जर ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर तुम्हाला माहीत हवेत ‘हे’ नियम

जर तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी चालवत असाल तर केव्हाना केव्हा ट्रॅफिक पोलिसांशी तुमचा संपर्क आलाच असेल. बहुतेक वेळा पोलिसांनी अडवलं की लोक घाबरून जातात.

परंतु घाबरू नका, तुम्हाला देखील वाहनचालक म्हणून काही अधिकार आहेत. अर्थात नियम ही आहेत.

तर चला, आज जाणून घेऊया वाहनचालकाचे अधिकार आणि नियम

जर तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं तर पळून जाण्याचा प्रयत्न न करता तुम्ही थांबलं पाहिजे आणि त्यांनी मागितलेली कागदपत्र दाखवली पाहिजेत.

मात्र खरं पाहता फक्त ड्रायव्हिंग लायसन्स दाखवणे सक्तीचे आहे, इतर कागदपत्रे दाखवणे सक्तीचे नाही.

आपली कागदपत्रे ट्रॅफिक पोलिसांकडे सुपूर्त करू नका तर त्यांना ती फक्त ‘दाखवा’.

कागदपत्रे दाखवणे हे ‘मोटार वाहन अधिनियम’ कलम १३० अंतर्गत सक्तीचे आहे, परंतु फक्त ‘दाखवणे’, सुपूर्त करणे नाही.

शिवाय तो वाहतूक अधिकारी गणवेश धारी असणे आवश्यक आहे.

तुमच्या विरुद्ध कोणतेही चलान जारी करण्यासाठी ट्रॅफिक पोलीसाकडे चलान बूक किंवा ई चलान मशीन असणे आवश्यक आहे. अन्यथा ते दंडात्मक कारवाई करू शकत नाहीत.

ट्रॅफिक पोलिसांशी कोणताही वाद न घालता त्यांना सहकार्य करा.

जर तुमच्याकडून चूक झाली असेल तर ती कोणत्या परिस्थितीत झाली हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.

कदाचित तुमचं म्हणणं मान्य करून ते तुम्हाला सोडून देतील. मोटार वाहन अधिनियमानुसार,

1) लाल सिग्नल तोडला तर

2) अनुचित जागी पार्किंग केले तर

3) विना हेलमेट दुचाकी चालवली तर

4) गाडीत धूम्रपान केले तर

5) गाडीची नंबर प्लेट स्पष्ट दिसत नसेल तर

6) विना परवाना गाडी चालवली तर

7) विना रेजिस्ट्रेशन गाडी चालवली तर

8) गाडीचा विमा उतरवलेला नसेल तर

9) Puc काढलेले नसेल तर

वाहनचालक अपराधी ठरू शकतो. त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

परंतु जरी तुमची चूक असेल तरी पोलिसांना लाच देऊन निसटण्याचा कधीही प्रयत्न करू नका.

त्यापेक्षा योग्य तो दंड भरून केस संपवण्याचा प्रयत्न करा.

विना लायसन्स किंवा रेजिस्ट्रेशन कधीही गाडी चालवू नका, वाहतूक अधिकारी तुमची गाडी जप्त करू शकतात.

परंतु तुमचे लायसन्स किंवा गाडी जप्त करताना योग्य ती पावती देणे आधिकाऱ्यावर बंधनकारक आहे.

जोवर तुम्ही गाडीत बसलेले असता तोवर तुमची गाडी जप्त केली जाऊ शकत नाही.

जर कोणत्याही अपराधासाठी वाहतूक अधिकाऱ्यानी तुम्हाला अटक केली तर २४ तासात तुम्हाला मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करणे बंधनकारक आहे.

आणि सर्वात महत्वाचे हे की जर वाहतूक अधिकारी तुम्हाला त्रास देत असतील तर तुम्ही त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करू शकता.

आणि आणखी महत्वाचे हे की जर तुमच्या विरोधात चलान जारी केले गेले तर त्यावर खालील नोंदी आहेत ह्याची खातरजमा नक्की करा..

1) सुनावणी कोर्टाचे नाव व पत्ता

2) घडलेल्या घटनेचे तपशीलवार वर्णन

3) चौकशीची तारीख

4) वाहनाची माहिती

5) अपराध्याचे नाव व पत्ता

6) चलान अधिकाऱ्याचे नाव, सही व शिक्का

तर मित्रांनो ट्रॅफिक नियमांचे पालन करा, आपल्या अधिकारांविषयी जागरूक रहा आणि कारवाई टाळा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “जर ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर तुम्हाला माहीत हवेत ‘हे’ नियम”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।