whorl

अशी फिंगरप्रिंट असणारी लोक खूप महत्वकांक्षी असतात.

त्यांना कोणत्याच बाबतीत हार पत्करणं मान्य नसतं आणि कुठल्याच गोष्टीत अपयश मिळू नये यासाठी ते प्रयत्नशील सुद्धा असतात.

त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी सतत प्रयत्न करायचा असतो.

या लोकांना अगदी लहान डिटेल्स बघण्यात उत्साह असतो आणि त्यांना प्रत्येक गोष्टीचं, खास करून पैशांचं नियोजन करायला आवडतं.

८. कम्पोझिट व्होर्ल

composite-whorl

या प्रकारची फिंगरप्रिंट असतात त्या लोकांना दुसऱ्यांशी संवाद साधायची कला चांगली अवगत असते.

त्याचबरोबर त्यांच्यात सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याचं स्किल सुद्धा खूप चांगलं असतं.

ते सहसा कोणत्याही परिस्थितीत पटकन रुळतात पण त्यांचं लक्ष एकाच गोष्टीत फार काळ लागून राहत नाही.

९. स्पायरल व्होर्ल

spiral whorl

या प्रकारची फिंगरप्रिंट असणारी लोकं सहसा स्वतःमध्ये रमणारी असतात.

त्यांच्या या स्वभावामुळे ते माणूसघाणे आहेत असा त्यांच्याबद्दल एक गैरसमज असतो पण ही लोकं खरंच फक्त स्वतःच्या विश्वात रमणारी असतात आणि एकांत त्यांना हवाहवासा वाटत असतो.

१०. इम्पलोडींग व्होर्ल

imploding-whorl

ही लोकं काहीशी लाजरी असतात. खूप लोकांमध्ये त्यांना बुजल्यासारखं होतं.

पण अशा आकाराची फिंगरप्रिंट असणाऱ्या लोकांचा एक गुण म्हणजे त्यांना एका वेळेस अनेक कामं, ज्याला आपण मल्टिटास्किंग म्हणतो, करता येते.

ही लोकं इतरांच्या मताचा आदर करतात आणि दुसऱ्यांची मतं जाणून घेण्यात त्यांना रस असतो.

११. कॉन्सन्ट्रीक व्होर्ल

conscentric

अशी फिंगरप्रिंट असणाऱ्या लोकांना दुसऱ्यांनी त्यांना काही सांगितलेलं किंवा शिकवलेलं खपत नाही.

त्यांना स्वतःसाठी गोल्स सेट करायला आणि ती मिळवायला स्वतः प्रयत्न करायला आवडतं.

त्यांचं स्वतःवर निस्सीम प्रेम असतं पण म्हणून ते इतरांचा अनादर करत नाहीत.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज मिळाली ना काहीतरी वेगळी माहिती? नवीन मित्र करताना, कोणावर विश्वास टाकताना त्या माणसाची फिंगरप्रिंट बघायला मिळाली तर सोपं होईल ना?

पण अशी सारखी फिंगरप्रिंट मिळवणं मात्र अवघडच!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “फिंगरप्रिंट्स वरून पर्सनॅलिटी आणि स्वभाव कसे ओळखायचे? वाचा या लेखात”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।