भारतीय बाजारपेठेत गुगल सज्ज
ऑनलाईन जगात अग्रस्थान पटकावणाऱ्या गूगलने पेमेंटच्या दुनियेत मोबाईलवरून पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी तेज (हिंदीतील तेझ हा शब्द, जो ‘ वेग’ या अर्थाने वापरला जातो) या नावाचे अॅप भारतीय बाजारात आणले आहे .१८ सप्टेंबर २०१७ रोजी या अॅपचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एक छोटा व्यवहार करून केले. हे वॉलेट नाही, नॅशनल क्लिअरींग कॉरपोरेशने UPI (Unified Payment Interface) ही प्रणाली एक वर्षापुर्वी विकसित केली होती. याच प्रणालीवर हे अॅप काम करीत असून गूगलने NCCI शी करार केला आहे. या व्यवहारांच्या सुरक्षिततेची दोघांनीही हमी घेतली आहे. यासाठी कोणतेही शुक्ल द्यावे लागणार नाही. UPI प्रमाणेच हे अॅप वापरायचे असून ते वापरण्याची पद्धत “यू पी आई एक पाऊल नव्या अर्थक्रांतीकडे” या लेखात सांगितली आहे. या अॅपचे साहाय्याने 24*7 पैसे पाठवणे, खात्यात रक्कम भरणे, बीले भरणे काही शक्य होते.
यासाठी गूगल प्ले स्टोरवरून हे अॅप डाउनलोड करावे लागेल. आपल्या बँक खात्याशी केवळ एकदाच जोडून (Link) घ्यावे. यासाठी आपला मोबाईल नंबर या खात्याशी संलग्न असणे जरुरीचे आहे .हे करण्यासाठी बँक खाते क्रमांक आई एफ सी कोड द्यावा लागत नाही .त्यानंतर हे अॅप गूगल पिन किंवा स्क्रीनलॉक देवून सेट करावे लागेल .यानंतर कॅशमोडचे मदतीने पैशांचे हस्तांतरण बँक तपशील न देता केवळ आभासी पत्त्यावर (Virtual Address) करता येईल .याशिवाय या अॅपचे सहायाने क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डच्या मदतीने पेमेंट करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे .हे अॅप अँड्रॉइड आणि आई. ओ. एस. (IOS ) या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून इंग्रजीशिवाय हिंदी , मराठी , गुजराती , कन्नड , तामीळ , तेलगू आणि बंगाली भाषेत कार्यरत आहे .यामुळे पेटिएम मोबिक्विक यासारख्या वॉलेट समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे .
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.