लॉन्ग वीकएंड म्हटले की फिरायला जायचे डोक्यात येते आणि फिरायला जायचे म्हटले की आपल्या जवळपासची काही ठराविक ठिकाणेच आपल्या डोळ्यासमोर येतात.
खासकरून एक फक्त वीकएंड पुरत्या मर्यादित अशा दोन दिवसाच्या ज्या सहली आपण करतो त्याकरता ठरलेली अशी काही ठिकाणे असतात.
पण दर वेळेला अशा ठरलेल्या ठिकाणी जायचा कंटाळा येऊ शकतो. महाराष्ट्र खरेतर आपल्या नावाप्रमाणेच मोठा आहे.
आपल्या या राज्यात कोकणातल्या लाल माती पासून ते विदर्भातल्या काळ्या मातीपर्यंत अनेक वेगवेगळी ठिकाणे आहेत.
चल तर मग पाहूया महाराष्ट्रातली अशीच काही सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणे.
१. कर्जत (पुण्यापासून अंदाजे १०७ किमी)
कर्जत हे देखील पश्चिम पर्वतरांगांमधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील कोंडाणा लेणी, भिवपुरी धबधबा आणि इतर निसर्गसौंदर्य बघण्यासारखे आहे. तसेच येथे रॅपलिंग आणि पॅराग्लायडिंग चा आनंद घेता येऊ शकेल.
कर्जतला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – ऑक्टोबर ते मे
२. कोलाड (पुण्यापासून अंदाजे ११३ किमी)
कोलाड येथील कुंडलिका नदीत संपूर्ण वर्षभर रिव्हर राफटिंग चा आनंद घेता येऊ शकतो. येथील धरणाचे दरवाजे उघडल्यावर नदीची पाण्याची पातळी वाढते आणि थरारक अशा राफटिंग चा आनंद घेता येतो.
कोलाडला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – जून ते सप्टेंबर
३. कर्नाळा पक्षी अभयारण्य (पुण्यापासून अंदाजे १२० किमी)
तुम्हाला वनराई आणि पक्षी निरीक्षणाचा छंद असेल तर तुम्ही कर्नाळा अभयारण्याला जरूर भेट द्या. थंडीच्या दिवसात तर येथे जवळजवळ ३५ स्थलांतरीत पक्षी दिसतात.
कर्नाळाला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – ऑक्टोबर ते मार्च
४. महाबळेश्वर (पुण्यापासून अंदाजे १२० किमी)
प्रेक्षणीय स्थळांची यादी ज्याशीवाय पूर्ण होऊच शकत नाही असे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. येथे अनेक सुंदर पॉईंट्स ण भेट देण्याबरोबरच वेण्णा तलावात बोटिंग आणि जगप्रसिद्ध स्ट्रॉबेरीज चा आनंद घेता येतो.
महाबळेश्वरला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – ऑक्टोबर ते मे
५. माथेरान (पुण्यापासून अंदाजे १२५ किमी)
समुद्र सपाटीपासून २६०० फुट उंचीवर असलेले माथेरान हे उत्तम थंड हवेचे ठिकाण आहे. तेथे जाण्यासाठी असलेली छोटी रेल्वे हे लहान मुलांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र आहे.
माथेरानला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – ऑक्टोबर ते मे
६. कास पठार (पुण्यापासून अंदाजे १३६ किमी)
कास पठार हे निरनिराळ्या रंगीत फुलांसाठी प्रसिद्ध आहे. अगदी परिकथेतील ठिकाणासारखे सुंदर हे विविध फुलांनी नटलेले ठिकाण दिसते. सप्टेंबर पासून येथे फुले दिसु लागतात आणि ह्याला फुलांचे पठार असेच म्हटले जाते.
कास पठार ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – सप्टेंबर ते मे
७. माळशेज घाट (पुण्यापासून अंदाजे १३८ किमी )
पावसाळ्यात निसर्गसौंदर्याने नटलेला माळशेज घाटाचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. येथील निरनिराळे धबधबे, दाट धुके आणि हिरव्या दऱ्या पाहून मान प्रफुल्लित होते.
माळशेज घाट ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – जून ते ऑक्टोबर
८. अलिबाग (पुण्यापासून अंदाजे १४३ किमी)
उत्तम सागर किनारा लाभलेले अलिबाग हे पुण्यापासून जवळचे पर्यटन स्थळ आहे. येथे समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या अलिबाग च्या किल्ल्याला भेट देता येते. तसेच अत्यंत ताज्या मासळीचा आनंद खवय्याना घेता येतो.
अलिबाग ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – ऑक्टोबर ते मार्च
९. दिवे आगर (पुण्यापासून अंदाजे १६० किमी)
दिवे आगर हे शांत , पर्यटकांनी न गजबजलेले असे ठिकाण आहे. स्वच्छ समुद्रकिनारा लाभलेला असल्यामुळे येथे समुद्री पक्षी, डॉल्फिन्स ह्यांच्या दर्शनाचा आनंद घेता येतो.
दिवेआगर ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – ऑक्टोबर ते मार्च
१०. मुरुड जंजिरा (पुण्यापासून अंदाजे १६१ किमी)
महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध जलदुर्गांपैकी एक म्हणजे मुरुड चा जंजीरा किल्ला. येथे जाण्यासाठी राजापुरीहून समुद्रातून बोटीने जावे लागते. जुन्या स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमूना असलेला जंजीरा किल्ला इतिहास प्रेमींचे आवडते ठिकाण आहे.
मुरुड जंजिरा ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – ऑक्टोबर ते मार्च
११. मुंबई (पुण्यापासून अंदाजे १६२ किमी)
स्वप्नांचे शहर म्हणवले जाणारे मुंबई हे महानगर पुण्यापासून १६२ किमी वर आहे. निरनिराळी उत्तम प्रेक्षणीय स्थळे, वस्तु व प्राणी संग्रहालये तसेच उत्तम हॉटेल्स आणि अर्थातच बॉलीवूड हे सर्व मुंबईत आहे. त्यामुळे मुंबई ला भेट देण्याचे आकर्षण आबाल वृद्ध सर्वांना असतेच.
मुंबई ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – संपूर्ण वर्षभर
१२. आंबोली (पुण्यापासून अंदाजे १६५ किमी)
आंबोली हे पश्चिम घाटरांगांमधील निसर्ग सौदर्याने नटलेले ठिकाण पुण्यापासून १६५ किमी वर आहे. येथे सर्वाधिक पाऊस पडतो, त्यामुळे पावसाळ्यात विविध धबधबे दिसतात. तर थंडीत दाट धुक्याने हा परिसर वेढलेला असतो.
आंबोली ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – संपूर्ण वर्षभर
१३. काशीद (पुण्यापासून अंदाजे१७० किमी)
पांढरी वाळू असलेला उत्तम आणि स्वच्छ समुद्र किनारा लाभलेले गाव म्हणजे काशीद. हे पुण्यापासून १७० किमी वर आहे. गर्दी कमी असल्यामुळे स्वच्छ असणारा किनारा, निरनिराळे समुद्री खेळ आणि ताजी मासळी ह्याचा आनंद इथे लुटता येतो.
काशीद ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – ऑक्टोबर ते मार्च
१४. भंडारदरा (पुण्यापासून अंदाजे १७२ किमी)
भंडारदरा हे पुण्यापासून जवळचे सहलीचे ठिकाण विल्सन डॅम आणि आर्थर लेक ने सजलेले आहे. इथे बोटिंग , मासेमारी ह्यांचा आनंद घेता येऊ शकतो.
भंडारदरा ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – ऑक्टोबर ते मे
१५. कळसुबाई (पुण्यापासून अंदाजे १८० किमी)
समुद्र सपाटीपासून ५४०० फुट उंच असणारे कळसुबाई चे शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण आहे. पुण्यापासून १८० किमी वर असलेले हे शिखर सर करणे हे सर्व गिर्यारोहकांचे स्वप्न असते. हा ट्रेक दिवसा व रात्री दोन्ही वेळा करता येतो.
कळसुबाई ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – संपूर्ण वर्षभर
१६. टाकवे लेक (पुण्यापासून अंदाजे १९२ किमी)
मानवनिर्मित असणारा टाकवे तलाव हा तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. इथे थरारक असे स्विमिंग, कयाकिंग, राफटिंग , नेट climbing हे साहसी खेळ खेळता येतात.
टाकवे लेक ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – ऑक्टोबर ते मे
१७. वेळास बीच (पुण्यापासून अंदाजे १९३ किमी)
पुण्यापासून जवळ असणारा वेळास हा समुद्र किनारा समुद्री कासवे आणि त्यांनी घातलेली अंडी ह्यासाठी प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यात अनेक लहान लहान समुद्री कासवे अंड्यातून बाहेर निघून लगबगीने समुद्राकडे जाताना येथे दिसतात.
वेळास बीच ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – ऑक्टोबर ते मार्च
१८. सांधण व्हॅली (पुण्यापासून अंदाजे १९८ किमी)
उंच डोंगरकडे आणि खोल दऱ्या ह्यांनी वेढलेला सांधण व्हॅली चा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. पावसाळ्यात येथे अनेक रौद्र धबधबे दिसतात.
सांधण व्हॅली ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – संपूर्ण वर्षभर
तर ही आहेत पुण्याच्या परिसरातील थोड्या वेळात जाऊन येता येईल अशी सुंदर ठिकाणे. ह्या ठिकाणांना जरूर भेट द्या. वीक एंड च्या सुट्टीत काय करावे हा प्रश्न आता नाही, तर त्या प्रश्नाची सुंदर उत्तरे आपल्याकडे तयार आहेत.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.