ऍमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल मध्ये १० ते १५ हजारांपर्यंतची सूट मुळवून पुन्हा बँकेकडून व्याजाशिवाय इ. एम. आय. ची सवलत कशी घेता येईल याबद्दल महत्त्वाची माहिती वाचा या लेखात.
आपण सध्या टीव्हीवर वर्तमानपत्रांत एक जाहिरात पाहतोय, ती म्हणजे १७ ऑक्टोबर पासून सुरू होणारा ऍमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल….
या तीन-चार दिवसांच्या सेलमध्ये वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स वर भरघोस सूट. बँकांकडून डेबिट आणि क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट इ. एम. आय. ची सवलत यांसारखे कित्येक फायदे मिळवता येणार आहेत.
याशिवाय सध्याच्या काळात बाजारात गर्दी न करता, घरातून हवी ती खरेदी हा पर्याय निवडणं कधीही चांगलं.
यावर बरेच जणांचं म्हणणं असंही असतं की, इतका स्वस्तात माल विकला जातो म्हणजे तो नक्कीच सदोष असणार.
पण मित्रांनो, यामागे कारण हे आहे की, करोडो चा टर्न ओव्हर होत असल्याने, असे सेल ठेऊन त्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते.
१७ ऑक्टोबर पासून हा ऍमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू होणार आहे.
यात आपण मोबाईल, फ्रीज, एसी, टीव्ही, लॅपटॉप यांसारख्या वस्तू ४ ते ५ किंवा अगदी १० हजाराची सूट मिळवून सुद्धा खरेदी करता येतील.
एवढंच नाही तर सणांच्या दिवसात बेडशीट, कुशन कव्हर, किचन अप्लायन्सेस, किंवा अगदी आपला किराणा सुद्धा तुम्हाला यात खूप चांगल्या दरात खरेदी करता येईल.
आता एक महत्त्वाचा विषय असा की, काही जणांचं असंही म्हणणं असतं की, अमेझॉन भारतीय कम्पनी नाही. यामुळे छोट्या दुकानदारांच्या धंद्यावर गदा येते.
तर मित्रांनो, अमेझॉन वर जोडल्या गेलेल्या भारतीय विक्रेत्यांकडूनच हा माल विकला जातो.
हजारो भारतीय कर्मचारी यासाठी काम करतात. भारतीय कुरियर कम्पन्या यात जोडल्या गेलेल्या असतात.
आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राहक म्हणून तुम्हा आम्हाला दिली जाणारी भरघोस सूट….
या लेखात येणाऱ्या सणांची खरेदी करण्यासाठी चांगल्या ऑफर कशा मिळवायच्या, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हा सेल सुरू होणार आहे १७ ऑक्टोबर पासून. यात सर्वात पहिली गोष्ट अशी की, या अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल मध्ये एच. डी. एफ. सी. कार्ड वर १० % चा इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे, आणि त्याच बरोबर नो कॉस्ट इ. एम. आय. सुद्धा आहे.
म्हणजे जर तुम्ही एखादा लॅपटॉप येत्या काळाची गरज म्हणून मुलांना ऑनलाईन शिक्षणाला उपयोगी असल्याने घ्यायचा विचार करत असाल तर हि अगदी उत्तम वेळ आहे.
हि सूट कशी घेता येईल ते बघा
जर एखादा ६०,००० रुपये किमतीचा लॉपटॉप तुम्ही पहिला आणि त्यावर अमेझॉन कडून १० टक्केची सवलत असेल तर, रुपये ५४०००/- अशी सवलतीची किंमत खरेदी साठी तुम्हाला मिळेल. आणि जर तुमच्याकडे एच. डी. एफ. सी. चे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल तर त्या ५४००० वर इन्स्टंट १० टक्के डिस्काउंट म्हणजे रु. ४८,६००/- हि तुमची खरेदीची किंमत होईल आणि त्यातही नो कॉस्ट इ. एम. आय. तुम्ही निवडू शकाल.
म्हणजे हे रु. ४८,६००/- तुम्ही बँकेला कुठल्याही व्याज शिवाय सुलभ हप्त्यांत देऊ शकाल. हि ऑफर मी स्वतः दोन लॅपटॉप आणि एक मोबाईल घेण्यासाठी वापरली असल्याने यात कुठलीही अडचण येत नाही हे मी तुम्हाला सांगू शकते.
म्हणजे बघा नॉर्मल किमतीपेक्षा ३ ते ५ किंवा अगदी १०-१५ हजारने स्वस्त किमतीत तुम्ही चांगली खरेदी करू शकता.
यासाठी तुमच्याकडे एच. डी. एफ. सी. चे कार्ड नसेल आणि खरेदीचा तुमचा विचार असेल तर HDFC चे कार्ड असलेल्या मित्राबरोबर बोलून, आधीच त्याला खरेदीचे पैसे देऊन, या खरेदीची तजवीज तुम्ही करू शकता.
याशिवाय इतरही बँकांच्या आपापल्या ऑफर्स आहेतच. नो कॉस्ट इ. एम. आय. ची सवलत तर इतरही बऱ्याच बँकांनी दिलेली आहे. अमेझॉन वर नो कॉस्ट इ. एम. आय. ची सवलत देणाऱ्या काही बँकांच्या नावाची लिस्ट खाली बघा.
यात आणखी दुसरी गोष्ट अशी आहे कि यात एक्सचेंज चा पर्याय सुद्धा तुम्ही निवडू शकता. म्हणजे एखादा मोबाईल जर तुम्ही घेत असाल आणि एक्सचेंज चा पर्याय निवडला तर जुना मोबाईल एक्सचेंज करून पुन्हा ३ ते ४ हजारांची अतिरिक्त सूट मिळून वरती सांगितलेल्या सर्व सूट तुम्ही मिळवू शकाल.
हा सेल १७ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. पण ज्यांच्याकडे ऍमेझॉन प्राईम ची मेम्बरशीप आहे त्यांना हा सेल १६ ऑक्टोबर पासूनच खुला होणार आहे. आणि जसा जसा सेलचा वेळ पुढे जाईल तसे स्टॉक कमी होऊन डिस्काउंट कमी होत जातील (एच. डी. एफ. सी. चा डिस्काउंट मात्र शेवट्पर्यंत तसाच राहील).
म्हणून खरेदीचा विचार असेल तर ऍमेझॉन प्राईम ची मेम्बरशीप आधीच घेऊन ठेवा. यासाठी तुम्हाला १२९ रुपयांची मेम्बरशीप घेता येईल. म्हणजे २३ ऑक्टोबर ला रिलीज होणार मिर्झापूर २ घरीच बघण्याची सोया सुद्धा यातच होईल.
म्हणून आताच अमेझॉन प्राईमची मेम्बरशीप घेण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा
आणि हो ऍमेझॉन प्राईम बरोबर अमेझॉन म्युझिक फ्री मिळतं, बरका… त्यामुळे या दिवाळीची सुरक्षित आणि किफायतशीर खरेदी करण्याची सुरुवात करण्यासाठी आधी हि अमेझॉन प्राईम ची मेम्बरशीप घेऊन ठेवा.
आता पुढे आम्ही तुम्हाला काही ठराविक वस्तू निवडून त्याचे स्टोअर देणार आहोत. यात जाऊन म्हणजे (यावर क्लिक करून) तुम्ही १६ तारखेपासून (जर ऍमेझॉन प्राईमची मेम्बरशीप घेतली तर) नाहीतर १७ ऑक्टोबर पासून आपल्याला हवी ती वस्तू रास्त दरात खरेदी करू शकता.
ऍमेझॉन वरती रिटर्न पॉलिसी सुद्धा खूप पारदर्शक असल्याने निश्चिन्तपणे खरेदी करायला आम्ही तुम्हाला सुचवू शकतो.
तुम्हाला हवी असलेली वस्तू खाली दिलेल्या स्टोअर मध्ये दिसली नाही तर वरती सर्च बार मध्ये जाऊन ती तुम्ही सर्च करू शकता. या स्टोअर मध्ये काही प्रॉडक्ट्स वरती आम्ही त्याबद्दल विशेष नोट दिलेली आहे. वस्तू निवडताना त्याचीही मदत तुम्ही घेऊ शकता.
यामध्ये जर तुम्ही बघाल तर लॅपटॉप वर एक्सचेंज करून रु. २००००/- पर्यंत सूट मिळवता येईल.
ऍमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल मध्ये चांगल्या ऑफर्स असलेल्या वस्तूंची एका ठिकाणी निवड करून ठेवलेले स्टोअर बघण्यासाठी येथे क्लिक करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.