तुम्हाला पण लाईट बिल जास्त येते का? मग हा लेख वाचाच!
सध्या सगळीकडे एकच तक्रार आहे, ती म्हणजे वाढीव लाईट बिल येण्याची.
मागच्या सहा महिन्यात आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनाच या वाढीव लाईट बिलाच्या समस्येला कमीजास्त प्रमाणात तोंड द्यावे लागले आहे.
पण असे एकाएकी लाईट बिल येण्यामागे नक्की कारण काय आहे?
याचा आपण विचार केला आहे का?
मित्रांनो, या वाढीव बिलाचा त्रास सगळ्यांनाच होत आहे.
सध्या तर सगळीकडेच तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
त्यात अजून कोणता जास्तीचा खर्च नको वाटतो.
या लाईट बिल संबंधी सुद्धा असेच झाले आहे.
याविषयी वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत किंवा टीका केली जात आहे.
पण दोष देऊन किंवा व्यवस्थापनाला नावे ठेऊन आपला प्रॉब्लेम सुटणार आहे का? नाही ना?
मग त्यात आपली ऊर्जा का फुकट घालवा? मग काय करायचे? तेच सांगण्यासाठी हा लेख आहे.
आम्ही तुम्हाला नेहमीच उपयोगी अशी माहिती शेयर करत असतो. आज अशीच या वाढीव लाईट बिलाबद्दल उपयुक्त माहिती या लेखातून देणार आहोत.
वाढीव लाईट बिल नक्की कशाने येतंय? त्यावर उपाय काय?
सगळ्यात आधी आपण बघू की नक्की लाईट बिल जास्त का येत आहे.
हे समजण्यासाठी लाईटचे बिलींग कसे होते हे समजून घेणे गरजेचे आहे.
लाईट बिलाचा सध्याचा दर पहिल्या 100 युनिटसाठी रुपये 3.46 प्रति युनिट असा आहे.
आणि 100 युनिटच्या पुढचा प्रत्येक युनिटचा दर हा दुप्पट, म्हणजेच रुपये 7.43 प्रति युनिट असा आहे.
हेच रिडींग जर 300 च्या वर गेले तर हाच दर तिप्पट, म्हणजे रुपये 10.38 इतका आहे!
आता जर रिडींग वेळच्या वेळी घेतले तर जितके युनिट झाले असतील तितके बिल आपल्याला येते.
सर्वसामान्य भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबाला महिन्याला साधारण 90 युनिट लागतात.
त्यामुळे बिलचे रिडींग जर महिन्याचे महिन्याला घेतले तर रुपये 3.46 प्रति युनिट प्रमाणे बिल येते.
एखाद्या वेळी जास्त युनिट वापरले तर त्या महिन्यापुरते बिल जास्त येऊ शकते.
मीटरचे रिडींग जर महिन्याच्या महिन्याला न घेता जास्त अवधीने घेतला तर 100 युनिटच्या वर प्रत्येक युनिटमागे दर दुप्पट होणार आणि 300 च्या वर रिडींग गेल्यास तिप्पट दराने बिल केले जाते.
हे वाचून तुमच्या लक्षात आलेच असेल की हा सगळा प्रॉब्लेम मीटर रिडींग महिन्याच्या महिन्याला न घेतल्यामुळे येत आहे.
महिन्याच्या वर जितके दिवस जातात, तितके युनिट जास्त पडत राहतात आणि त्यामागचा दर हा दर 100 युनिटने दुप्पट, तिप्पट होत जातो.
तर या समस्येवर तोडगा काय आणि कसा काढावा हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल.
वाढीव लाईट बिल येऊ नये याकरता कोणती खबरदारी बाळगावी हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
1. आपल्या मीटरचे रिडींग घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि आयडी नंबर लिहून घ्यावा.
2. त्यावर रिडींग घेतलेल्या दिवसाची तारीख लिहावी आणि त्याखाली आपली आणि त्या कर्मचाऱ्याची सही घेऊन ठेवावी.
3. यामुळे पुढील रिडींग हे 30 दिवसानंतरच घेतले जात आहे ना याबद्दल आपल्याला खबरदारी बाळगता येईल.
4. पुढील रिडींग घेण्यासाठी जर विद्युत मंडळातील कर्मचारी 30 दिवसांनंतर आला तर तशी महाराष्ट्र विद्युत मंडळाकडे रीतसर तक्रार करता येऊ शकते.
5. एखादी मोठी सोसायटी असेल तर या कामाची जवाबदारी एखाद्या व्यक्तीकडे सोपवता येईल.
त्या व्यक्तीने फ्लॅटधारकांच्या मीटर रिडींगची आणि ती घ्यायला येत असलेल्या तारखांची नोंद ठेवायचे काम करायचे.
एकदा एखाद्या प्रॉब्लेम मागचे कारण लक्षात आले तर त्या प्रॉब्लेमला मुळापासून उपटून टाकता येते.
गेल्या काही महिन्यात हा त्रास सगळ्यांनीच सहन केला आहे.
या जागतिक महामारीमुळे रिडींग वेळेवर घेणे जमले नसावे पण त्याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य नागरिकाला भरावा लागला.
या मागचे कारण मात्र लक्षात येत नव्हते.
आजचा हा लेख वाचून गेल्या काही महिन्यात लाईट बिल वाढीव का येत आहे, त्यामागचे नेमके लॉजिक काय आहे हे आपल्याला आज समजले.
लाईट बिल वाढीव येऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची हे सुद्धा आपण बघितले.
त्यात सध्याच्या काळात मीटर चे रिडींग घ्यायला कर्मचारी येत नसल्याने मीटर रिडींग साठी उपलब्ध करून दिलेल्या ऍप चा वापर करून आपणच वेळच्या वेळी रिडींग पाठवून द्यायचे.
या वाढीव लाईट बिलांच्या बाबतीत आपण असे अनभिद्न्य होतो तशाच अजून काही गोष्टींची आपल्याला माहिती नसते.
पण एक ग्राहक म्हणून या खालील गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेतच.
म्हणूनच या लेखाच्या पुढच्या भागात आम्ही वीज कायदा 2003 सेक्शन 57 मधल्या काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.
1. विजेच्या नवीन कनेक्शनसाठी अर्ज केल्यावर विजेचे कनेक्शन 30 दिवसात मिळणे अपेक्षित असते.
तसे न मिळाल्यास ग्राहकाला दर आठवड्याला रुपये 100 इतकी भरपाई मिळते.
2. ट्रान्सफॉर्मर बिघडल्यापासून 48 तासात दुरुस्त केला गेला नाही तर दर तासाला रुपये 50 नुकसान भरपाई ग्राहकाला मिळते.
3. मीटर रिडींगचा फोटो न काढता, सरासरी किंवा अंदाजे वीज बिल आकारले जाणे बेकायदेशीर आहे. असे झाल्यास ग्राहकाला दर आठवड्याला रुपये 100 नुकसान भरपाई मिळते.
4. ग्राहकाकडून वीज बिल वेळेत भरले न गेल्यास किंवा वादग्रस्त बिल न भरल्यास विजेचे कनेक्शन काढून टाकण्यापूर्वी तशी लेखी नोटीस ग्राहकाला देणे अनिवार्य आहे.
5. माणूस किंवा गुरे विजेच्या शॉकने मरण पावल्यास त्याची संपूर्ण भरपाई वीज खात्याने घ्यायची असते. मनुष्यहानीची भरपाई 5 लाख इतकी असते.
6. कमर्शिअल वीज कनेक्शन पैकी शाळा, कॉलेज, हॉस्पिटल यांना वीज दर कमी करून मिळतो.
7. नवीन कनेक्शनसाठी लागणाऱ्या सामानाचा, पोल, वापर, केबल इत्यादीचा खर्च कंपनीने करायचा असतो.
8. वीज पोल ते मीटर पर्यंत लागणाऱ्या केबलचा खर्च असल्यास तो परत मिळतो.
या लेखात दिलेल्या टिप्स अमलात आणून लाईट बिलाची किंमत वाढू नाही द्यायची आणि ही अतिशय उपयुक्त माहिती आणि शिवाय लेखाच्या शेवटी दिलेली महत्वाची माहिती आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेयर करायची!
आहे ना सोपे?
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Mast avadli mahiti