प्लॅस्टिकच्या भांड्यावरचे चिवट डाग आणि दुर्गंधी घालवण्यासाठी उपाय

प्लास्टिकच्या भांड्यांवरचे चिवट डाग घालवायचे आहेत?? मग हे घरगुती उपाय करा…

प्लास्टिकचा जाणूनबुजून शोध कोणी लावला नाही तर तो एक अपघाती शोध होता.

एक शास्त्रज्ञ संशोधन करत असताना त्यांच्याकडून चुकून एक रासायनिक घटक तयार झाला.

तो म्हणजे प्लास्टिक.

चिवट, पारदर्शक, सहज विघटन न होणारा, दीर्घकाळ टिकणारा, स्वस्त घटक.

म्हणूनच हल्ली घराघरात, नव्हे जगभर प्लास्टिकचं साम्राज्य आहे.

घरातल्या फर्निचर पासून स्वयंपाक घरातल्या भांड्यांपर्यंत प्लास्टिकचं अस्तित्व आहे.

प्लास्टिकची पारदर्शकता, रंगसंगती, टिकाऊपणा यामुळे कित्येक गृहिणी प्लास्टिकला पसंती देतात.

या वस्तू स्वस्त आणि उपयोगी तर असतातच आणि बाजारात सहज मिळतात.

प्लास्टिकचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत.

अशा भांड्यात आपण बरेच पदार्थ साठवतो. मायक्रोवेव्ह मध्ये शिजवतो सुद्धा.

पण ठराविक पदार्थ सतत त्यातच ठेवल्यामुळे पदार्थाचा वास त्या भांड्याला येतो.

दुसरा पदार्थ त्यात ठेवता येत नाही.

इतकंच नाही तर काही पदार्थांचे चिवट डाग भांड्याला लागतात.

त्यामुळे काही दिवसांनी प्लास्टिकच्या वस्तू खराब दिसू लागतात.

मग त्या वापरण्यायोग्य राहत नाहीत.

अशा कटकटी दूर करण्यासाठी स्वयंपाक घरातलीच काही गुपितं वापरता येतील.

बघा मग काय जादू होईल ते…

१. बेकिंग सोडा :

बेकिंग सोडा हा पाव, केक असे पदार्थ चांगले होण्यासाठी वापरतातच.

पण चिवट डाग असलेली भांडी घासायला तो डिटर्जंट सारखी मदत करतो.

प्लास्टिक भांड्याला लागलेले चिवट डाग, उग्र वास जाण्यासाठी बेकिंग सोडा उपयुक्त आहे.

त्यासाठी असं करा, एक बादली पाण्यात तीन चमचे बेकिंग सोडा ढवळून ठेवा.

त्यात डागाळलेली प्लास्टिक भांडी पूर्णपणे बुडवून ठेवा. अर्धा तास तशीच राहू दे.

नंतर बाहेर काढून स्क्रबरने स्वच्छ घासून स्वछ पाण्याने विसळून घ्या. ताबडतोब भांडं स्वच्छ दिसेल.

२. व्हिनेगर :

व्हिनेगर हे सुद्धा भांडी साफ करण्यासाठी एक जबरदस्त केमिकल आहे.

प्लास्टिक भांड्यावरचे डाग, उग्र वास हटवण्यासाठी ते उपयुक्त आहे.

व्हिनेगर पाण्यात मिसळून भांड्याला डाग लागलेल्या ठिकाणी लावायचं.

थोडा वेळ तसच ठेवून स्क्रबरने व्यवस्थित घासायचं.

मग स्वच्छ पाण्याने विसळून घ्यायचं. डाग, दुर्गंध नाहिशी होऊन भांडी नवी कोरी दिसतात.

३. लिक्विड क्लोरिन ब्लिच :

ब्लिचमुळे कपडे स्वच्छ होतात ते आपण पाहिलं असेल.

लिक्विड क्लोरिन ब्लिच वापरलं तर भांडी सुद्धा चकचकीत होतात.

त्यामुळे प्लास्टिकची डागाळलेली दुर्गंध येणारी भांडी जरूर लिक्विड क्लोरिन ब्लिचने साफ करावी.

भांडी अगदी नव्यासारखी कोरी करकरीत दिसतात.

४. कॉफी :

कॉफी खरतर जगभरातील लोकांच आवडत पेय.

पण कॉफी पावडरचा उपयोग प्लास्टिक भांडी साफ करण्यासाठी सुद्धा होतो.

डागाळलेल्या प्लास्टिक भांड्याला कॉफी थोडा वेळ लावून ठेवायची.

मग व्यवस्थित घासून भांडं पाण्याने स्वच्छ धुवायचं.

आहेत की नाही या सोप्या टीप्स. तुमच्याही घरात अशी भांडी असतील तर या टिप्स जरूर वापरून बघा.

पुन्हा एकदा तुमची प्लास्टिकची भांडी नवीकोरी दिसतील.

इतकंच काय तुमच्या स्वयंपाक घराचा रुबाब सुद्धा वाढेल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।